१३. रत्नागिरी
क्षेत्रफळ : ८२०८ चौ.कि.मी.
मुख्यालय : रत्नागिरी.
साक्षरता : ८२.४३%.
लोकसंख्या : १६,१२,६७२.
हवामान : आर्द्र, उष्ण व दमट.
तापमान : हिवाळयात १० अंश ते २५ अंश उन्हाळयात ३४ अंश-४० अंश से. पर्यत.
पर्जन्यमान : ३३० से. मी.
समुद्रकिनारा : १७० कि.मी.
पर्वत : सह्याद्री.
प्रशासकीय विभाग : कोकण-मुंबई.
थंड हवेचे ठिकाण : दापोली.
नद्या : सावित्री, वशिष्टी, अंबा, शास्त्री, नावडी, रत्नागिरी, मुचकुरी, पालशेत, काळबादेवी.
किल्ले : सुवर्णदुर्ग, मंडणगड, बाणकोट, रत्नदुर्ग, जयगड, पुर्नगड, गोवलगड, गोपाळगड, यशवंत गड, रसाळगड, अंबोलगड, महिपगड.
बीच : हर्णे, कर्द्रे, मुरुड, वेळास, दाभोळ, अंजार्ला.
बंदरे : राजापुर, बाणकोट, वेळास, वेसवी, दाभोळ, जयगड.
शेजारी जिल्ह्ये : रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुर, सांगली.
तालुके : मंडणगड, संगमेश्वर, राजापुर, चिपळूण, रत्नागिरी, दापोली, लांजा, खेड, गुहागर.
विद्यापीठ : बाळासाहेब सावंत कोकणकृषी विद्यापीठ दापोली.
धार्मिक ठिकाणे : राजापुरची गंगा, धुतपापेश्वर, गणपतीपुळे, परशुराम मंदीर, मार्लेश्वर मंदीर, संगमेश्वर मंदीर, क्षेत्र नानीज, स्वामी समर्थ मंदीर.
ऐतिहासिक ठिकाणे : रत्नागिरी, थिबा, राजवाडा, चिपळूण, दाभोळ, राजापुर, केळशी.
नगरपरिषदा : रत्नागिरी, चिपळूण, दापोली, राजापुर, खेड.
ग्रामपंचायती : ८४८.
पंचायत समित्या : प्रत्येक तालुक्यात एक एकूण ९.
गावे : १५३९.
लोकसभा मतदार संघ : रत्नागिरी.
विधान सभा मतदार संघ : रत्नागिरी, चिपळूण, दापोली-मंडणगड, खेड-गुहागर, राजापुर.
प्रमुख रेल्वे स्थानके : रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, राजापुर रोड.
पर्यटक क्षेत्र : राजापूरची गंगा, गणपतीपुळे, मार्लेश्वर, हर्णे, कर्द्रे, अंजार्ला.
टोपण नावे : समाजसेवकाचा जिल्ह्या, कलाकाराचा जिल्ह्या, धार्मिक स्थळाचा जिल्ह्या.
औद्यागिक क्षेत्र : रत्नागिरी, दाभोळप्रकल्प, लोटेमाळ.
किल्ले : सागरी : सुंवर्णदुर्ग, विजयदुर्ग.
डोंगरी : मंडणगड, पुर्नगड, महिपतगड, प्रचीतगड, तळसरचा किल्ला, जयगड वनदुर्ग-बारवई किल्ला, भैरवगड, वासोटा.
वने : ६००० हेक्टर्स पेक्षा जास्त जमिन वनक्षेत्रा मध्ये येते. खेड तालुका सर्वाधिक वनाचा तालुका म्हणुन ओळखला जातो. 50 % पेक्षा जास्त जंगल खेड तालुक्यात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वनामध्ये प्रामुख्याने आंबा, फणस, कोकम, जांभुळ, साग, बांबू, हिरडा, फळस, केजळ, निलगिरी व इतरही औषधी वनस्पती आढळतात. येथील जंगल घनदाट असल्यामुळे जंगलात वाघ, बिबटे, रानडूक्करे, हरणे, ससे,भेकरे, लांडगे, साळींदर, रानकुत्रे, रानकोंबडे हे प्राणी आढळतात तसेच मोर, पारवे, कबुतरे, बगळे, पानकोंबडे, घुबड, घाटी, पोपट, रवंडया व अन्य पक्षी जंगलात आढळतात.
शेतीविषयक : रत्नागिरी जिल्ह्यात शेतीक्षेत्र जरी कमी असले तरी येथील शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे. पावसाच्या पाण्यावर येथील शेती अवलंबुन असुन भात शेतीही प्रमुख शेती आहे. याशिवाय नाचणी, तुर, वाटाणा, कलिंगड, काकडी, हळद, सिंचन क्षेत्रात आंबा, काजु याच्या बागा आहेत समुद्र किनाऱ्यावरील शेतीमध्ये नारळी, पोफळीच्या बागा आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख शहरे व ठिकाणे :
रत्नागिरी : हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय असुन शहरात मुंबई गोवा लोहमार्गावरील महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. भारतच्या पश्चिम सागर किनाऱ्यावरील हे एक महतत्वाचे बंदर आहे. रत्नागिरी हे शहरात वी.दा. सावरकराची कर्मभूमी म्हणुन सुद्धा ओळखले जाते. भारतातील २ रया क्रमांकाचा रेल्वे बोगदा करबुडे या ठिकाणी असुन हा रेल्वे बोगदा रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून जवळच आहे, या रेल्वे बोगद्याची लांबी ६ कि.मी. आहे. शहरात प्रसिद्ध प्राचीन थिबाराजवाडा पाहण्यासारखा आहे.
रत्नागिरी तालुक्यात गणपतीपुळे, भंडारपुळे, महालक्ष्मी मंदीर, डगवे येथील लोटेश्वर मंदीर, मालगुंड येथील ओंकारेश्वर मंदीर, हातीसगावाचा पीर बाबर रोख दर्गा,नानीज येथील नरेंद्रस्वामीचा मठ, स्वामी स्वरूपानंद निवासस्थान, केशव मंदीर, झरेवाडी येथील स्वामी समर्थाचे मंदीर ही रत्नागिरी परिसरामधील धार्मिक ठिकाणे आहेत. तसेच रत्नागिरी परिसरामध्ये पूर्णगड, जयगड हे शिवकालीन किल्ले व मालगुडबीच राजिवडा बंदर, भगवती किल्ला, निसर्गरम्य पावस गाव पाहण्यासारखे आहे. हापूस आंब्यासाठी रत्नागिरीने जगात नाव कमविले आहे. परिसरात काजु, सुपारी प्रक्रिया उद्योग भरपुर प्रमाणात चालतात.
मंडणगड : मंडणगड हे तालुक्याचे ठिकाण असुन येथून जवळच मंडणगड व बाणकोट हे किल्ले आहेत. तालुक्यामध्ये बाणकोट व वेळास येथे समुद्रकिनारा व बंदर आहे. मंडणगड येथुन जवळच तुळशी धरण आहे. मंडणगड येथून १२ कि.मी. अंतरावर पालवणी हे गाव असुन या गावात श्री. दत्त मंदीर, पार्वती मंदीर, मारुती मंदीर व भवानी मंदीर आहे.
संगमेश्वर : हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी संगमेश्वर मंदीर नृसिंह मंदीर आहे. संगमेश्वर या गावापासून जवळच मार्लेश्वर मंदीर, श्री. व्दि भूजननीय मंदीर, मयुरेश्वर गणेश मंदीर, श्री जाखमाता मंदीर, सूर्यनारायण मंदीर, पंचमुखी सुंवर्णमूर्ती आरनेस्वर, श्री टिकलेश्वर मंदीर, सप्तेस्वर मंदीर हे देवस्थाने असुन तालुक्यात तिवरे गावाजवळ प्रचीतगड शिवकालीन किल्ला आहे. संगमेश्वर-मुंबई मार्गावर आरवली या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड असुन आरोग्यासाठी ह्या कुंडातील पाणी रामबाण औषध मानले जाते.
राजापुर : तालुक्याचे ठिकाण असुन ऐतिहासिक शहर सुद्धा आहे. इंग्रज, डच या व्यापाऱ्याच्या वखारी या शहरात होत्या. राजापुर शहरापासून २ कि.मी अंतरावर धृतपायेश्वर हे तीर्थ क्षेत्र आहे. तसेच तालुक्यातील आडिवरे या गावात महाकाली देवीचे मंदीर आहे. राजापुर येथील नैसर्गिक चमत्कार असणारी राजापुरची गंगा ही सुद्धा राजापुर पासून जवळच आहे. ह्या गंगेचा चमत्कार असा आहे कि हे पाणी कोठून अचानक येथे आणि येथील १४ कुंड भरून सतत पावसाळा सुरु होण्या पुर्वी २ महिने हे पाणी वाहत असते. ह्या गंगेत अंघोळ केल्याने सर्व पापे नष्ट होतात असे म्हटले जाते. राजापुर येथून जवळच देपीहसोल या गावी आर्यादुर्गा हे एक जागृत देवस्थान आहे. राजापुरच्या गंगेपासून १ कि.मी. ला बारामहीने वाहणारा गरम पाण्याचा झरा आहे. हा सुध्दा एक निसर्गाचा चमत्कारच आहे. राजापुर तालुक्यात व्येत्ये हे निसर्गरम्य ठिकाण असुन येथील समुद्रकिनारा सुंदर आणि शोभिवंत आहे.
लांजा : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा हे एक तालुक्याचे ठिकाण असुन तालुक्यात लांजा शहरापासून १२ कि.मी. अंतरावर जावडे या गावात २५ फुट उंचीचे श्री गणेशाचे एक खांबी मंदीर आहे. मंदीरात सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. तसेच लांजापासून जवळ खोरनीनको या गावी बल्लाळ गणेश मंदीर आहे. खोरनिनको हे एक निसर्गरम्य ठिकाण सुद्धा आहे. लांजा ताल्युक्यातील काजुगरे हे प्रसिद्ध असुन तालुक्यात काजू उद्योग भरपूर प्रमाणात चालतो.
चिपळूण : हे तालुक्याचे ठिकाण असुन जिल्ह्यातील २ रया क्रमांकाचे मोठे शहर आहे. शहरातून वारीष्टी नदी वाहत असुन नदीच्या काठावरच हे शहर आहे. कोकण रेल्वेचे हे एक रेल्वे स्थानक आहे. चिपळूण येथून जवळच लोटे व खर्डी येथे औद्योगिक वसाहत आहे. शहरात विधावासिनीदेवी मंदीर, करंजेश्वरी मंदीर, काळभैरव, जैन मंदीर तसेच गोविंदगड नावाचा किल्ला आहे.
तालुक्यामध्ये दक्षिण काशी म्हणुन ओळखले जाणारे परशुराम मंदीर, तीर्थ बाणगंगा, राजस्थानी बांधकाम असलेले श्री शारदा देवी मंदीर, रेणुका देवी मंदीर, सोनगावचे गणपती मंदीर, पेठमापचे गणपती मंदीर, श्री राम वरदायिनी मंदीर तसेच गोविदगड का शिवकालीन किल्ला आहे. चिपळूण पासून १९ ते २० कि.मी अंतरावर डेरवण येथे शिवसृष्टी उभारली गेली असुन शिवचरीत्रावर आधारित भरपुर प्रसंग येथे बघावयास मिळतात. चिपळूण शहरापासून २५ कि.मी. अंतरावर पोफळी येथे जलविद्युत प्रकल्प आहे.
खेड : तालुक्याचे ठिकाण असुन कोकण रेल्वे एक महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. खेड बसस्थानकापासून जवळच एक लेणी आहे. तसेच खेड पासून ३० कि.मी. अंतरावर महिपतगड हा शिवकालीन किल्ला, समरगड किल्ला आहे. तालुक्यामध्ये काळकाई मंदीर, श्री चौकेश्वर मंदीर आहे. खेड येथील डोंगरात शिव पिंडीसारखी दिसणारी एक गुफा आहे. येथे एक पिंड असुन त्या पिंडीवर १२ महिने नैसर्गिक जलाभिशेख होत असतो. तरीही पिंडीचे वरचे छत कोरडे असते हा सुध्दा एक नैसर्गिक चमत्कारच आहे.
गुहागर : हे तालुक्याचे ठिकाण असुन समुद्रकिनाऱ्यावर हा तालुका वसलेला आहे. तालुक्यामध्ये कालेश्वर मंदीर, काशिविश्वेश्वर व लक्ष्मिनारायण मंदीर, दुर्गादेवी मंदीर, गंगामाता मंदीर, वालुकेश्वर मंदीर, टाळकेश्वर मंदीर,श्री व्यडेश्वर मंदीर, स्वयंभू देवस्थान वळनेश्वर, श्री उरफाटा मंदीर भैरी व्याश्रबरी मंदीर, कार्कीत स्वामी मंदीर ही मंदिरे असुन सागरी गोपाळगड हा किल्ला आहे. तालुक्यात गुहागर येथे ८ कि.मी. लांबीचा समुद्र किनारा आहे. तालुक्यात प्रसिद्ध एनरॉन वीज प्रकल्प आहे.
दापोली : दापोली तालुक्याचे ठिकाण असुन रत्नागिरी जिल्ह्यतील महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. दापोली याठिकाणी कृषी विद्यापीठचे मुख्यठिकाण आहे. तालुक्यामध्ये हर्णे, बुरुडी, मुरुड, दाभोळ, कर्द्रे, अंजार्ला, केळशी या ठिकाणी समुद्रकिनारे आहेत. दापोली पासून जवळच आंजर्ले या ठिकाणी कड्यावरचा गणपती मंदीर आहे. तालुक्यामध्ये हर्णे येथे एकनाथ मंदीर, असूद येथे केशवराज मंदीर, केळशी येथे याकुबबाबा दर्गा, चिखलगाव येथे महलक्ष्मी मंदीर इ. महत्वाचे देवस्थाने आहे. तसेच तालुक्यात सुवर्णदर्ग, कनकदुर्ग, गोवा किल्ला इ. शिवकालीन किल्ले आहे. दापोली शहरापासून जवळच आलेल्या उन्हवरे या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. दापोली तालुक्यात चिखलगाव या ठिकाणी लोकमान्य टिळकाचे तर पालगड या गावात सानेगुरूजीचे जन्म ठिकाण आहे.