महाराष्ट्रातील जिल्हे – सातारा

१२. सातारा

क्षेत्रफळ : १०४८०.

मुख्यालय : सातारा शहर.

साक्षरता : ८४.२०%.

लोकसंख्या : ३०,०३,९२२. 

हवामान : उष्ण व कोरडे.

तापमान : हिवाळयात ३ अंश ते १० अंश सें. पर्यत उन्हाळयात ४० अंश ते ४२ सें. पर्यत.

थंड हवेचे ठिकाण : महाबळेश्वर, पाचगणी.

तालुके : सातारा, कराड, जावळी, खटाव, खंडाळा, पाटण, कोरेगाव, महाबळेश्वर, वाई, माण, फलटण.

औद्योगिक ठिकाणे : सातारा, वाई, कराड.

नद्या : कृष्णा, कोयना, वारणा, कुडाळी, नीरा, वेण्णा, येरळा, मांड.

शेजारी जिल्ह्ये : पुणे, सांगली, सोलापुर, रायगड, रत्नागिरी.

किल्ले : सज्जनगड, अजिंक्यतारा, प्रतापगड, नांदगिरी, वासोटा, चंदन-वंदन.

अभयारण्य : मायणी.

धरणे :कोयना.

धार्मिक स्थळे : शिखर शिगणापूर, गोंदावले महाराज समाधी : गोंदावले, काळूबाई-मांढरदेव, जरडेश्वर-कोरेगाव, सेवागिरी महाराज समाधी-पुसेगाव, सिध्दनाथ-म्हसवड, महागणपती, काशिविशेश्वर, कृष्णामाई-वाई, यमाईदेवी.

ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे : चाफळ, कराड, वाई, ठोसेघरचा धबधबा व पवनचक्की, औध, मायळी अभयारण्य, चंदन-वंदन, महाबळेश्वर-पाचगणी.

नगरपालिका : सातारा, कराड, पाटण, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, कोरेगाव, रहीमदपूर, फलटण.

लोकसभा मतदार संघ : सातारा.

पंचायत समित्या : प्रत्येक तालुक्यात एक एकूण ११.

विधान सभा मतदार संघ : सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, पाटण, कराड, फलटण, खटाव, माण.

पर्यटन क्षेत्र : महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड, माउली, सातारा, सज्जनगड, अजिंक्यतारा, कराड, शिखर-शिगनापूर, वाई, चाफळ, गोदावले, ओंध.

साखर कारखाने : जांब, ता. वाई, कोरेगाव, फलटण, कराड, पाटण.

टोपण नावे : शुरवीरांचा जिल्ह्या, हळदीचे कोठार.

वने : सातारा जिल्ह्यामध्ये पाटण जावळी, महाबळेश्वर, वाई, खंडाळाघाट या भागात जास्त प्रमाणात वनक्षेत्र आहे. कोयना नदीच्या खोऱ्यात पाटण, जावळी याभागात कोयना अभयारण्य घोषित केलेले आहे. येथील वनामध्ये साग, बोरे, कडुलिंब, बांबू, फणस, हिरडा, ऐन, जांभुळ, केजळ, शिककई ही झाडे वृक्षे आढळतात. वनातील कोयना अभयारण्यात वाघ, चित्ते, ससे, रानडूक्करे, माकडे, हरणे, गवे, सांबर, नीलगायी, मोर निरनिराळे पक्षी आढळतात. 

शेतीविषयक : जिल्ह्यामध्ये सातारा, कराड, वाई, पाटण, जावळी, हा परिसर कृष्णा नद्याच्या खोऱ्यात मोडत असल्याने सुपीक परिसर म्हणुन ओळखला जातो. ज्वारी, उस, हळद, जोंधळे, भुईमुग, भाजीपाला या परिसरात भरपूर प्रमाणात पिकवला जातो. महाबळेश्वर तालुक्यामध्ये स्ट्रोबेरी चे भरपुर उत्पन्न घेतले जाते. संपूर्ण जिल्ह्यात हिवाळयात गहु, हरभरा, नाचणी ही पिके घेतली जातात. जावळी, महाबळेश्वर, पाटण, वाई, हा भाग अतीपावसाचा असल्यामुळे येथे भात शेती केली जाते.

जिल्ह्यातील प्रमुख व प्रेक्षणीय स्थळे :

सातारा : हे जिल्ह्याचे मुख्यालय असुन ऐतिहासिकदुष्ट्या सातारा शहराला खुप महत्व आहे. शुरावीरांचा जिल्ह्या म्हणुन सातारा जिल्ह्या संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. महाराणी ताराबाई यांच्या काळात सातारा मराठ्यांची राजधानी होती. सातारा शहरापासून १२ कि.मी. ला अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला आहे. तसेच १७ कि.मी. ला सज्जनगड हा भव्य किल्ला आहे. या किल्ल्यावर श्रीरामाचे हनुमानाचे, दत्ताचे मंदीर व समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. तसेच येथे स्वामी यांच्या काळातील वस्तूचे संग्रहालय आहे. गगनचुंबी या किल्ल्यावर आल्यावर स्वर्गासारखे वाटते. येथील हवा अत्यंत सुध्द असते. जिल्ह्यातील अजिंक्यतारा या किल्ल्यावर आकाशवाणी व दूरदर्शन केंद्र यांचे टॉवर आहेत. सातारा येथून जवळच माहुली येथे कृष्णा व वेण्णा नद्याचं पवित्र संगम पाहण्यास मिळतो.

वाई : हे कृष्णा नदीवर बसलेले ऐतिहासिक शहर असुन दक्षिण काशी म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. येथील कृष्णा नदीच्या तीरावर काशीविश्वेश्वर शंभूमहादेवाचे मंदीर, गणपतीचे मंदीर, कृष्णा मंदीर, दत्ता मंदीर, श्री राम मंदीर अशी एकाच घाटावर ७ ते ८ मंदीर आहेत. तसेच काही मंदिरे नदीच्या अगदी पात्रात आहेत. शहरातील पसरणी रोड येथे मराठीविश्वकोश निर्मितीचे संपादकीय ऑफिस आहे. येथून जवळच पसरणी व धोम धरण हे निसर्गरम्य ठिकाणे आहे. धोम धरणामुळे तालुक्यात बराच भाग सुपीक बनला आहे. वाई मधील नाना फडणवीसाचा वाडा प्रसिद्ध आहे. शहरापासून २ कि.मी. ला औद्योगिक वसाहत आहे. गरवारे रोप्स हा येथील मोठा प्रकल्प आहे. वाई येथून जवळच जांब येथे किसनवीर सहकारी साखर कारखाना आहे. तसेच वाई येथून जवळच मांढरगावच्या डोंगरात आई काळूबाई चे मंदीर आहे. येथे हिवाळयात पाच मंगळावर मोठी यात्रा भरते.

पाटण : सातारा जिल्ह्यातील एक तालुका असुन पाटण हे शहर कृष्णा व कोयना या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. येथून जवळच हेळ्काव हे ठिकाण असुन शिवाजीनगर हे धरण ह्याचं ठिकाणी आहे. पाटण येथून जवळच चाफळ हे गाव असुन येथे मारुतीच्या अकरा स्थानापैकी दोन स्ताने चाफळ येथेच आहे. शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची ऐतिहासिक भेट येथेच झाली. तसेच रामदासांनी येथेच श्रीरामच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे.

महाबळेश्वर : राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणुन महाबळेश्वर हे ठिकाण सर्वांनाचं माहित आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १३७२ मीटर उंचीवर आहे. येथे आर्थट, कानार्क, बाम्बे, लांरडविक, एल्बिस्टन असे पोरेंप्य पाहण्यासारखे आहे. येथील जुने महाबळेश्वर या ठिकाणी महाबळेश्वर सुंदर मंदीर आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण हे महाबळेश्वर व वाचणी या ठिकाणी छोटा असते. देशातील असंख्य पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. कृष्णा, वेरणा, कोयना ह्या नद्यांचा उगम महाबळेहोतो तसेच कोकणातील प्रसिद्ध सावित्री नदी हिचा उगम सुद्धा महाबळेश्वरातूनच झालेला आहे.

                  तालुक्यातील पाचगणी हे ठिकाण सुद्धा थंड हवेचे ठिकाण व निसर्गरम्य ठिकाण म्हणुन प्रसिद्ध आहे. सिडनी, अपेक्स, डेव्हिल्सकीयन मेणवली हे poit पाचगणी मधील पाहण्यासारखे आहे. पाचगणी येथील इंग्रजी माध्यम शिक्षण भारतात प्रसिद्ध आहे. अनेक उद्योगपती तसेच मोठ मोठे लोकांची मुले येथील शाळेत शिकतात. स्ट्रोबेरी या फळासाठी महाबळेश्वर व पाचगणी देशात प्रसिद्ध आहे.

प्रतापगड : महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड हे ठिकाण महाबळेश्वर बस स्थानकापासून १५ ते २० कि.मी. आहे. सन १६७६ साली शिवाजी महाराजांनी आजारपणात विश्रांतीसाठी या किल्ल्यावर वास्तव्य केले होते. हा किल्ला महाराजांनी १६५६ साली बांधला होता. किल्ल्यांची उंची समुद्रसपाटीपासून ३५४३ फुट एवढी आहे. याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रूर कर्मी अफजलखानाचा चतुराई ने वध केला होता. प्रतापगडावर तुळजाभवानीचे मंदीर व महाराजाचा अश्वारूढ पुतळा आहे. व किल्ल्याच्या पायथ्याशी अफजालाखानाची कबर आहे.

कराड : हे सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक शहर म्हणुन ओळखले जाते. महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री तथा पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण याच तालुक्यातील होते. सातारा जिल्ह्यातील एकमेव विमानतळ याच ठिकाणी असुन येथे कृष्णा व कोयना ह्या महानद्यांचा संगम कराड येथे झालेला आहे. अली आदिलशहा याने १५८० मध्ये बांधलेली मशीद आजही साबुत आहे. बहामनी काळातील नकट्या रावणाची विहीर ही कराड मधील प्रसिद्ध विहीर आहे. कराड हे औद्योगिक शहर आहे. तसेच कराड शहरात हिंदू-मुस्लीम-जैन मंदिरे-मशिदी आहेत. येथून ३० ते ३५ कि.मी. अंतरावर पाली हे ठिकाण जागृत देवस्थान खंडोबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण समाधी व वेणूताई चव्हाण प्रतिष्टान हे कराड मध्येच आहे.

यवतेश्वर : सातारा येथून जवळच यवतेश्वर हे ठिकाण असुन येथे शंभू महादेवाचे व साईबाबाचे मंदीर आहे येथील वातावरण शुद्ध असुन जवळच पॉवर हाउस जलशुद्धीकरण केंद्र आहे.

औध : येथे हजारापेक्षा जास्त वस्तू असलेले हे वस्तू संग्रहालय आहे. औधच्या नैकृत्येस टेकडीवर यमाई देवी मंदीर आहे. मंदिराला तटबंदी व दहा बुरुज आहे. गाभाऱ्यात यमाई देवीची पाषाणातील पुर्वाभिभुखी मूर्ती आहे.

जंरडेश्वर : जंरडेश्वर हे कोरेगाव तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थ क्षेत्र आहे. जंरडेश्वर हा डोंगर चढताना खूपच बिकट वाट आहे. गडावरील मंदीराचे दालन भव्य व सुंदर असुन गाभार्यातील मूर्ती मनमोहक आहे. जंरडेश्वर मंदिराच्या पाठीमागे राम मंदीर आहे.

शिखर शिंगणापूर : हे ठिकाण डोंगराच्या माथ्यावर आहे. देवालयाच्या गाभार्यातील शाळूकेत असलेली दोन लिंगे शिवशक्तीची प्रतीके असुन स्वयंभु आहेत. येथे अंतराळ, गर्भगृह सभा मंडळ, नदीमंडळ याचा मंदीरात समावेश आहे. मंदिराला ७५ ते ८० पायऱ्या  आहेत.

नायगाव : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे हे जन्मगाव असुन खंडाळा तालुक्यातील एक निसर्गरम्य ठिकाण आहे. येथे सावित्रीफुले यांचे भव्य स्मारक आहे.

कटगुण : खटाव तालुक्यातील हे महात्मा फुले यांचे जन्मगाव असुन येथे महात्मा फुले यांचे पूर्वीचे घर व स्मारक आहे. पुर्वी कटगुण या गावी महात्मा फुलेना गोरे या आडनावाने ओळखले जायचे.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *