महाराष्ट्रातील जिल्हे – मुंबई शहर

मुंबई शहर

क्षेत्रफळ : १५६ चौ.कि.मी.

मुख्यालय : मुंबई.

साक्षरता : ८८.४८ %

लोकसंख्या : ३१,४५,९६६.

हवामान : उष्ण व दमट.

तापमान : कमीत कमी १९ अंश से तर जास्तीत जास्त ३३ अंश से.

पर्जन्यमाप : २१० से.मी.

लेणी : घारापुरी.

शेजारी जिल्ह्ये : ठाणे, मुंबई उपनगर.

प्रशासकीय विभाग :मुंबई विभाग.

धार्मिक ठिकाणे : भुलेश्वर मंदीर, मुंबादेवी मंदीर, महालक्ष्मी मंदीर, हजीअली दर्गा, अफगाणचर्च, माउंटमेरी चर्च, आदी शंकर मंदीर, चैत्यभुमी, श्री सिद्धिविनायक मंदीर.

ऐतिहासिक ठिकाणे : मुंबई, गेट ऑफ इंडिया, चैत्यभूमी, राणी ची बाग, माझगाव डॉक

पर्यटन स्थळे : आरे पार्क, गेट वे ऑफ इंडिया, चौपाटी.

बंदरे : भाऊचा धक्का, कुलाबा, मुंबई, गेट वे ऑफ इंडिया.

विमानतळ : सहारा.

महानगरपालिका : बृहन्मुंबई.

टोपण नावे : भारताचे प्रवेशद्वार, भारताची आर्थिक राजधानी, सातबेटाचे शहर.

विधानसभा मतदार संघ : ३६ मुंबई व उपनगर मिळून.

लोकसभा मतदार संघ : ०६ मुंबई व उपनगर मिळून.

विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ, मुंबई, एस.एन.डी.टी. विद्यापीठ.

औद्योगिक ठिकाणे : घाटकोपर, ट्रोम्बे,देवनार, दादर, डॉक्यार्ड रोड.

प्रमुख रेल्वे स्थानके : मुंबई सेंट्रल, दादर, सी.एस.टी.

उपनगरीय रेल्वे स्थानके : मुंबई सेंट्रल, चर्चगेट, दादर, परळ, माहीम, महालक्ष्मी, मज्जीदबंदर, वरळी, परळ, सायन, मरीनलाईन, भायखळा, वडाला,माटुंगा, चुनाभटी, चर्नी रोड.

मुंबई शहराची विभाग रचना:

मुंबई : ही महाराष्ट्राची राजधानी असुन, संपुर्ण भारताची आर्थिक व औद्योगिक राजधानीसुद्धा आहे. व्यापार, उद्योग, नोकरीसाठी देशातील कान्या कोपऱ्यातून लोक येथे पोट भरण्यासाठी येतात. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर म्हणून मुंबईला ओळखले जाते,तसेच सर्वात मोठी धारावीची झोपडपट्टी ही मुंबई मधील एक वसाहत आहे, मुंबई, कुलाबा, माझगाव, परळ, वरळी, माहीम, धाकटा कुलाबा या सात बेटाच्या समुदायाने तयार झालेली ही मुंबई आहे. तसेच भारतातील सर्वात श्रीमंत महानगपालिका आहे. शहरामध्ये गगनचुंबी इमारती, मोठमोठे मॉल्स, आंतरराष्ट्रीय हॉटेल्स, विमानतळ, चित्रपट गृहे, मंदीरे, रेल्वे स्थानके, कारखाने यामुळे मुंबईने जगात आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.

मुंबई परिसरातील धार्मिक ठिकाणे :

मुंबादेवी : ज्या नावाने मुंबई शहर ओळखले जाते. त्या मुंबईतील मुल कोळी असलेल्या बांधवांची ही देवता आहे. पुर्वी हे स्थान बोरीबंदर येथे होते नंतर हे मंदीर इ.स. १७३७ मध्ये भुलेश्वर येथे बांधण्यात आले.

वाळकेश्वर : हे मुंबई मधील थंड हवेचे ठिकाण व शासकीय वसाहत आहे तसेच वाळकेश्वाराचे मंदीर आहे.

महालक्ष्मी मंदीर : हे एक जागृत देवस्थान असुन खुप जुने मंदीर आहे. या मंदीरात महालक्ष्मी, महाकाली, सरस्वती, अशा तीन देवीच्या मुर्त्या आहेत. नवरात्रामध्ये असंख्य भाविक या देवस्थानाला भेट देतात.

सुर्यनारायण मंदीर : मुंबई मधील दादर या ठिकाणाहून अगदी जवळच असलेले हे सुर्यनारायण मंदीर आहे. हे मंदीर सुद्धा २०० वर्षापुर्वीचे आहे.

भुलेश्वर मंदीर : हे मंदीर ३०० वर्षापुर्वीचे असुन मंदीर अगदी चांगल्या परिस्थितीत आहे. मंदीराच्या प्रवेशद्वारावर लाकडी नक्षीकाम आहे. मंदीरात सभा मंडप, नगारखाना, गर्भागर असुन गर्भागरात शिवाची सुंदर मूर्ती आहे.

बाबुलाल नाथ : हे महादेवाचे मंदीर असुन ३०० वर्षापेक्षा जास्त जुने आहे. मंदिरामध्ये पाषाणातील शिवलिंग आहे. शिवरात्रीला येथे खुप गर्दी असते.

अफगाण चर्च : कुलाबा येथील ही सुंदर वास्तु आहे. १८३८ मध्ये झालेल्या पहिल्या अफगाणयुध्दात शहीद झालेल्या सैनिकांच्या आठवणीसाठी हे चर्च उभारले गेले आहे.

सेंट मायकेल चर्च : सैनिकांचे हे चर्च सर्व धर्माचे श्रद्धास्थान असुन, येथे मनापासून केलेली प्रार्थना पावन होते असे समजले जाते.

मुंबई मधील प्रसिद्ध वास्तु : टाउन हॉल व हॉर्निमून सर्कॅल, जहागीर आर्ट गलरी, मुंबई विद्यापीठ यालाच राजाबाई टॉवर सुद्धा म्हटले जाते,प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, हॉटेल ताजमहल, गेट वे ऑफ इंडिया, मुंबई महानगरपालिका इमारत, आर्थर रोड कारागृह, छ. शिवाजी टर्मिनस, नरीमन पोईंट, मणी भवन, तारापोरवाला मत्सलय, महात्मा ज्योतिबा फुले मार्केट, नेहरू प्लेनेटोरियम, कमला नेहरू पार्क, जुने विधान भवन, छ. शिवाजी वास्तु संग्रहालय, जुने सचिवालय, पोस्ट ऑफिस, दूरदर्शन केंद्र.

मुंबई मधील बीच : गोरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, बांद्रा चौपाटी.

स्टेडीयम : वानखेडे, बेब्रान.

मुंबई मधील प्रमुख उद्यान : राजमाता जिजाबाई उद्यान, १८६३ साली उभारलेले हे प्राणी संग्रहालय पुर्वी राणीची बाग म्हणुन ओळखले जायचे. पर्यटकाचे हे आवडते उद्यान आहे.

छोटा काश्मीर : हा एक पिकनिक स्पॉट आहे. अनेक शाळाच्या सहली आवडीने येथे येतात. तसेच चित्रीकरणासाठी हा खुपच महत्वाचा मानला जातो.

मुंबईमधील लेणी :

घारापुरी : मुंबई मधील सुंदर लेणी म्हणून ओळखली जाती.

श्री सिद्धिविनायक मंदीर : हे मुंबई मधील प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे. हे मंदीर मुंबईच्या दादर येथील भागात असुन दोनशे वर्षापूर्वीची सिद्धिविनायकाची मूर्ती या मंदीरात आहे. मुंबई तसेच उपनगरातील भाविक संकष्टीला तसेच नेहमी या ठिकाणी दर्शनाला येतात.

दादर : हे मुंबई मधील महत्वाचे शहर असुन रेल्वेचे महत्वाचे स्थानक आहे. दादर या ठिकाणाहून, पुणे, कोलकत्ता, शिर्डी, नागपुर,अहमदाबाद, छपरा, अमृतसर, चैनई या ठिकाणी एक्स्प्रेस गाड्या सुटतात. तसेच संपूर्ण मुंबई उपनगरात या ठिकाणाहून लोकल रेल्वे गाड्या आहेत. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण झाल्यावर त्यांच्या देहावर दादर येथील चौपाटीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या ठिकाणाला चैत्यभूमी असे म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण दादर मधील एक ऐतिहासिक व धार्मिक स्थळ असुन असंख्य आंबेडकराचे भक्त या ठिकाणाला भेट देतात. ६ डिसेंबर रोजी येथे भरपुर गर्दी असते. 

                      दादर या स्थानकापासून जवळच वरळी येथे हाजीअली दर्गा आहे. हा दर्गा मुस्लीम संत हाजी अली यांच्या स्मरणार्थ बांधला असुन वरळीच्या भर समुद्रात हा दरगा भाविकांचे लक्ष वेधून घेतो. येथे जायचे असले तर आहोटीच्या वेळीच जाता येते. हाजी आली दर्गा हे हिंदु-मुस्लीम-ख्रिचन-बौद्ध सर्व धर्माचे आवडते क्षेत्र आहे.तसेच दादर येथून जवळच माहीम या ठिकाणी मखतूम  फकीर अली पास या मुस्लीम औलीयाचा सुद्धा एक दर्गा आहे. या औलियाचे कुराणावर खुप प्रभुत्व होते. हे मुस्लीम बांधवाचे खुप महत्वाचे श्रध्दा स्थान समजले जाते.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *