महाराष्ट्रातील जिल्हे – मुंबई उपनगर

४. मुंबई उपनगर

क्षेत्रफळ : ४४६ चौ. कि.मी.

मुख्यालय : वांद्रे

साक्षरता : ९०.९०%

लोकसंख्या : ९३,३२,४८१.

हवामान : उष्ण व दमट.

तापमान : कमीत कमी १६ अंश से जास्तीत जास्त ३३ अंश से ते ३५ अंश से पर्यत.

पपर्जन्यमान : २१० से.मी

तालुके : अंधेरी, बोरीवली, कुर्ला.

शेजारी जिल्ह्ये : मुंबई शहर, ठाणे, रायगड.

प्रशासकीय विभाग : मुंबई.

धार्मिक ठिकाणे : महात्मा गांधी मंदीर, जोगेश्वरी देवी मंदीर, वाघेश्वरी देवी मंदीर.

ऐतिहासिक ठिकाणे : मालाड, जोगेश्वरी, बोरीवली, अंधेरी.

प्रेक्षणीय व पर्यटन स्थळे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जोगेश्वरी, गोरेगाव फिल्म सिटी, जुहू चौपाटी.

महागरपालिका : बृहन्मुंबई.

विधानसभा मतदार संघ : ३६.

लोकसभा मतदार संघ : ०६

टोपण नावे : लोकल रेल्वेचे जाळे, चित्रनगरीचा जिल्हा / कलाकारांचे छत.

औद्योगिक ठिकाणे : बोरीवली, अंधेरी, मालाड, कांदीवली, घाटकोपर, चेंबुर.

बंदरे : मार्वे, वेसावे.

विमानतळ : सांताक्रूझ.

प्रमुख रेल्वे स्थानके : बांद्रा, कुर्ला, बोरीवली, अंधेरी.

उपनगरीय लोकल स्थानके : अंधेरी, सांताक्रूझ, गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, कांदीवली, बोरीवली एकूण १८ स्थानके.

मुंबई उपनगरातील प्रमुख शहरे व ठिकाणे :

अंधेरी : मुंबई उपनगरातील हे एक तालुक्याचे ठिकाण असुन लोकल रेल्वेचे जंक्शन आहे. अंधेरी येथे अवजड यंत्र सामुर्गी बनविण्याचे अनेक कारखाने असुन लहान मोठे उद्योग सुद्धा अंधेरीत भरपुर प्रमाणात चालतात.

जोगेश्वरी : हे मुंबई-बोरीवली या लोकल रेल्वे मार्गावरील एक स्थानक असुन जोगेश्वरी देवीचे मंदीर या ठिकाणी आहे,तसेच जोगेश्वरी येथील लेणी भारतात प्रसिद्ध असुन या लेण्यामध्ये शंकराच्या व इतर देवदेवतांच्या सुबक सुंदर मुर्त्या आहेत. हे हिंदु धर्माचे पहिलेच लेणे समजले जाते.

मालाड : मालाड हे औद्योगिक उपनगर असुन असंख्य छोटेमोठे उद्योग या ठिकाणी चालतात. येथील हिऱ्याचा व्यापार व उद्योग जगात प्रसिद्ध आहे. मालाड येथे एकवीरादेवी, वाघेश्वरी देवीचे मंदीर आहेत.

बोरीवली : मुंबई उपनगराचे हे तालुक्याचे ठिकाण असुन मुंबई-अहमदाबाद रेल्वेमार्गावरील व लोकल रेल्वेचे महत्वाचे स्थानक आहे. बोरीवली येथुन जवळच कान्हेरी नावाचा डोंगर आहे. या डोंगरात प्राचीन काळातील सुंदर लेण्या आहेत या लेण्यामध्ये भगवान ध्यानस्त अवस्थेमधील अनेक मूर्तिमंत लेण्या आहेत. या लेण्यामधील स्थापत्यशैली व शिलालेख यामुळे ह्या लेण्या जगप्रसिद्ध आहेत. बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगरातील वैभव आहे. या उद्यानाला पुर्वी कृष्णगिरी उपवन म्हटले जायचे. उद्यानामध्ये प्राणी संग्रहालय पाहण्यासारखे आहे. अनेक प्राण्याच्या जाती-प्रजाती या संग्रहालयात आहेत. तसेच या उद्यानामध्ये महात्मा गांधी स्मुर्ती मंदीर आहे.

जुहू चौपाटी : हा एक सुंदर समुद्र किनारा असुन निसर्गम्य ठिकाण आहे. मुंबई उपनगरातील देशी-विदेशी पर्यटकाचे हे आवडते पर्यटनक्षेत्र आहे. ५ स्टार हॉटेल्स असुन, हॉलीउडचे प्रमुख कलाकार राहतात.

गोरेगाव : मुंबई उपनगरात गोरेगाव येथे म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर येथे ही फिल्म सिटी ती फिल्म सीटी म्हणजे दादासाहेब फाळके चित्रनगरी हे गोरोगाव मधील महत्वाचे ठिकाण आहे. तसेच गोरोगाव हे मुंबई विरार. बोरीवली लोकल रेल्वे मार्गावरील मुख्य रेल्वे स्थानक आहे.

वांद्रे : हे मुंबई उपनगरातील एक तालुका असुन जिल्ह्याचे सुद्धा ठिकाण आहे. तसेच हे रेल्वेचे जंक्शन आहे/ येथून अहमदाबाद, दिल्ली येथे जाण्यासाठी रेल्वे सुटतात. तसेच मुंबई उपनगरातील लोकल रेल्वेचे सुद्धा प्रमुख रेल्वे स्थानक आहे. वांद्रे येथील एका टेकडीवर माउंटमेरी हे सर्वधर्माच्या लोकाचे श्रद्धास्थान असलेले चर्च आहे.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *