महाराष्ट्रातील जिल्हे – लातूर

२. लातूर

क्षेत्रफळ : ७१५७ चौ.कि.मी.

मुख्यालय : लातुर.

साक्षरता : ७९.०३%

लोकसंख्या : २४,५५,५४३.

हवामान : कोरडे.

तापमान : हिवाळयात ७ अंश से ते १५ अंश पर्यत उन्हाळ्यात ४० अंश से ते 45 अंश से पर्यत.

पर्जन्यमान : ८८० मि.मी.

नद्या : मांजरा, मन्याड, लेंडी,तिरू, तेरणा, धरणी.

तालुके : औसा, लातुर, निलंगा, चाकुर, देवणी, शिरूर-अनंतपाळ, रेणापुर, जळकोट, अहमदपुर, उद्दगीर.

शेजारी जिल्हे : नांदेड, परभणी, बीड उस्मानाबाद.

प्रशासकीय विभाग :मराठवाडा औरंगाबाद.

किल्ले : औसा येथील भुईकोट.

पिके : कापुस, सोयाबीन, उस, तुर, भुईमुग, सुर्यफुल.

लेण्या : खरोसा ( हिंदू बौध्द ).

धार्मिक ठिकाण : पापविनाश, भुलेश्वर, रामलिंगेश्वर, सिद्धेश्वर, केशवराज, अंबाबाई, महादेव रेणुका देवी निलकंठेश्वर इ. मंदीरे व सहपीरवाशा दर्गा, मशीद.

ऐतिहासिक ठिकाणे : उद्दगीर, लातुर, चाकुर, किल्लारी.

महानगरपालिका : लातुर महानगरपालिका.

नगरपालिका : उद्दगीर, चाकुर, औसा, नीलगंगा, अहमदपुर.

पंचायत समित्या : प्रत्येक तालुक्यात एक एकूण ११.

लोकसभा मतदार संघ : लातुर.

विधानसभा मतदार संघ : लातुर, उद्दगीर, औसा, निलंगा, अहमदपुर, जळकोट, रेनापुर.

रेल्वे स्थानके : लातुर, उद्दगीर.

औद्योगिक ठिकाणे : लातुर, उद्दगीर.

लेण्या : खरोसा येथील हिंदू व बौद्ध लेणी.

वनक्षेत्र : जिल्ह्यातील वनक्षेत्र फारसे नसले तरी जिल्ह्यात खैरा बोरे, लिंब, अरोमी, टेभुर्णी, बाभुल, हिरव, करवंद झाडे आढळतात. तसेच जंगलामध्ये कुरळ व रोशा नावाचे गवत मिळते. जंगलामध्ये वाघ, चित्ते, मोर, ससे, माकडे, तरस, वनगायी, व रानडूक्करे आढळतात.

शेतीविषयक : लातुर जिल्ह्यामध्ये शेती हा पारंपारिक व्यवसाय समजला जातो येथील शेतीमध्ये प्रामुख्याने उस, तुर, ज्वारी, बाजरी, भुईमुग, कापुस, सोयाबीनचे उत्पन्न घेतले जाते. तसेच काही भागात भाजीपाल्याची शेती केली जाते.

जिल्ह्यातील प्रमुख शहरे :

औसा : हे तालुक्याचे ठिकाण असुन इतिहासात औसा शहराला खुप महत्व होते. मोगल शहा औरंगजेब याने बांधलेली मशीद ही येथील प्रसिद्ध वास्तु आहे. मलिक अंबर या सरदाराने बांधलेला अंबरपुर भुईकोट येते आहे. तसेच मल्लिकनाथ महाराज याचा मठ सुद्धा औसा शहरात आहे. औसा शहरापासुन जवळच किल्लारी नावाचे गाव आहे. ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या भूकंपाने येथे फार मोठी जीवीत व वित्त हानी झाली. त्यामुळे किल्लारी गाव हे भारतात भूकंपामुळे ओळखले जाते. येथे महादेवीचे मंदीर व साखर कारखाना आहे.

निलंगा : लातुर जिल्ह्यातीलप्रा प्रमुख तालुका समजला जातो. येथे शहपीर पाशा यांचा दर्गा असुन दरवर्षी येथे उरूस असतो. येथील निलकंठेश्वराचे मंदीर खूपच प्रसिद्ध आहे.

चाकुर : भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांचा हा तालुका असुन येथे जवळच साई नंदनवन हे प्रेक्षणीय ठिकाण आहे. तसेच वृंदावन ऑज्युमेन्ट पार्क हे मराठवाड्यातील प्रसिद्ध पर्यटन ठिकाण आहे.

रेणापुर : हे रेणुकादेवी मंदीर व हलत्या दिपमालेसाठी प्रसिद्ध आहे.

लातुर : हे जिल्ह्याचे मुख्यालय असुन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जिल्हा आहे. येथे रामलिंगेश्वर मंदीर, पापविनाश भुलेश्वर मंदीर, सिद्धेश्वर मंदीर, अंबाबाई व केशवराव याची पुरातन मंदीरे आहेत. लातुर शहरात गंजगोशाई ही बाजारपेठ प्रसिद्ध आहे. शिक्षणात लातुर जिल्हा व शहर खुपच अग्रेसर आहे.

उद्दगीर : हे तालुक्याचे ठिकाण असुन जिल्ह्यातील महत्वाचे शहर सुद्धा आहे. निजाम व सदाशिव राव भाऊ पेशवे यांच्या युद्धात जिनामाचा पराभव झाला. त्यांची ही रणभूमी आहे. मराठ्याच्या इतिहासात उद्द्गीरला खुप महत्व होते.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *