भारतातील सर्वात मोठे, लहान, उंच, लांब, जास्त, कमी इत्यादी

भारतातील सर्वात मोठे

 • सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने) राजस्थान
 • सर्वात मोठा जिल्हा – लडाख (काश्मीर)
 • सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश – सुंदरबन, . बंगाल
 • सर्वात मोठे राज्य (लोकसंख्येने) उत्तर प्रदेश
 • सर्वात मोठे वाळवंट थरचे वाळवंट
 • सर्वात मोठे मशीद – जामा मशीद, दिल्ली
 • सर्वात मोठा घुमट – गोल घुमट, विजापूर कर्नाटक
 • सर्वात मोठे संग्रहालय – इंडियन मुझीयम, कोलकाता
 • सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय – झूलॅाजिकल गार्डन, अलीपूर प. बंगाल
 • सर्वात मोठी प्राण्यांची जत्रा भरणारे ठिकाण – सोलपुर बिहार
 • सर्वात मोठे गुंफा मंदिर वेरूळ औरंगाबाद
 • सर्वात मोठे गुरुद्वार – सुवर्ण मंदिर, अमृतसर
 • सर्वात मोठे सरोवर – वूलर सरोवर, काश्मीर
 • मोठा रेल्वे प्लॅटफॅार्म खरगपूर , . बंगाल
 • सर्वात मोठा केंद्र्शाशित प्रदेश (क्षेत्रफळाने) – अंदमान आणि निकोबार
 • सर्वात मोठा केंद्र्शाशित प्रदेश (लोकसंख्येने) – दिल्ली
 • सर्वात मोठा प्रेक्षागृह – षण्मुखानंद सभागृह मुंबई
 • सर्वात मोठी सार्वजनिक बँक – स्टेट बँक ऑफ इंडिया
 • सर्वात मोठे राजगृह – राष्टपती भवन, नवी दिल्ली
 • सर्वात मोठे चर्च से कॅथेंड‌‍ल 
 • सर्वात मोठे धरण (सिमेंट कॉन्क्रीट युक्त) – नागार्जुन सागर, आंध्रप्रदेश
 • सर्वात मोठे खोरे – गंगा नदीचे खोरे
 • सर्वात मोठी युद्ध नौका – आय. एन. एस. दिल्ली
 • सर्वात मोठा खत कारखाना – सिंद्री, झारखंड

भारतातील सर्वात लहान

 • सर्वात लहान राज्य (क्षेत्रफळाने) – गोवा
 • सर्वात लहान राज्य (लोकसंख्येने) – सिक्कीम
 • सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश(क्षेत्रफळाने) – लक्षदीप
 • सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश(लोकसंख्येने) – लक्षदीप
 • सर्वात लहान जिल्हा – गारोहील्स,मेघालय

भारतातील सर्वात उंच

 • सर्वात उंच धबधबा – गिरसप्पा (जोग) धबधबा कर्नाटक
 • सर्वात उंच पुतळा – गोमटेश्वर (श्रवणबेळगोळ), कर्नाटक
 • सर्वात उंच पर्वतशिखर K २ गॅाडविन ऑस्टीन (, ६११ मीटर )
 • सर्वात उंच दरवाजा बुलंद दरवाजा, फत्तेपूर सिक्री (उत्तर प्रदेश)
 • सर्वात उंच धरण – भाक्रा (सतलज नदीवर, पंजाब)
 • सर्वात उंच मिनार कुतुबमिनार, दिल्ली
 • सर्वात उंच वृक्ष देवदार (हिमालय)
 • सर्वाधिक उंचीवरील रेल्वेस्टेशन – धूमदार्जीलिंग, . बंगाल
 • सर्वाधिक उंचीवरील विमानतळ – लेह विमानतळ , लडाख,जम्मूकाश्मीर
 • सर्वाधिक उंचीवरील टेलिफोन एक्स्चेंज किब्बर डोंगराळ प्रदेश (१४५०० फुटूस्पिती खोरे, हिमाचल प्रदेश
 • सर्वात उंचीवरील टपाल कचेरी हिक्कीम (जि. लाहुल स्पिनी, हिमाचल प्रदेश )
 • सर्वात उंचीवरील युद्धक्षेत्र सियाचेन (जम्मूकाश्मीर)
 • सर्वात उंचीवरील मार्ग खारदुंगला, लडाख (५६०२ मी.)

भारतातील सर्वात लांब

 • सर्वात लांब धरण – हिराकूड (महानदीवर ओरिसा)
 • सर्वात लांब पूल (रस्त्यावरील) – महात्मा गांधी सेतू (गंगा नदीवर .५७ कि.मी. , बिहार )
 • सर्वात लांब पूल (समुद्रावरील) – अन्नाई इंदिरा गांधी सेतू .३४ कि.मी. , तामिळनाडू
 • सर्वात लांब नदी – गंगा
 • सर्वात लांब मार्गावरील रेल्वे प्रवासी गाडी हिमसागर एक्स्प्रेस (जम्मूतावी ते कन्याकुमारी )
 • सर्वात लांब मार्ग – ग्रॅंड ट्रंक रोड , कोलकाता ते अमृतसर

भारतातील सर्वात जास्त

 • सर्वात जास्त खपाचे वृत्तपत्र (प्रादेशिक भाषा ) मल्याळम मनोरमा (केरळ)
 • सर्वात जास्त खपाचे इंग्रजी वृत्तपत्र – टाईम्स ऑफ इंडिया
 • सर्वात जास्त पावसाचे ठिकाण मावसीनराम (मेघालय)
 • सर्वात जास्त थंड हवामानाचे ठिकाण लेह
 • सर्वात जास्त उष्ण ठिकाण – गंगानगर (राजस्थान)
 • सर्वात जास्त जिल्हे असलेले राज्य – उत्तर प्रदेश
 • सर्वाधिक वेगवान रेल्वे – नवी दिल्ली ते भोपाळ, शताब्दी एक्स्प्रेस (ताशी १४४ कि.मी.)
 • सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा – ठाणे
 • सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य . बंगाल
 • सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला केंद्रशासित प्रदेश दिल्ली
 • सर्वाधिक लिंगगुणोत्तर असलेले राज्य केरळ
 • सर्वाधिक लिंगगुणोत्तर असलेला केंद्रशासित प्रदेश पॅाडिचेरी
 • सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य केरळ
 • सर्वाधिक साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप
 • सर्वाधिक क्षेत्र जंगलाखाली असलेले राज्य मध्यप्रदेश
 • भू-क्षेत्राशी वनव्याप्त क्षेत्राचे सर्वाधिक प्रमाण मिझोरम
 • सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारी व्यक्ती – ज्योती बसू (सतत २३ वर्षे, . बंगाल )
 • सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदिवासी जमात संथाल
 • सर्वाधिक साखर कारखाने असलेले राज्य – उत्तर प्रदेश
 • सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेले राज्य गुजरात
 • सर्वाधिक अनिसुचीत जातीतील नागरिक राहणारे राज्य उत्तर प्रदेश
 • सर्वाधिक बौद्ध राहणारे राज्य – महाराष्ट्र

मुंबई

भौगोलिक माहिती मुंबई शहर मुंबई उपनगर क्षेत्रफळ १५७ चौ.कि.मी. ४४६ चौ.कि.मी....

Read More

पशुसंवर्धन

म्हशीच्या दुधात स्निग्धांश ……टक्के असते ७% कोकणात शेतीची चिखलणी मुख्यता ……करवी...

Read More

राज्यशास्त्र

राज्यशास्त्र लोकसभा व राज्यसभा यांच्या दोन अधिवेशनांमध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त अंतर...

Read More

भारतातील सर्वात पहिले

भारतातील सर्वात पहिले

 • भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद
 • भारताचे पहिले मुस्लीम राष्ट्रपती – डॉ. झाकीर हुसेन
 • भारताचे पहिले शीख राष्ट्रपती – ग्यानी झैलसिंग
 • राष्ट्रपती निवडून येणारे पहिले उपराष्ट्रपती – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
 • पदावर असताना निधन पावलेले पहिले राष्ट्रपती – डॉ. झाकीर हुसेन
 • राष्ट्रपती पदावर आरूढ होणारी सर्वाधिक तरुण व्यक्ती – नीलम संजीव रेड्डी
 • सर्वाधिक पंतप्रधानांसोबत कार्य केलेले राष्ट्रपती – आर. वेंकटरामन
 • (राजीव गांधी, व्ही.पी.सिंग, चंद्रशेखर व पी.व्ही. नरसिंहराव या चार पंतप्रधान सोबत )
 • अनुसूचित जातीमधील उपराष्ट्रपती पदी तसेच राष्ट्रपती पदी विराजमान होणारी पहिली व्यक्ती के. आर. नारायण
 • राष्ट्रापदी पदावर विराजमान होणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ – डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम
 • हंगामी राष्ट्रपती पद भूषवणारी पहिली व्यक्ती वराहगिरी व्यंकटगिरी (१९६९)
 • भारताचे पहिले शीख पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग (२००४)
 • भारताचे पहिले उपराष्ट्रपती – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
 • पदावर असताना निधन पावलेले पहिले उपराष्ट्रपती – के कृष्णकांत
 • भारताचे पहिले पंतप्रधान – पंडित जवाहरलाल नेहरू
 • कॉंग्रेसेतर पक्षाचे पहिले पंतप्रधान – मोरारजी देसाई
 • कॉंग्रेसेतर पक्षाचे सर्वाधिक काळ व सर्वात कमी काळ पदावर असणारे पंतप्रधान – अटलबिहारी वाजपेयी
 • हंगामी पंतप्रधान पद भूषवणारी पहिली व्यक्ती – गुलझारीलाल नंदा (१९६४)
 • भारताचे पहिले उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल
 • लोकसभेचे पहिले सभापती – . वा. मावळकर
 • ब्रिटीश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल – वॉरन हेस्टिंग्ज
 • ब्रिटीश हिंदुस्थानचे शेवटचे गव्हर्नर जनरल – लॉर्ड कॅनिंग
 • स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन
 • स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी
 • ब्रिटीश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग
 • ब्रिटीश हिंदुस्थानचे शेवटचे व्हाईसरॉय ­ लॉर्ड माउंटबॅटन
 • भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेश्चंद्र बनर्जी (१८८५)
 • भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष – पी. आनंद चार्लू (१८९१)
 • भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले पारशी अध्यक्ष – दादाभाई नौरोजी (१८८६)
 • भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष ­– बद्रुद्दीन तैय्यबजी (१८८७)
 • भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्ष मौलाना आझाद (१९४०४६)
 • स्वतंत्र भारताचे पहिले भूदल प्रमुख – जनरल एम . राजेंद्रसिंह
 • स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सरसेनानी – जनरल करिअप्पा
 • स्वतंत्र भारताचे पहिले हवैदल प्रमुख एअर मार्शल एस. मुखर्जी
 • स्वतंत्र भारताचे पहिले नौदल प्रमुख – व्हाईस अडमिरल आर. डी. कटारी
 • भारतचे पहिले फिल्ड मार्शल जनरल माणकेशा
 • इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय राजा राममोहन रॉय
 • ब्रिटीश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य – दादाभाई नौरोजी
 • हाउस ऑफ लॉर्ड चे पहिले भारतीय सभासद – एस. पी. सिन्हा
 • अमेरिकन कॉंग्रेसचे पहिले भारतीय सभासद दिलीपसिंग सौद
 • आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय अध्यक्ष – डॉ. नागेंद्र सिंग
 • संयुक्त राष्ट्रसंघात हिंदी मध्ये भाषण करणारे पहिले भारतीय – अटलबिहारी वाजपेयी
 • सर्व्वोच न्यायालयाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश – न्या. हिरालाल कानिया
 • उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश शाम्भुनाथ पंडित
 • भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन
 • पहिले रॅंग्लर . एम. बोस
 • आय सी. एस परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय सुरेंद्रनाथ बनर्जी
 • पहिले भारताचे आय. सी. एस. अधिकारी – सत्येंद्रनाथ टागोर
 • बरीस्टर ची पदवी मिळवणारे पहिले भारतीय – ज्ञानेद्रमोहन टागोर
 • पहिले भारतीय वैमानिक – जे. आर. डी. टाटा (१९३२)
 • भारतात सर्वप्रथम प्रिंटींग प्रेसची सुरुवात करणारा जेम्स हिल्के
 • पहिल्या भारतीय अंटाक्टिका मोहिमेचे नेतृत्व करणारा प्रा. कासीम
 • अंटाक्टिकावर पाउल ठेवणारे पहिले भारतीय लेफ्टनंट रामचरण (१९६०)
 • दक्षिण ध्रुवावर पाउल ठेवणारे पहिले भारतीय कर्नल जे. के. बजाज (१९८९)
 • इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय मिहीर सेन (१९५८)
 • भारताचा पहिला अंतराळ यात्री स्क्वाडन लीडर राकेश शर्मा (१९८४)
 • जगाला चक्कर मारणारे पहिले भारतीय – ले. के. राव
 • एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाउल ठेवणारा – तेनसिंग नोर्के
 • प्राणवायूशिवाय पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करणारा – फु-दोरजी (१९८४)
 • नोबेल पारितोषिकाचे पाहिले भारतीय मानकरी – रवींद्रनाथ टागोर (१९१३)
 • भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय – सी. व्ही. रामन (१९३०)
 • अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय – डॉ. अमर्त्य कुमार सेन (१९९८)
 • रॅमन मगसेसे पारितोषिकाचे पहिले भारतीय मानकरी – आचार्य विनोबा भावे
 • पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण व भारतरत्न हे चारही नागरी सन्मान मिळविणारे पहिले कलाकार – उस्ताद बिस्मिल्ला खां
 • पहिला परमवीर चक्र विजेता – मेजर सोमनाथ शर्मा (नोव्हेंबर १९४७)
 • भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मानकरी – जी. शंकर कुरूप (१९६५)
 • भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर – चिंतामणराव डी. देशमुख
 • लोकसभेत महाभियोगाला सामोरे जावे लागलेले पहिले न्यायाधीश – न्या. व्ही. रामस्वामी (१९९३)
 • योजना आयोगाचे पहिले अध्यक्ष – पंडित जवाहरलाल नेहरू
 • रॉयल कमिशनचे पहिले भारतीय सभासद – दादाभाई नौरोजी
 • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष – न्यायमूर्ती रानडे
 • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले दलित अध्यक्ष – शंकरराव खरात
 • आद्य क्रांतिकारक – वासुदेव बळवंत फडके
 • वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष – के. सी. नियोगी (१९५१)
 • अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष – डॉ. होमि भाभा (१९४८)

विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात

 • पहिले वर्तमानपत्र बेंगॅाल गझेट (जेम्स हिक, २९ जानेवारी १७८१)
 • पहिली टपाल कचेरी कोलकाता (१७२७)
 • पहिली रेल्वे (वाफेचे इंजिन) – मुंबई टे ठाणे १६ एप्रिल १८५३)
 • पहिली रेल्वे (विजेवरील ) मुंबई ते कुर्ला (१९२५)
 • पहिली भुयारी रेल्वे – मेट्रो रेल्वे, कोलकाता
 • पहिली दुमजली रेल्वेगाडी सिंहगड एक्स्प्रेस (मुंबई ते पुणे)
 • पहिला मूकपट – राजा हरिश्चंद्र (१९१३, दादासाहेब फाळके निर्मित)
 • पहिला बोलपट आलमआरा (१९३१, आर्देशीर इराणी निर्मित)
 • पहिला मराठी बोलपट – अयोध्येचा राजा (१९३२, प्रभात फिल्म कंपनीच्या व्ही शांताराम निर्मित)
 • पहिले दूरदर्शन केंद्र दिल्ली (१९५९)
 • पहिले आकाशवाणी केद्र मुंबई (१९२७)
 • पहिले विद्यापीठ – कोलकाता (१८५७)
 • पहिले टेलिफोन एक्स्चेंज कोलकाता (१८८१)
 • पहिला उपग्रह – आर्यभट्ट (१९७५)
 • पहिला अणुस्फोट – पोखरण (१८मे १९७४, राजस्थान )
 • पहिले क्षेपणास्त्र – पृथ्वी (१९८८)
 • भारतीय बनवटीची पहिली क्षेपणास्त्रवाहू बोट – विभूती
 • भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी शाल्की
 • भारताचे पहिले लढाऊ विमान नॅट
 • भारतीय बनवटीचा पहिला रणगाडा – विजयंता
 • पहिली अंटार्क्टिका मोहीम – डिसेंबर , १९८१ (मोहीम प्रमुख प्रा. कासीम )
 • पहिली अणुभट्टी – अप्सरा, तारापूर (१९५६)
 • पहिला आधुनिक पोलाद कारखाना कुल्ति, . बंगाल
 • पहिला तेल्शुधीकरण कारखाना दिग्बोई (१९०१, आसाम )
 • पहिली कापड गिरणी मुंबई (१८५४)
 • पहिली ताग गिरणी कोलकाता (१८५५)
 • पहिला सिमेंटचा कारखाना चेन्नई (१९०४)
 • पहिले जलविद्युत केंद्र – दार्जीलिंग (१८९८)
 • पहिले पंचतारांकित हॉटेल – ताजमहाल, मुंबई (१९०३)
 • पहिले व्यापारी विमानउडान – कराची ते मुंबई (ऑक्टो. १९३२ )
 • पहिले राष्ट्रीय उद्यान – जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल, १९३५)
 • पहिले संग्रहालय इंडियन मुझीयम, कोलकाता (फेब्रु. १८१४)
 • पहिला सरकारी साखर कारखाना प्रवरानगर (१९५०, अहमदनगर )
 • पहिली सहकारी सूतगिरणी – कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी
 • पंचायतराज पद्धतीचा स्वीकार करणारे पहिले राज्य – राजस्थान
 • भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर – कोट्टायम (केरळ)
 • भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर जिल्हा – अर्नाकुलम (केरळ )
 • भारतीय बनावटीची पाहिलीयुद्ध नौका – आय. एन. एस. दिल्ली
 • भारताची पहिली आण्विक पाणबुडी – आय. एन. एस. चक्र
 • भारतीय नौदलातील पाहिलीयुद्ध नौका – विक्रांत
 • भारताचे अंटार्क्टिकावरील पहिले स्थानक दक्षिण गंगोत्री (दुसरे मैत्रि)
 • भारतातील विमा उतरवलेला पहिला भारतीय चित्रपट – ताल (१० कोटींचा विमा )
 • भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ – हैद्राबाद, आंध्रप्रदेश (१९८२)
 • भारतातील पहिले नियोजित शहर – चंडीगढ (ला कार्बुझिए या फ्रेंच व्याक्तीद्वारा निर्मित)
 • भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य – आंध्रप्रदेश (१९५३)
 • अंत्योदय योजना सुरु करणारे भारतातील पहिले राज्य – राजस्थान
 • राष्ट्रासभेचे पहिले अधिवेशन – गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा, मुंबई (२८ डिसे. १८८५)
 • हवामानविषयक पहिला भारतीय उपग्रह – कल्पना (१२ सप्टें. २००३, श्रीहरीकोटा)
 • पहिले संपूर्ण संगणीकृत बंदर – न्हावाशेवा
 • संगणकाद्वारे रेल्वे आरक्षण केले जाणारे पहिले शहर – दिल्ली (दुसरे कोलकाता )
 • भारतातील पहिली जनगणना – १८७१७२
 • देशातील पहिले बिगर कॉंग्रेस मंत्रिमंडळ प्रस्थापित होणारे राज्य केरळ (१९५७)
 • भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी – हर्षा चावडा ( ऑगस्ट १९८६)

भारतातील प्रमुख

भारतातील प्रसिद्ध वास्तुशिल्पे

मुंबई:- छत्रपती शिवाजी टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस), रेल्वे स्टेशन , गेट वे ऑफ इंडिया, मुंबई विद्यापीठ , विधानसभा भवन, मंत्रालय, उच्च न्यायालय, छत्रपती शिवाजी म्युझियम (प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम), राजभवन, जहागीर आर्ट गॅलरी, एशियाटिक सोसायटी, आय मॅक्स थिएटर, ताजमहल हॉटेल, अफगाण चर्च, मुंबई मनपा, घारापुरी उर्फ एलिफंटा लेणी.

पुणे :- शनिवार वाडा, विश्रामबाग वाडा, लाल महाल, आगाखान पॅलेस, नॅशनल डिफेन्स अॅकाडमी.

औरंगाबाद :- बीबी का मकबरा (दख्खनचा ताजमहाल), अजिंठा – वेरुळच्या लेण्या, वेरूळ येथील कैलास नाथाचे मंदिर, घृष्णेश्वर मंदिर .

दिल्ली :- राष्टपती भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालय, इंडिया गेट, कुतुबमिनार, लक्ष्मी- नारायण मंदिर, लोटस टेम्पल (बहाई पंथाचे मंदिर ), लाल किल्ला, जंतर- मंतर (वेधशाळा), जामा मशीद, हुमायूनची कबर, विज्ञान भवन, बालभवन, केंद्रीय सचिवालय.

चेन्नई :- विधानसभा भवन, उच्च न्यायालय, फोर्ट सेंट भागातील सचिवालय, व्हिक्टोरिया स्मारक, ताजमहाल ची प्रतिकृती

कोलकाता :- विधान भवन, उच्च न्यायालय, राज भवन, सेंट जॉर्ज चर्च, रायटर्स बिल्डींग, रिझर्व्ह बँक इंडियन म्युझियम

बंगळूर :- विधान भवन, विंडसर राजवाडा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स

हैदराबाद :- चार मिनार, उस्मानिया विद्यापीठ, बिर्ला मंदिर, उच्च न्यायालय, विधानसभा भवन

चंदिगढ :- विधानसभा भवन, उच्च न्यायालय, विद्यापीठ

जयपूर :- हवा महल

भोपाळ :- भारत भवन, विधानसभा भवन

आग्रा :- ताजमहाल, लाल किल्ला, सिकंदरा ही अकबराची कबर

माउंट अबू :- दिलवाडा जैन मंदिर

भुवनेश्वर :- लिंगराज मंदिर, मुक्तेश्वर मंदिर,

कोणार्क :- सूर्यमंदिर

विजापूर :- गोलघुमट

फत्तेपूर सिक्री :- बुलंद दरवाजा

अमृतसर :- सुवर्ण मंदिर

श्रवणबेळगोळ :- गोमटेश्वराचा पुतळा

मदुराई :- गोपुरम – मीनाक्षी मंदिर

मध्य प्रदेश :- खजुराहो मंदिर

कन्याकुमारी : विवेकानंद स्मारक

भारतातील प्रमुख थंड हवेची ठिकाणे

राज्य

थंड हवेची ठिकाणे

उत्तरांचल

नैनीताल, अलमोडा, मसुरी, राणीखेत

केरळ

पोनमुडी, मुन्नार

गुजरात

सापुतारा

जम्मू आणि काश्मीर

श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम

कर्नाटक

केम्मुनुगुंडी, मडिकेरी

तामिळनाडू

कोडाई कॅनल, यारकाउड, येलगिरी, उटी , कुन्नूर

पश्चिम बंगाल

दार्जीलिंग, कॅालीम्पॉंग

मध्य प्रदेश

पंचमढी

महाराष्ट्र

महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी, लोणावळा, खंडाळा, अंबोली, भंडारदरा, चिखलदरा, तोरणमाळ, म्हैसमाळ

मणिपूर

उखरूल

मेघालय

शिलॉंग

राजस्थान

माउंट अबू

हिमाचल प्रदेश

सिमला, डलहौसी, कुलू, कसौली, चैल, धर्मशाला, मनाली, सोलान

उत्तर प्रदेश

कौसानी

भारतातील राष्ट्रीय उद्याने

राष्ट्रीय उद्याने

स्थान

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क

रामनगर (उत्तरांचल)

हजारीबाग नॅशनल पार्क

हजारीबाग (झारखंड)

बेट्ला राष्टीय उद्यान (वाघ)

पलामू (झारखंड)

दुधवा नॅशनल पार्क (वाघ)

नखीमपूर (उत्तरप्रदेश)

शिवपुरी नॅशनल पार्क

शिवपुरी (मध्य प्रदेश)

कान्हा नॅशनल पार्क (वाघ)

मांडला (मध्य प्रदेश)

बांधवगड नॅशनल पार्क

शाहदोल (मध्य प्रदेश)

ताडोबा राष्ट्रीय उद्यान

चंद्रपूर (महाराष्ट्र)

प्रियदर्शनी इंदिरा, पेंच राष्ट्रीय उद्यान

गपूर (महाराष्ट्र)

संजय गांधी नॅशनल पार्क

बोरीवली (महाराष्ट्र)

नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान

नवेगाव (गोंदिया, महाराष्ट्र)

बंदीपूर नॅशनल पार्क

म्हैसूर (कर्नाटक)

बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान (हत्ती)

बंगळूर (कर्नाटक)

नागरहोल नॅशनल पार्क

कुर्ग (कर्नाटक)

काझीरंगा नॅशनल पार्क

जोरहाट (आसाम)

नंदनकानन नॅशनल पार्क

भुवनेश्वरजवळ (ओरिसा)

रोहला नॅशनल पार्क

कुलू (हिमाचल प्रदेश)

भरतपूर राष्ट्रीय उद्यान (पक्षी)

भरतपूर (राजस्थान)

खांगचेंदझोंगा राष्ट्रीय उद्यान

गंगटोक (सिक्कीम)

वेळावदार राष्ट्रीय उद्यान (लांडगे)

भावनगर (गुजरात)

गिंडी नॅशनल पार्क

चेन्नई (तामिळनाडू)

एरावीकुलम राजमलय नॅशनल पार्क

इद्दुकी (केरळ)

भारतातील अभयारण्य

मानस अभयारण्य

बारपेटा (आसाम)

सोनलरूपा अभयारण्य

तेजपूर (आसाम)

पुलीकत अभयारण्य

पुलीकत (आंध्रप्रदेश)

मेलपट्टू अभयारण्य (पक्षी)

नेल्लोर (आंध्रप्रदेश)

कावल अभयारण्य

अदिलाबाद (आंध्रप्रदेश)

किन्नेरसानी अभयारण्य

खामाम (आंध्रप्रदेश)

तड्वाई अभयारण्य

वारंगळ (आंध्रप्रदेश)

चंद्रप्रभा अभयारण्य

वाराणसी (उत्तरप्रदेश)

घटप्रभा अभयारण्य (पक्षी)

बेळगाव (कर्नाटक)

रंगनथीट्टू अभयारण्य (पक्षी)

म्हैसूर (कर्नाटक)

शरावती खोरे अभयारण्य

शिमोगा (कर्नाटक)

दांडेली अभयारण्य (वाघ)

धारवाड (कर्नाटक)

भद्रा अभयारण्य (हत्ती)

चिकमंगळूर (कर्नाटक)

तुंगभद्रा अभयारण्य

बेल्लारी (कर्नाटक)

पेरियार अभयारण्य (हत्ती)

इद्दुकी (केरळ)

वायनाड अभयारण्य

कान्नानोर, कोझिकोडे (केरळ)

निशब्दमाया ताळवरा अभयारण्य

अट्टपाडीजवळ , जिल्हा पालघाट

गीर अभयारण्य (सिंह)

जुनागढ (गुजरात)

नळ सरोवर अभयारण्य (पक्षी)

अहमदाबाद (गुजरात)

इंद्रावती अभयारण्य (वाघ)

बस्तर (छत्तीसगढ)

आचंकमार अभयारण्य (वाघ)

बिलासपुर (छत्तीसगड)

दाचीगम अभयारण्य हंगूल – हरणे)

श्रीनगर (जम्मू काश्मीर)

पलामू अभयारण्य (वाघ)

दातीनगंज (झारखंड)

दालमा अभयारण्य (वाघ)

सिंगभूम (झारखंड)

हजारीबाग अभयारण्य

हजारीबाग (झारखंड)

इटांगकी अभयारण्य (हत्ती)

कोहिमा (नागालॅंड)

जालपाडा अभयारण्य

जलपैगुडी (प. बंगाल)

भिमबंध अभयारण्य (वाघ)

मोंघीर (बिहार)

गौतम बुद्ध अभयारण्य (वाघ)

गया (बिहार)

गांधी सागर अभयारण्य (चितळ)

मंदसौर (मध्य प्रदेश)

पंचमढी अभयारण्य

होशंगाबाद (मध्य प्रदेश)

ताडोबा अभयारण्य (वाघ)

चंद्रपूर (महाराष्ट्र)

मेळघाट अभयारण्य (वाघ)

अमरावती (महाराष्ट्र)

तानसा अभयारण्य

तानसा, ठाणे (महाराष्ट्र)

राधानगरी अभयारण्य (गवे)

कोल्हापूर (महाराष्ट्र)

सागरेश्वर अभयारण्य

सांगली (महाराष्ट्र)

देऊळगाव- रेहेकुरी अभयारण्य (काळवीट)

अहमदनगर (महाराष्ट्र)

सुंदरबन अभयारण्य (वाघ)

चोवीस परगणा (प. बंगाल)

रणथंबोर अभयारण्य (वाघ)

सवाई माधवपूर (राजस्थान)

घाना पक्षी अभयारण्य

भरतपूर (राजस्थान)

सारिस्का अभयारण्य

अल्वार (राजस्थान)

सुलतानपूर लेक अभयारण्य (वाघ)

गुरगाव (हरियाना)

सिमलीपाल अभयारण्य (वाघ)

मयूरभंज (ओरिसा)

दामपा अभयारण्य

एजवाल (सिक्कीम)

शिकारीदेवी अभयारण्य

मंडी (हिमाचल प्रदेश)

भारतातील प्रमुख नद्या

नदी

उगम

लांबी

कोठे मिळते

उपनद्या

गंगा

गंगोत्री

२५१०

बंगालच्या उपसागरास, बांगलादेशात, चांदीपूरजवळ

रामगंगा

यमुना

यमुनोत्री

१४३५

गंगा नदीस अलाहाबाद येथे

चंबळ, बेटवा, केन, सिंध

घाघ्रा

गंगोत्रीच्या पूर्वेस

९१२

गंगा नदीस

शारदा, राप्ती

गोमती

पिलीभितजवळ

८००

गंगा नदीस

साई

शोण

पूर्व मध्य

७६०

गंगा नदीस

साई

गंडक

मध्य हिमालय

६७५

गंगा नदीस पाटण्याजवळ

त्रिशुला

कोसी

पूर्व नेपाळ तांबर

७३०

गंगा नदीस

अरूण, घुगरी

दामोदर

तोरी (छोटा नागपूर पठार)

५४१

हुगळी नदीस

गोनिया, बाराकर, कोनार

ब्रह्मपुत्रा

मानस सरोवराजवळ (तिबेट)

२९०० (भारतात ८८५)

गंगा नदीस बांगलादेशमध्ये

लोहित, मानस, दिबांग, चंपावती, सुबानसिरी, तिस्ता, कोपिली

सिंधू

मानससरोवर (तिबेट)

२९०० (भारतात ७०९)

अरबी समुद्रास

झेलम, चिनाब,रावी, सतलज, द्रास, बियास, झंस्कर

झेलम

पीरपंजाल टेकड्या मध्ये वैरीनाग

७२५

सिंधू नदीस

किशांगांगा, पुंछ

चिनाब

हिमालय पर्वत

९६०

सिंधू नदीस

उनियार, लिडारकोर, मारूवरद्वान, भूतना

रावी

कुलू टेकड्या मध्ये ( हिमाचल प्रदेश )

७२५

सिंधू नदीस

दिग

बियास

कुलू टेकड्या मध्ये ( हिमाचल प्रदेश )

४७०

सतलज नदीस

सतलज

राकस सरोवर (तिबेट)

१३६०

सिंधू नदीस

बियास

नर्मदा

अमरकंटक जि. शहडोल (मध्य प्रदेश)

१३१०

अरबी समुद्रास

हिरण, शेर, बंजार, शक्कर

तापी

मुलताई जि. बैतुल (मध्य प्रदेश)

७०२

अरबी समुद्रास

पूर्णा, गिरणा, पांझरा, वाघुर, बोरी

साबरमती

अरवली पर्वत

४१५

अरबी समुद्रास

हाथमती, माझम, मेश्रो

चंबळ

जानापाव डोंगर (मध्य प्रदेश)

१०४०

यमुना नदीस

क्षिप्रा, पार्वती

महानदी

सिहाव जि. रायपुर (मध्य प्रदेश)

८५८

बंगालच्या उपसागरास ओरिसामध्ये

सेवानाथ, ओंग, पैरी, तेल

गोदावरी

त्रंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी जि. नाशिक महाराष्ट्र

१४९८

बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात

सिंदफणा, दुधना, पूर्णा, पैनगंगा, प्राणहिता, वर्धा, इंद्रावती, काडवा, दारणा, मांजरा

कृष्णा

महाबळेश्वर जि. पुणे (महाराष्ट्र)

१२८०

बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात

कोयना, वारणा, वेण्णा, भीमा, पंचगंगा, तुंगभद्रा

भीमा

भीमाशंकर जि. पुणे (महाराष्ट्र)

८६७

कृष्णा नदीस

इंद्रायणी, मुळा, घोड नीरा, भामा, सीना, माण

कावेरी

ब्रह्मगिरी जि. कुर्ग (कर्नाटक)

७६०

बंगालच्या उपसागरात

सुवर्णवती, कर्णावती, भवानी, नोयील

तुंगभद्रा

गांगामुळ (कर्नाटक)

६४०

कृष्णा नदीस

वेदवती, हरिद्रा, कुमुद्वती, वरद

भारतातील पहिल्या महिला

भारतातील पहिल्या महिला

 • दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लीम राज्यकर्ती – रझिया सुलताना
 • भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान – इंदिरा गांधी
 • भारतातील परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर – डॉ. आनंदीबाई जोशी
 • भातातील पहिल्या महिला डॉक्टर – डॉ. कादम्बनी गांगुली
 • भारतीय राष्टीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष – अॅनी बेझंट (१९१७)
 • भारतीय राष्टीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष – सरोजिनी नायडू (१९२५)
 • पहिली महिला राजपाल – सरोजिनी नायडू
 • पहिली महिला मुखमंत्री – सुचेता कृपलानी (१९६३-६७, उत्तर प्रदेश )
 • भारताच्या परदेशातील पहिली महिला राजदूत – सी. बी. मुथाप्पा
 • भारताच्या रशियातील पहिली महिला राजदूत – विजयालक्ष्मी पंडित
 • पहिली महिला बॅरीस्टर – कार्नेलीया सोराबजी
 • उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद भूषवणारी पहिली महिला – न्या. लैला शेठ (१९९१, हिमाचल प्रदेश )
 • सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश – न्या. मिरासाहीब फातीमिबिबी (१९८९)
 • युनोच्या आमसभेचे अध्यक्षस्थान भूषवणारी पहिली भारतीय महिला – विजयालक्ष्मी पंडित (१९५३)
 • युनोमध्ये नागरी पोलीस सल्लागार पद भूषवणारी पहिली भारतीय महिला – किरण बेदी (२००३)
 • केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद भूषवणारी [अहिली महिला – राजकुमारी अमृतकौर
 • पहिली महिला सभापती – सुशीला नायर
 • पहिली भारतीय महापौर – अरुणा असफअली
 • योजना आयोगाची पहिली महिला अध्यक्ष – इंदिरा गांधी
 • एम. ए. ची पदव्युत्तर पदवी मिळविणारी पहिली महिला – चंद्रमुखी बोस
 • पहिली महिला आय. ए. एस. अधिकारी – अन्ना राजम जॉर्ज
 • पहिली महिला आय. पी. एस. अधिकारी – किरण बेदी
 • पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल – पद्मावती बंडोपाध्याय
 • पहिली भारतीय महिला क्रांतिकारक – मॅडम भिकाजी कामा
 • अमेरिकी राज्याच्या प्रतिनिधी गृहात सदस्य झालेल्या पहिल्या भारतीय महिला – स्वाती दांडेकर
 • पहिली भारतीय महिला ग्रॅडमास्टर – एस. विजयालक्ष्मी
 • इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला – आरती साहा (गुप्ता)
 • एव्हरेस्ट पाउल ठेवणारी पहिली बह्र्तीय महिला – बचेंद्री पाल
 • एव्हरेस्ट शिकःर सर करणारी दुसरी भारतीय महिला – संतोष यादव
 • दोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी भारतीय महिला – संतोष यादव
 • एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण महिला – डिकी डोमा
 • पाहिली महिला वैमानिक – प्रेम माथुर
 • भारताची पहिली महिला अंतराळवीर – कल्पना चावला (१९९७)
 • पहिली भारतीय महिला जगाला चक्कर मारणारी – उज्वला रॉय
 • पॅराशुट जंप घेणारी पहिली महिला – गीता चंद्र
 • भारताच्या पहिला महिला परराष्ट्र सचिव – चोकीला अय्यर
 • जगतसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला – रिटा फॅरिया
 • नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली महिला – मदर टेरेसा (१९७९)
 • रॅमन मॅगसेसे पारितोषिक मिळवणारी पहिली महिला – कमलादेवी चटोपाध्याय
 • भारतरत्न मिळवणारी पहिली भारतीय महिला – इंदिरा गांधी (१९७१)
 • भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी पहिली महिला – आशापूर्णादेवी (१९७६)
 • दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणारी पहिली महिला – देविकाराणी (१९६९)
 • साहित्य अकादमी पुरस्कार मिळविणारी पहिली महिला – अमृता प्रीतम
 • ऑलिम्पिक सामन्यात पदकविजेती पहिली महिला – कार्नामा मल्लेश्वरी (सिडनी, २०००, कांस्यपदक, वेट लिफ्टिंग )
 • बुकर पुरस्कार मिळविणारी पहिली महिला – अरुंधती रॉय (१९९७, The god of Small Things)
 • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष – कुसुमावती देशपांडे
 • राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला – कॅ. लक्ष्मी सहगल (२००२)
 • भारतातील एखाद्या राज्याची पहिली महिला पोलीस महासंचालक – कंचन चौधरी भट्टाचार्य (२००४)

भारत सर्वसामान्य माहिती

भारत – सर्व सामान्य माहिती

 • स्थान – आशिया
 • विस्तारअक्षवृतीय विस्तार – ८° ४’ २८” उ. ते ३७° १७’ ५३” उ.

रेखा वृतीय विस्तार – ६८° ७’ ३३” पूर्व. ते ९७° २४’ ४७” उ.

पूर्व पश्चिम अंतर – २९३३ कि.मी.

दक्षिणोत्तर अंतर – ३२१४ कि.मी

जलसिमा (समुद्रकिनारा) – ७५१७ कि.मी.

भू-सीमा – १५२०० कि.मी.

 • एकूण क्षेत्रफळ – ३२,८७,२६३ चौ. कि. मी.
 • राजधानी – दिल्ली
 • कूण राज्ये – २८
 • केंद्र्शाशित प्रदेश ०७
 • भारताची जनगणना २०११ प्रमाणे :

एकूण लोकसंख्या – १,२१,०१,९३,४२२

ग्रामीण लोकसंख्या – ६८.८४ %

नागरी लोकसंख्या – ३१.१६ %

पुरुष:स्त्री प्रमाण – १०००:९४०

एकूण साक्षरता – ७४.०४ %

पुरुष साक्षरता – ८२.१४ %

स्त्री साक्षरता – ६५.४६ %

लोकसंख्येची घनता – ३८२

 • प्रमुख सीमारेषा

मॅकमोहन रेषा – सर हेन्री मॅकमोहन यांनी निश्चित केलेली भारत व चीन     यांच्या मधील सीमा रेषा

रॅडक्लिफ रेषा – सर रॅडक्लिफ यांनी १९४७ मध्ये निश्चित केलेली भारत व पाकिस्तान यामधील रेषा सीमा

 • भारताचे शेजारील देश व समुद्र :

उत्तरेस – नेपाळ, भूतान, चीन

पूर्वेस – बांगलादेश, म्यानमार, बंगालचा उपसागर

दक्षिणेस – श्रीलंका, पाल्कची सामुद्रधुनी, मानारचे आखात

पश्चिमेस – पाकिस्तान, अरबीसमुद्र

वायव्येस – अफगाणिस्तान

 • भारताच्या सीमेवर एकूण सात देश आहेत . पाल्कची सामुद्रधुनी व मानारचे आखात यामुळे श्रीलंका भारतापासून वेगळे झाले आहे

भारतातील राज्ये – राजधान्या व राज्यभाषा

राज्य

राजधानी

राज्यभाषा

आंध्र प्रदेश

हैद्राबाद

तेलगु आणि उर्दू

आसाम

दिसपूर

आसामी आणि बंगाली

बिहार

पटना

हिंदी

गुजरात

गांधीनगर

गुजराती

हरियाना

चंडीगड

हिंदी

जम्मू काश्मीर

श्रीनगर

काश्मिरी व उर्दू

हिमाचल प्रदेश

सिमला

हिंदी व पहाडी

केरळ

त्रिवेंद्रम

मल्याळी

कर्नाटक

बंगलोर

कन्नड

मध्यप्रदेश

भोपाळ

हिंदी

महाराष्ट्र

मुंबई

मराठी

सिक्कीम

गंगटोक

सिक्कीम व गोरखली

अरुणाचल प्रदेश

इटानगर

पहाडी

मेघालय

शिलॉंग

खाशी, जैतीया, गारो

मणिपूर

इम्फाळ

मणिपुरी

नागालँड

कोहिमा

नागा, आसामी

मिझोराम

एजवाल

मिझो, इंग्रजी

ओरिसा

भुवनेश्वर

ओडिसी

पंजाब

चंडीगड

पंजाबी

राजस्थान

जयपूर

राजस्थानी व हिंदी

तामिळनाडू

चेन्नई

तामिळ

त्रिपुरा

आगरतळा

बंगाली, मणिपुरी

उत्तर प्रदेश

लखनौ

हिंदी, उर्दू

पश्चिम बंगाल

कोलकाता

बंगाली

गोवा

पणजी

कोंकणी

छत्तीसगड

रायपुर

हिंदी

उत्तरांचल

देहराडून

हिंदी

झारखंड

रांची

हिंदी

 

केंद्र्शाशित प्रदेश

दमण – दीव

दमण

गुजराती

अंदमान – निकोबार

पोर्टब्लेअर

हिंदी

चंडीगड

चंडीगड

हिंदी, पंजाबी

दादरा – नगर हवेली

सिल्वासा

गुजराती

लक्षद्वीप

कावारत्ती

मल्याळम

पॉंडेचरी

पॉंडेचरी

तमिळ, इंग्रजी, फ्रेंच

दिल्ली

दिल्ली

हिंदी, पंजाबी, उर्दू

राष्ट्रीय प्रतीके

 • राष्ट्रध्वज :- भारताचा राष्ट्रध्वज तिरंगी आहे. सर्वात वरच्या बाजूला केशरी रंग आहे. मध्य भागी पांढरा व सर्वात खाली हिरवा रंग आहे. पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यावर मध्यभागी निळ्या रंगाचे चक्र आहे. हे चक्र सारनाथ येथील सिंह स्थंभावरील धर्मचक्रासारखे आहे. चक्रामध्ये २४ आरे आहेत. ध्वजाच्या उंची व लांबी चे प्रमाण २:३ असे असते.
 • राष्ट्रगीत :- रवींद्रनाथ टागोर रचित “जन गण मन” हे राष्ट्रीगीत म्हणून घटना समितीने २४ जानेवारी, १९५० रोजी मान्य केले. २७ डिसेंबर, १९११ रोजी भारतीय कोन्ग्रेस च्या कलकत्ता अधिवेशनात हे गीत प्रथम गायिले गेले. हे गीत एकूण पाच चरणाचे असले तरी फक्त पहिल्या चरणाचाच राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला.

राष्ट्रगीत

जन – गण – मन – अधिनायक , जय हे

भारत – भाग्य – विधाता

पंजाब – सिंधू – गुजरात – मराठा

द्राविड – उत्कल – बंगा

विंध्य – हिमाचल – यमुना – गंगा

उत्कल – जलधि – तरंगा

तव शुभ नामे जागे ,

तव शुभ आशिष मागे

गाहे तव जय – गाथा

जन – गण – मंगल – दायक जय हे ,

भारत भाग्य विधाता

जय हे ,जय हे , जय हे

जय जय जय , जय हे

 

( राष्ट्रगीत पूर्णपणे म्हणावयास अंदाजे ५२ सेकंद लागतात )

 • राष्ट्रीय चिन्ह –   सारनाथ येथे सम्राट अशोकाने बांधलेला सिंह – स्तंभ आहे . भारत सरकारने राष्ट्रीय चिन्हात या सिंह – स्तंभाला स्थान दिले आहे. या राष्ट्रीय चिन्हात एकूण तीन सिंह दिसतात. या स्तंभाच्या मध्यभागी चक्र असून, त्याच्या उजव्या बाजूला बैलाचे चित्र आहे ; डाव्या बाजूला घोड्याचे चित्र आहे. या राष्ट्रीयचिन्हाच्या खालील बाजूस मुंडकोपनिशादातील “सत्यमेव जयते” हे वचन देवनागरी लिपीमध्ये कोरले आहे. हे राष्ट्रीय चिन्ह २६ जानेवारी, १९५० रोजी मान्य करण्यात आले .
 • राष्ट्रीय गीत :- बाकिंमचन्द्र चटर्जींचे “वंदे मातरम “ या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिलेला आहे . हे गीत म्हणजे भारताच्या स्वातंत्रसंग्रामातील फार मोठी प्रेरणा होती.

बकिमचंद्राच्या “ आनंदमठ “ कादंबरीत हे गीत आहे.

 • राष्ट्रीय पंचांग :- २२ मार्च, १९५७ पासून राष्ट्रीय पंचांगाला मान्यता दिली गेली. याचा पहिला महिना चैत्र असून शेवटचा महिना फाल्गुन आहे.
 • राष्ट्रीय पक्षी – मोर
 • ाष्ट्रीय प्राणी – वाघ
 • राष्ट्रीय फुल – कमळ
 • राष्ट्रीय खेळ – हॉकी
 • राष्ट्रभाषा – हिंदी
 • राष्ट्रीय बोधवाक्य – सत्यमेव जयते