महाराष्ट्रातील जिल्हे – भंडारा

२४. भंडारा

क्षेत्रफळ : ३८९५ चौ.कि.मी.

मुख्यालय : भंडारा शहर.

साक्षरता : ८५.१४%

लोकसंख्या : ११,९८,८१०.

हवामान:विषम, आर्द्र पाऊस : १४० मि.मि.

तापमान :हिवाळ्यात ६ अंश ते ७ अंश से. उन्हाळ्यात ४५ अंश से. पर्यत.

शेजारी जिल्हे : नागपुर, गोंदिया, चंद्रपूर, मध्य प्रदेश राज्यातील काही जिल्हे.

नद्या : वैनगंगा, पांगोडी, बाग, सूर, चंदनव, वावनधडी, बाग, गोंधळी.

पर्वत : गापिलगडचा डोंगर.

प्रशासकीय विभाग:विदर्भ- नागपुर विभाग.

तालुके : साकोली, मोहाडी पवनी, लाखांदुर, भंडारा, लाखणी, तुमसर.

खाणी :मेगनीज, हिरवे बॉक्साईट, सोने, लोखंड.

पिके : कापुस, सोयाबीन, ज्वारी, तीळ, मका.

धार्मिक स्थळे: अड्याळ येथील हनुमान मुर्ती, अलोनी बाबा मठ-भंडारा.

ऐतिहासिक ठिकाणे : भंडारा.

पंचायत समित्या :प्रत्येक तालुक्याला १ एकूण ७ पंचायत समित्या.

टोपण नाव : तलावांचा जिल्ह्या.

विधान सभा मतदार संघ : भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी.

लोकसभा मतदार संघ :भंडारा.

नगरपालिका :भंडारा, तुमसर.

औद्योगिक ठिकाणे : तुमसर, भंडारारोड, जवाहरनगर, वरठी, लाखणी, डोंगरी.

वने :भंडारा जिल्ह्यात ४८% जंगल आहे. जंगलामध्ये टेभुर्ली, तेंडूची झाडे जास्त आढळतात. या झाडाच्या पानापासुन विड्या बनविल्या जातात. याशिवाय जंगलात खैर, हळद, सिसम, तिवस, मोह, साग, बाभूळ, बोरे, आंबे आहेत.

शेतीविषयक : भंडारा जिल्हा हा शेतीच्या बाबतीत फारच सुपीक आहे. येथे वैणगंगेचे सुपीक खोरे आहे. पाऊस भरपुर असल्यामुळे भात हे येथील महत्वाचे पीक मानले जाते. याशिवाय ज्वारी, बाजरी, कापुस, मका, संत्री, मोसंबी, येथील शेतकरी उत्पन्न होतात. डोंगराळ भागातील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असल्यामुळे येथे, भगर, नाचणी, राळे ही पिके घेतली जातात.

महत्वाची शहरे व शैक्षणिय ठिकाणे :

अंबागड :भंडारा या शहरापासुन २६ ते २७ कि.मि.अंतरावर अंबागड हा किल्ला आहे हा किल्ला बख्व बुलंद या राज्याच्या मातब्बर सरदाराने १७०० साली बांधला आहे.

प्रतापगड : नवेगाव बाध येथुन जवळच हा किल्ला आहे. येथुन जवळच एक नैसर्गिक तलाव आहे.

पवणी : या शहराला प्राचीन काळी पद्मावती नागरी म्हणून ओळखले जात असे. हे बौध्द धर्मियांचे केंद्रबिंदू आहे. येथे बौध्दकालीन स्तुप बालसमुद्र व कऱ्हाडा हे तलाव आहेत. पवणी तालुक्यातील अड्याळ या ठिकाणी हनुमान मुर्ती आहे.ह्या मुर्तीसाठी अड्याळ हे गाव खुप प्रसिद्ध आहे.

भंडारा : हे जिल्हयाचे ठिकाण असुन मुंबई-कोलकत्ता या रेल्वे मार्गावरील महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. गवळी या राज्याच्या कारकिर्दीतील खांब तलाव व येथील प्राचीन किल्ला येथेच आहे.चक्रधरस्वामी यांच्या पादस्पर्शाने भंडारा शहर पावन झालेले आहे. भंडारा येथील पितळी भांडीला देशात खुपच मागणी असुन येथील पितळी भांडी खुप प्रसिद्ध आहे. येथुन जवळच वराठी येथे खुप मोठा पोलाद प्रकल्प आहे.

जवाहरनगर : येथे युध्द साहित्यानिर्मितिचा मोठा कारखाना आहे. तसेच रसायने व यंत्रसामुग्रीचे कारखाने या ठिकाणी आहे.

तुमसर : हे जिल्ह्यातील औद्योगिक शहर असुन येथे मग्नीज शुद्धीकरण कारखाना, लाकुड कटाई उद्योग, विड्याचा कारखाना, राईसमील व इतर छोटे-मोठे उद्योग आहेत. येथील तांदुळाची बाजारपेठ जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *