महाराष्ट्रातील जिल्हे – औरंगाबाद

३५. औरंगाबाद

क्षेत्रफळ : १०१०७. चौ.कि.मी.

मुख्याल: औरंगाबाद शहर

साक्षरता : ८०.४०%

लोकसंख्या : ३६,९५,९२८.

हवामा: उष्ण कोरडे, पर्जन्यवृष्टी ७५ सेमी.

तापमान : हिवाळ्यात ८ अंश ते १० अंश से. पर्यत उन्हाळयात ४० अंश ते ४६ अंश से.

शेजारी जिल्हे : जळगाव, अहमदनगर, जालना, नाशिक.

नद्या : गोदावरी, पूर्णा, येलगंगा, अंजनी, शिव, खेळणा तसेच वाघुर.

पर्वत : अजिंठ्याच्या डोंगररांगा, सातमाळ्याचे पर्वत, म्हैसमाळ.

लेण्या : अजिंठा, वेरूळ, पितळखोरा.

किल्ले : दौलताबाद ( देवगिरी ) वेतालवादी.

टोपण नावे : संभाजी नगर/ मराठवाड्याचा राजधानी, लेण्याचा जिल्ह्या.

भाषा : मराठी, उर्दू, हिंदी.

रेल्वे स्टेशन : औरंगाबाद रेल्वे स्टेशन.

तालुके : औरंगाबाद, पैठण, गंगापुर, कन्नड, सिल्लोड, फुलंब्री, वैजापूर, खुल्ताबाद, सोयगाव.

प्रेक्षणीय स्थळे : म्हैसमाळ, दौलताबाद, सिधार्थ गार्डन व सिधार्थ गार्डन मधील प्राणी व मत्स्य संग्रहालय, रंगीत कारंजा, पवनचक्की, बीविका मकबरा, जायकवाडी धरण, संत ज्ञानेश्वर उद्यान, पैठण.

नगरपालिका : सिल्लोड, वैजापूर, कन्नड, गंगापुर, पैठण, खुल्ताबाद.

ग्रामपंचायती : ८५५.

गावे : १०४४.

महानगरपालिका : औरंगाबाद शहर.

विधान सभा मतदार संघ : ९.

लोकसभा मतदार संघ : औरंगाबाद.

औद्योगिक ठिकाणे : औरंगाबाद, गंगापुर, वाळुज, पंढरपुर, शेंद्रा, जालना.

साखर कारखाने : कन्नड, वैजापूर, पैठण.

वनक्षेत्र : औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठा, फर्दापूर, नागापूर, पिशोर, कन्नड घाट या भागामध्ये प्रामुख्याने वनक्षेत्र आढळून येते. येथील जंगलामध्ये मोहाचे व टेंभुर्णी झाडे भरपुर प्रमाणात आहेत. याशिवाय खैर, चंदन, पळस, बेल, धावडा, कडुलिंब, काटेरी बाभुळ,साग, बांबू, करवंद यांची झाडे आहेत. जंगलामध्ये बिबटे, तरस, ससे, हरणे, माकडे, रानडुक्कर, रानकुत्रे व निरनिराळे प्राणी आढळतात. पक्ष्यामध्ये मोर, सुतारपक्षी, पोपट, साळुंखी, कोकीळ, घार, वेगवेगळ्या चिमण्या, पारवे, कावळे अशा प्रकारची पक्षी आढळून येतात.

हवामान : औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तिन्हीही ऋतुमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हवामान असते.पावसाळ्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो.  हिवाळ्यामध्ये भरपूर थंडी पडत असते त्या वेळेस येथील तापमान साधारणता १०अंश से पेक्षा कमी होत असते. उन्हाळासुद्धा जिल्ह्यामध्ये भिन्न प्रकारात आढळून येतो. उन्हाळ्यामध्ये भरपुर प्रमाणात ऊन तापत असते.

शेती : मराठवाडयातील शेतकरी आत्महत्या करण्यामध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर आहेत हे सर्वानाच माहित आहे. परंतु येथील शेतकरी हा बर्यापैकी आहे जिल्ह्यातील बरीचशी शेती ही मान्सुनच्या पावसावर अवलंबून असते. येथील शेतकरी उन्हाळ्यामध्ये शेतीची संपूर्ण मशागत करून घेत असतो आणि मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर सुरवात करतो. जिल्ह्यातील शेतीमध्ये कापुस व ज्वारी, बाजरी, सोयाबीन ही मुख्य पिके घेतली जातात या पिकांना पूरक म्हणुन भुईमुग, मुग, उडीद, तीळ,तुर, मका ही पिके घेतली जातात.कापसाला ठिकठिकाणी जिनिंग प्रेसिंग मील असल्यामुळे भरपुर मागणी असते. इतर पिकांना प्रताक तालुक्याच्या ठिकाणी धान्य मार्केट किंवा बाजार समिती उपलब्ध असल्यामुळे तेथे विक्री केली जाते. पावसाळी पिके खाली झाल्यानंतर संचानावर किंवा थंडीमध्ये येणारी पिकाची लागवड केली जाते. यामध्ये साधारणता गहु, हरभरा, सुर्यफुल, करडई, उन्हाळ्यात मका, कलिंगड, खरबूज ही पिके घेतली जातात. काही भागात विहिरी, पाट, धरणे व बारमाही नद्या आहेत. अशा भागात मोसंबी, उस, चिकू, केळी, मिरची, आले, कांदा इतर भाजीपाला घेतला जातो. अशाप्रकारे औरंगाबाद जिल्ह्यातील शेती विविध प्रकारात आढळून येते.

प्रेक्षणीय स्थळे व प्रमुख शहरे :

औरंगाबाद : औरंगाबाद हे विभागीय व जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. इतिहासामध्ये औरंगाबाद हे औरंगजेबाच्या राजधानीचे ठिकाण होते. अकबर बादशाहा औरंगजेब याने त्याची पत्नी बेगम रजिया हिच्या नावे भव्य वास्तू बांधली आहे. तिलाच ताजमहाल प्रतिकृती म्हणुन ओळखले जाते. औरंगाबाद बसस्थानकाजवळच सिद्धार्थ गार्डन हे भव्य उद्यान आहे. येथे प्राणी संग्रहालय, सर्पालय, गृहालय असुन जिल्ह्यातील हे प्रेक्षणीय व करमणुकीचे उद्यान म्हणुन ओळखले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व मुंबई उच्च न्यायालायचे खंड पीठ औरंगाबाद शहरातच आहे. औरंगाबाद शहर महानगरपालिका ही एक मोठ्या महानगारापैकी एक असुन शहरामध्ये विमानतळ व मुंबई-हैद्राबाद रेल्वे मार्गावरील मुख्य रेल्वे स्थानक आहे. औरंगाबाद बसस्थानाकापासून ७० ते ७५ कि.मी. अजिंठा तर ४०ते 45 कि.मी वेरूळ ह्या जगप्रसिद्ध लेण्या आहेत. 

वेरूळ : औरंगाबाद पासून ४० कि.मी. अंतरावर वेरूळ गावच्या डोंगरामध्ये ही जग प्रसिद्ध लेणी आहे. वेरुलामधील कैलास मंदीर व हत्ती शिल्प हे जग प्रसिद्ध असुन येथे ३४ खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये जैन व बौद्ध व हिंदू धर्मीय शिल्पे आहेत. भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग येथेच आहे. ८ व्या शतकातील राष्ट्रकुट राज्याने हे लेणे कोरलेले असावे असा शिलालेख आढळतो. छ. शिवाजी महाराज्यांचे वडील शहाजी राजे यांचा जन्म वेरूळ याच गावी झाला आहे. शहाजी राजे यांचे आजोबा बाबाजी भोसले यांना येथील मंदिरातील पूजेचा मान होता.

अजिंठा : सिल्लोड येथून जवळच असलेल्या जग प्रसिद्ध लेण्यांचा शोध १८१९ मध्ये स्मिथ या इंग्रज कालीन गोर्या व्यक्तीने लावला. सदरील लेणी ही जळगाव, औरंगाबाद, महामार्गावरून ५ कि.मी आत अजिंठा येथील डोंगरात कोरलेली आहेत. लेण्यामध्ये बौद्ध धर्मीय शिल्प असुन येथील बुद्ध्याची मूर्ती प्रसिद्ध आहे. गौतम बुध्द्याच्या जीवनावर आधारित चित्रे येथे बघायला मिळतात.

आपेगाव : हे संत ज्ञानेश्वरांचे जन्म गाव आहे.

पैठण : हे एक तीर्थ क्षेत्र असुन मराठवाड्याची दक्षिण काशी म्हणुन ओळखले जाणारे पवित्र स्थान आहे. येथेच संत एकनाथ महाराज जन्मले असुन त्यांची समाधी व सुंदर मंदिरे येथे आहे. गोदावरी नदीवरील “नाथसागर” हा जायकवाडी प्रकल्प पैठण पासून अगदी जवळच आहे. येथे एक उद्यान असुन येथील संगीत रंगेबेरिंगी कारंजा ह्या विशेष प्रसिद्ध आहेत. येथे सरकारी वस्तू संग्रहालय व एकनाथ अभ्यासिका असुन पैठण हे औरंगाबाद जिल्ह्यातील महत्वाचा तालुका आहे.

पितळखोरा : कन्नड पासून जवळच हे एक छोठेसे गाव आहे. हे एक अश्मयुगीन गाव असुन येथे पाचव्या शतकातील यादव कालीन जैन, हिंदू व बौद्ध धर्मिलेल्या आहेत. दगडात कोरलेली यक्षाची मूर्ती ही विशेष प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध गानितीतज्ञ भास्कारार्चा हे याच गावाचे आहेत.

म्हैसमाळ : हे औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असुन येथे दूरदर्शन उपकेंद्र आहे.

