महाराष्ट्र : महसूल (मुलकी) व पोलीस प्रशासन

महाराष्ट्र : महसूल(मुलकी ) व पोलीस प्रशासन

 • महाराष्ट्रात महसूल विषयक न्यायसभेची स्थापना -१९५८
 • महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम -१९६७
 • महाराष्ट्र ग्राम पोलीस नियमावली -१९६८

महाराष्ट्र महसूल प्रशासन

 महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग :

1. प्रशासकीय विभाग –नागपूर (विदर्भ)

 • मुख्यालय –नागपूर

  विभागीय जिल्हे – नागपूर,भंडारा ,गडचिरोली ,चंद्रपूर ,वर्धा,गोंदिया

  एकूण जिल्हे –सहा

2. प्रशासकीय विभाग –अमरावती (विदर्भ )

 •  मुख्यालय –अमरावती

  विभागीय जिल्हे –अमरावती ,बुलढाणा ,अकोला,यवतमाळ,वाशीम

  एकूण जिल्हे –पाच

3. प्रशासकीय विभाग- ओरंगाबाद (मराठवाडा )

 •  मुख्यालय – ओरंगाबाद

  विभागीय जिल्हे – ओरंगाबाद,नांदेड,बीड,जालना,परभणी,हिंगोली,लातूर ,उस्मानाबाद

  एकूण जिल्हे –आठ

4. प्रशासकीय विभाग- नाशिक

 •  मुख्यालय –नाशिक

  विभागीय जिल्हे –नाशिक,ध्य्ले,नंदुरबार,जळगाव,अहमदनगर

  एकूण जिल्हे –पाच

5. प्रशासकीय विभाग –पुणे

 •  मुख्यालय –पुणे

  विभागीय जिल्हे –पुणे,सातारा,सांगली ,सोलापूर,कोल्हापूर

  एकूण जिल्हे –पाच

6. प्रशासकीय विभाग –कोकण(मुंबई)

 •  मुख्यालय –मुंबई

  विभागीय जिल्हे –मुंबई शहर ,मुंबई उपनगर ,ठाणे,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग

  एकूण जिल्हे –सहा

 • सर्वाधिक जिल्हे असणारा व मोठा प्रशासकीय विभाग –ओरंगाबाद (मराठवाडा )
 • सहा जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग –नागपूर व कोकण
 • पाच जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग- अमरावती,नाशिक,पुणे
 • महाराष्ट्रातील एकूण जिल्हे -३६
 • महाराष्ट्रातील एकूण तालुके-३५५

महाराष्ट्रातील महसूल व पोलीस प्रशासनाविषयक संक्षिप्त माहिती

 • प्रशासकीय स्तर

  कार्यकारी प्रमुख

  विभाग(महसूल )

  विभागीय आयुक्त

  जिल्हा

  जिल्हाधिकारी

  प्रांत (जिल्ह्याचा विभाग –काही तालुके मिळून )

  उपजिल्हाधिकारी प्रांताधिकारी

  तालुका /तहसील

  तहसीलदार

  गाव

  पोलिस पाटील व कोतवाल

  सज्जा

  तलाठी व कोतवाल

विभागीय आयुक्त

  • प्रशासकीय स्तर /कार्यक्षेत्र-महसूल विभाग /प्रशासकीय विभाग
  • निवड –केंद्रीय लोकसेवा आयोग(upsc)
  • नियुक्ती –राज्य शासन

  कामे :

  १)महसूल विभागाचा प्रमुख कार्यकारी अधिकारी

  2)पंचायत राज संस्था व नगर परिषद यांच्या संबंधी विशेष अधिकार यांना असतात.

  ३)जिल्हाधिकारयाच्या निर्णयावरील अपील ऐकून घेऊन त्यावर आपला निर्णय देणे.

जिल्हाधिकारी (कलेक्टर )

जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकार्यांकडे असून तो प्रशासनातील जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी असतो.

निवड:

 • केंद्रीय लोकसेवा आयोगाची भारतीय प्रशासकीय सेवा उतीर्ण झालेल्या व्यक्तीची या पदावर नेमणूक केली जाते.IAS अधिकारी
 • नियुक्ती :राज्यशासन
 • कार्यक्षेत्र :जिल्हा
 • प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी तरतूद :महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६,कलम ७(१)

कामे:

१)जिल्ह्यातील जमिनीवर शेतसारा आकारणे व तो वसूल करणे

2)जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणे व तसेच जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम करणे

३)जिल्यात दुष्काळ,रोगराई,महापूर,भूकंप  यांसारख्या नैसर्गिक आपत्ती आल्या असतील तर नागरिकांना सर्व प्रकारची मदत करण्याचे कार्य जिल्ह्याधीकारयाच्या नेतृत्वाखाली केले जाते .

४)जिल्ह्यातील जनतेच्या अडचणी,तक्रारी ऐकणे व त्यावर योग्य ती कारवाही करणे .

५)जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका यांच्या देखरेखीखाली घेतल्या जातात.

६)शेतीच्या वाद्विवादावर  निर्णय घेणे ,बेवारस संपती व जमीन ताब्यात ठेवणे तसेच अतिरिक्त जमीन ताब्यात घेणे .

७)दशवार्षिक जनगनणेचे काम त्यांच्या निरीक्षणाखाली होते.

8)जिल्हाधिकारी वेळोवेळी स्थानिक स्वराज्य संस्थाना सल्ला देतो

९)१४४ कलम किंवा कर्फ्यू जरी करणे

१०)मालमतदार्स कोर्ट कायदान्व्ये तसेच मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ अन्वये जिल्हास्तरावरील सर्व कर्तव्ये पार पडणे.

११)जिल्हा व नियोजन मंडळाचा सचिव:जिल्हाधिकारी

12)रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरावरील प्रमुख :जिल्हाधिकारी

 • उपजिल्हाधिकारी ,सहाय्यक जिल्हाधिकारी ,तहसीलदार ,मंडळ अधिकारी ,तलाठी,इ.जिल्हाधीकाराच्या नियंत्रणाखाली असतात.

उपजिल्हाधिकारी

 • कार्यक्षेत्र (प्रशासकीय सत्र ):जिल्ह्याचा विभाग –काही तालुके मिळून बनवलेला उपविभाग –प्रांत
 • निवड –महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
 • नियुक्ती:राज्य शासन

कामे:

१)महसुलविषयक कार्यात जिल्ह्याधिकारी व तहसीलदार यांच्यामध्ये समन्वय साधणारा दुवा म्हणजे उपजिल्हाधिकारी /प्रांत अधिकारी होय.

2)महसुलाच्या उपविभागाव्र्र उपजिल्हाधिकारी नेमला जातो.

३) उपविभागात कायदा व सुव्यवस्था सांभाळणे

४)पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार

तहसीलदार

 • तहसीलदार हा महसूल खात्याचा वर्ग -2 चा अधिकारी असतो.
 • महाराष्ट्र जमीन महसूल कायदा ,१९६६ कलम ७ अन्वये प्रत्येक तालुक्यास एक तहसीलदार ,एक किंवा अधिक नायब तहसीलदार अथवा अप्पर तहसीलदार नेमण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत.
 • निवड: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत याची निवड होते व नेमणूक राज्य शासनाकडून होते तसेच काही पदे पदोन्नतीने भरली जातात .

कामे:

 • तालुका दंडाधिकारी म्हणून काम करणे
 • तालुक्याला शांतता व सुव्यवस्था राकःने
 • तालुक्यातील सर्वाधिक निवडणुका वेळी तालुकास्तरावरील जबाबदारी पार पाडणे.
 • महारष्ट्र जमीन महसूल अधिनियम ,१९६६ व त्या अन्वये तयार केलेल्या नियमांच्या आधीन राहून कर्तव्ये पार पाडणे.
 • मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम ,१९४८ अन्वये,’मामलेदार ‘ या नात्याने विहित कर्तव्ये पार पाडणे.
 • मंडळ अधिकारी ,तलाठी इ.तहसिलदाराच्या नियंत्रणाखाली असतात.

तलाठी

 • तलाठी हा महसूल खात्याचा वर्ग -३ चा कर्मचारी असतो.तलाठ्याच्या कार्याक्षेत्रास ‘सज्जा’असे म्हणतात
 • नेमणूक : प्रत्येक ‘सज्जा’करिता एक किंवा अधिक तलाठी नेमण्याचे अधिकार जिल्हाधिकार्यांना आहेत .
 • नियंत्रण:मंडळ अधिकारी व तहसीलदार

कामे:

 • ग्रामस्तरावर महसूल गोळा करणे ,तसेच महसूल खात्याचे दप्तर सांभाळणे
 • ७-12 व 8 अ चे उतारे देणे.
 • जमिनीच्या व्यवहाराची नोंदी करणे .
 • निवडणुकीच्या कामात मदत करणे.
 • तहसिलदाराच्या आदेशानुसार सोपविलेलि काम करणे .
 • तलाठ्यास कोतवालावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे अधिकार असतात.

कोतवाल

 • गावपातळीवरील सर्वात कनिष्ठ व पूर्ण वेळ शासकीय सेवक होय.
 • नेमणूक :तहसिलदारामार्फात

कोतवालांची संख्या

गावाची लोकसंख्या

१००० पर्यंत

१००१ ते ३००० पर्यंत

३००१ ते पुढे

 • नियंत्रण :तलाठी
 • पात्रता :शिक्षण :४ थी उतीर्ण

        वय -१८ ते ४० वर्षे

        विहित केलेली तारणाची रक्कम १०० रु व दोन जमीन

        शारीरिकदृष्ट्या सक्षम व चारीत्रसंपन्न

        तो संबंधित गावातच राहणे आव्यश्यक असते. 

 • वेतन:दरमहा ५००० रु (पूर्वी २००० रु )
 • रजा :१)कोतवालाच्या इतर शासकीय सेवाकांप्रमाणे रजा मिळतात .

              2)कोतवालास किरकोळ राजा देण्याचे अधिकार तलाठ्यास असतात .

                  ३)कोतवालाची अर्जित रजा मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारास असतात.

कामे:

१)गावातील लोकांना आवश्यक त्या वेळीचावडी/सज्जा येथे बोलाविणे .चावडी/सज्जा येथे स्वच्छता ठेवणे .

2)सरकारी पत्रव्यवहार पोहोच करणे .

३)गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पातळस मदत करणे.

४)जन्ममृत्यूची,विवाह इ.नोंदणीची माहिती ग्रामसेवकास देणे.

५)तलाठी,पोलीस पाटील व अन्य वरिष्ठ अधिकारी यांना त्यांच्या कामात मदत करणे.

६)गावात दवंडी पिटून सरकारी आदेश /सूचना जाहीर करणे.

तलाठी

 • नेमणूक –उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी
 • पात्रता :
  1. वय -२५ ते ४५ वर्ष
  2. शिक्षण –किमान दहावी उतीर्ण
 • शारीरीकदृष्ट्या सक्षम व वागणूक चांगली असावी
 1. संबंधित उमेदवार त्या गावातील असावा
 • कार्यकाल :५ वर्षे परंतु ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत काम पाहता येते .
 • वेतन –दरमहा ३००० रु (पूर्वी ८०० रु )
 • नियंत्रण : तहसीलदार व पोलीस स्टेशन
 • रजा -१)वर्षातून 8 दिवस किरकोळ राजा

        2)रजा मंजुरचे अधिकार तहसिलदाराना

कामे:

 1. गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे व पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हेगाराविषयक माहिती देणे .तसेच गुन्ह्यांच्या चौकशीत मदत करणे .
 2. गावात अनैसर्गिक /संशयास्पद मृत्यू घडल्यास तालुका दंडाधिकारी व संबंधित पोलीस अधिकारी यांना तसे कळविणे .
 3. कोणी विना परवाना शस्त्र बाळगले असल्यास ते काडून घेणे .व त्या संबंधीचा अहवाल संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देणे.
 4. काही नैसर्गिक आपत्ती आल्यास तहसिलादारास तसे कळवणे .
 5. कोतवाल वैगेरे कनिष्ठ सेवकांकडून आवश्यक ती कामे करवून घेणे.

महाराष्ट्र : पोलीस प्रशासन

महाराष्ट्र पोलीस यंत्रणेची संरचना :

पोलीस महासंचालक (DGP )(राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद )

|

अप्पर पोलीस महासंचालक

|

विशेष पोलीस महानिरीक्षक (IGP)

|

पोलीस उपमहानिरीक्षक (DIG)

|

जिल्हा पोलीस अधीक्षक (SP/DSP)

|

पोलीस उपअधीक्षक /सहाय्यक पोलीस आयुक्त (Dy.SP)

|

वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Sr.PI)

|

पोलीस निरीक्षक (PI)

|

सहाय्यक पोलीस निरीक्षक(API)

|

पोलीस उपनिरीक्षक (PSI)

|

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (APSI)

|

पोलीस हवालदार (HC)

|

पोलीस नाईक (PN)

|

पोलीस शिपाई (PC)

महाराष्ट्रातील पोलीस आयुक्त

 • महानगरातील पोलीस यंत्रेचा प्रमुख-पोलीस आयुक्त
 • मदतीला –पोलीस उपायुक्त,सहाय्यक पोलीस आयुक्त
 • आयुक्तालये –मुंबई शहर,नवी मुंबई ,रेल्वे(मुंबई ),ठाणे,पुणे,नाशिक,नागपूर,सोलापूर,औरंगाबाद ,अमरावती,पिंपरी चिंचवड
 • राज्यातील पोलीस आयुक्तालयाची एकूण संख्या –अकरा

महाराष्ट्रातील पोलीस ग्रामीण परीक्षेत्रे

1)      एकूण संख्या

2)      पोलीस ग्रामीण परीक्षेत्रे – 

 • ठाणे (५ जिल्हे )
 • नागपूर(६ जिल्हे )
 • औरंगाबाद (४ जिल्हे )
 • कोल्हापूर (५ जिल्हे )
 • नाशिक (५ जिल्हे )
 • अमरावती(५ जिल्हे )
 • नांदेड (४ जिल्हे )
 

3) ग्रामीण पोलीस परिक्षेत्रातील एकूण जिल्हे -३४

4)ग्रामीण परीक्षेत्राचा प्रमुख –विशेष पोलीस उपमहानिरीक्षकz

महाराष्ट्रात पाच ठिकाणी पोलीस आयुक्तालये व पोलीस ग्रामीण परीक्षेत्रे कार्यरत आहेत :

 1. ठाणे
 2. नागपूर
 3. औरंगाबाद
 4. नाशिक
 5. अमरावती

महाराष्ट्रातील पोलीस खात्याचे विशेष विभाग

 • क्राईम ब्रंच (गुन्हे शाखा )
 • गुन्हे अन्वेषण
 • वाहतूक नियंत्रण
 • सशस्त्र राखीव पोलीस दल
 • बिनतारी संदेश यंत्रणा
 • मोटार वाहन विभाग
 • पोलीस जनसंपर्क यंत्रणा
 • पोलीस भरती व प्रशिक्षण
 • स्त्री पोलीस
 • रेल्वे पोलीस व वाहतूक विभाग
 • होमगार्ड

पोलीस प्रशिक्षण केंद्र

 • भारतीय पोलीस सेवेतील उच्च अधिकाऱ्यांना प्रशिक्षण :१.सरदार वल्लभभाईपटेल अकॅडमी ,हैदराबाद लालबहादूर शास्त्री अकॅडमी ,मसुरी
 • पोलीस उपअधीक्षक,पोलीस उपनिरीक्षक ,सहाय्यक पोलीस आयुक्त या पदांच्या उमेदवारांना प्रशिक्षण :पोलीस अधिकारी प्रशिक्षण केंद्र,नाशिक
 • पोलीस शिपायांसाठी प्रशिक्षण विद्यालये :खंडाळा,नागपूर,नाशिक,अकोला,जालना

होमगार्ड (गृहरक्षक दल )

 • होमगार्ड संघटनेची स्थापना -१९४६ (मुंबई)
 • महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड (गृहरक्षक )चा प्रमुख –महासमादेशक
 • महासमादेशकाची नियुक्ती-राज्य शासन
 • जिल्हा स्तरावर होमगार्डचा प्रमुख –जिल्हा समादेशक
 • महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाला मदत करणारी संघटनाम्हणजे होमगार्ड होय

थोडक्यात महत्वाचे

 • महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम मुंबई शहर व नवी मुंबई या जिल्ह्यांना लागू नाही .
 • भारतात प्रथम १९५५ साली महाराष्ट्रात महिला पोलिसांची नेमणूक करण्यात आली.
 • तलाठ्याच्या कार्यालयास सज्जा असे म्हणतात
 • भारतात १७७२ या वर्षी प्रथमच जिल्हाधिकार्याचे पद निर्माण केले गेले
 • 7/12 चा उतारा तलाठी देतो.
 • महाराष्ट्राचे नवीन जमीन महसूल वर्ष १ ऑगस्ट रोजी सुरु होते
 • तलाठी हा खेड्यांचे महसूल गोळा करतो .
 • महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षणाचे मुख्य केंद्र नाशिक आहे.

नेमणूक

पद

नेमणूक करतो

जिल्हाधिकारी,तहसीलदार

राज्य शासन

तलाठी

जिल्हाधिकारी

कोतवाल

तहसीलदार

पोलीस पाटील

जिल्हाधिकारी/उपजिल्हाधिकारी

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *