महाराष्ट्रातील जिल्हे – रायगड

१४ . रायगड

क्षेत्रफळ : ७१५२. चौ.कि.मी.

मुख्यालय : अलिबाग.

लोकसंख्या : २६,३५,३९४.

साक्षरता : ८३.८९%

हवामान : उष्ण व दमट.

तापमान : हिवाळ्यात १० अंश ते १५ अंश से पर्यत उन्हाळ्यात ३५ अंश ते ४२ अंश से पर्यत.

पर्यज्यमान : ३०० से. मी.

पर्वत : सह्याद्री प्र.

विभाग : मुंबई.

समुद्र किनारा : २४० कि.मी.

थंड हवेचे ठिकाण : माथेरान, ता. कर्जत.

नद्या : सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, काळ, घोड.

किल्ले :सागरी : जंजिरा-मुरुड, पद्मदुर्ग ( कासा ), कुलाबा-अलिबाग, खांदेरीउदेरी-अलिबाग.

दुर्गकिल्ले : रायगड-महाड, लिंगाणा, रेवदंडा, सुधागड, सरगड, द्रोणगिरी, कार्लई, राजकोट, मदगड, तळगड, अविचीलगड, घोसाळगड.

बीच : श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर, मुरुड, काशीद, अलिबाग, नागाव, किहीम, रेवदंडा, आक्षी, आवास, मांडवा, थळ.

बंदरे : जे. एन. पी. टी., उरण, बांगमाडला, दिघी, आगरदांडा, राजपुरी, अलिबाग, रेवदंडा, मांडवा, रेवस, न्हावाशेवा, थळ, साळाव, धरमतर, उलवा.

लेण्या : घारापुरी, मांदाड, गांधारपाले, रामधरण, कुडा, खडसांबळे, ढानाळे अबिवली, कोंढाणे.

शेजारी जिल्हे : ठाणे, पुणे, रत्नागिरी, सातारा.

तालुके : अलिबाग, मुरुड, महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपुर, रोहा, उरण, पनवेल, पेण, कर्जत, खालापुर, तळा, पाली, श्रीवर्धन.

धार्मिक ठिकाणे : कुनकेश्वर मंदीर, हरिहरेश्वर, पाली, मढ, दत्तमंदीर मुरुड, शिवाजीमहाराज समाधी, जीजाईसमाधी, शिवथरवल, इदगाह मैदान, खोकरीघुमुट, कान्होजी आग्रे समाधी, रामेश्वर मंदीर, दत्तमंदीर चौल, सिद्धिविनायक विक्रम विनायक मंदीर साळाव, शितळादेवी मंदीर.  

ऐतिहासिक ठिकाणे : चवदार तळे, रायगड, जंजीरा, महाड, पोलादपुर, अलिबाग, रेवदंडा, चौल.

नगरपरिषदा : पनवेल, उरण, खोपोली, पेण, अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, महाड, कर्जत.

खनिज : बॉक्साईट

गावे :१११९.

पंचायत समित्या : प्रत्येक तालुक्यात एक एकूण १५.

लोकसभा मतदार संघ : रायगड-मावळ, रायगड-रत्नागिरी.

विधानसभा मतदार संघ : श्रीवर्धन-माणगाव, महाड, अलिबाग, कर्जत, पनवेल, उरण, पेण.

प्रमुख रेल्वे स्थानके : पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, कोलाड.

धरण / तलाव : गारंभी, हटवणे धरण, मोरबे, वाघोली, तिनवीरा, शहपाडा, रानबजिरे, कोथ्रुर्डे, पन्हाळघर,

पाली, रानसई, देहरेग, उमटे.

अभयारण्ये : फणसाड-मुरुड, कर्नाळा पक्षी अभयारण्य-पनवेल.

विदयापीठ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विदयापीठ, लोणेरे, ता. माणगाव.

टोपण नावे : तांदळाचे कोठार, मच्छीमाराचा जिल्ह्या.

ओद्योगिक क्षेत्र : पनवेल, तळोजा, रसायनी, उरण, वडखळ पेण, नागोठणे, विळा-भागाड, महाड-बिरवाडी,खोपोली, घाटाव-रोहा.

वने : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्राफळापैकी रायगड जिल्ह्यात २५% क्षेत्र हे वनक्षेत्र म्हणुन ओळखले जाते.जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात त्या तालुक्यानुसार वनक्षेत्र आहेच. जिल्ह्यातील वनामध्ये साग, खैर, ऐन, बांबू, माड, शिंदी, लिंब, आंबा, काजु, आपटा, अशोक, भेरली, भोंडारा, हिरडा, चंदन, गोरखचिंच, बोरे ही वृक्ष आढळतात.

                        दाट जंगलामध्ये वाघ, चित्ते, तरस, कोल्हे, लांडगे, भेकर, हरिणे, रानडुक्कर, साळींदर, ससे, निरनिराळी माकडे, शेकरू, पिसई, रानमांजर हे वन्य प्राणी याशिवाय मोर, पारवे, साळुंखी, कावळे, कबुतरे, घुबड, बगळे, खंड्या, रानकोंबडे, पोपट, घारी, गिधाडे, हर्नाबील, कोकीळ ही पक्षी जंगलात आढळतात. जिल्ह्यामध्ये सरकारने कर्नाळा व फणसाड हे अभयारण्य म्हणुन घोषित केले आहे.

शेतीविषयक : शेती हा रायगड जिल्ह्यातील पारंपरीक व्यवसाय असुन जिल्ह्यात खरीप व रब्बी हे पिके घेतली जातात. भात हे जिल्ह्यातील मुख्य पीक असुन नाचणी, काळीतीळ, तुर ही सुद्धा पिके घेतली जातात. पेण,अलिबाग या भागात भाजीपाल्याची शेती केली जाते. अलिबाग येथील कलिंगड राज्यात प्रसिद्ध आहे. अलिबाग तालुक्यात कलिंगडाची शेती भरपुर प्रमाणात होते. काही भागात काकडीचे उत्पन्न घेतली जाते.समुद्रकिनार्याच्या शेतीमध्ये नारळ, सुपारी ( पोफळी ), फणस, काजू रातांबीचे पीक घेतले जाते.डोंगराळ भागात आंबा, फणस, काजूची शेती आढळते. अशा प्रकारची रायगड जिल्ह्याची शेती विभिन्न प्रकारची आहे.

जिल्ह्यातील प्रमुख शहरे व प्रेक्षणीय ठिकाणे :

महाड : महाड हा रायगड जिल्ह्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा तालुका असुन महाड या शहराला फेम शहर म्हणुन ओळखले जाते. १९५२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्याची साक्ष म्हणुन आजही हे चवदार तळे जसेच्या तसे आहे. शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, रमाबाई आंबेडकर स्मारक, क्रांती स्तंभ, वीरेश्वर मंदीर, श्रीराम मंदीर, श्री कृष्ण मंदीर आहे. येथुन जवळच ३० कि. मी. अंतरावर दुर्ग दुर्गेश्वर रायगड हा किल्ला आहे. याच किल्ल्यावर महाराजांचा राज्यभिषेक झाला आणि येथेच महाराजाची समाधी आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी आईसाहेब जिजाई ची पाचाड येथे समाधी आहे. महाड पासुन जवळच शिवथरघल हे पवित्र ठिकाण आहे. येथेच रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ लिहिला. महाड बसस्थानकापासुन १ कि.मी. गांधारपाले हे गाव असुन येथील डोंगरात बौद्ध लेणी आहे.

उमरठ : शिवाजी महाराजाचे विश्वासु मित्र व ज्याच्यामुळे “ गड आला पण सिंह गेला ” ही म्हण ओळखली जाते ते नरवीर तानाजी मालुसरे यांचे उमरठ हे गाव असुन येथे त्यांची स्मारक आहे.

श्रीवर्धन : श्रीमंत बाजीराव पेशवे यांची कर्मभूमी म्हणुन श्रीवर्धन हे प्रख्यात आहे. येथुन जवळच हरिहरेश्वर हे तिर्थक्षेत्र जवळच आहे. येथील हरिहरेश्वर मंदीर व स्वच्छ समुद्र किनारा प्रसिद्द आहे, दरवर्षी हिवाळा व उन्हाळ्यात येथे लाखो पर्यटक येऊन जातात. प्रसिद्ध सुवर्ण गणेश येथील दिवेआगार येथे आहे, परंतु काही समाजाकंठकानी ही मुर्ती चोरून नेली. तसेच सामाजाई मंदीर, जीवनेश्वर मंदीर, लक्ष्मीनारायण मंदीर, कुसुमेश्वर मंदीर, उत्तर खंड मंदीर तालुक्यात आहे. 

उरण : उरण तालुक्याचे ठिकाण असुन रायगड जिल्हयातील क्षेत्रफळाने सर्वात लहान तालुका आहे. तालुका लहान जरी असला तरी तो महान तालुका आहे. तालुक्यामध्ये श्री सिद्धिविनायक गणपती मंदीर, पिरापाडी बीच, हजरत मुकीन शहबाबा दर्गा, ओ. एन.जी.सी. प्रकल्प, द्रोणागिरी किल्ला, धारापुरी लेणी असी भरपुर पर्यटक व धार्मिक ठिकाणे शहरात असुन उरण शहर रायगड जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

रोहा : हे प.पु. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे जन्म ठिकाण असुन भारताचे पहिले गव्हर्नर चिंतामणराव देशमुख हे सुद्धा रोह्याचेच होते. याशिवाय तालुक्यात धावीर महाराज मंदीर. बिरवाडीचा किल्ला, सुरगड, अवचितगड, औद्योगिक वसाहत धाटाव, काष्टशिल्प संग्रहालय, नागोठणे औ. वसाहत हे रोहे तालुक्याचे वैभव आहे.

माणगाव : माणगाव हे रायगड चे नाक म्हणुन ओळखले जाते. येथुन महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जायला सोपे आहे.तालुक्यात ग्रामदैवत वाकडाईदेवी मंदीर, बालाजी मंदीर, जैन मंदीर, मानगड किल्ला, विश्रामगड किल्ला, तालुक्यात आहे. तसेच तालुक्यातील लोणेरे येथे तंत्रज्ञान विदयापीठ आहे. याशिवाय या तालुक्याने महाराष्ट्राला रहमान अंतुले व मनोहर जोशी असे दोन मुख्यमंत्री दिले. येथुन जवळच कडप्पा या ठिकाणी काळकाई देवीची जागृत देवस्थान आहे.

कर्जत : रायगड जिल्ह्यातील कर्जत हा सुद्धा एक महत्वाचा तालुका मानला जातो. येथे दिगंबर सिद्धिविनायक मंदीर ( कडवा ) भीमगड, बिकटगड, कोटीळीगड, चंदेरी हे किल्ले अबिवली व कोढाणे लेण्या आहेत. याशिवाय जिल्ह्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण माथेरान हे ह्याच तालुक्यात आहे.

सव : महाड येथुन जवळच सव या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत.

पेण : पेण शहर सुबक गणपतीच्या मुर्तीसाठी प्रसिद्द आहे. येथील गणपती, देशात-विदेशात जातात. पेण तालुक्यात कणकेश्वर मंदीर, साईमंदीर प्रसिद्ध आहे. याशिवाय मिरगड, रतनगड, सांक्षी, हे किल्ले असुन, विनोबा भावे यांचे जन्मगाव गोगदे हे ह्याच तालुक्यात आहे येथे विनोबा भावे आश्रम संस्था आहे.

मुरुड : हे समुद्र किनाऱ्यावरील सुंदर शहर असुन तालुक्याचे ठिकाण आहे. मुरुड येथील समुद्रामध्ये जंजीरा व कासा हे किल्ले आहेत. पर्यटकाचा आवडता बीच काशीद बीच हा मुरुड पासुन १८ कि.मी. ला आहे.मुरुड तालुक्यामध्ये व शहरामध्ये विनायक मंदीर, नादगावचे सिद्धिविनायक मंदीर, मुरुडचे दत्त मंदीर, इदगाह, खोकारी घुमुट हे धार्मिक स्थळे आहेत तसेच सवतकडा धबधबा मुरुड समुद्र किनारा, फणसाड धबधबा, नवबाच राजवाडा, गारंभीचे धरण हे पाहण्यासारखे निसर्गरम्य ठिकाणे आहेत.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात सर्वात जास्त समुद्रकिनारा आहे. तालुक्यात अलिबाग, किहीम, आक्षी, नागाव, रेवदंडा, वरसोली, सासवणे, रेवस, येथे सुंदर निसर्गरम्य बीच आहेत तसेच रेवस, मांडवा, अलिबाग, थळ, रेवदंडा ही बंदरे आहेत. याशिवाय तालुक्यामध्ये सासवणे येथील करमरकर शिल्पालय बघण्यासारखे आहेत. अलिबाग भु-चुंबकीय वेधशाळा ही प्रसिद्द आहे. तालुक्यामध्ये अलिबाग शहरपासून ४ कि.मी.ला शिवकालीन आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांची समाधी, कनकेश्वर मंदीर, चौलचे दत्त मंदीर, शितळादेवी मंदीर, रामेश्वर मंदीर हे धार्मिक ठिकाणे आहेत. तसेच खादेरी, उंदेरी, कुलाबा हे किल्ले आहेत.

पनवेल : रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर हे पनवेल असुन मुंबईचे प्रवेशद्वार म्हणुन ओळखले जाते. पनवेल पासुन १२ किमी ला कर्नाळा हे पक्षी अभयारण्य आहे हे एक सुंदर रमणीय व विविध प्रकारच्या वृक्षवेलिनी व समृद्ध असलेले अभयारण्य आहे. येथे १३४ प्रगतीचे स्थानिक व ३८ प्रजातीचे स्थलांतरित पक्षी आहेत. तसेच अभयारण्याजवळ कर्नाळा हा किल्ला आहे. याशिवाय प्रबळगड, माणिकगड ३ किल्ले असुन शहरात सुसज्य बसस्थानक, रेल्वे स्थानक आहे. वायुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव शिरढोण पनवेल तालुक्यातच आहे.

खालापुर : हा रायगड जिल्ह्यातील तालुका असुन, तालुक्यात महड येथे वरदविनायक हे अष्टविनायक मंदीर, राजगाव येथे बोबल्या विठोबा मंदीर, गगनगिरी आश्रम हे धार्मिक स्थळे असुन विशाळगड हा किल्ला आहे. तालुक्यात खोपोली हे मोठे शहर व ओद्योगिक शहर आहे. खोपोली येथे जलविद्युत प्रकल्प आहे.

सुधागड : अष्टविनायक रायगड जिल्ह्यातील दुसरे स्थान बल्लाळेश्वर मंदीर हे पाली या ठिकाणी आहे. पाली येथुन जवळच उन्हेरे हे गरम पाण्याचे झरे व रामेश्वर मंदीर आहे. तालुक्यात सरसगड, खडसांबळे, सुधागड, मृगगड हे किल्ले आहेत.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *