मुंबई

भौगोलिक माहिती

 

मुंबई शहर

मुंबई उपनगर

क्षेत्रफळ

१५७ चौ.कि.मी.

४४६ चौ.कि.मी.

पर्जन्यमान

१९० से.मी.

१९० से.मी.

नद्या

मिठी,दहिसर,पोईसर.

मिठी,दहिसर,पोईसर.

हवामान

उष्ण व दमट

तापमानात तफावत

दिवसा ३३° से व रात्री १९° से. तापमान

उष्ण व दमट

किमान तापमान २२° से

 

जनगणना २०११

 

मुंबई शहर

मुंबई उपनगर

एकूण लोकसंख्या

३१,४५,९६६

९३,३२,४८१

लोकसंख्येची घनता

२००३८

२०,९२५

लिंग गुणोत्तर प्रमाण

१०००:८३८

१०००:८५७

साक्षरता

८८.४८%

९०.९०%

इतिहास

 • मुंबईच्या परिसरावर कोकणासह प्राचीन काळी अभीर राजाची सत्ता होती.नंतर त्रैकुटक राजवटीची सत्ता निर्माण झाली.
 • पुढे हे क्षेत्र मौर्य,चालुक्य,शिलाहार,यादव,इस्लाम राजवटीखाली राहिले.
 • इ.स.१५३४ मध्ये पोर्तुगीजांनी मुंबई व वसई येथे वर्चस्व् निर्माण केले.
 • इ.स.१६६१-६२ च्या दरम्यान इंग्लंड चा राजा दुसरा चार्ल्स व पोर्तुगालची राजपुत्री इन्फांटा कॅथरीन यांच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी मुंबई बेट दुसरया चार्ल्सला भेट म्हणून दिले.
 • दुसरा चार्ल्स याने ईस्ट इंडिया कंपनीस मुंबई बेट भाड्याने दिले.
 • पुढे काही काळ या क्षेत्रावर मराठ्यांनी आपले नियंत्रण निर्माण करण्यात यश मिळविले.
 • इ.स.१८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाल्याबरोबर इंग्रजांचे मुंबईवर पूर्णपणे अधिराज्य निर्माण झाले.
 • मुंबई या नावाच्या उत्प्तीविषयी विविध मते आहेत.मासेमाऱ्यानी मुंबादेवीचे मंदिर बांधले त्यामुळे मुंबादेवी पासून शहराला ‘मुंबई’ हे नाव पडले.
 • मोठा कुलाबा,धाकटा कुलाबा,माझगाव,परळ,माहीम,मुंबई,वरळी ही सात बेटे एकमेकांना जोडून मुंबई बेट तयार झाले.
 • जेराल्ड आंजीअर या ब्रिटीश गव्हर्नरच्या काळात सात बेटालगतच्या खाडया बुजवून व समुद्र हटवून या सात बेटांच्या एकत्रीकरणास सुरुवात झाली.म्हणून त्यास ‘आधुनिक मुंबईचा शिल्पकार’असे म्हणतात.
 • मुंबई बेटांच्या शेजारच्या साष्टी बेटावर या वाढत्या लोकसंख्येने मुंबई उपनगरे निर्माण झाली.१९२० साली ब्रिटिशांनी या उपनगरांना स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा दिला होता.
 • इ.स.१९५७मध्ये मुंबई उपनगर जिल्हा, मुंबई शहर जिल्ह्यात विलीन करण्यात आला.या नव्या जिल्ह्याला ‘बृहन्मुंबई जिल्हा’ म्हटले जात असे.
 • इ.स.१९९० मध्ये बृहन्मुंबई जिल्ह्याचे पुन्हा विभाजन करण्यात आले.त्यातून ‘मुंबई शहर ‘ व ‘मुंबई उपनगर’हे दोन स्वतंत्र जिल्हे अस्तित्वात आली.

विभाग रचना

1. मुंबई शहराची विभाग रचना:

विभाग

समावेशीत परिसर

कुलाबा,फोर्ट,बॅक-बे

बी

मांडवी,उमरवाडी,डोंगरी,चकला

सी

धोबी तलाव ,फणसवाडी,भुलेश्वर,कुंभारवाडा,खारा तलाव

डी

खेतवाडी,मलबार हिल,चौपाटी,महालक्ष्मी,गिरगाव,वाळकेश्वर

माझगाव ,नागपाडा,ताडदेव,भायखळा,तारवडी,कामाठीपुरा

एफ

परळ,शिवडी,माटुंगा

जी

माहीम,दादर,प्रभादेवी,वरळी,चिंचपोकळी

2. मुंबई उपनगराची विभाग रचना:

विभाग

समावेशीत प्रदेश

एच

वांद्रे,खार,पाली,सांताक्रूझ,कलिना

के

जुहू,विलेपार्ले,अंधेरी,जोगेश्वरी,वर्सोवा

पी

गोरेगाव,मालाड,मार्वे,मानोरी,आरे कॉलनी

आर

कांदिवली,बोरीवली,दहिसर

एल

कुर्ला,चुनाभट्टी

एम

चेंबूर,माहूल,देवनार,तुर्भे

एन

घाटकोपर ,राजावाडी,विक्रोळी,भांडूप

टी

तुळशी,विहार तलाव

मुंबई विशेष माहिती :थोडक्यात महत्वाचे

 • भारतातील पहिली सुती कापड गिरणी मुंबई येथे सुरु झाली. (११ जुलै १८५१)
 • भारतातील पहिली रेल्वे मुंबई टे ठाणे या मार्गावरून धावली.(१६ एप्रिल १८५३)
 • १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
 • ‘गेट वे ऑफ इंडिया’हे भारताचे प्रवेशद्वार १९११ मध्ये राजा पाचवा जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतासाठी बांधण्यात आले.
 • महाराष्ट्राची राजधानी -मुंबई
 • भारताची आर्थिक राजधानी,भारताची व्यापारी राजधानी-मुंबई
 • स्वातंत्रोत्तर भारतात मुंबई राज्याची राजधानी ,१ नोव्हेंबर १९५६ रोजी अस्तित्वात आलेल्या द्वैभाषिक राज्याची राजधानी -मुंबई
 • कापड गिरण्यांची संख्यालक्षात घेता गुजरातमधील अहमदाबाद प्रमाणे मुंबईला ‘भारताचे मॅंचेस्टर’ ही म्हटले जाते .
 • सागरी मार्गाने होणाऱ्या भारताच्या परदेशी व्यापारापैकी जवळपास २५% व्यापार भारताच्या पश्चिम किनारऱ्यावरील बंदरातून चालतो.
 • देशातील सर्वात मोठे बंदर
 • मुंबई शेअर बाजारांची स्थापना(१८७५)

मुंबई येथे स्थापन झालेल्या सामाजिक/राजकीय/सांस्कृतिक संघटना

 • रॉयल एशियाटिक सोसायटी(१८०५)
 • बॉम्बे असोशियन(१९५२)
 • जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स (१८५७)
 • प्रार्थनासमाज(१८६७)
 • आर्य समाज (१८७५)
 • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(१८८५)

मुंबई उद्योगधंदे

येथील उद्योग व्यापार ,आर्थिक संस्था ,बँका,उद्योग धंद्याची मुख्यालये ,शेअर-बाजार,आदी कारणांमुळे मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हटले जाते.

 • भारतातील सर्वात मोठे औद्योगिक केंद्र
 • चित्रपट निर्मितीचे सर्वात मोठे केंद्र
 • सुती वस्त्रोद्योगातील’भारताचे मँचेस्टर’
 • महाराष्ट्रातील एकूण कारखान्यांच्या निम्मे कारखाने फक्त मुंबईत आहेत
 • विविध वस्तू उत्पादनाची मोठ्या प्रमाणात कार्कःने
 • मस्त्योत्पाद्नात अग्रेसर

मुंबई वाहतूक

 • मध्य रेल्वेचे मुख्यालय बोरीबंदर येथे पश्चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट येथे आहे.
 • मुंबईतील सर्वत मोठे रेल्वे स्थानक -छत्रपती शिवाजी टर्मीनस
 • मुंबई रेल्वे लोकल गाड्यातून ४ टे 50 लाख लोक प्रवास करतात
 • राष्ट्रीय महामार्ग कर.३,४,व ८ हे मुंबईहून सुरु होतात
 • सहार येथे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ

मुंबई-महाराष्ट्रात पहिले ,मोठे,लहान,उंच इ.

 • पहिले आकाशवाणी केंद्र(१९२७)
 • पहिले दूरदर्शन केंद्र(१९७२)
 • पहिले विद्यापीठ(१८५७)
 • पहिली कापड गिरणी(१८५१)
 • पहिले पंचतारांकित हॉटेल(ताजमहाल)
 • पहिली रेल्वे’(१८५३)
 • सर्वात मोठे नाट्यगृह/सभागृह(षण्मुखानंद)
 • क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा (मुंबई शहर)
 • सर्वाधिक साक्षरता असणार जिल्हा(मुंबई उपनगर)
 • सर्वात वेगवान रेल्वे-शताब्दी एक्स्प्रेस (मुंबई-पुणे)
 • महाराष्ट्रातील सर्वाधिक घनतेचा जिल्हा(मुंबई उपनगर)
 • महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री साक्षरता जिल्हा (मुंबई उपनगर )
 • सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा (मुंबई शहर)
 • भारतातील समुद्रावरील पहिला पुल-राजीव गांधी सी-लिंक

मुंबई -प्रेक्षणीय व महत्वाची स्थळे

गेट वे ऑफ इंडिया,छत्रपती शिवाजी म्युझियम॒(प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ),मलबार हिल्स,नेहरू उद्यान,फिरोजशहा मेहता उद्यान(हंगिंग गार्डन ),तारापोरवाला मस्त्यालय,जहांगीर आर्ट गँलरी ,गिरगाव दादर जुहू चौपाट्या,हुतात्मा स्मारक,कान्हेरी लेणी,जोगेश्वरीची लेणी,एस्सेल वर्ल्ड ,संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ,माउंटमेरी चर्च ,मरीन डाइव,ताजमहाल व ओबेरॉय हॉटेल,राणीचा बाग,राजाबाई टावर,मुंबई विद्यापीठ,हाफकिन इन्स्टिट्यूट,भाभा अणुसंशोधन केंद्र ,मंत्रालय ,विधानभवन,ओगस्त क्रांती मैदान,सहार व सान्ताक्रुज विमानतळ,गोदि विभाग ,गोरेगाव फिल्म सिटी,ब्रेबोर्न व वानखेडे स्टेडियम ,बॉम्बे हाय ,खनिज तेलाची विहीर,एस.एन.डी.टी. विद्यापीठ,म.फुले मंडई,महालक्ष्मी रेसकोर्स,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी चैत्यभूमी,जैन मंदिर,उच्च न्यायालय,मनीभवन(गांधी मेमोरिअल),एशियाटिक सोसायटी व राष्ट्रीय ग्रंथालय ,वाळकेश्वर मंदिर ,महालक्ष्मी मंदिर ,हाजी अली दर्गा ,राजीव गांधी सी-लिंक,नेहरू तारांगण ,सिद्धिविनायक मंदिर,तलाव (विहार,तुलसी,पवई ),आरे कॉलनी.