महाराष्ट्रातील जिल्हे – सांगली

१०. सांगली

क्षेत्रफळ : ८५७२ चौ.कि.मी.

मुख्यालय : २८,२०,५७५.

हवामान : कोरडे.

तापमान : हिवाळयात ९ अंश ते १२ अंश से. उन्हाळयात ३५ अंश से पर्यत.

विभागीय ठिकाण : पश्चिम महाराष्ट्र ( पुणे ).

पर्जन्यमाप : साधारणत १५०० मि.लि.

नद्या : कृष्णा, मोरणा, वारणा, पाटणा, माण, बोर.

पर्वत : सहयाद्री.

लेण्या : देवराष्ट्र येथील प्राचीन लेण्या.

शेजारी जिल्ह्ये : सातारा, कोल्हापुर, सोलापुर, रत्नागिरी, कर्नाटक राज्य.

तालुके : कवटे महाकाळ, खानापुर, तासगाव, आटपाडी, कडेगाव, वाळवे, शिरोळ, फलूस, मिरज, जत.

पिके : हळद, ऊस, भुईमुग, आद्रक, भात, द्राक्ष, शाळू, ज्वारी.

धार्मिक ठिकाणे : समुद्रेश्वर मंदीर, मिरासाहेदुर्गा, गणेश मंदिर, तासगावचे गणेश मंदिर, गणेश दुर्ग, औदुंबर दत्त मंदीर.

ऐतिहासिक ठिकाणे : सांगली, मिरज, वाळवे, तासगाव.

औद्योगिक ठिकाणे : सांगली, मिरज, तासगाव.

महानगपालिका : सांगली, मिरज.

नगरपालिका : जत, आटपाडी, तासगाव, खानापुर, कवटे महाकाळ, वाळवे.

पंचायत समित्या : १०.

लोकसभा मतदार संघ : सांगली.

मतदार संघ : तासगाव, सांगली, क.महाकाळ, जत, मिरज, आटपाडी, शिरिष्ठ, फलूस, वाळवे, खानापुर.

टोपण नावे : कलावंताचा जिल्ह्या, शाहिराचा जिल्ह्या.

वनविषयक : जिल्ह्यात वनाचे प्रमाण खुपच कमी असल्यामुळे कोल्ह्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत ते ५ ते ६ % एवढेच आहे. येथील जंगलात आंबा, बेहडा, वेड, बोरे, हिरडा, फणस, करवंदे ही वृक्ष आढळून येतात. तसेच जंगलामध्ये माकडे, मोर, ससे, हरणे, रानडुक्कर, चित्ते विविध पक्षी कालविट, रानकुत्रे, रानकोंबडे ही पशु-पक्षी आढळून येतात.

शेतीविषयक : कृष्णा, कोयना नद्यांच्या खोऱ्यात जिल्ह्या असल्यामुळे तसेच जमिन सुपीक असल्यामुळे येथील शेतकरी भरपुर प्रकारचे उत्पन्न घेतात. पावसाच्या पाण्यावर भात, नाचणी, तीळ ही पिके घेतली जातात. पाठ, कालवे, सिंचन क्षेत्रात उस, हळद, भुईमुग, भाजीपाला ही पिके भरपुर प्रमाणात घेतली जातात.

जिल्ह्यातील प्रमुख शहरे व ठिकाणे :

सांगली : हे शहर जिल्ह्यातील प्रमुख ठिकाण असुन शैक्षणिकदृष्ट्या दिवसें दिवस प्रगत होत चाललेले शहर आहे. शहरात ओद्योगिक वसाहत साखर कारखाना, कापड गिरण्या, यंत्र कारखाने, जुन्या काळतील इमारती, राजवाडे, विलिंगटन कॉलेज मुझीयम, धान्य मार्केट, मॉल, गणेश मंदीर आहे. सांगली हे एक महानगर असुन येते महानगरपालिका आहे. सहकारी चळवळीचे हे महत्वाचे केंद्र मानले जाते. अनेक क्रांतिकारी या शहरात होऊन गेलेले आहे. नाना पाटील सुध्दा एक व्यक्तिमत्व सांगलीचेच आहेत. तसेच खुजाबा, अशी अनेक पुढारी नेते या शहराने दिलेले आहेत.

मिरज : हे एक औद्योगिक शहर असुन येथील कापड गिरण्या संपुर्ण भारतात प्रसिद्ध आहे. मिरज येथे मीरासाहेब अवलियाचा दर्गा असुन त्यामुळे शहराला मिरज हे नाव पडले असावे. जिल्ह्यातील मिरज हे रेल्वेचे जंक्शन असुन अनेक ठिकाणी ह्या रेल्वे जंक्शनवरून जाता येते. मिरजची हवा पाली महाराष्ट्रात आरोग्यसाठी प्रसिद्ध आहे.

तासगाव : हे तालुक्याचे ठिकाण असुन जिल्ह्यात द्राक्ष उत्पादनात हे गाव अग्रेसर आहे. येथील गणपती मंदीर पाहण्यासारखे आहे.

देवराष्ट्र : या गावात प्राचीन लेण्या, समुद्रेश्वर मंदीर, सागरेश्वर अभयारण्य आहे. तसेच एक निसर्गरम्य थिं असुन माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म याच गावात झालेला आहे.

शिराळा : तालुक्याचे एक ठिकाण असुन तालुक्यातील शाहीर पोवाड्यासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच येथील नागपंचमी सण पाहण्यासाठी असतो. जीवंत नागाची पुजा करून त्या नागाची मिरवणूक येथे काढली जाते. तसेच नागपंचमीला येथे मोठी यात्रा भरते.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *