महाराष्ट्रातील जिल्हे – वाशीम

९. वाशीम

क्षेत्रफळ : ५१५३ चौ. कि.मी.

मुख्यालय : वाशीम

साक्षरता : ८१.७०%

लोकसंख्या : ११,९६,७१४.

हवामान : विषम.

तापमान : हिवाळयात ७ अंश टे ८ अंश से पर्यत उन्हाळयात ४२ अंश ते ४८ अंश से.

विभाग : विदर्भ ( अमरावती ).

पर्जन्यमाप : ८५ से.मी.

नद्या : पैनगंगा, आडन, काटेपुर्णा, अरुणावती.

शेजारी जिल्ह्ये : अकोला, यवतमाळ, अमरावती, हिंगोली, बुलढाणा

तालुके : मालेगाव, वाशीम, रिसोड, मनोरा, मंगळूरपीर.

पिके : कापुस, ज्वारी, सोयाबीन, तुर, तीळ, भुईमुग, उडीद, मुग.

धार्मिक ठिकाणे : अमदासबाबा मंदीर, नृरसिंह, सरस्वती मंदीर, जैन मंदीर, काष्ठमंदीर, बालाजी मंदीर, मधमेश्वर मंदीर, पोहरादेवी मंदीर, ब्रम्हदेव मंदीर.

ऐतिहासिक ठिकाणे : वाशिम, शिरपुरजैन, कारंजा.

ओद्योगिक ठिकाणे : वाशीम, रीसोड, कारंजा.

नगरपालिका : वाशिम, रीसोड, कारंजा, मंगळूरपीर, मालेगाव.

पंचायत समित्या : प्रत्येक तालुक्यात एक एकूण ५.

लोकसभा : वाशिम.

विधानसभा मतदार संघ : वाशिम, मंगळूरपीर, रीसोड, मालेगाव.

रेल्वे स्थानक : वाशिम.

वने : जिल्ह्यामध्ये मनोरा, मंगळूरपीर, मालेगाव याच भागात थोडे फार जंगल आढळून येते. जंगलामध्ये साधारणता साग, ऐन, निंब, अजन कैर, बाभळी, बोरे, करवंद यांची झाडे तसेच रोशा नावाचे गवत आढळून येते. जंगलामध्ये वाघ, बिवटे, हरणे, निरनिराळी माकडे, निलगायी, रानकुत्रे, रानडूक्करे, भेकरे, ससे, मोर, निरनिराळ्या चिमण्या, रवंडया रानकोंबडे यांसारखे पशु-पक्षी आहेत.

शेतीविषयक : वाशिम जिल्ह्यातील शेतकरी हा साधारणत: कापुस, ज्वारी, बाजरी, तुर,तीळ, मका, सोयाबीन या पिकांची शेती करतो. तसेच हिवाळयात करडई,सुर्यफुल, हरभरा यांची पिके घेतो. याशिवाय वाशिम जिल्ह्यात संत्री, मोसंबीच्या बागा आढळतात.

जिल्ह्यातील प्रमुख शहरे व ठिकाणे :

वाशिम : हे जिल्ह्याचे मुख्यालय असुन ऐतिहासिक शहर आहे. वाकाटक काळामध्ये या शहराचे नाव वत्सगुलम असे होते. शहरामध्ये मधमेश्वर व बालाजी यांची सुंदर मंदिरे आहेत. खंडवा-पूर्णा या रेल्वेमार्गावरील वाशिम हे महत्वाचे रेल्वे स्थानक मानले जाते. शहरामध्ये मोठी बाजारपेठ व ओद्योगिक वसाहत आहे.

मंगळूरपीर : हे जिल्ह्यातील प्रमुख तालुक्यांपैकी एक तालुका आहे. येथे बिरबलनाथाची भव्य यात्रा भरते. मंगळूर मध्ये भव्य बाजारपेठा व सुंदर मंदीर आहेत. येथून जवळच तिल्हात हे ठिकाण असुन हे ठिकाण पठाण लोकांचे पवित्र ठिकाण मानले जाते.

कारंजा : हे जिल्ह्यातील एक तालुका असुन व्यापारी केंद्र म्हणुन ही प्रसिद्ध आहे. येथे सुत गिरण्या, कापड गिरण्या, भांडी बनविण्याचे कारखाने आहेत तसेच कारंजा येथे एम.आय.डी.सी. सुद्धा आहे. नृसिंह सरस्वती यांचा जन्म येथेच झाला असुन नृसिंह-सरस्वती, जैन मंदीर, काष्ठमंदीर शहरात आहे.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *