महाराष्ट्रातील जिल्हे – सोलापुर

३०. सोलापुर/ SOLAPUR

क्षेत्रफळ : १४८९. चौ.कि.मी.

मुख्यालय : सोलापुर.

साक्षरता : ७७.७२%.

लोकसंख्या : ४३,१५,५२७.

हवामान : उष्ण व कोरडे.

तापमान : हिवाळयात ९ अंश  ते १२ अंश पर्यत उन्हाळयात ४० अंश ते ४२ अंश से. पर्यत.

पर्वत : सहयाद्री.

पर्जन्यमान : ६७८ मि.मी.

विभाग : पश्चीम महाराष्ट्र ( पुणे )

नद्या : चंद्रभागा, भीमा, सीना, भोगवती, मान.

किल्ले : सोलापूरचा किल्ला, मंगलकोट, अकलुज, अक्कलकोट.

तालुके : अक्कलकोट, पंढरपुर, माळशिरस, करमाळा, मंगळवेढा, द. सोलापुर, उ. सोलापुर, मोहोळ, सांगोला, बार्शी, माढा.

पिके : उस, ज्वारी, बाजरी, गहु, हळद, भुईमुग.

धार्मिक ठिकाणे : स्वामी समर्थ समाधी, विठ्ठल रुखमाई मंदीर, भक्त पुंडलिक मंदीर, भवानी मंदीर, संगमेश्वर मंदीर, नरेश्वर मंदीर, बार्शीचे भगवंत मंदीर, मंगळवेढा येथील कान्होपात्रा, चोखामेळा, दामाजी पंथ यांची मंदिरे.

ऐतिहासिक ठिकाणे : सोलापुर, मंगळवेढा, अकलुज, करमाळा आष्टी, पंढरपुर.

औद्योगिक ठिकाणे : सोलापुर, अकलुज, पंढरपुर, बार्शी.

विद्यापीठ : सोलापुर.

महानगरपालिका : सोलापुर शहर.

नगरपालिका : अक्कलकोट, पंढरपुर, सांगोला, बार्शी, माढा, मंगळवेढा, करमाळा, माळशिरस.

पंचायत समित्या : प्रत्येक तालुक्याला एक एकूण ११.

लोकसभा मतदार संघ : सोलापुर, माढा.

विधान सभा मतदार संघ : अक्कलकोट, द. सोलापुर, उ. सोलापुर, माढा, बार्शी, मोहोळ, पंढरपुर, मंगळवेढा, करमाळा, माळशिरस, सांगोला.

विमानतळ : सोलापुर.

टोपण नावे : ज्वारीचे कोठार, कामगाराचा जिल्ह्या.

रेल्वे स्थानक : सोलापुर, पंढरपुर.

वनविषयक : जिल्ह्यामध्ये पाणी पाऊस कमी असल्यामुळे तसेच गवताळ प्रदेश असल्यामुळे वनाचा विकास फारसा झालेला नाही. जंगल हे विरलक असल्यामुळे जंगलात कुसळे गवत, रोशा गवत, करवंद व बोराची झुडपे, बाभुळ, पळस, कडुलिंब, वड ही झाडे आढळतात. जिल्ह्यामध्ये नान्नज या ठिकाणी अभयारण्य आहे. जंगलामध्ये मोर, माळढोक, हरिणे,पोपट, कोकीळ, रानकोंबडे, माकडे, ही पशु-पक्षी आढळतात.

शेतीविषयक : सोलापुर जिल्ह्यात पाऊस खूपच कमी असल्यामुळे या ठिकाणी कोरडवाहू शेती जास्त प्रमाणात आहे. काही भाग सिंचन व पाटबंधारे विकासामुळे विकसित आहे. जिल्ह्यामध्ये ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. या शिवाय बाजरी, उस, भाजीपाला, मिरची, भुईमुग, गेवडा, सुर्यफुल, गहु, हरभरा ही पिके घेतली जातात.

जिल्ह्यातील प्रमुख शहरे व ठिकाणे :

अक्कलकोट : हे तालुक्याचे ठिकाण असुन एक धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. येथे दत्ताचे अवतार असलेले श्री स्वामी समर्थ यांची समाधी व मंदीर आहे. स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील भाविक भक्ताचे आवडते संत असल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यात लाखो भाविक येतात. अक्कलकोट हे औरंगजेबाचे दक्षिणेतील महत्वाचे ठाणे असल्यामुळे येथे काही काळ मोगलांची सत्ता होती. शहरात अक्कलकोट येथे भुईकोट असुन शहरातील प्राचीन राजवाडे व शस्त्रागार भाल्यासारखे आहे.

नान्नज : या ठिकाणचे अभयारण्य पाहण्यासारखे आहे. या अभयारण्यात माळढोक व हरणे आढळतात. याशिवाय अनेक पक्षी व प्राणी सुध्दा येथे असुन हे एक निसर्गरम्य ठिकाण मानले जाते.

करमाळा : सोलापूर जिल्ह्याचे तुळजापुर म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण असुन महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे तुळजाभवानी मंदीर येथे आहे. तसेच या ठिकाणी अष्टकोनी विहीर व भुईकोट किल्ला आहे.

अकलुज : या ठिकाणचे वैशिष्ट म्हणजे हे एक महानगर असुन सुध्दा ग्रामपंचायत हीच संस्था या ठिकाणी कार्यरत आहे. अकलुज ही औरंगजेबाची काही राजधानी होती. संभाजी राज्यांना पकडण्यासाठी औरंगजेबाने या ठिकाणी तळ ठोकला होता. औरंगजेबाची ४०  हजारांच्यावर फौज या ठिकाणी होती.   

             अकलुज गावच्या हळदीवर निरा नदी वाहत असुन नदी किनाऱ्यावर एक प्रेक्षणीय किल्ला आहे. शहरामध्ये दुग्ध उद्योग, कुकुटपालन, मच्छी तलाव, सहकारी साखर कारखाना असल्यामुळे हे गाव उद्योग धंद्यात खूपच प्रगतीपथावर आहे.

पंढरपुर : महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे धार्मिक स्थळ म्हणुन पंढरपुर हे शहर आहे. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचे व वारकऱ्यांचे दैवत श्री विठ्ठल रखुमाई हे तीर्थक्षेत्र आहे. आषाढी व एकादशीला या ठिकाणी खुप गर्दी असते. आपल्या आवडत्या विठ्ठलाला भेटण्यासाठी महाराष्ट्र व देशातून विविध देवताच्या पालख्या घेवून वारकरी येथे येतात.

              पंढरपुर या ठिकाणी भीमा नदीने चंद्राच्या कोर सारखे रूप धारण केल्यामुळे इ नदीला चंद्रभागा नदी सुद्धा म्हटले जाते, नदीच्या पात्रामध्ये भक्त पुंडलिकाचे व तिरावर देवदेवतांचे इतर मंदीरे आहेत. पंढरपुर तालुक्याचे ठिकाण असुन रेल्वेचे स्थानक व सुसज्य बस स्थानक या ठिकाणी आहे.

सोलापुर : हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असुन महाराष्ट्रातील एक महानगर आहे. या ठिकाणी सिध्देश्वर मंदीर, दत्तमंदीर, गणपती मंदीर तसेच एक ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. येथील औद्योगिक वसाहत खुप मोठी असुन हे ठिकाण उद्योगाचे महत्वाचे केंद्र मानले जाते. या ठिकाणी कापड मील, यंत्र माग, हातमाग तसेच बिडी उद्योग, अगरबत्ती उद्योग आहेत. संपुर्ण देशात व विदेशात प्रसिद्ध असणारी सोलापुरी चादर ह्याच शहरात तयार होते. सोलापुरी चांदरीसाठी हा जिल्ह्या विशेष करून ओळखला जातो.

आष्टी : हे तालुका ठिकाण असुन मराठे व इंग्रजांच्या शेवटच्या लढाईसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. या युद्धात दुसऱ्या बाजीराव पेशव्या सह असंख्य मराठे शहीद झाले.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *