महाराष्ट्रातील जिल्हे – हिंगोली

१९ . हिंगोली

क्षेत्रफळ : ४,५२५ चौ.कि.मी.

मुख्यालय : हिंगोली.

लोकसंख्या : ११,७८,९६३.

हवामान : कोरडे.

तापमान : हिवाळ्यात ६ अंश ते १५ अंश पर्यत उन्हाळ्यात ४० अंश ते 45 अंश से पर्यत.

पर्यज्यमान : ८० से. मी.

प्रशासकिय विभाग : मराठवाडा-औरंगाबाद.

नद्या : पुर्णा, कयाधु, पैनगंगा.

शेजारी जिल्हे : परभणी, नांदेड, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा.

पिके : सोयाबीन, कापुस, तुर, ज्वारी, उडीद, मुग, मका.

ठिकाणे : औंढा नागनागमंदीर, नृसिंह मंदीर नरसी टोळगाव.

ऐतिहासिक ठिकाणे : हिंगोली, नरसी.

औद्योगिक ठिकाणे : वसमत, हिंगोली.

तालुके : औंढा नागनाथ, कळमनुरी, वसमत, हिंगोली, सेनगाव.

नगरपालिका : वसमत, हिंगोली, औंढा नागनाथ.

पंचायत समित्या : एकूण ४.

लोकसभा मतदार संघ : हिंगोली.

विधानसभा मतदार संघ : हिंगोली, वसमत, कळमनुरी.

रेल्वे स्थानक : हिंगोली.

टोपण नाव : ज्योतिर्लिंगचा जिल्ह्या.

वने : हिंगोली जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी जरी असले तरी वनामध्ये कडुलिंब, चिंच, धावडा, पिंपळ, पळस, ही वृक्ष आढळतात. तसेच रोशा नावाचे गवत सापडते. येथील जंगलात माकडे, ससे, मोर, बगळे, रानडुक्कर, हरिणे, हे पशु-पक्षी आढळतात.

शेतीविषयक : हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन हे पिक जास्त प्रमाणात घेतले जाते याशिवाय येथे ज्वारी, कापुस, बाजरी भुईमुग, मुग, उडीद, काही प्रमाणात भाजीपाल्याची शेती अशा प्रकारचे पिके जिल्ह्यामधील शेतकरी घेतात.

औंढा नागनाथ : औंढा नागनाथ भारत देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. औंढा नागनाथ हे शांत व निसर्गरम्य ठिकाण आहे. तसेच राष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र आहे येथे भरपुर भाविक दर्शनासाठी येतात.

नरसी : या ठिकाणी नृसिंहाचे प्रसिद्ध भव्य मंदिर आहे. तसेच संत नामदेव महाराजाचे जन्म स्थान म्हणून नरसी हे ठिकाण ओळखले जाते.

येलदरी : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्याचा हा सुपीक भाग आहे, येथील पुर्णा नदीवरील धरणात वीजनिर्मिती केंद्र आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वात जास्त मासेमारी ह्या धरणात होते.

हिंगोली : हिंगोली हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे कयाधु नदीवरील हे सुंदर शहर आहे. येथे पुर्णा खंडवा या रेल्वेमार्गावरील रेल्वे स्थानक आहे. विजया दशमीच्या दिवशी येथील दसरा महोत्सव पाहण्याजोगा असुन हा दसरा महोत्सव प्रसिद्ध आहे. येथील बाजारपेठ ही प्रमुख बाजारपेठ पैकी एक मानली जाते.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *