१५. पुणे
क्षेत्रफळ : १५,६४३.
मुख्यालय : पुणे.
लोकसंख्या : ९४,२६,९५९.
साक्षरता : ८७.१९%.
हवामान : कोरडे.
तापमान : हिवाळ्यात ३ अंश से १० अंश से पर्यत उन्हाळ्यात ४२ अंश से पर्यत.
पर्यज्यमान : ९० से मी. सरासरी.
पर्वत : सह्याद्री.
विभाग : पश्चिम महाराष्ट्र पुणे विभाग.
नद्या : भिमा, इंद्रायणी, निरा, मिना, मुळा, मुठा, गोड, कुकडी.
किल्ले : शिवनेरी, राजगड, तोरणा, सिंहगड, ( कोंढाणा ), इंदापूर, निमगिरी, इंदुरी, सुर्या, सिदोला, तुग, चोवड, नारायण गड, दौलतमंगळ, चाकण, मल्हारगड, लोहगड, हाटकेश्वर, कोरगड, रेजिज, भुलेश्वर.
शेजारी जिल्हे : सातारा, सोलापूर, रायगड, अहमदनगर.
तालुके : खेड, वेल्हा, दौड, भोर, जुन्नर, शिरूर, मावळ, मुळशी, हवेली, पुरंदर, बारामती, इंदापुर, आंबेगाव, पिपरी, चिंचवड, पुणे शहर.
पिके : ऊस, भात, शाळू ( ज्वारी ) द्राक्ष, कांदा, भुईमुग, गहु, भाजीपाला, अंजीर, डाळिंब, केळी, टोमेटो, बटाटा.
थंड हवेचे ठिकाण : लोणावळा, खंडाळा.
धार्मिक ठिकाणे : पर्वती, कसबा गणपती, पेशवे गणपती, महालक्ष्मी मंदीर, भीमा शंकर जेजुरी, सासवड, देहू, आळंदी, महागणपती, विघ्नेश्वर, गिरिजात्मक, चिंतामणी, मयुरेश्वर, जोगेश्वरी, तुळशीबाग गणपती.
ऐतिहासिक ठिकाणे : लाल महल, नानावाडा, फुलेवाडा, चाफेकार्वाडा, शनिवारवाडा, आगाखान पेलेस, सारस बाग.
प्रमुख शिखरे : भीमाशंकर, तसुबाई.
विद्यापीठ : पुणे.
औदोगिक ठिकाणे : पिंपरी-चिंचवड, बारामती, पुणे, भोसरी, चाकण, वाघोली, शिक्रापूर, सणसवाडी-कोरेगाव, वालचंदनगर, भोर, मुंढवा, खडकी, निगडी, देहूरोड, तळेगाव.
धरणे/तलाव : मुळशी धरण, भोर धरण, खेडगाव, भूशीधरण, पानशेत, भाटघर, पवनाधरण, निरा देवधर, चिपेणी, चासकमान.
महानगपालिका : पुणे, पिंपरी-चिंचवड.
नगरपालिका : शिरूर, बारामती, भोर, इंदापुर, लोणावळा, जुन्नर, दौड, तळेगाव, सासवड, जेजुरी, आळंदी.
पंचायत समित्या : एकूण १३.
लोकसभा मतदार संघ : पुणे, बारामती, शिरूर, मावळ.
टोपण नावे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, शिवबाचा जिल्ह्या.
विधानसभा मतदार संघ : एकूण २५.
विमानतळ : पुणे विमानगर, चाकण.
प्रमुख रेल्वे स्थानके : पुणे, लोणावळा, दौड, शिवाजीनगर, चिंचवड व तळेगाव.
ग्रामपंचायती : १४०१.
सागर कारखाने :
- भिमा शंकर सह. साखर कारखाना, अवसरी ता. आंबेगाव.
- छ. शिवाजी सह. साखर कारखाना, भवानी नगर ता. इंदापुर.
- राजगड सह. साखर कारखाना, अनंतनगर, ता. भोर.
- घोडगंगा सह. साखर कारखाना, न्हावरे, ता. शिरूर.
- सोमेश्वर सह. साखर कारखाना, नीरा, ता. बारामती.
- मालेगाव सह. साखर कारखाना, माळेगाव, ता. बारामती.
- यशवंत सह. साखर कारखाना, थेऊर, ता. हवेली.
- इंदापुर सह. साखर कारखाना, फुलेनगर, ता इंदापुर.
- संत तुकाराम सह. साखर कारखाना, हिंजवडी, ता. मुळशी.
- भिमा सह. साखर कारखाना, मधुकरनगर, ता. दौड.
- विघ्नहर सह. साखर कारखाना, शिरोली, ता. जुन्नर.
वने : पुणे जिल्ह्यातील साधारणतः मुळशी, मावळ, भोर, जुन्नर या तालुक्यामध्ये वनक्षेत्र आढळुन येतात.येथील वनात बोरे, साग,बांबू, धावडा, चंदन, किंजल, बाभुळ, वागटी, पोलाटी, हिरडा, जांभुळ, बेहडा, करवंद इ. झाडे आढळुन येतात.वनामध्ये वाघ, बिबटे, सांबर, लांडगे, कोल्हे, तरस, माकडे, रानडुक्कर, हरिणे, वनगायी, रानकुत्रे, तसेच मोर, चिमणी, साळुंखी, मैना, पोपट, पारवे, बगळे, कोकीळ, रानकोंबडे इ. पशु-पक्षी आढळुन येतात.
शेतीविषयक : पुणे जिल्ह्यातील शेतकरी हा महाराष्ट्रातील सर्वात सुखी शेतकरी समाजला जातो. जिल्ह्यामध्ये मान्सुन, खरीप तसेच उन्हाळी पिके घेतली जातात. मान्सुनच्या पावसावर भातशेती तसेच ज्वारी, बाजरी, मुग, उडीद, भुईमुग, शाळू ही पिके घेतली जातात. सिंचन क्षेत्रामध्ये ऊस, गहू, हरभरा, मका, फुलशेती, भाजीपाला शेती केली जाते. जिल्हयामध्ये पेरू, डाळिंब, अंजीर, द्राक्षे यांच्या सुद्धा बागा आहेत.
पुणे जिल्ह्यातील प्रमुख शहरे/ ठिकाणे :
पुणे : पुणे ही शिक्षणाची पंढरी म्हणुन ओळखले जाणारे शहर असुन महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे.पुणे म्हटले म्हणजे सर्वाना मराठे व पेशवाईचा इतिहास डोळ्यासमोर येतो. शिवकाळामध्ये निजामाने पुणे शहरावर गाढवांचा नांगर फिरवला होता असे म्हटले जाते. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जीजाबाई यांनी शून्यातून पुण्याचे विश्व निर्माण केले आणि आजच्या या पुणे शहराट मोठमोठ्या शिक्षण संस्था, भव्य उद्याने, उत्तुंग व शोभिवंत इमारती किल्ले, मंदीरे, अशा अनेक बाबी प्रेक्षणीय व ऐतिहासिक आहे.
शहरामध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था भारती विदयापीठ, महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ, महाराष्ट्र राज्य उच्च माध्य, शिक्षण मंडळ नेहरू क्रीडा मंडळ( नेहरू स्टेडीयम ) इ. महत्वाच्या संस्था तसेच पर्वती, लालमहल, दगडूशेठ हलवाई गणपती, कसबा गणपती, पेशवे गणपती, सारसबाग, केळकर वास्तु संग्रहालय, चाफेकर वाडा, बंडगार्डन, शनिवारवाडा, शिंद्याची छत्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आगाखान पेलेस, सिंहगड, पाताकेश्वर मंदीर, ओंकारेश्वर मंदीर, लालमहल, पर्वती, विश्रीमबागवाडा, नवदेवी मंदीर, इ. प्रेक्षणीय व धार्मिक ठिकाणे पुणे या सांस्कृतिक शहरात आहेत.
बारामती : हे तालुक्याचे ठिकाण असुन देशाचे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व राज्याचे उपमुख्युमंत्री यांचे गाव असुन येथे मोठी औदोगिक वसाहत आहे. बारामती येथे द्राक्ष्यापासून मद्यनिर्मितीकरण्याचा कारखाना आहे. बारामती येथुन जवळच सोमेश्वर नगर व माळेगाव येथे सहकारी साखर कारखाने आहेत.
भोर : तालुक्याचे ठिकाण असुन येथे रेक्झींचा कारखाना आहे. तसेच येथुन जवळच भाटघर येथे लाईट धरण आहे. या धरणाच्या जलाशयाला येसाजी कंक असे नाव आहे.
पिंपरी–चिंचवड : पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी औदोगिक वसाहत ही पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रात आहे. या ठिकाणी भारतातील मोठमोठे उद्योग चालतात. ( Bajaj Auto, Telco Ltd., Bajaj Tempo. )येथील इंदायणी नदीच्या तिरावर मोरया गोसावी या महापुरषाची समाधी आहे. येथुन जवळच निगडी येथे अप्पूघर हे करमणुकीचे व प्रेक्षणीय ठिकाण आहे. पिंपरी-चिंचवड ही महानगपालिका असुन श्रीमंत महानगपालिका म्हणुन ओळखली जाते. पिंपरी पासुन जवळच भोसरी येथे राष्ट्रीय एडस् या जीवघेण्या आजारासंदर्भात संशोधन कार्य करणारी संस्था आहे.
उरळी कांचन : निसर्गउपचार केंद्रासाठी उरळी कांचन हे प्रसिद्ध आहे.
लोणावळा : पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणुन लोणावळा सर्वांनाच माहित आहे. लोणावळा शहराला ब्रिटीशांच्या काळात खुप महत्व होते. लोणावळा शहरापासून जवळच कार्ले व भाजे या प्राचीन लेण्या आहेत. लोणावळा येथील चिक्की भारतात व जगात प्रसिद्ध आहे. नामवंत समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मेणाचा पुतळा लोणावल्यामध्ये आहे. लोणावळा येथुन जवळच कार्ला येथे एकवीरा देवीचे सुंदर मंदीर असुन आगरी-कोळी लोकांची ही देवता मानली जाते. दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते. शहरामध्ये I.N.S. शिवाजी हे नौदल ट्रेनिंग सेंटर आहे.
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा हे पुरंदर तालुक्यातील जेजुरी गावातील गडावर आहे. सोमवती अमावस्येला येथे मोठी यात्रा असते.
जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर हे ऐतिहासिक ठिकाण असुन इतिहासात जुन्नरचे मोठे योगदान आहे. आताच्या पुणे जिल्ह्यातील हे तालुक्याचे ठिकाण आहे. जुन्नर तालुक्यातच शिवनेरी हा किला असुन छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच किल्यावर झाला व येथेच शिवाजी महाराजांचे बालपण गेले. या गडावर शिवाईदेवीचे सुंदर मंदीर आहे. शिवाजी महाराजाचे गुरु दादोजी कोंडदेव यांचा वाडा, मराठकालीन व पेशवे कालीन बऱ्याच वास्तु जन्नर येथे बघावयास मिळतात.
देहू : हे एक तिर्थक्षेत्र असुन पुण्यातील दक्षिणकाशी म्हणून ओळखले जाते. संत तुकाराम महाराजाचा जन्म देहू येथे झाला होता. देहूपासून जवळच असलेल्या भंडारा डोंगरात तुकाराम महाराज चिंतन करीत असत येथे फाल्गुन वद्य दिवतीतेला मोठी यात्रा भरते. देहू येथे सैनिक प्रशिक्षण केंद्र व लष्करी
चाकण : चाकण गावाला शिवकालात खुप महत्व होते. १४ व्या शतकापासून हे जहांगीरदारीचे गाव म्हणुन ओळखले जाते. पुणे जिल्ह्यातील कांद्याची मोठी बाजारपेठ येथे असुन सद्यस्थितीत हे एक व्यापारी औद्योगिक शहर बनलेले आहे.
आळंदी : हे महाराष्ट्रातील वारकरी लोकांची दक्षिण काशी म्हणुन ओळखले जाते. आळंदी हे ठिकाण इंद्रायणी नदीकाठी असुन याच ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. ज्ञानेश्वराच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आषाढी व कार्तिकी एकादशीला महाराष्ट्रातून व देशातून असंख्य भाविक येथे येतात. राहण्यासाठी येथे धर्मशाळा उपलब्ध आहेत. आळंदी येथे जाण्यासाठी पुणे, स्वर्गगेट, भोसरी येथुन बस असतात.
भीमाशंकर : सह्याद्रीच्या पर्वत रंगामध्ये वसलेले हे बारा ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर ठिकाण असुन भीमा नदीचा उगम सुद्धा याच डोंगरातुन झालेला आहे. याठिकाणी असलेले महादेवाचे देवस्थान हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते. येथे श्रावण महिन्यात व शिवरात्रीला या ठिकाणी भरपुर भाविक येतात. येथील वातावरण थंड असुन निसर्गरम्य आहे.
आर्वी : भारतातील १ ले उपग्रह दळणवळण केंद्र येथे आहे.
नारायणपुर : येथे गुरुदत्ताचे जागृत देवस्थान असुन भरपुर दत्तभक्त या देवस्थानाला भेट देतात.
रायरेश्वर मंदीर : छ. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यासोबत येथील रोहिडेश्वरावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती.
बनेश्वर मंदीर : हे एक निसर्गरम्य ठिकाण असुन येथील शिवमंदिर प्रसिद्ध आहे.