इंद्रगडी : हे निसर्गरम्य ठिकाण असुन येथील डोंगरावरील तळयात तांबूस व औषधी गुणयुक्त पाणी आहे.

महाराष्ट्रातील जिल्हे – अमरावती

३४. अमरावती / Amravati

 • क्षेत्रफळ : १२१२२.

  मुख्यालय : अमरावती.

  साक्षरता : ८८.२३%.

  लोकसंख्या : २८,८७,८२६.

  हवामान : उष्ण , विषमवकोरडे.

  तापमान : किमान १० अंश से कमाल 45 अंशसे.

  पर्जन्यमान :८५ से.मी./ ८५०मि. मि.

  नदया : पूर्णा,पेढी, बोर्डी,अर्ना,तापी,चंद्रभागा,शाहनुर,बापरा,माडु,विदर्भ,चारघड, गाडगा,सिपना,

  शेजारीजिल्हे : वर्धा, यवतमाळ, वाशीम ,अकोला,नागपूर, बुलढाणा.

  टोपणनाव : इंद्रनगरी व देवी रुक्मिणी व दमयंती जिल्हा.

  थंड हवेचे ठिकाण : चिखलदरा.

  तालुके : मोर्शी,वरुड,तिवसा,धारणी,नांदगाव, दर्यापूर, भातकुली,धामणगाव,अचलपूर,अमरावती,चांदूररेल्वे,चांदूरबाजार,अंजनगावसुर्जी.

  पर्वत : सातपुडा, जीनगड.

  लेणी : सालबर्डी येथे २ बौध्द व ५ हिंदु लेण्या आहेत.

  किल्ला : गाविलगड.

  उंचशिखर : वैराट.

  विद्यापीठ : संतगाडगेबाबा विद्यापीठ अमरावती.

  गावे : १६९६.

  अभयारण्य : गुगामल राष्ट्रीय उद्यान ( वाघासाठी प्रसिद्ध ).

  औद्योगिक वसाहत : अमरावती, बोरगाव, शिराळा.

  लोकसभा मतदार संघ : अमरावती.

  विधान सभा मतदार संघ : अमरावती,बडनेरा, धामणगाव,अचलपूर,मोर्शी,मेळघाट,दर्यापूर, तिवसा.

  रेल्वे स्थानक : अमरावती, बडनेरा.

  शेतीविषयक : अमरावती हा भाग कमी पावासाचाअसल्यामुळे येथेपावसाळीपिके जास्त प्रमाणात घेतली जातात. ज्वारी,कापूस,सोयाबीन हे येथील मुख्य पिके आहेत. याशिवाय येथे भुईमुग, उडीद, मुग,बाजरी,मटकी, वाटाणा, घेवडा, तुर ही पिके घेतली जातात. जिल्ह्यामध्ये काही भागात संत्री मोसंबीच्या बागा आहेत.हिवाळ्यामध्ये अमरावती जिल्ह्यात सुर्यफुल, गहू, हरभरा ही पिके घेतली जातात.

  वने : अमरावती जिल्ह्यात एकूण क्षेत्रफळाच्या ११.४% क्षेत्र वनाने व्यापले आहे. जिल्ह्यामध्ये चिखलदरा, धारणी मोशी या भागामध्ये जंगल भरपूर प्रमाणात आहे. जंगलामध्ये साग,बांबू, चंदन,धावडा,बेहडा,सालरडतोंदु, हिरडा,येन,मोह,तेभूनी, कडुलिंब, काटेरी झुडपे यांची झाडे आहेत. याशिवाय जंगलामध्ये रोशा व कुसळ नावाचे गवत आहे. जंगलामध्ये वाघ, चित्ते, तरस, रानडुक्कर, रानकुत्रे, ससे, माकडे, अस्वल, साबर, कोल्हे, वनगायी, याप्रकारचे प्राणी आहेत. पक्ष्यामध्ये मोर, पानकोंबड्या, रानकोंबड्या, कोकीळ, पारवे, कावळे, कबुतरे, घारी, घुबड, पोपट निरनिराळ्या चिमण्या जंगलामध्ये आढळतात.

जिल्ह्यातील प्रमुख व प्रेक्षणीय ठिकाणे :

 • अमरावती : अमरावती हे जिल्ह्यातील मुख्यालय व विदर्भात एक प्रशासकीय विभाग कार्यालय आहे. सुतगिरण्या, कापडगिरण्या हातमाग-यंत्रमाग तसेच कापुस जिनिंग प्रेसिंग मिल हे उद्योग मोठ्या प्रमाणात चालतात. विदर्भातील अमरावती हे शैक्षणिक केंद्र आहे. येथे संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आहे व संतगाडगेबाबा यांची समाधी अमरावती येथेच आहे. अमरावती शहरात तसेच परीसरात साईबाबामंदीर,सतीधाम,भक्तीधाम,एकवीरादेवी, हिमंदीरे असुन येथील अंबादेवी मंदीर खुप प्रसिद्ध आहे. कृष्टरोगासाठी अमरावती सर्वांनाच परिचित आहे. येथे तपोवन जगदंबा कृष्ठधाम हि संस्था कृष्ठरोग्यासाठी काम करत असते.

  अंजनगाव : अंजनगाव तालुक्याचे ठिकाण असुन विड्याच्या पानासाठी खुप प्रसिद्ध आहे.

  रिध्दपुर : महानुभव पंथाचे तीर्थक्षेत्र व गोविंदप्रभूची समाधीस्थळ,कृष्णमंदिर,रामनाथ मंदिर या साठी रिध्यपुर भावीकाचे श्रध्दास्थान म्हणुन ओळखले जाते.

  शेणगाव : संतगाडगेबाबाची समाधी शेणगाव येथे आहे.

  कृष्ण्मोचन : मदगलेश्वर मंदिर येथे आहे.

  तिवसा : हे अमरावती जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण असुन धार्मिक स्थळाचा तालुका म्हणुन प्रसिद्ध आहे. तालुक्यातील मोसरी या गावी श्रीहरी गुरुदेव मंदिर, संततुकडोजी महाराज समाधि गुरुकुंज आश्रय येथे आहे. तालुक्यातील कौणडीण्यपुर येथे रुक्मिणीचे भव्य दिव्य मंदिर आहे तसेच सदारामबाबाची समाधी आहे.

  बडनेरा  : रेल्वेजंक्शन, सुतगिरणी, विड्याची पाने यासाठी बडनेरा शहर प्रसिद्ध आहे.

  चिखलदरा : हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण व विदर्भाचे नंदनवन म्हणुन ओळखले जाते. खान-ईजहान या सरदाराने बांधलेला गाविलगड हा किल्ला चिखलदरा पासुनजवळच आहे येथील कॉफीचे मळे व वन्य प्राणी हे पर्यटकांना आकर्षिक करतात.

महाराष्ट्रातील जिल्हे – बीड

३३. बीड

 क्षेत्रफळ : १०६९३.

मुख्यालय : बीड.

साक्षरता : ७३.५३%.

लोकसंख्या : २५,८५,९६२.

हवामान : कोरडे हिवाळ्यात थंड उन्हाळ्यात उष्ण.

तापमान : हिवाळ्यात १० अंश से. उन्हाळ्यात 45 अंश से पर्यत जाते.

पर्जन्यमान : ७५ ते ८० से.मी.

प्रशासकिय विभाग : मराठवाडा, औरंगाबाद.

नद्या : गोदावरी,सीना,मांजरा,लेंडी,अमृता,सिंदफना, सरस्वती,बिदुसरा,लिंब,भामटी,वाघी,होळ,चौसारा,केळी,मेहुकरी, इंचना.

पिके :ज्वारी,बाजरी,कापुस,भुईमुग,गहु,करडई,हरभरा,सुर्यफुल.

फळे : सीताफळ,मोसंबी,चिकु,पेरू.

शेजारी जिल्हे : परभणी,जालना,अहमदनगर,उस्मानाबाद,लातुर.

टोपणनाव : जुन्या मराठी कवींचा जिल्हा.

तालुके : बीड,अंबाजोगाई, आष्टी,गेवराई,माजलगाव,पाटोदा,केज,धारूर,परळी,शिरूर,वडवाणी.

धार्मिक स्थळे : वैजनाथपरळी,आंबेजोगाईची योगेश्वरी,दत्तमंदीर, कंकालेश्वरमंदीर,हजरतशहा बुटवारीचा दर्गा

ऐतिहासिक स्थळे : आष्टी,माजलगाव,वडवली,बीड.

औद्योगिक ठिकाणे : बीड,परळी.

नगरपालिका : बीड,परळी,माजलगाव,गेवराई,केज,आंबेजोगाई.

पंचायत समित्या : ११.         

विधान सभा मतदारसंघ : बीड,माजलगाव,परळी,अंबाजोगाई,आष्टी,केज,शिरुख,धारूर.

लोकसभा मतदार संघ : बीड.

गावे :१२५६.

रेल्वे स्थानक :परळी.

वने : बीड जिल्ह्यातील वनात साधारणता साग,मोह,आंबा,बाभळी,खैर,चंदन,कडुलिंब हि झाडे आढळतात. याशिवाय रोशा कुसळ नावाचे गवत आढळते. जंगलामध्ये रानडुकरे, ससे,चितळ,हरीण,मोर,तसेच वेगवेगळे पक्षी आहेत. येथील वनक्षेत्र हे जिल्ह्याच्या मानाने खुपच कमी आहे.

शेती विषयक : बीड जिल्ह्यातील शेतकरी हा खुपच साधा आहे. पाऊस कमी असल्याने येथे शेती कमी पिकते. कापुस,ज्वारी,बाजरी हे येथील प्रमुख पिके आहेत. याशिवाय येथे तुर,तीळ,मका,सोयाबीन,उडीद,मुग ही पिके घेतली जातात. विहिरी तलावाच्या पाण्यात गहु,हरभरा,सुर्यफुल,भुईमुग,भाजीपाला ही पिके घेतली जातात. शेतीमधील उत्पन्न खरेदीविक्री साठी माजल गाव परळी,बीड,अंबाजोगाई,गेवराई ह्या मोठमोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत.

प्रमुख शहरे व प्रेक्षणीय ठिकाणे :

बीड : बीड हे एक मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक जिल्ह्या असुन जिल्ह्याचे मुख्यालय आहे. येथे औष्णिक विद्युत केंद्र असुन शैक्षणिकदृष्ट्या बीड शहर खुप प्रगत आहे. बीड शहरात अतिप्राचीन अवशेष पाहवयास मिळतात. पीर बालाशाह मन्सुर शहायांचे प्राचीन दर्गे आहेत. निजामशहाच्या सलाबत खान नावाच्या मातब्बर सरदाराने बांधलेली विहीर आजही जशीच्या तशी शाबुत असुन कधीही आटत नाही. त्या विहिरी लाखजाना असे म्हटले आहे.शहरामध्ये कंकालेश्वराचे प्राचीन जलमंदिर खंडेश्वराचे मंदीर इतर जैनहिंदुमंदीर आहेत.

आष्टी : प्राचीन इतिहासात आष्टीला खुप महत्व होते येथे हजरत शाहबुरवारीचा दर्गा आहे. हे निजामशहाचे शहर म्हणुन ओळखले जायचे.

परळी : भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी वैजनाथमंदीर हे परळी शहरामध्ये आहे. परळी येथे औष्णिक विद्युत केंद्र सिमेंटचा कारखाना आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा हा तालुका आहे.

पाचालेश्वर :येथील दत्तमंदीर प्रसिद्ध आहे.

अंबाजोगाई :योगेश्वरी देवीमंदीरामुळे अंबाजोगाई शहर तालुका खुप प्रसिद्ध आहे, या तिर्थक्षेत्राला खुप महत्व आहे. नवरात्री मध्ये लाखो भाविक अंबाजोगाईला येतात. अंबाजोगाई येथे १० व्या शतकातील हिंदु लेणी आहेत. येथील क्षयरोग दवाखाना खुप गुणकारी आहे.

नायगाव :हे एक अभयारण्य आहे. हे अभयारण्य मोरासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या अभयारण्याला मयुरोद्यान असेही म्हणतात. याशिवाय येथे हरीण,ससे,माकडे,रानडुकरे, सायाळ, कोल्हे,तरस आढळतात.

महाराष्ट्रातील जिल्हे – अहमदनगर

३२. अहमदनगर

क्षेत्रफळ : १७.०४८ चौ.कि.मी.

मुख्यालय : अहमदनगर.

साक्षरता : ८०.२२%.

लोकसंख्या : 45,४३,०८३.

हवामान : उष्णवकोरडे.

तापमान : हिवाळ्यात १० अंश ते १४ अंश से. पर्यत उन्हाळयात ४२ अंश से. पर्यत.

पर्जन्यमान : ६८से.मी.

प्रशासकिय विभाग : नाशिक-उत्तरमहाराष्ट्र.

नद्या : गोदावरी, भिमा,मुळा,घोड,अडूळा,सीना.

पिके : चिकु, डाळींब,बोरे,पेरू.

शेजारी जिल्हे : औरंगाबाद, पुणे,नाशिक,सोलापुर,उस्मानाबाद,ठाणे,बीड.

थंड हवेचे ठिकाण : भंडारदरा.

किल्ले :अहमदनगर चा भुईकोट, खर्डेचा भुईकोट.

तालुके :अहमदनगर,कोपरगाव,संगमनेर,श्रीरामपुर, शेवगाव,पारनेर,जामखेड,अकोले,श्रीगोंदा,राहुरी,नेवासा,पाथर्डी,कर्जत,रहाता.

धार्मिक ठिकाणे :शिर्डी-साईबाबा, शनीशिंगणापूर, नेवासे-संतएकनाथ समाधी पुणतांबे, सिद्धटेक-सिद्धिविनायक, मेहरबाद,चांदबिबीमहल.

ऐतिहासिक ठिकाणे :चोंढी, कोपरगाव,नगर,राळगणसिद्धी,मेहराबाद, शिर्डी,शिंगणापूर.

टोपणनाव :साखर कारखान्याचा जिल्हा.

औद्योगिक ठिकाणे :अहमदनगर, राहुरी,श्रीरामपुर,प्रवरानगर,पारनेर,कोपरगाव.

महानगरपालिका :अहमदनगर महानगरपालिका.

पंचायत समित्या :१४.

विद्यापीठ :महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जि. अहमदनगर.

विधान सभा मतदार संघ :अहमदनगर, कोपरगाव,राहुरी,श्रीरामपुर,संगमनेर,नेवासा,शिर्डी,जामखेड,कर्जत,अकोले.

गावे :१,५०३.

लोकसभा मतदार संघ :अहमदनगर,शिर्डी.

साखर कारखाने :१५पेक्षा जास्त.

वने : अहमदनगर जिल्हा जरी महाराष्ट्र क्षेत्रफळाने मोठा असला तरी म्हणावे तितके जंगल क्षेत्र या जिल्ह्यात नाही. येथील जंगलामध्ये साग,आंबा,कडुलिंब,चिंच,बोरे,करवंद, आवळा,बाभुळ,पिंपळ,पळसही झाडे आढळतात.वनामध्ये हरणे,लांडगे,कोल्हे,ससे,काळ्यातोंडाची माकडे आहेत. मोर, कोकीळ,कावळे, कबुतरे,पाखरे,घारी,दलदलीच्या भागात बगळे,पानकोंबड्या आढळतात. जिल्ह्यामध्ये देऊळ गाव येथे काळविटासाठी प्रसिद्ध अभयारण्य आहे.

शेतीविषयक :क्षेत्रफळाने जसा जिल्हा मोठा तसा शेतीमध्ये हा जिल्हा प्रधानआहे. जिल्ह्यात गोदावरी नदीमुळे भरपूर पाणी शेतीला मिळते, तसेच जलसिंचन प्रकल्प, पाठबंधारे, धरणे,जिल्ह्यामध्ये भरपुर प्रमाणात असल्यामुळे येथे उसाचे विक्रमी पिके घेतले जाते. याशिवाय बाजरी,ज्वारी,मका,पेरू,डाळिंब,गहु,हरभरा,कापुस,चिकु,बोरे,सर्व प्रकारचा भाजीपाला तसेच काही भागात द्राक्ष सुद्धा घेतली जातात. अशाप्रकारे येथील शेती खुप प्रगत झालेली आहे.

प्रमुख शहरे व प्रेक्षणीय ठिकाणे :

अहमदनगर : अहमदनगर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे भिंगार याठिकाणी लष्करी छावणी असुन लष्कराचा वाहुन संशोधन व पिकास विभाग येथे आहे. तसेच भारतीय सैन्याचे रणगाडा प्रशिक्षण केंद्र येथे चालवले जातात. अहमदनगर हे शहर मलिक अहमद या बादशहाने १४१८ मध्ये बसविले आहे. त्यामुळे कदाचित अहमदनगर हे नाव शहराला देण्यात आले असावे. पुर्वी हे निजामाची राजधानी म्हणुन ओळखले जायचे. अहमदनगर हे मनमाड-पुणे लोहमार्गा वरील महत्वाचे रेल्वेस्थानक असून सर्व एक्सप्रे ससुपर एक्सप्रेस गाड्या याठिकाणी थांबतात. शहरामध्ये तीन ठिकाणी एस.टी.बस. स्थानक असुन महानगरपालिकेची बस सेवा सुद्धा शहरात वाहतुक सेवा पुरविते. अहमदनगर मधील भुईकोट किल्ला हा पुर्वी खूप महत्वाचा होता. याच किल्ल्यात एक कारागृह आहे येथील कारागृहात १९४२ ला पंडीत नेहरुनी Discovery of India हा ग्रंथ लिहिला आहे.

नेवासे : नेवासे हे तालुक्याचे ठिकाण संत ज्ञानेश्वराच्या मंदिरामुळे पावन झालेले हे एक तिर्थक्षेत्र म्हणुन ओळखले जाते. येते ज्ञानेश्वरमंदीर आहे. ज्ञानेश्वरानी येथे खांबास ठोकुन ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. येथे मोहीनी राजाचे प्राचीन मंदीर आहे. प्रवरानगर १७ जुन १९५० रोजी येथे पहिला सहकारी कारखाना उभारला. हा आशिया खंडातील पहिला साखर कारखाना ठरला. प्रवरानगरला इतिहासात खुपच महत्व होते.

राहूरी : शैक्षणिकदृष्टा राहुरी या शहराला खुप महत्व प्राप्त झाले आहे. येथील महात्मा फुले कृषीविद्यापीठ प्रसिद्ध आहे. या विद्यापीठाने अनेक पिकांच्या जाती संशोधित केल्या आहे. येथे सहकारी साखर कारखाना व कागदाचा मोठा कारखाना आहे.

राळेगणसिद्धी : पारनेर तालुक्यातील हे गाव अण्णा हजारे यांच्या उपोषणामुळे खुपच नावाजले आहे. आशिया खंडातील आदर्श गाव म्हणुन हे गाव प्रसिद्ध आहे. शिक्षण क्षेत्र सामाजिक वनीकरण,व्यसनमुक्ती,कुटुंबकल्याण या सर्वच क्षेत्रामध्ये हे गाव अग्रस्थानी आहे.

शनिशिंगणापुर : या गावाचे एक आगळे-वेगळे वैशिष्ट्ये आहे. येथील कोणत्याही घराला,दुकानाला, गोदामाला दरवाजे नाहीत आणि येथे येणारा भाविक कोणते ही अनैतिक काम करू शकत नाही. त्याचे कारण येथील शनिदेवाची कृपा या गावावर आहे असे सांगितले जाते. येथे शनिदेवाची शिलास्वरूपातील स्वयंभु मुर्ती ही मंदीराबाहेर आहे. येथे शनि आमावास्येला मोठी यात्रा भरते.

श्रीरामपुर : श्रीरामपुराला जिल्ह्यामध्ये खुप महत्व आहे येथे पुणे-मनमाड रेल्वेमार्गावरील हे एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. श्रीरामपुरमध्ये मोसंबीचे भरपुर उत्पन्न घेतले जाते. तालुक्यामध्ये अशोक नगर येथे सहकारी साखर कारखाना आहे. तसेच सुतगिरणी आहे.

अकोले : हे तालुक्याचे ठिकाण असुन प्रवरानदी वरील वसलेले सुंदर शहर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर हे येथेच आहे. येथुन जवळच भंडारदरा धरण आहे. येथील आगस्थी ऋषीचा आश्रम प्रसिद्ध आहे. अकोले तालुका पर्यटनाच्या दृष्टीने खुपच महत्वाचा मानला जातो.

पारनेर : पारनेर हे जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण असुन येथे सहकारी साखर कारखाना आहे तसेच सेनापती बापट यांचे हे जन्म गाव म्हणुन ओळखले जाते.

भंडारदरा : भंडारदरा हे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणुन ओळखले जाते. येथील रंधा हा धबधबा खुप प्रसिद्ध आहे. पावसाच्या मोसमात येथे भरपुर पर्यटक येतात. येथील प्रवरानदी वर भंडारदरा हे धरण आहे. पुर्वी या धरणाला विल्सन बंधारा म्हणुन ओळखले जायचे. येथील महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणुन प्रसिद्ध आहे.

सिद्धटेक : महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी सिद्धिविनायक म्हणुन ओळखले जाणारे गणपतीचे हे मंदीर सिद्धटेक याठिकाणी आहे.

कोपरगाव : कोपरगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे. येथुन फक्त १५कि.मी. ला देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व सर्व भाविकांचे आवडते देवस्थान शिर्डीचे साईबाबा देवस्थान आहे. साईबाबाची समाधी व मंदीर आहे, तसेच साईबाबा ट्रस्टचा मोठा दवाखाना आहे. देशातुन तसेच जगातील साईभक्त लाखोंच्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात. कोपर गावतालुक्यातील करपेवाडी व कोपरगाव येथे सहकारी साखर कारखाने आहेत. येथुन जवळच गोदावरी नदी काठी पुणतांबे हे गाव आहे यागावात चांगदेवाची समाधी आहे

महाराष्ट्रातील जिल्हे – वर्धा

३१. वर्धा

क्षेत्रफळ : ६३०९ चौ. कि.मी.

मुख्यालय : वर्धा.

साक्षरता : ८७.२२%

लोकसंख्या : १२,९७,१५७

हवामान : उष्ण व कोरडे.

तापमान : हिवाळयात ९ अंश ते १० अंश उन्हाळयात ४१ अंश ते ४६ अंश से. पर्यत.

पर्जन्यमाप : १२० से. मी.

विभाग : विदर्भ ( नागपूर )

नद्या : वर्धा, यशोदा, वेणा, पाकळी.

तालुके : आष्टी, आर्वी, सेलु, वर्धा, देवळी, करंजा, समुद्रपुर, हिंगणघाट.

पिके : कापुस, ज्वारी, मका, सुर्यफुल.

खनिज संपत्ती : दगडी कोळसा.

शेजारी जिल्ह्ये : अमरावती, नागपुर, चंद्रपुर, यवतमाळ.

धार्मिक ठिकाणे : आर्वी येथील काचेचे जैन मंदीर, हिंगणघाट मल्हारी मार्तड मंदीर, वर्धाचे गीताई मंदीर.

ऐतिहासिक ठिकाणे : आष्टी, सेवाग्राम, देवळी, दत्तपूर, पवनार.

औद्योगिक ठिकाणे : वर्धा, हिगणघाट, आर्वी, केळझट.

पंचायत समित्या : प्रत्येक तालुक्याला एक एकूण आठ.

नगरपालिका : वर्धा, आर्वी, आष्टी, देवळी, हिंगळघाट.

लोकसभा मतदार संघ : वर्धा.

विधान सभा मतदार संघ : वर्धा, देवळी, हिंगणघाट.

टोपण नावे : महीला कामगाराचा जिल्ह्या, गांधीजीचा जिल्ह्या.

वने : जिल्ह्यामध्ये साधारणता आष्टी, आर्वी, सेलु तसेच आर्वी या तालुक्यामध्ये जंगल आढळते. जंगलामध्ये साग, बाबु, बाभुळ, कडुलिंब, तेंदू, धावडा, बेहडा, ऐन, मोह, गुलमोहर, खैरा, फळस, काडसर, पिंपळ, वडाची झाडे, चिंच, आंबे, बोरे तसेच काटेरी झुडपे व निरनिराळे गवत जंगलामध्ये आढळतात. दाट वनक्षेत्रात वाघ, बिबटे, ससे, माकडे, सांबरे, हरणे, कळवीट, मोर, निरनिराळे चिमण्या पाखरे इ. पशु-पक्षी आढळतात.

शेतीविषयक : जिल्ह्यामध्ये पाऊस कमी असल्यामुळे पावसाळी पिके जास्त प्रमाणात घेतली जातात. उदा. कापुस, ज्वारी, मका, बाजरी, उडीद, मुग, पाण्याच्या भागामध्ये संत्रीच्या बागा तसेच भाजीपाला, गहु, हरभरा ही पिके घेतली जातात.

जिल्ह्यातील प्रमुख शहरे व ठिकाणे :

वर्धा : वर्धा हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय असुन दिल्ली चैन्नई या रेल्वे मार्गावरील महत्वाचे रेल्वे जंक्शन आहे. तसेच विदर्भात वर्धा शहराला खूपच महत्व दिले जाते. वर्धा रेल्वे स्थानकामधून कोलकाता, मुंबई चैन्नई, पंजाब, भुसावळ या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे आहेत. तसेच वर्धा येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. वर्धा येथून जवळच दत्तपूर नावाचे गाव असुन तेथे कुष्टरोग्यासाठी कुष्टधाम ही संख्या आहे. शहरामध्ये अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ संस्था, बाजारपेठा, छोटीसी औ. वसाहत, कापुस फेडरेशन, सुत गिरण्या, तेलगिरण्या, राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्य ठिकाण, विश्वशांती स्तुप, कल्याणात्मक गिताई मंदीर, नगरपालिका, जैन मंदिरे चर्च, मशिदी आहेत.

देवळी : हे एक तालुका ठिकाण असुन येथील बैलांचा बाजार पाहण्यासारखा असतो. या ठिकाणी कापुस फेडरेशन व कापुस संकलन केंद्र आहे. तसेच देवळी शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती, मंदीरे, बस स्थानक आहे. तालुक्यामध्ये पुलगाव या ठिकाणी लष्करी सामग्री कारखाना, रासायनिक खतांचा कारखाना, कापड गिरण्या, बाजारपेठ आहे. देवळी तालुक्यातील पुलगाव हे अत्यंत महत्वाचे गाव म्हणुन ओळखले जाते.

सेलु : सेलु हे तालुक्याचे ठिकाण असुन जिल्ह्यातील महत्वाचे शहर आहे. येथुन जवळच केळझर हे गाव आहे. केळझर येथे स्फोटक द्रव्यांचा कारखाना तसेच मत्सबीज उत्पादन केंद्र आहे.

आर्वी : आर्वी हे तालुक्याचे ठिकाण असुन आर्वीला संताची भूमी म्हणुन ओळखले जाते. शहरामध्ये मोठ-मोठ्या कडधान्याचा बाजारपेठा आहेत. सर्व जाती धर्माची मंदीरे आहेत. येथील काचेचे जैन मंदीर पाहण्यासारखे आहे. आर्वी येथे कापसाची भव्य बाजारपेठ आहे.

सेवाग्राम : वर्धा शहरापासून सेवाग्राम हे ठिकाण जवळच असुन येथे महात्मा गांधीनी  वास्तव्य केले होते. त्यामुळेच या गावाला सेवाग्राम असे म्हटले जाते. येथील ज्या झोपडी मद्ये महात्मा गांधीनी वास्त्यव्य केले होते. ती झोपडी आजही पाहायला मिळते. त्या ओपाडीला बापुकुटी या नावाने ओळखले जाते.

पवनार : धाम नदीवरील या गावात महात्मा गांदीच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेली छत्री आहे तसेच विनोबा भावे यांचा परमधाम गावाचा आश्रम आहे. वाकाटक राजा दुसरा यांच्या काळात पवनार हे प्रवरापुर म्हणुन ओळखले जाते. तसेच वाकाटक राज्याचे राजादानाचे हे ठिकाण होते.

आष्टी : हे तालुक्याचे मुख्यालय असुन १६ ऑगस्ट १९४२ च्या आंदोलनामध्ये जो गोळीबार झाला आणि त्या सत्याग्रहामध्ये अनेक सत्याग्रही मारले गेले त्यांचे साक्षीदार म्हणुन वर्धा जिल्ह्यात आष्टी या शहराला ओळखले जाते.

हिधणघाट : येथील मल्हारी-मार्तंड मंदीर पाहण्यासारखे आहे. पुर्वी लकरशायरच्या कापड गिरण्यामधून येथील वणी जातीच्या कापसाला फार महत्व होते त्यासाठी हिंगणघाट खुप परिचित आहे.

महाराष्ट्रातील जिल्हे – सोलापुर

३०. सोलापुर/ SOLAPUR

क्षेत्रफळ : १४८९. चौ.कि.मी.

मुख्यालय : सोलापुर.

साक्षरता : ७७.७२%.

लोकसंख्या : ४३,१५,५२७.

हवामान : उष्ण व कोरडे.

तापमान : हिवाळयात ९ अंश  ते १२ अंश पर्यत उन्हाळयात ४० अंश ते ४२ अंश से. पर्यत.

पर्वत : सहयाद्री.

पर्जन्यमान : ६७८ मि.मी.

विभाग : पश्चीम महाराष्ट्र ( पुणे )

नद्या : चंद्रभागा, भीमा, सीना, भोगवती, मान.

किल्ले : सोलापूरचा किल्ला, मंगलकोट, अकलुज, अक्कलकोट.

तालुके : अक्कलकोट, पंढरपुर, माळशिरस, करमाळा, मंगळवेढा, द. सोलापुर, उ. सोलापुर, मोहोळ, सांगोला, बार्शी, माढा.

पिके : उस, ज्वारी, बाजरी, गहु, हळद, भुईमुग.

धार्मिक ठिकाणे : स्वामी समर्थ समाधी, विठ्ठल रुखमाई मंदीर, भक्त पुंडलिक मंदीर, भवानी मंदीर, संगमेश्वर मंदीर, नरेश्वर मंदीर, बार्शीचे भगवंत मंदीर, मंगळवेढा येथील कान्होपात्रा, चोखामेळा, दामाजी पंथ यांची मंदिरे.

ऐतिहासिक ठिकाणे : सोलापुर, मंगळवेढा, अकलुज, करमाळा आष्टी, पंढरपुर.

औद्योगिक ठिकाणे : सोलापुर, अकलुज, पंढरपुर, बार्शी.

विद्यापीठ : सोलापुर.

महानगरपालिका : सोलापुर शहर.

नगरपालिका : अक्कलकोट, पंढरपुर, सांगोला, बार्शी, माढा, मंगळवेढा, करमाळा, माळशिरस.

पंचायत समित्या : प्रत्येक तालुक्याला एक एकूण ११.

लोकसभा मतदार संघ : सोलापुर, माढा.

विधान सभा मतदार संघ : अक्कलकोट, द. सोलापुर, उ. सोलापुर, माढा, बार्शी, मोहोळ, पंढरपुर, मंगळवेढा, करमाळा, माळशिरस, सांगोला.

विमानतळ : सोलापुर.

टोपण नावे : ज्वारीचे कोठार, कामगाराचा जिल्ह्या.

रेल्वे स्थानक : सोलापुर, पंढरपुर.

वनविषयक : जिल्ह्यामध्ये पाणी पाऊस कमी असल्यामुळे तसेच गवताळ प्रदेश असल्यामुळे वनाचा विकास फारसा झालेला नाही. जंगल हे विरलक असल्यामुळे जंगलात कुसळे गवत, रोशा गवत, करवंद व बोराची झुडपे, बाभुळ, पळस, कडुलिंब, वड ही झाडे आढळतात. जिल्ह्यामध्ये नान्नज या ठिकाणी अभयारण्य आहे. जंगलामध्ये मोर, माळढोक, हरिणे,पोपट, कोकीळ, रानकोंबडे, माकडे, ही पशु-पक्षी आढळतात.

शेतीविषयक : सोलापुर जिल्ह्यात पाऊस खूपच कमी असल्यामुळे या ठिकाणी कोरडवाहू शेती जास्त प्रमाणात आहे. काही भाग सिंचन व पाटबंधारे विकासामुळे विकसित आहे. जिल्ह्यामध्ये ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. या शिवाय बाजरी, उस, भाजीपाला, मिरची, भुईमुग, गेवडा, सुर्यफुल, गहु, हरभरा ही पिके घेतली जातात.

जिल्ह्यातील प्रमुख शहरे व ठिकाणे :

अक्कलकोट : हे तालुक्याचे ठिकाण असुन एक धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. येथे दत्ताचे अवतार असलेले श्री स्वामी समर्थ यांची समाधी व मंदीर आहे. स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील भाविक भक्ताचे आवडते संत असल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यात लाखो भाविक येतात. अक्कलकोट हे औरंगजेबाचे दक्षिणेतील महत्वाचे ठाणे असल्यामुळे येथे काही काळ मोगलांची सत्ता होती. शहरात अक्कलकोट येथे भुईकोट असुन शहरातील प्राचीन राजवाडे व शस्त्रागार भाल्यासारखे आहे.

नान्नज : या ठिकाणचे अभयारण्य पाहण्यासारखे आहे. या अभयारण्यात माळढोक व हरणे आढळतात. याशिवाय अनेक पक्षी व प्राणी सुध्दा येथे असुन हे एक निसर्गरम्य ठिकाण मानले जाते.

करमाळा : सोलापूर जिल्ह्याचे तुळजापुर म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण असुन महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे तुळजाभवानी मंदीर येथे आहे. तसेच या ठिकाणी अष्टकोनी विहीर व भुईकोट किल्ला आहे.

अकलुज : या ठिकाणचे वैशिष्ट म्हणजे हे एक महानगर असुन सुध्दा ग्रामपंचायत हीच संस्था या ठिकाणी कार्यरत आहे. अकलुज ही औरंगजेबाची काही राजधानी होती. संभाजी राज्यांना पकडण्यासाठी औरंगजेबाने या ठिकाणी तळ ठोकला होता. औरंगजेबाची ४०  हजारांच्यावर फौज या ठिकाणी होती.   

             अकलुज गावच्या हळदीवर निरा नदी वाहत असुन नदी किनाऱ्यावर एक प्रेक्षणीय किल्ला आहे. शहरामध्ये दुग्ध उद्योग, कुकुटपालन, मच्छी तलाव, सहकारी साखर कारखाना असल्यामुळे हे गाव उद्योग धंद्यात खूपच प्रगतीपथावर आहे.

पंढरपुर : महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे धार्मिक स्थळ म्हणुन पंढरपुर हे शहर आहे. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचे व वारकऱ्यांचे दैवत श्री विठ्ठल रखुमाई हे तीर्थक्षेत्र आहे. आषाढी व एकादशीला या ठिकाणी खुप गर्दी असते. आपल्या आवडत्या विठ्ठलाला भेटण्यासाठी महाराष्ट्र व देशातून विविध देवताच्या पालख्या घेवून वारकरी येथे येतात.

              पंढरपुर या ठिकाणी भीमा नदीने चंद्राच्या कोर सारखे रूप धारण केल्यामुळे इ नदीला चंद्रभागा नदी सुद्धा म्हटले जाते, नदीच्या पात्रामध्ये भक्त पुंडलिकाचे व तिरावर देवदेवतांचे इतर मंदीरे आहेत. पंढरपुर तालुक्याचे ठिकाण असुन रेल्वेचे स्थानक व सुसज्य बस स्थानक या ठिकाणी आहे.

सोलापुर : हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असुन महाराष्ट्रातील एक महानगर आहे. या ठिकाणी सिध्देश्वर मंदीर, दत्तमंदीर, गणपती मंदीर तसेच एक ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. येथील औद्योगिक वसाहत खुप मोठी असुन हे ठिकाण उद्योगाचे महत्वाचे केंद्र मानले जाते. या ठिकाणी कापड मील, यंत्र माग, हातमाग तसेच बिडी उद्योग, अगरबत्ती उद्योग आहेत. संपुर्ण देशात व विदेशात प्रसिद्ध असणारी सोलापुरी चादर ह्याच शहरात तयार होते. सोलापुरी चांदरीसाठी हा जिल्ह्या विशेष करून ओळखला जातो.

आष्टी : हे तालुका ठिकाण असुन मराठे व इंग्रजांच्या शेवटच्या लढाईसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. या युद्धात दुसऱ्या बाजीराव पेशव्या सह असंख्य मराठे शहीद झाले.

महाराष्ट्रातील जिल्हे – ठाणे

२९. ठाणे

क्षेत्रफळ : ९५५८ चौ.कि.मी.

मुख्यालय : ठाणे.

साक्षरता : ८०.६७%

लोकसंख्या : १,१०,५४,१३१.

हवामान : समुद्राजवळ आद्र, उर्वरित भागात कोरडे.

तापमान : हिवाळयात १० अंश ते १७ अंश पर्यत उन्हाळयात ४२ अंश से पर्यत.

पर्जन्यमान : २५० से.मी.

थंड हवेचे ठिकाण : सूर्यमाळ.

पर्वत : सहयाद्री.

प्र. विभाग : कोकण ( मुंबई विभाग )

नद्या : वैतरमा, उल्हास देहेरजा, पिंजळ, मुर्या, बार्वी, भातसा, काळू.

तालुके : अंबरनाथ, भिवंडी, जव्हार, ठाणे, डहाणू, मोरवाडा, पालघर, शहापूर, वर्स, वाडा, मुरबाड, उल्हासनगर, विक्रमगड, तलासरी, कल्याण (१५)

किल्ले : अर्नाळा, वसई, कामनदुर्ग, आगाशी, सिध्दगड, वजीरगड, मंगळगड, भोपटगड, काळदुर्ग, थेदवण, माहुली, बळवंतगड, बेलापूर, भवानगड, मनोर, गंभीर गड, कामनादुर्ग, बहिरूणड, दंडा किल्ला, कितल, वीरठाण, विसावागड, गोरखगड, माहीम, अशेरी, पाणबुरुज, गुमतारा.

बंदर : डहाणू, अर्नाळा.

शेजारी जिल्ह्ये : नाशिक, रायगड, नवी मुंबई, पुणे, नगर.

धार्मिक ठिकाण : टिटवाळयाचा गणपती, कोपिनेश्वर मंदीर, अंबेरश्वर मंदीर, वज्रेश्वरी डोंबिवलीचे ओमकारेश्वर मंदीर.

ऐतिहासिक ठिकाणे : शहाड, कल्याण, वसई.

औद्योगिक क्षेत्र : कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे तारापुर, शहाड, अंबरनाथ, आसनगाव.

टोपण नावे : मुंबईची तहान, महानगरांचा जिल्ह्या.

पिके : भात, नाचणी, भाजीपाला, भेंडी.

पंचायत समित्या : १३.

नगरपालिका : अंबरनाथ, बदलापूर, नवघर, पालघर, डहाणू, नालासोपारा, जव्हार.

ग्रामपंचायती : ९६०.

गावे : १७४८.

महानगरपालिका : ठाणे शहर, कल्याण-डोंबिवली, नवीमुंबई, भिवंडी, वसई-विरार, उल्हासनगर, मीरा भाईदर.

लोकसभा मतदार संघ : ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडी.

विधान सभा मतदार संघ : ठाणे, ऐरोली, मीराभाईदर, भिवंडी ग्रा., कल्याण पूर्व, ओवळा माजीवाडा, पालघर, बेलापुर, शहापुर, डोंबिवली, मुरबाड, भोईसर, अंबरनाथ, कल्याण ग्रा., कोपरी, वर्स, भिवंडी ( पूर्व ), विक्रमगड, उल्हासनगर, मुंब्रा-कळवा, डहाणू, नालासोपारा, कल्याण पश्चिम, भिवंडी पश्चिम.

वनविषयक : ठाणे जिल्ह्यात ४० % वनक्षेत्र असुन वनामध्ये साग, हिरडा, कळस, बांबू, कडुलिंब, आंब्याची झाडे, करवंद, आढळतात. जंगलामध्ये वाघ, बिबटे, ससे, रानकुत्रे, रानदुक्करे, माकडे, अस्वले तसेच मोर, चिमण्या, पारवे, कबुतरे, रवंडया, पोपट, कोकीळ, घुबड, सुतारपक्षी, साळुंखी, तितरे, रानकोंबड्या, दलदलीच्या भागात बगळे, पानाकोम्बड्या, बदके इ. पशु-पक्षी आहेत.

येऊर : सहलीसाठी प्रसिध्द्द आहे.

शेतीविषयक : शेती ही बहुधा पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असुन भात हे जिल्ह्यातील मुख्य पीक आहे. पाणी व पाटबंधारे असलेल्या भागात चिकूच्या बागा आहेत तसेच काही भागात भाजीपाला घेतला जातो. येथील भाजीपाला हा मुंबईसाठी वरदान समजला जातो.

जिल्ह्यातील मुख्य शहरे व ठिकाणे :

ठाणे : हे जिल्ह्याचे मुख्यालय असुन सर्वात लवकर शहरीकरण झालेले शहर आहे. तसेच भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या सुद्धा जिल्ह्यामध्ये आहे. औद्योगिक दृष्ट्या ठाणे शहर खूपच विकसित झालेले आहेच. पुर्वी हे एक बंदर होते. वाढती लोकसंख्या व खाडीच्या भरावामुळे हे एक मोठ शहर उदयास आले. ठाणे येथील कोपिनेश्वर मंदीर, शनी मंदीर, राम मंदीर, बालाजी मंदीर, खुप प्रसिध्द्द आहेत. तसेच येथील टाळ्याची खाडी ही विशेष आहे.

बोर्डी : डहाणुपासून जवळच असलेले बोर्डी हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. बऱ्याच सालापासून येथे अग्रीज्योत तेवत ठेवलेली आहे. येथील किल्ला हा खुपच प्रसिध्द्द असुन बोर्डी हे पर्यटक क्षेत्र म्हणुन प्रसिध्द्द आहे.

भिवंडी : हे तालुक्याचे ठिकाण असुन महानगपालिका आहे. भिवंडी गृह उद्योग, छोटे-मोठे उद्योगासाठी मुंबई उपनगरात प्रसिध्द्द आहे. औद्योगिकदृष्ट्या भिवंडी शहर दिवसेंदिवस प्रगत होत आहे. येथून जवळच वज्रेश्वरी हे गाव असुन येथे वज्रेश्वरी देवीचे मोठे मंदीर आहे. तसेच गावात गरम पाण्याचे झरे आहेत.

पालघर : हे तालुक्याचे ठिकाण असुन एस.टी. परिवहन महामंडळाचे विभागीय मुख्यालय आहे. भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तालुक्यातील तारापुर येथे आहे.

डहाणू : डहाणू हे तालुक्याचे मुख्यालय असुन येथील कोळी समाज खूपच परिचित आहे. येथील लोकांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय असुन मत्स्य व्यवसायासाठी येथे होड्या बनविल्या जातात.

शहापुर : जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणुन शहापुर तालुक्याला ओळखले जाते. शहापुर तालुक्यामध्ये तानसा, मोडकसागर, भातसा हे मोठे मोठे धरण आहेत या धरणामुळे संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा केला जातो.

कल्याण : हे रेल्वेचे जंक्शन असुन जिल्ह्यातील महत्वाचे शहर व तालुका आहे. कल्याण शहर खुप जुने असुन सुध्द्दा औद्योगिकदृष्ट्या व व्यापारीदृष्ट्या खूपच प्रगत झालेले आहे. कल्याणला मुंबईचे प्रवेशद्वार सुध्दा म्हटले जाते. अनेक केमिकल फारटीलायझर, सूतगिरण्या, कल्याण औद्योगिक वसाहत मध्ये आहे. तसेच छोटी मोठी खेळणी कल्याण मधील गृह उद्योग आहेत. कल्याण शहराला डोंबिवली, उल्हासनगर, सारखे शहरे भिडल्याने हे एक महानगर झाले. शहरात सर्व धर्माच्या देवदेवाची प्रार्थनास्थळे आहे. कल्याणपासून जवळच शहाड हे ठिकाण असुन येथील बिर्ला मंदीर पाहण्यासारखे आहे.

मुरबाड : मुरबाड तालुक्याचे ठिकाण असुन जिल्ह्यातील खुप मोठा तालुका आहे. जिल्ह्यात आदिवासी वस्ती जास्त प्रमाणात आहे.

जव्हार : जव्हार हे जिल्ह्यातील निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाण असुन तालुक्याचे ठिकाण सुध्दा आहे. तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांची संख्या जास्त प्रमाणात आढळून येते.

सातपाटी : हे गाव कोळी समाजाचे गाव म्हणुन ओळखले जाते. येथील प्रत्येक कोळी हा समुद्रात मासेमारीसाठी जात असतो. प्रत्येक कोळ्याकडे महागड्या बोटी असुन येथील कोळी जिल्ह्यात श्रीमंत समजले जातात.

अंबरनाथ : हे ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक शहर असुन येथे दारू गोळा, आगपेठ्या, घड्याळे, रसायने यांच्या कंपन्या आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठा असिड कारखाना अंबरनाथ येथेच आहे. अंबरनाथ येथून मुंबई सी.एस.टी. येथे लोकल रेल्वे असुन असंख्य प्रवासी लोकल रेल्वेचा प्रवासासाठी वापर करतात. अंबरेश्वर, शिवमंदिर हे येथील धार्मिक ठिकाणे असुन असंख्य भाविक या मंदिराला भेटी देतात.

मोखाडा : ठाणे जिल्ह्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण मोरवाडा तालुक्यात असुन सूर्यमाळ हे या ठिकाणे नाव आहे.

विरार : वसई तालुक्यातील विरार हे एक महानगर आहे. मुंबईपासून ते थेट विरार या स्टेशन पर्यत लोकल सेवा असल्यामुळे या मार्गावरील सर्व प्रवासी लोकल रेल्वेनेच प्रवास करतात. विरार हे शहर एकवीरा देवीसाठी प्रसिध्द्द असुन एकवीरा देवीचे मंदीर येथे आहे.

टिटवाळा : शहापुर तालुक्यातील टिटवाळा या गावाचा महागणपती खुप प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा आहे. असंख्य गणेश भक्त या देवस्थानाला भेट देतात. तसेच टिटवाळा हे लोकल रेव्लेच एक महत्वाचे स्थानक आहे. येथून टिटवाळा ते मुंबई सेंट्रल, कसारा टे मुंबई सेंट्रल लोकल सारख्या असतात. येथून जवळच आसनगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहत आहे.

उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील हे एक महानगर असुन तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक प्रकारचे छोटे-मोठे उद्योग असल्यामुळे उल्हासनगर शहराची लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे. शहरामध्ये शिव मंदीर, झुलेलाल मंदीर, चालीयासाहेब मंदीर, ही धार्मिक ठिकाणे आहेत.

महाराष्ट्रातील जिल्हे – सिंधुदुर्ग

२८. सिंधुदुर्ग

क्षेत्रफळ : ५२०७ चौ.कि.मी.

मुख्यालय : ओरोस बु||

साक्षरता : ८६.५४%

लोकसंख्या : ८,,४८,८६८.

हवामान : उष्ण, दमट व सम.

तापमान : किमान १६ अंश ते १८ अंश से. कमाल ३४ अंश ते ३५ अंश से. पर्यत जाते.

पर्जन्यमान : ३०० सेमी.

पर्वत : सहयाद्री.

प्रशासकीय विभाग : कोकण ( मुंबई )

समुद्र किनारा : १२१ कि.मी.

थंड हवेचे ठिकाण : अंबोली.

नद्या : तेरेखोल, देवगड, कर्ली, तिल्लारी.

पिके : भात, नाचणी, हळद, काजु, आंबा, नारळ, सुपारी.

किल्ले : अवर किल्ला, बांदा, भरतगड, भैरवगड, भगवत गड, पदमगड, नोदोस, देवगड, हनुमंतगर, सोनगड, सिंधुदुर्ग, शिवगड, रामगड, सिहागड मानसंतोषगड, महादेव गड, विजयदुर्ग, वेतालगड, सर्जेकोर, मनोहर गड,राजकोट, सावंतवाडी.

बीच : मिठबाव बीच, कोदुराबीच, निवतीबीच, भोगवेबीच, रेड्डी, वयागण, मालवण बीच, तारकर्ली बीच.

बंदरे : वेंगुर्ला, रेड्डी, मालवण, देवगड.

लेण्या : ऐनारी लेणी.

तालुके : सावंतवाडी, वैभव वाडी, कणकवली, दोडामार्ग, मालवण, कुडाळ, देवगड, वेगुर्ला.

धार्मिक ठिकाणे : शिवापूर, भराडीदेवी, कुणकेश्वर, माणगाव, दाणोली, वालावल, भगवती मंदीर, विमलेश्वर मंदीर, जय गणेश मंदीर, ओझेरेश्वर मंदीर, परशुराम मंदीर, रवळनाथ मंदीर.

ऐतिहासिक ठिकाणे : सावंतवाडी, वेंगुर्ला, रेड्डी, सिंधुदुर्ग वेलागर, धामापुरचे तळे.

नगरपरिषद : सावंतवाडी, कणकवली, मालवण, कुडाळ.

पंचायत समित्या : प्रत्येक तालुक्याला १ एकूण ८.

पर्यटन क्षेत्र : पाडघर धबधबा, तारकर्ली, धामापुर तलाव, देवबा, सागेरश्वर, मोतीतलाव, नरेंद्र उद्यान, जगन्नाथ भोज, आंबोली, कावळेसाद, शिल्प ग्राम, सिंधुदुर्ग किल्ला.

लोकसभा मतदार संघ : सिंधुदुर्ग-रत्नागिरी.

विधान सभा मतदार संघ : सावंतवाडी, कणकवली, मालवण, कुडाळ.

टोपण नाव : पर्यटन नगरी, आंब्यांची बाग.

रेल्वे स्थानक : सावंतवाडी, देवगड, कणकवली, मालवण, नांदगाव, वैभववाडी, कुडाळ.

धरण/तलाव : मोती तलाव, धामापूर तलाव.

औद्योगिक क्षेत्र : कुडाळ, सावंतवाडी, देवगड ( जामकंडे ) वेंगुर्ला, आरोदा.

अभयारण्य : धारापूर, कासार्डे, बाबा.

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हा तालुका मालवणी भाषेमुळे खूपच प्रसिध्द्द आहे. मालवण शहरापासून १ कि.मी. अंतरावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे. हिंदवी स्वराज्याचा आत्मा म्हणुन हा किल्ला ओळखला जातो. कुरटे बेटावर छ. शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. २५ नोव्हेंबर १६६४ रोजी हा किल्ला बांधायला सुरवात झाली आणि २१ मार्च १६६७ रोजी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. किल्ल्यामध्ये जरीमरी मंदीर, भवानी मंदीर, महादेव मंदीर, गोड्या पाण्याच्या विहिरी, गुप्त भुयारे किल्ल्याच्या तटबंदी वर चुन्यामध्ये मुद्रित केलेले शिवाजी महाराजाचे हाताचे ठसे आजही जसेच्या तसे आहेत. शिवाजी महाराजांचे राज्यातील एकमेव शिवराजेश्वर मंदीर येथेच आहे. तसेच किल्ल्यात सेवेकर्याची १८ घरे आहेत.

           भराडी देवी ( आंगणेवाडी ) कोकणातील प्रसिद्ध यात्रा आंगणेवाडी या येथे भरते वं प्रसिद्ध आहे हे सर्वांनाच माहित आहे. मालवण पासून १५ ते १६ कि.मी. अंतरावर मसुरे या गावातील बारा वाड्यापैकी आंगणे वाडी ही एक वाडी आहे. भराडी देवीच्या महात्मामुळे व चमत्कारामुळे आंगणे वाडी हे गाव खुप प्रसिद्धीस झाले. पुण्याच्या श्रीमंत पेशवे चिमाजी अप्पांनी ह्या मंदिराला २२ हजार एकर जमिन दान दिली होती. आंगणे वाडीतील भरडावर ही स्वयंभु पाशाणारूपी देवी अवतरली म्हणुन तिला भराडी देवी असे म्हणतात. या देवीचा यात्रोत्सव साधारणता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातून होतो. विशेष म्हणजे जत्रा विशेष तिथीवर अवलंबुन नसते टी वेगळ्या प्रकारे ठरवली जाते.

मालवण तालुक्यातील इतर पर्यटन स्थळे :

जय गणेश मंदीर : मालवण शहरापासून अर्धा कि.मी. अंतरावर.

रॉक गार्डन : हे जिल्ह्यातील सुंदर उद्यान मालवण येथे आहे.

धामापुर तलाव : धामापुर तलाव व सिंधुदुर्गातील नैसर्गिकरित्या उत्तम [पर्यटन स्थळ म्हणुन ओळखले जाते.

चिवलाबीच : मालवण येथील समुद्र किनारा जॉगींग व मॉर्निंग वॉक साठी प्रसिद्ध आहे. हा बीच म्हणजे निसर्गाची मालवणला दिलेली देणगीच आहे.

श्री. रामेश्वर देव आचरा : हे स्वयंभु देवस्थान असुन शिवकालीन मंदीर आहे.

देवबाग : देवबाग हा तारकर्लीचा सुंदर समुद्र किनारा आहे. मनाला मोहित करणारा हा शोभिवंत किनारा आहे.

तारकर्ली : मालवण पासून ७ कि.मी. वर असणारे शासनाने सुंदर असे हे पर्यटन केंद्र बनवले आहे.

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध असुन कोकणातील शेवटचा तालुका आहे.

राजवाडा : सावंतवाडी शहरात भूषण तसेच पर्यटकांचे मन आकर्षित करणारा हा राजवाडा सावंतवाडीचे तिसरे खेम सावंत भोसले यांनी बांधला होता.

मोती तलाव : १८७४ साली हा तलाव बांधला गेला असुन सावंतवाडी बस स्थानकाजवळ हा तलाव आहे.

साटम महाराज मंदीर दाणोली : सावंतवाडी पासुन दाणोली १७ कि.मी. येथे शंकर महाराज समाधी आहे.

आंबोली : हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असुन निसर्ग रम्य ठिकाण आहे. येथे सनसेट पोइंट, हिरवळ केशी, कावळेसाद, महादेव गड पोइंट असे निसर्गरम्य पाईट आहेत. तसेच आंबोली येथे समुद्र सपाटीपासून २५०० फुट उंचीवर एक धबधबा आहे. कोकणचा म्हणुन तसेच सौंदर्य नगरी म्हणुन आंबोलीला मिळालेली निसर्गाची देणगी आहे.

अरोदा : सावंतवाडी पासुन २६ कि.मी. हे निसर्गरम्य ठिकाण आहे. येथे जवळच रेडी येथील इस्पात हा भारतातील एक प्रमुख पोलाद निर्मिती प्रकल्प आहे.

देवगड : हे तालुक्याचे ठिकाण असुन कोकण रेल्वे चे एक महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. तालुक्यामध्ये विजय दुर्ग हा किल्ला विजय दुर्ग गावात आहे. तसेच तालुक्यात पांडवकालीन विमलेश्वर मंदिर, गजबादेवी मंदीर, कुणकेश्वर मंदीर, ही प्रसिद्ध व प्राचीन धार्मिक क्षेत्रे आहे. याशिवाय तालुक्यात देवगड बीच, मिठबांव बीच ही पर्यटन क्षेत्रे आहेत. देवगडचा हापुस व देवगड आंबा देशात व विदेशात प्रसिद्ध आहे.

वेंगुर्ला : हे तालुक्याचे गाव असुन समुद्र किनार्यावरील निसर्गरम्य तालुका म्हणुन ओळखला जातो. तालुक्याला रेडी या गावात सुंदर गणपती मंदीर आहे. तसेच आरवलीचा ठिकाणी वेतोबा मंदीर आहे तसेच तालुक्यामध्ये भोगवेबीच. पेळागर बीच, खवणे बीच, निवती बीच, सागर बंगला, सागरेश्वर मंदीर, या ठिकाणी प्रेक्षणीय व पर्यटन क्षेत्र आहे.

माणगाव : हे दत्ताच्या मंदिरासाठी कोकणातील प्रसिद्ध ठिकाण आहे.

कुडाळ : हे तालुक्याचे ठिकाण असुन रेल्वे स्थान या ठिकाणी आहे. या तालुक्यामध्ये साई मंदीर, लक्ष्मी नारायण मंदीर, राहूळ महाराजा समाधी असुन काप्टशिल्प व बांबू प्रकल्प बघण्यासारखे आहे.

महाराष्ट्रातील जिल्हे – उस्मानाबाद ( धाराशिव )

२७. उस्मानाबाद ( धाराशिव )

क्षेत्रफळ : ७५६९ चौ.कि.मी.

मुख्यालय : उस्मानाबाद.

साक्षरता : ७६.३३%.

लोकसंख्या : १६,६०,३११.

हवामान : उष्ण व कोरडे.

तापमान : हिवाळयात ८ अंश से ते १२ अंश उन्हाळयात ४० अंश ते ४२ अंश पर्यत.

पर्जन्यमान : ६०सेमि.

विभाग : मराठवाडा ( औरंगाबाद ).

नद्या : तेरणा, बोरी, बेणीतुरा, बाणगंगा, सीना.

तालुके : भुम बार्शी, कळंब, लोहारा, परांडा, उस्मानाबाद, तुळजापुर, उमरगा.

किल्ले : नळदुर्ग, पराडा ( भुईकोट ).

लेण्या : उस्मानाबाद जवळील डोंगरात बौध्द हिंदु व जैन लेण्या.

शेजारी जिल्ह्ये : बीड, लातुर, सोलापुर, अहमदनगर, कर्नाटक राज्य.

धार्मिक ठिकाणे : तुळजाभवानी मंदीर, खंडोबा मंदीर, कुंथलगिरी,खाजाबाद्दिन साहेबान दर्गा, हजरत खाजाशमसुद्दिन दर्गा, जाफरअली तहसीलदार दर्गा.

