महाराष्ट्रातील जिल्हे – बीड

३३. बीड

 क्षेत्रफळ : १०६९३.

मुख्यालय : बीड.

साक्षरता : ७३.५३%.

लोकसंख्या : २५,८५,९६२.

हवामान : कोरडे हिवाळ्यात थंड उन्हाळ्यात उष्ण.

तापमान : हिवाळ्यात १० अंश से. उन्हाळ्यात 45 अंश से पर्यत जाते.

पर्जन्यमान : ७५ ते ८० से.मी.

प्रशासकिय विभाग : मराठवाडा, औरंगाबाद.

नद्या : गोदावरी,सीना,मांजरा,लेंडी,अमृता,सिंदफना, सरस्वती,बिदुसरा,लिंब,भामटी,वाघी,होळ,चौसारा,केळी,मेहुकरी, इंचना.

पिके :ज्वारी,बाजरी,कापुस,भुईमुग,गहु,करडई,हरभरा,सुर्यफुल.

फळे : सीताफळ,मोसंबी,चिकु,पेरू.

शेजारी जिल्हे : परभणी,जालना,अहमदनगर,उस्मानाबाद,लातुर.

टोपणनाव : जुन्या मराठी कवींचा जिल्हा.

तालुके : बीड,अंबाजोगाई, आष्टी,गेवराई,माजलगाव,पाटोदा,केज,धारूर,परळी,शिरूर,वडवाणी.

धार्मिक स्थळे : वैजनाथपरळी,आंबेजोगाईची योगेश्वरी,दत्तमंदीर, कंकालेश्वरमंदीर,हजरतशहा बुटवारीचा दर्गा

ऐतिहासिक स्थळे : आष्टी,माजलगाव,वडवली,बीड.

औद्योगिक ठिकाणे : बीड,परळी.

नगरपालिका : बीड,परळी,माजलगाव,गेवराई,केज,आंबेजोगाई.

पंचायत समित्या : ११.         

विधान सभा मतदारसंघ : बीड,माजलगाव,परळी,अंबाजोगाई,आष्टी,केज,शिरुख,धारूर.

लोकसभा मतदार संघ : बीड.

गावे :१२५६.

रेल्वे स्थानक :परळी.

वने : बीड जिल्ह्यातील वनात साधारणता साग,मोह,आंबा,बाभळी,खैर,चंदन,कडुलिंब हि झाडे आढळतात. याशिवाय रोशा कुसळ नावाचे गवत आढळते. जंगलामध्ये रानडुकरे, ससे,चितळ,हरीण,मोर,तसेच वेगवेगळे पक्षी आहेत. येथील वनक्षेत्र हे जिल्ह्याच्या मानाने खुपच कमी आहे.

शेती विषयक : बीड जिल्ह्यातील शेतकरी हा खुपच साधा आहे. पाऊस कमी असल्याने येथे शेती कमी पिकते. कापुस,ज्वारी,बाजरी हे येथील प्रमुख पिके आहेत. याशिवाय येथे तुर,तीळ,मका,सोयाबीन,उडीद,मुग ही पिके घेतली जातात. विहिरी तलावाच्या पाण्यात गहु,हरभरा,सुर्यफुल,भुईमुग,भाजीपाला ही पिके घेतली जातात. शेतीमधील उत्पन्न खरेदीविक्री साठी माजल गाव परळी,बीड,अंबाजोगाई,गेवराई ह्या मोठमोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत.

प्रमुख शहरे व प्रेक्षणीय ठिकाणे :

बीड : बीड हे एक मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक जिल्ह्या असुन जिल्ह्याचे मुख्यालय आहे. येथे औष्णिक विद्युत केंद्र असुन शैक्षणिकदृष्ट्या बीड शहर खुप प्रगत आहे. बीड शहरात अतिप्राचीन अवशेष पाहवयास मिळतात. पीर बालाशाह मन्सुर शहायांचे प्राचीन दर्गे आहेत. निजामशहाच्या सलाबत खान नावाच्या मातब्बर सरदाराने बांधलेली विहीर आजही जशीच्या तशी शाबुत असुन कधीही आटत नाही. त्या विहिरी लाखजाना असे म्हटले आहे.शहरामध्ये कंकालेश्वराचे प्राचीन जलमंदिर खंडेश्वराचे मंदीर इतर जैनहिंदुमंदीर आहेत.

आष्टी : प्राचीन इतिहासात आष्टीला खुप महत्व होते येथे हजरत शाहबुरवारीचा दर्गा आहे. हे निजामशहाचे शहर म्हणुन ओळखले जायचे.

परळी : भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी वैजनाथमंदीर हे परळी शहरामध्ये आहे. परळी येथे औष्णिक विद्युत केंद्र सिमेंटचा कारखाना आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा हा तालुका आहे.

पाचालेश्वर :येथील दत्तमंदीर प्रसिद्ध आहे.

अंबाजोगाई :योगेश्वरी देवीमंदीरामुळे अंबाजोगाई शहर तालुका खुप प्रसिद्ध आहे, या तिर्थक्षेत्राला खुप महत्व आहे. नवरात्री मध्ये लाखो भाविक अंबाजोगाईला येतात. अंबाजोगाई येथे १० व्या शतकातील हिंदु लेणी आहेत. येथील क्षयरोग दवाखाना खुप गुणकारी आहे.

नायगाव :हे एक अभयारण्य आहे. हे अभयारण्य मोरासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या अभयारण्याला मयुरोद्यान असेही म्हणतात. याशिवाय येथे हरीण,ससे,माकडे,रानडुकरे, सायाळ, कोल्हे,तरस आढळतात.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *