महाराष्ट्र : महसूल (मुलकी) व पोलीस प्रशासन

महाराष्ट्र : महसूल(मुलकी ) व पोलीस प्रशासन

 • महाराष्ट्रात महसूल विषयक न्यायसभेची स्थापना -१९५८
 • महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम -१९६७
 • महाराष्ट्र ग्राम पोलीस नियमावली -१९६८

महाराष्ट्र महसूल प्रशासन

 महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग :

1. प्रशासकीय विभाग –नागपूर (विदर्भ)

 • मुख्यालय –नागपूर

  विभागीय जिल्हे – नागपूर,भंडारा ,गडचिरोली ,चंद्रपूर ,वर्धा,गोंदिया

  एकूण जिल्हे –सहा

2. प्रशासकीय विभाग –अमरावती (विदर्भ )

 •  मुख्यालय –अमरावती

  विभागीय जिल्हे –अमरावती ,बुलढाणा ,अकोला,यवतमाळ,वाशीम

  एकूण जिल्हे –पाच

3. प्रशासकीय विभाग- ओरंगाबाद (मराठवाडा )

 •  मुख्यालय – ओरंगाबाद

  विभागीय जिल्हे – ओरंगाबाद,नांदेड,बीड,जालना,परभणी,हिंगोली,लातूर ,उस्मानाबाद

  एकूण जिल्हे –आठ

4. प्रशासकीय विभाग- नाशिक

 •  मुख्यालय –नाशिक

  विभागीय जिल्हे –नाशिक,ध्य्ले,नंदुरबार,जळगाव,अहमदनगर

  एकूण जिल्हे –पाच

5. प्रशासकीय विभाग –पुणे

 •  मुख्यालय –पुणे

  विभागीय जिल्हे –पुणे,सातारा,सांगली ,सोलापूर,कोल्हापूर

  एकूण जिल्हे –पाच

6. प्रशासकीय विभाग –कोकण(मुंबई)

 •  मुख्यालय –मुंबई

  विभागीय जिल्हे –मुंबई शहर ,मुंबई उपनगर ,ठाणे,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग

  एकूण जिल्हे –सहा

 • सर्वाधिक जिल्हे असणारा व मोठा प्रशासकीय विभाग –ओरंगाबाद (मराठवाडा )
 • सहा जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग –नागपूर व कोकण
 • पाच जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग- अमरावती,नाशिक,पुणे
 • महाराष्ट्रातील एकूण जिल्हे -३६
 • महाराष्ट्रातील एकूण तालुके-३५५

महाराष्ट्रातील महसूल व पोलीस प्रशासनाविषयक संक्षिप्त माहिती

 • प्रशासकीय स्तर

  कार्यकारी प्रमुख

  विभाग(महसूल )

  विभागीय आयुक्त

  जिल्हा

  जिल्हाधिकारी

  प्रांत (जिल्ह्याचा विभाग –काही तालुके मिळून )

  उपजिल्हाधिकारी प्रांताधिकारी

  तालुका /तहसील

  तहसीलदार

  गाव

  पोलिस पाटील व कोतवाल

  सज्जा

  तलाठी व कोतवाल

विभागीय आयुक्त

  • प्रशासकीय स्तर /कार्यक्षेत्र-महसूल विभाग /प्रशासकीय विभाग
  • निवड –केंद्रीय लोकसेवा आयोग(upsc)
  • नियुक्ती –राज्य शासन

  कामे :

  १)महसूल विभागाचा प्रमुख कार्यकारी अधिकारी

  2)पंचायत राज संस्था व नगर परिषद यांच्या संबंधी विशेष अधिकार यांना असतात.

  ३)जिल्हाधिकारयाच्या निर्णयावरील अपील ऐकून घेऊन त्यावर आपला निर्णय देणे.

जिल्हाधिकारी (कलेक्टर )

जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकार्यांकडे असून तो प्रशासनातील जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी असतो.

निवड:

 • केंद्रीय लोकसेवा आयोगाची भारतीय प्रशासकीय सेवा उतीर्ण झालेल्या व्यक्तीची या पदावर नेमणूक केली जाते.IAS अधिकारी
 • नियुक्ती :राज्यशासन
 • कार्यक्षेत्र :जिल्हा
 • प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी तरतूद :महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६,कलम ७(१)

कामे:

१)जिल्ह्यातील जमिनीवर शेतसारा आकारणे व तो वसूल करणे

2)जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणे व तसेच जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम करणे

३)जिल्यात दुष्काळ,रोगराई,महापूर,भूकंप  यांसारख्या नैसर्गिक आपत्ती आल्या असतील तर नागरिकांना सर्व प्रकारची मदत करण्याचे कार्य जिल्ह्याधीकारयाच्या नेतृत्वाखाली केले जाते .

४)जिल्ह्यातील जनतेच्या अडचणी,तक्रारी ऐकणे व त्यावर योग्य ती कारवाही करणे .

५)जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका यांच्या देखरेखीखाली घेतल्या जातात.

६)शेतीच्या वाद्विवादावर  निर्णय घेणे ,बेवारस संपती व जमीन ताब्यात ठेवणे तसेच अतिरिक्त जमीन ताब्यात घेणे .

७)दशवार्षिक जनगनणेचे काम त्यांच्या निरीक्षणाखाली होते.

8)जिल्हाधिकारी वेळोवेळी स्थानिक स्वराज्य संस्थाना सल्ला देतो

९)१४४ कलम किंवा कर्फ्यू जरी करणे

१०)मालमतदार्स कोर्ट कायदान्व्ये तसेच मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ अन्वये जिल्हास्तरावरील सर्व कर्तव्ये पार पडणे.

११)जिल्हा व नियोजन मंडळाचा सचिव:जिल्हाधिकारी

12)रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरावरील प्रमुख :जिल्हाधिकारी

 • उपजिल्हाधिकारी ,सहाय्यक जिल्हाधिकारी ,तहसीलदार ,मंडळ अधिकारी ,तलाठी,इ.जिल्हाधीकाराच्या नियंत्रणाखाली असतात.

उपजिल्हाधिकारी

 • कार्यक्षेत्र (प्रशासकीय सत्र ):जिल्ह्याचा विभाग –काही तालुके मिळून बनवलेला उपविभाग –प्रांत
 • निवड –महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
 • नियुक्ती:राज्य शासन

कामे:

१)महसुलविषयक कार्यात जिल्ह्याधिकारी व तहसीलदार यांच्यामध्ये समन्वय साधणारा दुवा म्हणजे उपजिल्हाधिकारी /प्रांत अधिकारी होय.

2)महसुलाच्या उपविभागाव्र्र उपजिल्हाधिकारी नेमला जातो.

३) उपविभागात कायदा व सुव्यवस्था सांभाळणे

४)पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार

तहसीलदार

 • तहसीलदार हा महसूल खात्याचा वर्ग -2 चा अधिकारी असतो.
 • महाराष्ट्र जमीन महसूल कायदा ,१९६६ कलम ७ अन्वये प्रत्येक तालुक्यास एक तहसीलदार ,एक किंवा अधिक नायब तहसीलदार अथवा अप्पर तहसीलदार नेमण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत.
 • निवड: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत याची निवड होते व नेमणूक राज्य शासनाकडून होते तसेच काही पदे पदोन्नतीने भरली जातात .

कामे:

 • तालुका दंडाधिकारी म्हणून काम करणे
 • तालुक्याला शांतता व सुव्यवस्था राकःने
 • तालुक्यातील सर्वाधिक निवडणुका वेळी तालुकास्तरावरील जबाबदारी पार पाडणे.
 • महारष्ट्र जमीन महसूल अधिनियम ,१९६६ व त्या अन्वये तयार केलेल्या नियमांच्या आधीन राहून कर्तव्ये पार पाडणे.
 • मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम ,१९४८ अन्वये,’मामलेदार ‘ या नात्याने विहित कर्तव्ये पार पाडणे.
 • मंडळ अधिकारी ,तलाठी इ.तहसिलदाराच्या नियंत्रणाखाली असतात.

तलाठी

 • तलाठी हा महसूल खात्याचा वर्ग -३ चा कर्मचारी असतो.तलाठ्याच्या कार्याक्षेत्रास ‘सज्जा’असे म्हणतात
 • नेमणूक : प्रत्येक ‘सज्जा’करिता एक किंवा अधिक तलाठी नेमण्याचे अधिकार जिल्हाधिकार्यांना आहेत .
 • नियंत्रण:मंडळ अधिकारी व तहसीलदार

कामे:

 • ग्रामस्तरावर महसूल गोळा करणे ,तसेच महसूल खात्याचे दप्तर सांभाळणे
 • ७-12 व 8 अ चे उतारे देणे.
 • जमिनीच्या व्यवहाराची नोंदी करणे .
 • निवडणुकीच्या कामात मदत करणे.
 • तहसिलदाराच्या आदेशानुसार सोपविलेलि काम करणे .
 • तलाठ्यास कोतवालावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे अधिकार असतात.

कोतवाल

 • गावपातळीवरील सर्वात कनिष्ठ व पूर्ण वेळ शासकीय सेवक होय.
 • नेमणूक :तहसिलदारामार्फात

कोतवालांची संख्या

गावाची लोकसंख्या

१००० पर्यंत

१००१ ते ३००० पर्यंत

३००१ ते पुढे

 • नियंत्रण :तलाठी
 • पात्रता :शिक्षण :४ थी उतीर्ण

        वय -१८ ते ४० वर्षे

        विहित केलेली तारणाची रक्कम १०० रु व दोन जमीन

        शारीरिकदृष्ट्या सक्षम व चारीत्रसंपन्न

        तो संबंधित गावातच राहणे आव्यश्यक असते. 

 • वेतन:दरमहा ५००० रु (पूर्वी २००० रु )
 • रजा :१)कोतवालाच्या इतर शासकीय सेवाकांप्रमाणे रजा मिळतात .

              2)कोतवालास किरकोळ राजा देण्याचे अधिकार तलाठ्यास असतात .

                  ३)कोतवालाची अर्जित रजा मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारास असतात.

कामे:

१)गावातील लोकांना आवश्यक त्या वेळीचावडी/सज्जा येथे बोलाविणे .चावडी/सज्जा येथे स्वच्छता ठेवणे .

2)सरकारी पत्रव्यवहार पोहोच करणे .

३)गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पातळस मदत करणे.

४)जन्ममृत्यूची,विवाह इ.नोंदणीची माहिती ग्रामसेवकास देणे.

५)तलाठी,पोलीस पाटील व अन्य वरिष्ठ अधिकारी यांना त्यांच्या कामात मदत करणे.

६)गावात दवंडी पिटून सरकारी आदेश /सूचना जाहीर करणे.

तलाठी

 • नेमणूक –उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी
 • पात्रता :
  1. वय -२५ ते ४५ वर्ष
  2. शिक्षण –किमान दहावी उतीर्ण
 • शारीरीकदृष्ट्या सक्षम व वागणूक चांगली असावी
 1. संबंधित उमेदवार त्या गावातील असावा
 • कार्यकाल :५ वर्षे परंतु ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत काम पाहता येते .
 • वेतन –दरमहा ३००० रु (पूर्वी ८०० रु )
 • नियंत्रण : तहसीलदार व पोलीस स्टेशन
 • रजा -१)वर्षातून 8 दिवस किरकोळ राजा

        2)रजा मंजुरचे अधिकार तहसिलदाराना

कामे:

 1. गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे व पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हेगाराविषयक माहिती देणे .तसेच गुन्ह्यांच्या चौकशीत मदत करणे .
 2. गावात अनैसर्गिक /संशयास्पद मृत्यू घडल्यास तालुका दंडाधिकारी व संबंधित पोलीस अधिकारी यांना तसे कळविणे .
 3. कोणी विना परवाना शस्त्र बाळगले असल्यास ते काडून घेणे .व त्या संबंधीचा अहवाल संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देणे.
 4. काही नैसर्गिक आपत्ती आल्यास तहसिलादारास तसे कळवणे .
 5. कोतवाल वैगेरे कनिष्ठ सेवकांकडून आवश्यक ती कामे करवून घेणे.

महाराष्ट्र : पोलीस प्रशासन

महाराष्ट्र पोलीस यंत्रणेची संरचना :

पोलीस महासंचालक (DGP )(राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद )

|

अप्पर पोलीस महासंचालक

|

विशेष पोलीस महानिरीक्षक (IGP)

|

पोलीस उपमहानिरीक्षक (DIG)

|

जिल्हा पोलीस अधीक्षक (SP/DSP)

|

पोलीस उपअधीक्षक /सहाय्यक पोलीस आयुक्त (Dy.SP)

|

वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Sr.PI)

|

पोलीस निरीक्षक (PI)

|

सहाय्यक पोलीस निरीक्षक(API)

|

पोलीस उपनिरीक्षक (PSI)

|

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (APSI)

|

पोलीस हवालदार (HC)

|

पोलीस नाईक (PN)

|

पोलीस शिपाई (PC)

महाराष्ट्रातील पोलीस आयुक्त

 • महानगरातील पोलीस यंत्रेचा प्रमुख-पोलीस आयुक्त
 • मदतीला –पोलीस उपायुक्त,सहाय्यक पोलीस आयुक्त
 • आयुक्तालये –मुंबई शहर,नवी मुंबई ,रेल्वे(मुंबई ),ठाणे,पुणे,नाशिक,नागपूर,सोलापूर,औरंगाबाद ,अमरावती,पिंपरी चिंचवड
 • राज्यातील पोलीस आयुक्तालयाची एकूण संख्या –अकरा

महाराष्ट्रातील पोलीस ग्रामीण परीक्षेत्रे

1)      एकूण संख्या

2)      पोलीस ग्रामीण परीक्षेत्रे – 

 • ठाणे (५ जिल्हे )
 • नागपूर(६ जिल्हे )
 • औरंगाबाद (४ जिल्हे )
 • कोल्हापूर (५ जिल्हे )
 • नाशिक (५ जिल्हे )
 • अमरावती(५ जिल्हे )
 • नांदेड (४ जिल्हे )
 

3) ग्रामीण पोलीस परिक्षेत्रातील एकूण जिल्हे -३४

4)ग्रामीण परीक्षेत्राचा प्रमुख –विशेष पोलीस उपमहानिरीक्षकz

महाराष्ट्रात पाच ठिकाणी पोलीस आयुक्तालये व पोलीस ग्रामीण परीक्षेत्रे कार्यरत आहेत :

 1. ठाणे
 2. नागपूर
 3. औरंगाबाद
 4. नाशिक
 5. अमरावती

महाराष्ट्रातील पोलीस खात्याचे विशेष विभाग

 • क्राईम ब्रंच (गुन्हे शाखा )
 • गुन्हे अन्वेषण
 • वाहतूक नियंत्रण
 • सशस्त्र राखीव पोलीस दल
 • बिनतारी संदेश यंत्रणा
 • मोटार वाहन विभाग
 • पोलीस जनसंपर्क यंत्रणा
 • पोलीस भरती व प्रशिक्षण
 • स्त्री पोलीस
 • रेल्वे पोलीस व वाहतूक विभाग
 • होमगार्ड

पोलीस प्रशिक्षण केंद्र

 • भारतीय पोलीस सेवेतील उच्च अधिकाऱ्यांना प्रशिक्षण :१.सरदार वल्लभभाईपटेल अकॅडमी ,हैदराबाद लालबहादूर शास्त्री अकॅडमी ,मसुरी
 • पोलीस उपअधीक्षक,पोलीस उपनिरीक्षक ,सहाय्यक पोलीस आयुक्त या पदांच्या उमेदवारांना प्रशिक्षण :पोलीस अधिकारी प्रशिक्षण केंद्र,नाशिक
 • पोलीस शिपायांसाठी प्रशिक्षण विद्यालये :खंडाळा,नागपूर,नाशिक,अकोला,जालना

होमगार्ड (गृहरक्षक दल )

 • होमगार्ड संघटनेची स्थापना -१९४६ (मुंबई)
 • महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड (गृहरक्षक )चा प्रमुख –महासमादेशक
 • महासमादेशकाची नियुक्ती-राज्य शासन
 • जिल्हा स्तरावर होमगार्डचा प्रमुख –जिल्हा समादेशक
 • महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाला मदत करणारी संघटनाम्हणजे होमगार्ड होय

थोडक्यात महत्वाचे

 • महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम मुंबई शहर व नवी मुंबई या जिल्ह्यांना लागू नाही .
 • भारतात प्रथम १९५५ साली महाराष्ट्रात महिला पोलिसांची नेमणूक करण्यात आली.
 • तलाठ्याच्या कार्यालयास सज्जा असे म्हणतात
 • भारतात १७७२ या वर्षी प्रथमच जिल्हाधिकार्याचे पद निर्माण केले गेले
 • 7/12 चा उतारा तलाठी देतो.
 • महाराष्ट्राचे नवीन जमीन महसूल वर्ष १ ऑगस्ट रोजी सुरु होते
 • तलाठी हा खेड्यांचे महसूल गोळा करतो .
 • महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षणाचे मुख्य केंद्र नाशिक आहे.

नेमणूक

पद

नेमणूक करतो

जिल्हाधिकारी,तहसीलदार

राज्य शासन

तलाठी

जिल्हाधिकारी

कोतवाल

तहसीलदार

पोलीस पाटील

जिल्हाधिकारी/उपजिल्हाधिकारी

स्थानिक स्वराज्य संस्था

नगर परिषद

 • २५ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरी भागात नगर परिषदेची स्थापना केली जाते .
 • काही वेळेस लोकसंख्या या निकषास महत्व न देता व्यावसायिक आकृतिबंधाच्या आधारेही एखाद्या वस्तीला नगरपालिकेचा दर्जा दिला जातो .उदा.माथेरान हे थंड हवेचे ठिकाण व पर्यटन केंद्र असल्यामुळे कमी लोकसंख्या असूनही तेथे नगरपालिका आहे .
 • लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नागरी क्षेत्रांचे तीन वर्ग करण्यात आले आहेत.

लोकसंख्या

नगर परिषदेचा वर्ग

राज्यातील नगर परिषदांची संख्या

४० हजारहून कमी

‘क’ वर्ग

१३९

४० हजार ते एक लाख

‘ब’ वर्ग

७२

एक लाखाहून अधिक

‘अ’ वर्ग

१८

 

एकूण

२२९

नगर परिषदेची रचना

 • नवीन नियमानुसार नगराध्यक्षाची निवड जनतेकडून प्रौढ मतदानाने होणार आहे.
 • प्रौढ मतदानाद्वारे नगरसेवकाची निवड होते .शहराचे लोकसंख्येच्या प्रमाणात ‘प्रभागनिहाय’ विभागणी केली जाते.प्रत्येक प्रभागातून सभासदाची निवड केली जाते.
 • नगर परिषदेमधील काही जागा अनुसूचित जाती-जमाती,नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्व वर्गातील स्त्रिया यांच्यासाठी राखीव असतात.स्त्रियांसाठी ५० टक्के जागा राखीव असतात.

मुख्याधिकारी

 • हा नगर परिषदेचा प्रशासन यंत्रणेचा प्रमुख असतो.
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उतीर्ण झालेल्या व्यक्तीची या पदावर सरकार नेमणूक करत असते .
 • विविध विभागांतील अधिकारी मुख्याधिकारी यांना प्रशासकीय कामात मदत करतात.

नगरपालिकेची कामे

 • पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे
 • रस्ते,पूल,बाजार,शौचालये ,प्रसाधन गृह ,पशुसंवर्धन केंद्रे ,गटारे बांधणेव त्यांची व्यवस्था पाहणे.
 • रस्त्यावर दिव्यांची व्यवस्था पाहणे .
 • जन्ममृत्यूची नोंद करणे
 • अग्निशामक सेवा पुरविणे
 • स्मशानभूमीची व्यवस्था करणे
 • सार्वजनिक आरोग्यविषयक सोयी उपलब्ध करून देणे.
 • प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था करणे.
 • दवाखाने,माध्यमिक शाळा ,वाचनालये स्थापन करून चालविणे.
 • नगर सभागृह बांधणे,बगीचे निर्माण करणे

उत्पन्नाची साधने

 • घरपट्टी,पाणीपट्टी,बाजारपट्टी
 • मनोरंजन कर ,प्रशिक्षण कर ,वाहन कर
 • सरकारी अनुदान

महानगरपालिका

 • महानगरपालिका हि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे.
 • ज्या शहराची लोकसंख्या तीन लाखांपेक्षा जास्त असते,त्या शहरात राज्याच्या विधीमंडळाने संमत केलेल्या कायद्यानुसार महानगरपालिका स्थापन केली जाते.
 • महाराष्ट्रात प्रथम मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली.

महानगरपालिकेची रचना

 • महानगरपालिकेच्या सभासदांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरवली जाते.
 • निवडणुकीसाठी वेगवेगळ्या प्रभागांमध्ये शहराची वविभागणी केली जाते .या प्रभागामधून प्रोढ मतदान पद्धतीने सभासद निवडले जातात .हि निवड पाच वर्षाच्या मुदतीसाठी करण्यात येते .
 • महानगरपालिकेतील काही जागा अनुसूचित जाती-जमाती,नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्व वर्गातील स्त्रिया यांच्यासाठी राखीव असतात.स्त्रियांसाठी ५० टक्के जागा राखीव असतात.

महापौर

 • महानगरपालिकेच्या प्रमुखास ‘महापौर ‘असे म्हणतात .महापौराची निवड महानगरपालिकेचे सभासद करतात. उपमहापौराची निवड हि त्याच वेळी करण्यात येते .या दोन्ही पदाधिकाऱ्यांची निवड अडीच वर्षासाठी होते.
 • महापौर हा शहराचा पहिला नागरिक मानला जातो.तो महानगरपालिकेच्या सभांचे अध्यक्षस्थान स्वीकारतो.
 • व कामकाजाचे नियमन करतो.महापौराचे पद हे प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे मानले जाते.
 • महापौराच्या पदासाठी शासनाच्या नियमानुसार आरक्षण ठेवण्यात आले आहे.

स्थायी समिती

 • महानगरपालिकेचा कारभार विविध समित्यांमार्फत चालतो .
 • प्रत्येक महानगरपालिकेत एक स्थायी समिती असते .महानगरपालिकेचे सर्व धोरणात्मक निर्णय ती घेते .
 • याशिवाय शिक्षण ,आरोग्य ,परिवहन ,पाणीपुरवठा इ.विषयांसाठी मनपा प्रभाग समित्यांची नेमणूक करते
 • प्रत्येक प्रभाग समितीत दोन किंवा अधिक प्रभागांचे प्रतिनिधी असतात.

प्रशासन यंत्रणा

 • ‘महानगरपालिका आयुक्त’ हा महानगरपालिकेच्या प्रशासन यंत्रणेचा प्रमुख असतो.या पदावर भारतीय प्रशासकीय सेवा परिक्षा उतीर्ण झालेल्या जेष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक सरकारकडून केली जाते .तो महानगरपालिकेचा ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’म्हणून कार्य पाहतो.
 • महानगरपालिकेने घेतलेल्या सर्व निर्णयांची ‘मनपा आयुक्त ‘अमलबजावणी करतो.तो महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करतों .महानगरपालिकेच्या बैठकीस तो उपस्थित राहतो;परंतु निर्णय घेताना मतदान घेतल्यास त्याला मत देण्याचा अधिकार नसतो.विविध विभागातील अधिकारी महानगरपालिका आयुक्ताला प्रशासकीय कामांत मदत करतात.

महानगरपालिकेची कामे

  • महानगरात राहणाऱ्या लोकाना आवश्यक त्या सेवा व सुविधा पुरविणे हि महानगरपालिकेची जबाबदारी असते.
  1. पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करणे.
  2. जन्म-मृत्त्युची नोंद ठेवणे
  3. दवाखाने-इस्पितळे चालविणे आणि रोग प्रतिबंधक लस टोचणे
  4. रस्ते दुरुस्ती ,रस्ते साफसफाई ,सांडपाण्याची विल्हेवाट.
  5. झोपाद्पात्त्यांची सुधारणा करणे , गलीच्च वस्त्या सुधारणे
  6. अग्निशामक सेवा पुरविणे .
  7. प्राथमिक,माध्यमिक शाळा चालविणे.
  8. गरिबांसाठी घरे बांधणे ,धर्मशाळा व विश्रांतीगृह बांधणे .
  9. वाचनालय चालविणे ,नाट्यगृह बांधणे ,बागबगीचे व उद्यान निर्माण करणे.
  10. वीजपुरवठा व शहर वाहतूक करणे
  11. पशुवध केंद्राची व्यवस्था पाहणे .
  12. घरांना क्रमांक देणे
  13. रस्त्यांवर दिव्याची सोय करणे
  14. स्मशानभूमीची व्यवस्था करणे.
  .

उत्पनाची साधने

 • जकात कर हे उत्पनाचे सर्वात महत्वाचे साधन आहे .
 • पाणीपट्टी,घरपट्टी,मनोरंजन कर ,यात्रा कर,शिक्षण कर इ.
 • राज्य सरकारची आर्थिक मदत व अनुदान
 • मनपाच्या ताब्यातील जमिनीची विक्री करून मनपा पैसा उभारते.

महाराष्ट्रातील महानगरपालिका

 • अकोला
 • अमरावती
 • औरंगाबाद
 • उल्हासनगर
 • कल्याण-डोंबिवली
 • कोल्हापूर
 • ठाणे
 • नवी मुंबई
 • नागपूर
 • नाशिक
 • पिंपरी-चिंचवड
 • पुणे
 • भिवंडी-निजामपूर
 • मीरा-भाईंदर
 • मुंबई
 • सांगली-मिरज-कुपवाड
 • सोलापूर
 • नांदेड-वाघाळा
 • मालेगाव
 • धुळे
 • जळगाव
 • अहमदनगर
 • वसई-विरार
 • लातूर
 • चंद्रपूर
 • परभणी
 • पनवेल

थोडक्यात महत्वाचे

 • नागरी स्वराज्य संस्थेची सर्वोच्च संस्था-महानगरपालिका
 • महाराष्ट्रातील कटकमंडळे –सात
 • महानगरपालिकेची निर्मितीचे अधिकार – राज्य सरकार
 • महाराष्ट्रातील सर्वात जुनी मनपा-मुंबई
 • राज्य,देश व आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मनपा –पिंपरी चिंचवड
 • भारतातील कटक मंडळांची संख्या -६२
 • नगरपालिकेच्या प्रमुखास म्हणतात-नगराध्यक्ष
 • महानगरपालिकेच्या प्रमुखास म्हणतात-महापौर
 • राजीनामा

  घटक

  पद

  राजीनामा यांच्याकडे देतात

  नगर परिषद

  नगरसेवक

  नगराध्यक्ष

   

  उपनगराध्यक्ष

  नगराध्यक्ष

   

  नगराध्यक्ष

  जिल्हाधिकारी

  महानगरपालिका

  नगरसेवक

  महापौर

   

  उपमहापौर

  महापौर

   

  महापौर

  विभागीय आयुक्त