ऐतिहासिक ठिकाणे : तुळजापुर, अगदुर, उस्मानाबाद, पराडा.

औद्योगिक ठिकाणे : उस्मानाबाद, तुळजापुर, बार्शी.

नगरपालिका : उस्मानाबाद, तुळजापूर, भुम, बार्शी, उमरगा.

पंचायत समित्या : प्रत्येक तालुक्याला एक एकूण ८.

टोपण नावे : भवानी मातेचा जिल्ह्या.

लोकसभा मतदार संघ : उस्मानाबाद.

विधान सभा मतदार संघ : उस्मानाबाद, बार्शी, तुळजापुर, उमरगा, भुम, कळंब.

वने : जिल्ह्यामध्ये वनाचे प्रमाण खूपच कमी आहे. वनामध्ये मोह, करवंद, अर्जुनी, कडुलिंब, सलाई, बोरे, बाभळी, बांबू, साग ही वृक्ष आहेत. तसेच जंगलामध्ये काही भागात रोशा नावाचे गवत आढळते. तसेच जंगलामध्ये हरणे, ससे, माकडे, घोरपडी, कळवीट, वनगायी, रानकुत्रे, रानडुकरे, मोरे, कोकीळ, कावळे, तितरे वेगवेगळ्या चिमण्या इ. पशु-पक्षी आढळतात.

शेती : जिल्ह्यामध्ये पाऊस कमी असल्यामुळे शेती विकास फारसा झालेला नाही. पावसाळ्यामध्ये ज्वारी-बाजरी, मका, सोयाबीन, तुर, भुईमुग, उडीद, मुग, ही पिके घेतली जातात.हिवाळयात तसेच उजनी या पाठबंधारे भागात उस, गहु, हरभरा, मका, भाजीपाला, पेरू, द्राक्ष ही पिके घेतली जातात.

जिल्ह्यातील प्रमुख शहरे व ठिकाणे :

उस्मानाबाद : हे जिल्ह्याचे ठिकाण असुन धाराशिव ह्या नावाने सुद्धा शहराला ओळखले जाते. शहराजवळ भोगवती नावाची नदी असुन या नदीवरच उस्मानाबाद शहर बसले आहे. उस्मानाबाद शहराजवळच्या डोंगरात बौद्ध, जैन, हिंदू लेण्या आहेत. शहरामध्ये हजरत ख्वाजा रामसुद्दिन गाझिया दर्गा आहे. अनेक भाविक येथे दरसाल येतात.

तुळजापुर : हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असुन छ. शिवाजी महाराजाची देवता तसेच व महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानीचे भव्य मंदीर तुळजापुरात आहे. देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी तुळजाभवानी हे एक पीठ आहे. याच तुळजाभवानीने शिवरायांना भवानी मळदुर्ग देऊन अफजलखानाचा खात्मा करण्यास मदत केली होती. तुळजापुर पासून जवळच मळदुर्ग नावाचा एक भव्य किल्ला आहे. येथील किल्ल्याचे अनेक अवशेष आजही बघावयास मिळतात. तसेच तुळजापुर जवळच नागझरी नावाचे निसर्ग रम्य ठिकाण आहे व अणदुर या ठिकाणी खंडोबाचे मंदीर आहे.

तेर : हे जैन मंदीर व त्यावरील कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. येथे कै. रामलिंगप्पा पुराणवस्तु संग्रहालय आहे तसेच संत गोरा कुंभार जन्म ठिकाण असुन येथेच गोरा कुंभाराची समाधी आहे.

डोणगाव : हे परांडा तालुक्यात असुन रामदास स्वामीचे पट्ट्याशिष्ट्य कल्याण स्वामी यांचा मठ येथे आहे, तसेच खज्जाद्दिन साहेबांचा दर्गा येथे आहे.

महाराष्ट्रातील जिल्हे – बुलढाणा

२६. बुलढाणा

क्षेत्रफळ :९६६१चौ.कि.मी.

मुख्यालय :बुलढाणा.

साक्षरता :८२.०९%.

लोकसंख्या :२५,८८,०३९.

हवामान :उष्ण, विषम,थंड.

तापमान :हिवाळ्यात८अंशते१२अंशसे. उन्हाळ्यात३५अंश ते ४२अंशसे.

प्रशासकियविभाग :अमरावती ( विदर्भ )

पर्वत :अजिंठा.

नद्या:पुर्णा,पेनगंगा,नळगंगा,बाणगंगा, विश्वगंगा, काटेपुर्णा.

पिके:कापुस,ज्वारी,मका,सोयाबीन,गहु,हरभरा.

शेजारीजिल्हे :जळगाव,जालना,अकोला,वाशिम,हिंगोली,मध्यप्रदेश.

औद्योगिकठिकाणे :मलकापुर,खामगाव

तालुके: बुलढाणा, खामगाव, जळगाव ( जामोद ) मेहकर, लोणार, मोताळा, शेगाव, नांदुरा, चिखली, संग्रामपुर, मलकापुर, देऊळगाव राजा, सिद्धखेडराजा.

धार्मिक ठिकाणे : गजाननबाबा समाधी, शेगाव, गौरीशंकर मंदीरमलकापुर, नृसिंह, बालाजी, विष्णु मंदीरेमेहकर, जैन मंदीरजळगाव जामोद, बौद्ध विहारखामंगाव, बालाजी मंदीरदेऊळगाव राजा, मारोती नांदुरा.

ऐतिहासिक ठिकाणे : जिजाबाईंचे माहेरसिधखेडराजा, खामगाव, लोणार, मेहकर.

टोपण नाव : विदर्भाचे प्रवेशद्वार.

नगरपालिका :बुलढाणा, खामगाव, मेहकर, नांदुरा, चिखली, मलकापुर,शेगाव व संग्रामपुर.

पंचायत समित्या : प्रत्येक तालुक्याला एक एकूण १३.

विधानसभा मतदारसंघ : बुलढाणा, खामगाव, मलकापुर, नांदुरा, शेगाव, चिखली, मेहकर, सिद्धखेडराजा, संग्रामपुर, जळगाव, जामोद.

लोकसभा मतदार संघ : बुलढाणा.

गावे : १२७३.

रेल्वे स्थानके : नांदुरा, मलकापुर, शेगाव, खामगाव.

वने : बुलढाणा जिल्ह्यातील वनक्षेत्र साधारणतः अजिंठ्याच्या डोंगररांगामध्ये जास्त प्रमाणात पसरलेले आहे.याशिवाय येथेही जंगलक्षेत्र आहे.येथील जंगलात मोर, बोरी,बाबळी, पळस, टेभुर्णी, बीभाची झाडे, खैर, सागवान, करवंद तसेच वेगवेगळ्या प्रकारचे गवत जिल्ह्यात आढळते. वनामध्ये चित्ते, बिबटे, माकडे, ससे, घोरपडी, रस, तितरे, लाहुरी, मोर, निरनिराळ्या चिमण्या, कावळे, पारवे, घारी, पहाडी पोपट,कोकीळ अशाप्रकारची पशुपक्षी आहेत. दलदलीच्या भागात बगळे, पानकोंबड्या आढळतात.

शेतीविषयक : बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाउस बर्यापैकी असल्यामुळे येथे पावसाच्या पाण्यावर बरीचशी शेती केली जाते. जिल्ह्यात ६५ते७० % ही कापसाची शेती आहे याशिवाय येथे ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका, हिवाळ्यात गहु, बाजरी, सूर्यफुल, भाजीपाला, मिरची ही पिके घेतली जातात काही भागात मोसंबीच्या बागा आहेत.

प्रमुख शहरे व प्रेक्षणीय स्थळे :

बुलढाणा : बुलढाणा हे जिल्ह्याचे मुख्यालय असुन विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणुन ओळखले जाते. बुलढाणा शहर हे जिल्हयातील थंड हवेचे ठिकाण असुन येथील हवा आरोग्याला हितकारक असते. क्षयरोगाने पिडीत असलेले रोगी येथे बरे होतात. त्यासाठी येथे मोठे क्षयरोग हॉस्पिटल आहे. बुलढाणा येथुन जवळचे देऊळगाव या ठिकाणी भुईकोट किल्ला आहे.

शेगाव : शेगाव हे जळगावअकोला महामार्गावरील एक तिर्थक्षेत्र आहे. येथे गजानन महाराजाची समाधी व मंदीर आहे. लाखोंच्या संख्येने भाविक येथे येत असतात. शेगाव हे मुंबईनागपुर लोहमार्गावरील महत्वाचे रेल्वे स्थानक आहे.

लोणार : महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणुन लोणार सरोवर प्रसिद्ध आहे. पुर्वी या सरोवराला वैराजतिर्थ म्हणुन ओळखले जायचे.

सिद्धखेड राजा : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांचा जन्म सिद्धखेड येथे झाला होता. जिजाबाई यांचे वडील लखुजी जाधव यांची येथे समाधी आहे. तसेच जिजाबाई यांचे बंधु दत्ताजी जाधव हे संभाजीदत्ताजी यांच्या लढाईत येथेच मरण पावले.

मेहकर : हे तालुक्याचे ठिकाण असुन एक मोठे शहर आहे. येथील विष्णु मंदीर, बालाजी मंदीर, नृसिंह मंदीर, जैनमंदिर प्रसिद्ध आहे.

मलकापुर : मलकापुर हे तालुक्याचे ठिकाण असुन मुंबईनागपुर रेल्वे मार्गातील महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. येथी गौरीशंकर मंदीर विशेष उल्लेखनिय आहे.

खामगाव : बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर म्हणुन खामगावला ओळखले जाते. येथे रेल्वे स्थानक, औद्योगिक वसाहत, मोठी बाजार पेठ, कुष्ठरोग, दवाखाना आहे.

नांदुरा : तालुक्याचे ठिकाण असुन येथे जगप्रसिद्ध १०५ फुट भव्य हनुमान मुर्ती आहे.