महाराष्ट्रातील जिल्हे – सिंधुदुर्ग

२८. सिंधुदुर्ग

क्षेत्रफळ : ५२०७ चौ.कि.मी.

मुख्यालय : ओरोस बु||

साक्षरता : ८६.५४%

लोकसंख्या : ८,,४८,८६८.

हवामान : उष्ण, दमट व सम.

तापमान : किमान १६ अंश ते १८ अंश से. कमाल ३४ अंश ते ३५ अंश से. पर्यत जाते.

पर्जन्यमान : ३०० सेमी.

पर्वत : सहयाद्री.

प्रशासकीय विभाग : कोकण ( मुंबई )

समुद्र किनारा : १२१ कि.मी.

थंड हवेचे ठिकाण : अंबोली.

नद्या : तेरेखोल, देवगड, कर्ली, तिल्लारी.

पिके : भात, नाचणी, हळद, काजु, आंबा, नारळ, सुपारी.

किल्ले : अवर किल्ला, बांदा, भरतगड, भैरवगड, भगवत गड, पदमगड, नोदोस, देवगड, हनुमंतगर, सोनगड, सिंधुदुर्ग, शिवगड, रामगड, सिहागड मानसंतोषगड, महादेव गड, विजयदुर्ग, वेतालगड, सर्जेकोर, मनोहर गड,राजकोट, सावंतवाडी.

बीच : मिठबाव बीच, कोदुराबीच, निवतीबीच, भोगवेबीच, रेड्डी, वयागण, मालवण बीच, तारकर्ली बीच.

बंदरे : वेंगुर्ला, रेड्डी, मालवण, देवगड.

लेण्या : ऐनारी लेणी.

तालुके : सावंतवाडी, वैभव वाडी, कणकवली, दोडामार्ग, मालवण, कुडाळ, देवगड, वेगुर्ला.

धार्मिक ठिकाणे : शिवापूर, भराडीदेवी, कुणकेश्वर, माणगाव, दाणोली, वालावल, भगवती मंदीर, विमलेश्वर मंदीर, जय गणेश मंदीर, ओझेरेश्वर मंदीर, परशुराम मंदीर, रवळनाथ मंदीर.

ऐतिहासिक ठिकाणे : सावंतवाडी, वेंगुर्ला, रेड्डी, सिंधुदुर्ग वेलागर, धामापुरचे तळे.

नगरपरिषद : सावंतवाडी, कणकवली, मालवण, कुडाळ.

पंचायत समित्या : प्रत्येक तालुक्याला १ एकूण ८.

पर्यटन क्षेत्र : पाडघर धबधबा, तारकर्ली, धामापुर तलाव, देवबा, सागेरश्वर, मोतीतलाव, नरेंद्र उद्यान, जगन्नाथ भोज, आंबोली, कावळेसाद, शिल्प ग्राम, सिंधुदुर्ग किल्ला.

लोकसभा मतदार संघ : सिंधुदुर्ग-रत्नागिरी.

विधान सभा मतदार संघ : सावंतवाडी, कणकवली, मालवण, कुडाळ.

टोपण नाव : पर्यटन नगरी, आंब्यांची बाग.

रेल्वे स्थानक : सावंतवाडी, देवगड, कणकवली, मालवण, नांदगाव, वैभववाडी, कुडाळ.

धरण/तलाव : मोती तलाव, धामापूर तलाव.

औद्योगिक क्षेत्र : कुडाळ, सावंतवाडी, देवगड ( जामकंडे ) वेंगुर्ला, आरोदा.

अभयारण्य : धारापूर, कासार्डे, बाबा.

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हा तालुका मालवणी भाषेमुळे खूपच प्रसिध्द्द आहे. मालवण शहरापासून १ कि.मी. अंतरावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे. हिंदवी स्वराज्याचा आत्मा म्हणुन हा किल्ला ओळखला जातो. कुरटे बेटावर छ. शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. २५ नोव्हेंबर १६६४ रोजी हा किल्ला बांधायला सुरवात झाली आणि २१ मार्च १६६७ रोजी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. किल्ल्यामध्ये जरीमरी मंदीर, भवानी मंदीर, महादेव मंदीर, गोड्या पाण्याच्या विहिरी, गुप्त भुयारे किल्ल्याच्या तटबंदी वर चुन्यामध्ये मुद्रित केलेले शिवाजी महाराजाचे हाताचे ठसे आजही जसेच्या तसे आहेत. शिवाजी महाराजांचे राज्यातील एकमेव शिवराजेश्वर मंदीर येथेच आहे. तसेच किल्ल्यात सेवेकर्याची १८ घरे आहेत.

           भराडी देवी ( आंगणेवाडी ) कोकणातील प्रसिद्ध यात्रा आंगणेवाडी या येथे भरते वं प्रसिद्ध आहे हे सर्वांनाच माहित आहे. मालवण पासून १५ ते १६ कि.मी. अंतरावर मसुरे या गावातील बारा वाड्यापैकी आंगणे वाडी ही एक वाडी आहे. भराडी देवीच्या महात्मामुळे व चमत्कारामुळे आंगणे वाडी हे गाव खुप प्रसिद्धीस झाले. पुण्याच्या श्रीमंत पेशवे चिमाजी अप्पांनी ह्या मंदिराला २२ हजार एकर जमिन दान दिली होती. आंगणे वाडीतील भरडावर ही स्वयंभु पाशाणारूपी देवी अवतरली म्हणुन तिला भराडी देवी असे म्हणतात. या देवीचा यात्रोत्सव साधारणता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातून होतो. विशेष म्हणजे जत्रा विशेष तिथीवर अवलंबुन नसते टी वेगळ्या प्रकारे ठरवली जाते.

मालवण तालुक्यातील इतर पर्यटन स्थळे :

जय गणेश मंदीर : मालवण शहरापासून अर्धा कि.मी. अंतरावर.

रॉक गार्डन : हे जिल्ह्यातील सुंदर उद्यान मालवण येथे आहे.

धामापुर तलाव : धामापुर तलाव व सिंधुदुर्गातील नैसर्गिकरित्या उत्तम [पर्यटन स्थळ म्हणुन ओळखले जाते.

चिवलाबीच : मालवण येथील समुद्र किनारा जॉगींग व मॉर्निंग वॉक साठी प्रसिद्ध आहे. हा बीच म्हणजे निसर्गाची मालवणला दिलेली देणगीच आहे.

श्री. रामेश्वर देव आचरा : हे स्वयंभु देवस्थान असुन शिवकालीन मंदीर आहे.

देवबाग : देवबाग हा तारकर्लीचा सुंदर समुद्र किनारा आहे. मनाला मोहित करणारा हा शोभिवंत किनारा आहे.

तारकर्ली : मालवण पासून ७ कि.मी. वर असणारे शासनाने सुंदर असे हे पर्यटन केंद्र बनवले आहे.

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध असुन कोकणातील शेवटचा तालुका आहे.

राजवाडा : सावंतवाडी शहरात भूषण तसेच पर्यटकांचे मन आकर्षित करणारा हा राजवाडा सावंतवाडीचे तिसरे खेम सावंत भोसले यांनी बांधला होता.

मोती तलाव : १८७४ साली हा तलाव बांधला गेला असुन सावंतवाडी बस स्थानकाजवळ हा तलाव आहे.

साटम महाराज मंदीर दाणोली : सावंतवाडी पासुन दाणोली १७ कि.मी. येथे शंकर महाराज समाधी आहे.

आंबोली : हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असुन निसर्ग रम्य ठिकाण आहे. येथे सनसेट पोइंट, हिरवळ केशी, कावळेसाद, महादेव गड पोइंट असे निसर्गरम्य पाईट आहेत. तसेच आंबोली येथे समुद्र सपाटीपासून २५०० फुट उंचीवर एक धबधबा आहे. कोकणचा म्हणुन तसेच सौंदर्य नगरी म्हणुन आंबोलीला मिळालेली निसर्गाची देणगी आहे.

अरोदा : सावंतवाडी पासुन २६ कि.मी. हे निसर्गरम्य ठिकाण आहे. येथे जवळच रेडी येथील इस्पात हा भारतातील एक प्रमुख पोलाद निर्मिती प्रकल्प आहे.

देवगड : हे तालुक्याचे ठिकाण असुन कोकण रेल्वे चे एक महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. तालुक्यामध्ये विजय दुर्ग हा किल्ला विजय दुर्ग गावात आहे. तसेच तालुक्यात पांडवकालीन विमलेश्वर मंदिर, गजबादेवी मंदीर, कुणकेश्वर मंदीर, ही प्रसिद्ध व प्राचीन धार्मिक क्षेत्रे आहे. याशिवाय तालुक्यात देवगड बीच, मिठबांव बीच ही पर्यटन क्षेत्रे आहेत. देवगडचा हापुस व देवगड आंबा देशात व विदेशात प्रसिद्ध आहे.

वेंगुर्ला : हे तालुक्याचे गाव असुन समुद्र किनार्यावरील निसर्गरम्य तालुका म्हणुन ओळखला जातो. तालुक्याला रेडी या गावात सुंदर गणपती मंदीर आहे. तसेच आरवलीचा ठिकाणी वेतोबा मंदीर आहे तसेच तालुक्यामध्ये भोगवेबीच. पेळागर बीच, खवणे बीच, निवती बीच, सागर बंगला, सागरेश्वर मंदीर, या ठिकाणी प्रेक्षणीय व पर्यटन क्षेत्र आहे.

माणगाव : हे दत्ताच्या मंदिरासाठी कोकणातील प्रसिद्ध ठिकाण आहे.

कुडाळ : हे तालुक्याचे ठिकाण असुन रेल्वे स्थान या ठिकाणी आहे. या तालुक्यामध्ये साई मंदीर, लक्ष्मी नारायण मंदीर, राहूळ महाराजा समाधी असुन काप्टशिल्प व बांबू प्रकल्प बघण्यासारखे आहे.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *