महाराष्ट्रातील जिल्हे – यवतमाळ

११. यवतमाळ

क्षेत्रफळ : १३,५८२. चौ.कि.मी.

मुख्यालय : यवतमाळ.

साक्षरता : ८०.७०%

लोकसंख्या : २७,७५,४५७.

हवामान : विषम व कोरडे.

तापमान : हिवाळयात ७ अंश ते ९ अंश से. उन्हाळयात 50 अंश से पर्यत.

पर्जन्यमान : ९९ से.मी.

विभाग : विदर्भ ( अमरावती ).

नद्या : वैनगंगा, वर्धा, निर्गुणा, बेबळा, पुस, वाघाडी, अरुणावती, खुनी, विदर्भा, अडाण.

तालुके : आर्णी, नेट, वणी, पुसद, दारव्हा, कळंब, घाटजी, दिग्रस, राळेगाव, मोरगाव, महागाव, यवतमाळ, बाभूलगाव, उमरखेड, पांढरकडवा, झरीजामगी.

पिके : कापुस, ज्वारी, सोयाबीन, तुर, तीळ, सुर्यफुल.

खनिज संपती : दगडी कोळशाची खाणी ( वणी ).

धार्मिक ठिकाणे : केदारेश्वर मंदीर, रंगनाथ स्वामी मंदीर, कळंबचे चिंतामणी मंदीर.

ऐतिहासिक ठिकाणे : यवतमाळ, वणी, पुसद.

औद्योगिक ठिकाणे : यवतमाळ, पाटणबोरी, लोहारा, पुसद.

टोपण नावे : कापसाचा जिल्ह्या.

पंचायत समित्या : प्रत्येक तालुक्यालेक एकूण १६.

लोकसभा मतदार संघ : यवतमाळ.

विधानसभा मतदार संघ : यवतमाळ, पुसद, दिग्रस, दारव्हा, वणी, राळेगाव, आर्णी.

रेल्वे स्थानक : यवतमाळ, दारव्हा, वणी.

अभयारण्य : टिपेश्वर व पैनगंगा.

शेतीविषयक : यवतमाळ जिल्ह्यातील जमिन काळी कसदार असल्यामुळे जिल्ह्यात पांढरे सोने म्हणुन ओळखले जाणारे कापसाचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. याशिवाय ज्वारी मका सोयाबीन, तुर, तीळ, हिवाळ्यामध्ये करडई, सुर्यफुल सहू हरभऱ्याची पिके घेतली जातात.

वने : यवतमाळ जिल्ह्या जरी क्षेत्रफळाने मोठा असला तरी त्या मानाने जिल्ह्यात वनक्षेत्र खुपच कमी आहे. जिल्ह्यामध्ये टिपेश्वर व पैनगंगा ही अभयारन्ये आहेत. वनामध्ये साग, बांबू, सेमल, निंब, तेंदू, धावडा, खैर, फळस, काडसर, बाभळी, बोरे, करवंद, ही झाडे झुडपे आढळतात. तसेच वाघ, बिबटे, सांबरे, रनडूक्करे, रानकुत्री, निरनिराळी माकडे, नीलगायी, चिकारा, अस्वले, ससे, लांडगे, कोल्हे, मोर वेगवेगळ्या चिमण्या, पोपट, कावळे, कबुतरे, लावा, खंड्या, लाहुरी-तितरे, घोरपडी इ. पशु-पक्षी जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत.

जिल्ह्यातील प्रमुख शहरे वं ठिकाणे :

यवतमाळ : यवतमाळ शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असुन शहरात कापसाच्या तसेच इतर कडधान्याच्या मोठ्या बाजरपेठा आहे. शहरामध्ये शारदा आश्रम ही प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी संस्था आहे. शहरामध्ये काही प्रमाणात छोटे-मोठे व्यवसाय चालतात. जवळच लोहारा या ठिकाणी औ. वसाहत आहे. येथील केदारेश्वर मंदीर पाहण्यासारखे आहे. असंख्य भाविक लोक या ठिकाणी येत असतात.

पांढरकवडा : हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असुन प्रसिद्ध क्षेत्र आहे. येथून जवळच पाटणबोरी हे ठिकाण आहे. दगडाच्या फरशा बनविण्याचे कारखाने पाटणबोरी येथे आहे.

वणी : हे तालुक्याचे ठीकण आहे. येथे रंगनाथ स्वामी मंदीर आहे. तसेच येथे चुन्याचा व्यापार भरपुर प्रमाणात केला जातो.

घारंजी : हे गाव वाघाडी नदीकाठी वसलेले निसर्गरम्य व सुंदर गाव असुन येथे मोरोली महाराजांची संधी आहे. दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते.

पाटणबोरी : हे एक औद्योगिक ठिकाण असुन दगडी फरश्या बनवण्याचा उद्योग येथे मोठ्या प्रमाणात चालतो. तसेच कन्याकुमारी ते वाराणशी या राष्ट्रीय महामार्गावरील हे महत्वाचे अंतिम शहर आहे.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *