२५ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरी भागात नगर परिषदेची स्थापना केली जाते .
काही वेळेस लोकसंख्या या निकषास महत्व न देता व्यावसायिक आकृतिबंधाच्या आधारेही एखाद्या वस्तीला नगरपालिकेचा दर्जा दिला जातो .उदा.माथेरान हे थंड हवेचे ठिकाण व पर्यटन केंद्र असल्यामुळे कमी लोकसंख्या असूनही तेथे नगरपालिका आहे .
लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नागरी क्षेत्रांचे तीन वर्ग करण्यात आले आहेत.
लोकसंख्या
नगर परिषदेचा वर्ग
राज्यातील नगर परिषदांची संख्या
४० हजारहून कमी
‘क’ वर्ग
१३९
४० हजार ते एक लाख
‘ब’ वर्ग
७२
एक लाखाहून अधिक
‘अ’ वर्ग
१८
एकूण
२२९
नगर परिषदेची रचना
नवीन नियमानुसार नगराध्यक्षाची निवड जनतेकडून प्रौढ मतदानाने होणार आहे.
प्रौढ मतदानाद्वारे नगरसेवकाची निवड होते .शहराचे लोकसंख्येच्या प्रमाणात ‘प्रभागनिहाय’ विभागणी केली जाते.प्रत्येक प्रभागातून सभासदाची निवड केली जाते.
नगर परिषदेमधील काही जागा अनुसूचित जाती-जमाती,नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्व वर्गातील स्त्रिया यांच्यासाठी राखीव असतात.स्त्रियांसाठी ५० टक्के जागा राखीव असतात.
मुख्याधिकारी
हा नगर परिषदेचा प्रशासन यंत्रणेचा प्रमुख असतो.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उतीर्ण झालेल्या व्यक्तीची या पदावर सरकार नेमणूक करत असते .
विविध विभागांतील अधिकारी मुख्याधिकारी यांना प्रशासकीय कामात मदत करतात.
नगरपालिकेची कामे
पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे
रस्ते,पूल,बाजार,शौचालये ,प्रसाधन गृह ,पशुसंवर्धन केंद्रे ,गटारे बांधणेव त्यांची व्यवस्था पाहणे.
रस्त्यावर दिव्यांची व्यवस्था पाहणे .
जन्ममृत्यूची नोंद करणे
अग्निशामक सेवा पुरविणे
स्मशानभूमीची व्यवस्था करणे
सार्वजनिक आरोग्यविषयक सोयी उपलब्ध करून देणे.
प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था करणे.
दवाखाने,माध्यमिक शाळा ,वाचनालये स्थापन करून चालविणे.
नगर सभागृह बांधणे,बगीचे निर्माण करणे
उत्पन्नाची साधने
घरपट्टी,पाणीपट्टी,बाजारपट्टी
मनोरंजन कर ,प्रशिक्षण कर ,वाहन कर
सरकारी अनुदान
महानगरपालिका
महानगरपालिका हि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे.
ज्या शहराची लोकसंख्या तीन लाखांपेक्षा जास्त असते,त्या शहरात राज्याच्या विधीमंडळाने संमत केलेल्या कायद्यानुसार महानगरपालिका स्थापन केली जाते.
महाराष्ट्रात प्रथम मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली.
महानगरपालिकेची रचना
महानगरपालिकेच्या सभासदांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरवली जाते.
निवडणुकीसाठी वेगवेगळ्या प्रभागांमध्ये शहराची वविभागणी केली जाते .या प्रभागामधून प्रोढ मतदान पद्धतीने सभासद निवडले जातात .हि निवड पाच वर्षाच्या मुदतीसाठी करण्यात येते .
महानगरपालिकेतील काही जागा अनुसूचित जाती-जमाती,नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्व वर्गातील स्त्रिया यांच्यासाठी राखीव असतात.स्त्रियांसाठी ५० टक्के जागा राखीव असतात.
महापौर
महानगरपालिकेच्या प्रमुखास ‘महापौर ‘असे म्हणतात .महापौराची निवड महानगरपालिकेचे सभासद करतात. उपमहापौराची निवड हि त्याच वेळी करण्यात येते .या दोन्ही पदाधिकाऱ्यांची निवड अडीच वर्षासाठी होते.
महापौर हा शहराचा पहिला नागरिक मानला जातो.तो महानगरपालिकेच्या सभांचे अध्यक्षस्थान स्वीकारतो.
व कामकाजाचे नियमन करतो.महापौराचे पद हे प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे मानले जाते.
महापौराच्या पदासाठी शासनाच्या नियमानुसार आरक्षण ठेवण्यात आले आहे.
स्थायी समिती
महानगरपालिकेचा कारभार विविध समित्यांमार्फत चालतो .
प्रत्येक महानगरपालिकेत एक स्थायी समिती असते .महानगरपालिकेचे सर्व धोरणात्मक निर्णय ती घेते .
याशिवाय शिक्षण ,आरोग्य ,परिवहन ,पाणीपुरवठा इ.विषयांसाठी मनपा प्रभाग समित्यांची नेमणूक करते
प्रत्येक प्रभाग समितीत दोन किंवा अधिक प्रभागांचे प्रतिनिधी असतात.
प्रशासन यंत्रणा
‘महानगरपालिका आयुक्त’ हा महानगरपालिकेच्या प्रशासन यंत्रणेचा प्रमुख असतो.या पदावर भारतीय प्रशासकीय सेवा परिक्षा उतीर्ण झालेल्या जेष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक सरकारकडून केली जाते .तो महानगरपालिकेचा ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’म्हणून कार्य पाहतो.
महानगरपालिकेने घेतलेल्या सर्व निर्णयांची ‘मनपा आयुक्त ‘अमलबजावणी करतो.तो महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करतों .महानगरपालिकेच्या बैठकीस तो उपस्थित राहतो;परंतु निर्णय घेताना मतदान घेतल्यास त्याला मत देण्याचा अधिकार नसतो.विविध विभागातील अधिकारी महानगरपालिका आयुक्ताला प्रशासकीय कामांत मदत करतात.
महानगरपालिकेची कामे
महानगरात राहणाऱ्या लोकाना आवश्यक त्या सेवा व सुविधा पुरविणे हि महानगरपालिकेची जबाबदारी असते.
पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करणे.
जन्म-मृत्त्युची नोंद ठेवणे
दवाखाने-इस्पितळे चालविणे आणि रोग प्रतिबंधक लस टोचणे