३१. वर्धा
क्षेत्रफळ : ६३०९ चौ. कि.मी.
मुख्यालय : वर्धा.
साक्षरता : ८७.२२%
लोकसंख्या : १२,९७,१५७
हवामान : उष्ण व कोरडे.
तापमान : हिवाळयात ९ अंश ते १० अंश उन्हाळयात ४१ अंश ते ४६ अंश से. पर्यत.
पर्जन्यमाप : १२० से. मी.
विभाग : विदर्भ ( नागपूर )
नद्या : वर्धा, यशोदा, वेणा, पाकळी.
तालुके : आष्टी, आर्वी, सेलु, वर्धा, देवळी, करंजा, समुद्रपुर, हिंगणघाट.
पिके : कापुस, ज्वारी, मका, सुर्यफुल.
खनिज संपत्ती : दगडी कोळसा.
शेजारी जिल्ह्ये : अमरावती, नागपुर, चंद्रपुर, यवतमाळ.
धार्मिक ठिकाणे : आर्वी येथील काचेचे जैन मंदीर, हिंगणघाट मल्हारी मार्तड मंदीर, वर्धाचे गीताई मंदीर.
ऐतिहासिक ठिकाणे : आष्टी, सेवाग्राम, देवळी, दत्तपूर, पवनार.
औद्योगिक ठिकाणे : वर्धा, हिगणघाट, आर्वी, केळझट.
पंचायत समित्या : प्रत्येक तालुक्याला एक एकूण आठ.
नगरपालिका : वर्धा, आर्वी, आष्टी, देवळी, हिंगळघाट.
लोकसभा मतदार संघ : वर्धा.
विधान सभा मतदार संघ : वर्धा, देवळी, हिंगणघाट.
टोपण नावे : महीला कामगाराचा जिल्ह्या, गांधीजीचा जिल्ह्या.
वने : जिल्ह्यामध्ये साधारणता आष्टी, आर्वी, सेलु तसेच आर्वी या तालुक्यामध्ये जंगल आढळते. जंगलामध्ये साग, बाबु, बाभुळ, कडुलिंब, तेंदू, धावडा, बेहडा, ऐन, मोह, गुलमोहर, खैरा, फळस, काडसर, पिंपळ, वडाची झाडे, चिंच, आंबे, बोरे तसेच काटेरी झुडपे व निरनिराळे गवत जंगलामध्ये आढळतात. दाट वनक्षेत्रात वाघ, बिबटे, ससे, माकडे, सांबरे, हरणे, कळवीट, मोर, निरनिराळे चिमण्या पाखरे इ. पशु-पक्षी आढळतात.
शेतीविषयक : जिल्ह्यामध्ये पाऊस कमी असल्यामुळे पावसाळी पिके जास्त प्रमाणात घेतली जातात. उदा. कापुस, ज्वारी, मका, बाजरी, उडीद, मुग, पाण्याच्या भागामध्ये संत्रीच्या बागा तसेच भाजीपाला, गहु, हरभरा ही पिके घेतली जातात.
जिल्ह्यातील प्रमुख शहरे व ठिकाणे :
वर्धा : वर्धा हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय असुन दिल्ली चैन्नई या रेल्वे मार्गावरील महत्वाचे रेल्वे जंक्शन आहे. तसेच विदर्भात वर्धा शहराला खूपच महत्व दिले जाते. वर्धा रेल्वे स्थानकामधून कोलकाता, मुंबई चैन्नई, पंजाब, भुसावळ या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे आहेत. तसेच वर्धा येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. वर्धा येथून जवळच दत्तपूर नावाचे गाव असुन तेथे कुष्टरोग्यासाठी कुष्टधाम ही संख्या आहे. शहरामध्ये अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ संस्था, बाजारपेठा, छोटीसी औ. वसाहत, कापुस फेडरेशन, सुत गिरण्या, तेलगिरण्या, राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्य ठिकाण, विश्वशांती स्तुप, कल्याणात्मक गिताई मंदीर, नगरपालिका, जैन मंदिरे चर्च, मशिदी आहेत.
देवळी : हे एक तालुका ठिकाण असुन येथील बैलांचा बाजार पाहण्यासारखा असतो. या ठिकाणी कापुस फेडरेशन व कापुस संकलन केंद्र आहे. तसेच देवळी शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती, मंदीरे, बस स्थानक आहे. तालुक्यामध्ये पुलगाव या ठिकाणी लष्करी सामग्री कारखाना, रासायनिक खतांचा कारखाना, कापड गिरण्या, बाजारपेठ आहे. देवळी तालुक्यातील पुलगाव हे अत्यंत महत्वाचे गाव म्हणुन ओळखले जाते.
सेलु : सेलु हे तालुक्याचे ठिकाण असुन जिल्ह्यातील महत्वाचे शहर आहे. येथुन जवळच केळझर हे गाव आहे. केळझर येथे स्फोटक द्रव्यांचा कारखाना तसेच मत्सबीज उत्पादन केंद्र आहे.
आर्वी : आर्वी हे तालुक्याचे ठिकाण असुन आर्वीला संताची भूमी म्हणुन ओळखले जाते. शहरामध्ये मोठ-मोठ्या कडधान्याचा बाजारपेठा आहेत. सर्व जाती धर्माची मंदीरे आहेत. येथील काचेचे जैन मंदीर पाहण्यासारखे आहे. आर्वी येथे कापसाची भव्य बाजारपेठ आहे.
सेवाग्राम : वर्धा शहरापासून सेवाग्राम हे ठिकाण जवळच असुन येथे महात्मा गांधीनी वास्तव्य केले होते. त्यामुळेच या गावाला सेवाग्राम असे म्हटले जाते. येथील ज्या झोपडी मद्ये महात्मा गांधीनी वास्त्यव्य केले होते. ती झोपडी आजही पाहायला मिळते. त्या ओपाडीला बापुकुटी या नावाने ओळखले जाते.
पवनार : धाम नदीवरील या गावात महात्मा गांदीच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेली छत्री आहे तसेच विनोबा भावे यांचा परमधाम गावाचा आश्रम आहे. वाकाटक राजा दुसरा यांच्या काळात पवनार हे प्रवरापुर म्हणुन ओळखले जाते. तसेच वाकाटक राज्याचे राजादानाचे हे ठिकाण होते.
आष्टी : हे तालुक्याचे मुख्यालय असुन १६ ऑगस्ट १९४२ च्या आंदोलनामध्ये जो गोळीबार झाला आणि त्या सत्याग्रहामध्ये अनेक सत्याग्रही मारले गेले त्यांचे साक्षीदार म्हणुन वर्धा जिल्ह्यात आष्टी या शहराला ओळखले जाते.
हिधणघाट : येथील मल्हारी-मार्तंड मंदीर पाहण्यासारखे आहे. पुर्वी लकरशायरच्या कापड गिरण्यामधून येथील वणी जातीच्या कापसाला फार महत्व होते त्यासाठी हिंगणघाट खुप परिचित आहे.