भारत सर्वसामान्य माहिती

भारत – सर्व सामान्य माहिती

 • स्थान – आशिया
 • विस्तारअक्षवृतीय विस्तार – ८° ४’ २८” उ. ते ३७° १७’ ५३” उ.

रेखा वृतीय विस्तार – ६८° ७’ ३३” पूर्व. ते ९७° २४’ ४७” उ.

पूर्व पश्चिम अंतर – २९३३ कि.मी.

दक्षिणोत्तर अंतर – ३२१४ कि.मी

जलसिमा (समुद्रकिनारा) – ७५१७ कि.मी.

भू-सीमा – १५२०० कि.मी.

 • एकूण क्षेत्रफळ – ३२,८७,२६३ चौ. कि. मी.
 • राजधानी – दिल्ली
 • कूण राज्ये – २८
 • केंद्र्शाशित प्रदेश ०७
 • भारताची जनगणना २०११ प्रमाणे :

एकूण लोकसंख्या – १,२१,०१,९३,४२२

ग्रामीण लोकसंख्या – ६८.८४ %

नागरी लोकसंख्या – ३१.१६ %

पुरुष:स्त्री प्रमाण – १०००:९४०

एकूण साक्षरता – ७४.०४ %

पुरुष साक्षरता – ८२.१४ %

स्त्री साक्षरता – ६५.४६ %

लोकसंख्येची घनता – ३८२

 • प्रमुख सीमारेषा

मॅकमोहन रेषा – सर हेन्री मॅकमोहन यांनी निश्चित केलेली भारत व चीन     यांच्या मधील सीमा रेषा

रॅडक्लिफ रेषा – सर रॅडक्लिफ यांनी १९४७ मध्ये निश्चित केलेली भारत व पाकिस्तान यामधील रेषा सीमा

 • भारताचे शेजारील देश व समुद्र :

उत्तरेस – नेपाळ, भूतान, चीन

पूर्वेस – बांगलादेश, म्यानमार, बंगालचा उपसागर

दक्षिणेस – श्रीलंका, पाल्कची सामुद्रधुनी, मानारचे आखात

पश्चिमेस – पाकिस्तान, अरबीसमुद्र

वायव्येस – अफगाणिस्तान

 • भारताच्या सीमेवर एकूण सात देश आहेत . पाल्कची सामुद्रधुनी व मानारचे आखात यामुळे श्रीलंका भारतापासून वेगळे झाले आहे

भारतातील राज्ये – राजधान्या व राज्यभाषा

राज्य

राजधानी

राज्यभाषा

आंध्र प्रदेश

हैद्राबाद

तेलगु आणि उर्दू

आसाम

दिसपूर

आसामी आणि बंगाली

बिहार

पटना

हिंदी

गुजरात

गांधीनगर

गुजराती

हरियाना

चंडीगड

हिंदी

जम्मू काश्मीर

श्रीनगर

काश्मिरी व उर्दू

हिमाचल प्रदेश

सिमला

हिंदी व पहाडी

केरळ

त्रिवेंद्रम

मल्याळी

कर्नाटक

बंगलोर

कन्नड

मध्यप्रदेश

भोपाळ

हिंदी

महाराष्ट्र

मुंबई

मराठी

सिक्कीम

गंगटोक

सिक्कीम व गोरखली

अरुणाचल प्रदेश

इटानगर

पहाडी

मेघालय

शिलॉंग

खाशी, जैतीया, गारो

मणिपूर

इम्फाळ

मणिपुरी

नागालँड

कोहिमा

नागा, आसामी

मिझोराम

एजवाल

मिझो, इंग्रजी

ओरिसा

भुवनेश्वर

ओडिसी

पंजाब

चंडीगड

पंजाबी

राजस्थान

जयपूर

राजस्थानी व हिंदी

तामिळनाडू

चेन्नई

तामिळ

त्रिपुरा

आगरतळा

बंगाली, मणिपुरी

उत्तर प्रदेश

लखनौ

हिंदी, उर्दू

पश्चिम बंगाल

कोलकाता

बंगाली

गोवा

पणजी

कोंकणी

छत्तीसगड

रायपुर

हिंदी

उत्तरांचल

देहराडून

हिंदी

झारखंड

रांची

हिंदी

 

केंद्र्शाशित प्रदेश

दमण – दीव

दमण

गुजराती

अंदमान – निकोबार

पोर्टब्लेअर

हिंदी

चंडीगड

चंडीगड

हिंदी, पंजाबी

दादरा – नगर हवेली

सिल्वासा

गुजराती

लक्षद्वीप

कावारत्ती

मल्याळम

पॉंडेचरी

पॉंडेचरी

तमिळ, इंग्रजी, फ्रेंच

दिल्ली

दिल्ली

हिंदी, पंजाबी, उर्दू

राष्ट्रीय प्रतीके

 • राष्ट्रध्वज :- भारताचा राष्ट्रध्वज तिरंगी आहे. सर्वात वरच्या बाजूला केशरी रंग आहे. मध्य भागी पांढरा व सर्वात खाली हिरवा रंग आहे. पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यावर मध्यभागी निळ्या रंगाचे चक्र आहे. हे चक्र सारनाथ येथील सिंह स्थंभावरील धर्मचक्रासारखे आहे. चक्रामध्ये २४ आरे आहेत. ध्वजाच्या उंची व लांबी चे प्रमाण २:३ असे असते.
 • राष्ट्रगीत :- रवींद्रनाथ टागोर रचित “जन गण मन” हे राष्ट्रीगीत म्हणून घटना समितीने २४ जानेवारी, १९५० रोजी मान्य केले. २७ डिसेंबर, १९११ रोजी भारतीय कोन्ग्रेस च्या कलकत्ता अधिवेशनात हे गीत प्रथम गायिले गेले. हे गीत एकूण पाच चरणाचे असले तरी फक्त पहिल्या चरणाचाच राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला.

राष्ट्रगीत

जन – गण – मन – अधिनायक , जय हे

भारत – भाग्य – विधाता

पंजाब – सिंधू – गुजरात – मराठा

द्राविड – उत्कल – बंगा

विंध्य – हिमाचल – यमुना – गंगा

उत्कल – जलधि – तरंगा

तव शुभ नामे जागे ,

तव शुभ आशिष मागे

गाहे तव जय – गाथा

जन – गण – मंगल – दायक जय हे ,

भारत भाग्य विधाता

जय हे ,जय हे , जय हे

जय जय जय , जय हे

 

( राष्ट्रगीत पूर्णपणे म्हणावयास अंदाजे ५२ सेकंद लागतात )

 • राष्ट्रीय चिन्ह –   सारनाथ येथे सम्राट अशोकाने बांधलेला सिंह – स्तंभ आहे . भारत सरकारने राष्ट्रीय चिन्हात या सिंह – स्तंभाला स्थान दिले आहे. या राष्ट्रीय चिन्हात एकूण तीन सिंह दिसतात. या स्तंभाच्या मध्यभागी चक्र असून, त्याच्या उजव्या बाजूला बैलाचे चित्र आहे ; डाव्या बाजूला घोड्याचे चित्र आहे. या राष्ट्रीयचिन्हाच्या खालील बाजूस मुंडकोपनिशादातील “सत्यमेव जयते” हे वचन देवनागरी लिपीमध्ये कोरले आहे. हे राष्ट्रीय चिन्ह २६ जानेवारी, १९५० रोजी मान्य करण्यात आले .
 • राष्ट्रीय गीत :- बाकिंमचन्द्र चटर्जींचे “वंदे मातरम “ या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिलेला आहे . हे गीत म्हणजे भारताच्या स्वातंत्रसंग्रामातील फार मोठी प्रेरणा होती.

बकिमचंद्राच्या “ आनंदमठ “ कादंबरीत हे गीत आहे.

 • राष्ट्रीय पंचांग :- २२ मार्च, १९५७ पासून राष्ट्रीय पंचांगाला मान्यता दिली गेली. याचा पहिला महिना चैत्र असून शेवटचा महिना फाल्गुन आहे.
 • राष्ट्रीय पक्षी – मोर
 • ाष्ट्रीय प्राणी – वाघ
 • राष्ट्रीय फुल – कमळ
 • राष्ट्रीय खेळ – हॉकी
 • राष्ट्रभाषा – हिंदी
 • राष्ट्रीय बोधवाक्य – सत्यमेव जयते
Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *