- म्हशीच्या दुधात स्निग्धांश ……टक्के असते
७%
- कोकणात शेतीची चिखलणी मुख्यता ……करवी करून घेतात कारण त्यांच्या खुरांचे स्नायू जास्त बळकट असतात
रेडा
- ….. दुधात व मांसात कोलेस्टेरॉल चे प्रमाण कमी असते.
म्हैशिंच्या
- शरीराने सर्वात धिप्पाड व खादाड म्हणून…… म्हैस ओळखली जाते.
जाफराबादी
- ……. म्हैशीचे मुळस्थान पंजाब आहे.
मुऱ्हा
- म्हैशीना …… थंडी व……उष्णता सहन होत नाही.
अति
- …….म्हैशी च्या दुधात स्निग्धाशांचे प्रमाण जास्त असते.
जाफराबादी
- सध्या भारताची दरडोई दुधाची उपलब्धता किती आहे ?
२२६ ग्रॅम
- National Dairy Development Board तर्फे कोणत्या तेलाचे उत्पादन केले जाते?
धारा
- परदेशी गाईच्या जातीपैकी…..गाय सर्वात जास्त दुध देते?
होल्स्टीन-फ्रिजीयन
- देशी गायी पैकी सर्वात जास्त दुध देणारी गाय म्हणून ओळखली जाते?
साहिवाल
- महाराष्ट्रात विदेशी वळूंची पैदास केंद्रे कोठे आहेत ?
ताथवडे (पुणे), कोपरगाव व औरंगाबाद
- राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेकडे –कर्नाल हरियाना यांनी करणाफ्रीज जातीची कोणती नवी जात शोधली ?
कामधेनु
- गाईच्या दुग्धात्पादनाशी तुलना करता म्हशींच्या दुग्धोत्पादन क्षमतेत म्हणावी तितकी वाढ झाली नाही
कारण……संकरीत म्हैस संशोधन झाले नाही.
- दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी ऑपरेशन फ्लूड ( दुधाचा महापूर ) हि योजना भारत सरकारने केव्हा सुरु केली?
१९७१
- राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
आनंद (गुजरात)
- सध्या महाराष्ट्रातील दर माणशी दर दिवसाची दुधाची उपलब्धता किती आहे ?
१८० ग्रॅम
- धवलक्रांतीचा तिसरा टप्पा केंव्हा पूर्ण झाला ?
१९९६
- संकरीत गायीबाबत संवर्धन कार्य निष्ठेने करणाऱ्या अशासकीय संस्थामध्ये…….येथील भारतीय कृषी उद्योग प्रतीष्टांची (BAIF) कामगिरी उल्लेखनीय आहे ?
उरळीकांचन (पुणे)
- ………चारावृक्ष म्हणूनच संबोधले जाते ?
सुबाभळीस
- ……या पद्धतीने दोन निरनिराळ्या वंशाचा उपयोग करून अधिक दुग्धात्पादन देणारी गाय निर्माण केली जाते ?
संकर
- भारतातील पशुधनाची घनता दर १०० हेक्टर पिकांखालील जमिनीमध्ये………जनावरे तर महाराष्ट्रात हेच प्रमाण…..इतके आहे.
११६ व १२०
- पशुधनाच्या बाबतीत भारताचा जगात……क्रमांक आहे.
प्रथम
- पशुसंवर्धनाचा एकात्मिक कार्यक्रम……वर्षी सुरु करण्यात आला.
१९६६-६७
- होल्स्टीन फ्रिजीयन गायीचे मुळस्थान…..हे आहे.
हॉलंड
- भावनगरी या नावाने सुध्दा…..म्हैस ओळखली जाते.
जाफराबादी
- ……म्हैशीची शिंगे लहान व कोयत्या सारखी असतात.
सुरती
- पंढरपुरी जातीच्या म्हैशीला कर्नाटकात काय म्हणतात.
धारवाडी
- चारा वर्गीय खाद्य म्हणून…..व…..याचा उल्लेख करता येईल.
बरसीम,मुरघास
- खुराक वर्गीय खाद्य म्हणून…..ओळखले जाते.
शेंगदाणा पेंड, करंज पेंड
- म्हैशीचा गाभण काळ…..असतो.
१० महिने १० दिवस
- वासराची शिंगे खुडण्यासाठी…..चा वापर करतात.
कॉस्टिक सोडा
- नर जनावराचे खच्चीकरण करण्यासाठी……खच्चीकरण चिमट्याचा वापर करतात.
बर्डीबेज
- जनावरांना होणारे फऱ्या, घटसर्प, क्षय कासेचा दाह हे…..जन्य रोग आहेत.
जीवाणू
- जनावरांना होणारे विषाणू जन्य रोग म्हणून…..व…..ओळखले जातात.
लाळखुरकत, देवी, बुळकांडी
- जगातील पशुधनात भारताचा वाट…..टक्के आहे.
२०%
- जास्त पावसाच्या प्रदेशात शेतीकामासाठी उपयुक्त बैल कोणता?
डांगी
- आशियातील सर्वात मोठी दुग्ध वसाहत म्हणून महाराष्ट्रातील कोणती संस्था ओळखली जाते?
आरे, मुंबई
- होल्स्टीन-फ्रिजीयन या गायीचा रंग…..असतो.
काळा व पांढरा
- मेहसाना हि म्हैशीची जात…..व…..जातीच्या संकरापासून पैदा झाली आहे.
सुरती व मुऱ्हा
- म्हैशीचे प्रजोत्पादन करण्यासाठी प्रामुख्याने……पद्धत जास्त प्रचलित आहे.
नैसर्गिक
- दुग्धोत्पादन कायम राखण्यासाठी……या हर्मोनाची आवश्यकता असते.
प्रोलक्टीन
- कोणत्या झाडाचा पाला शेळीला अधिक प्रमाणात चारल्यास त्या शेळीचे केस गळतात ?
सुबाभूळ
- …….या संप्रेरक द्रव्यामुळे पान्हावण्याची प्रक्रिया चालू होते व त्याचा प्रभाव ७ मिनिटे राहत असल्यामुळे तेवढ्या कालावधीतच दुध काढावे.
ऑक्सीटोसीन
- शिंगावरील वर्तुळांची संख्येत २ मिळवले असता जनावरांचे….. निघते.
वय
- बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी मुख्यता कोणत्या जातीच्या बैलाची निवड केली जाते?
खिलार
- अमूल या नावाने विकली जाणारी दिग्धोत्पादने…..येथे तयार केली जाताट.
आनंद (गुजरात)
- सर्वसाधारण पणे गायींच्या दुधाचा सामू हा…..ते…..दरम्यान असतो.
६.४ ते ६.६
- गाईच्या दुधाचे विशिष्ट गुरुत्व….ते….. असते.
१.०२८ ते १.०३०
- गाईच्या दुधाच्या गोठण बिंदू….अंश सें.ग्रेड असतो.
०.५४७
- सर्वसाधारण पणे म्हैशीच्या दुधाचा सामू…..असतो.
६ ते ६.२
- म्हैशीच्या दुधाचे विशिष्ट गुरुत्व…..ते…..असते.
१.०३० ते १.०३२
- दुधामध्ये तांबडा लिटम पेपर……होतो.
निळा
- १९३९ मध्ये……येथे भारतातील सर्व प्रथम कृत्रिम रेतनाचा प्रयोग करण्यात आला.
म्हैसूर
- राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था…. येथे आहे.
कर्नाल (हरियाना)
- कच्चे दुध पिण्यासाठी हानिकारक असते कारण त्यामध्ये……हा हानिकारक जीवाणू असतो.
लक्टोबॉस्टीलस
- टेपवर्म जंतू मारण्यासाठी……किंवा….हे औषध वापरतात.
निकोटीन किंवा कॉपर सल्फेट
- दुधातील स्निग्धांशाच्या गाठींना दोन मायक्रोन पेक्षा लहान करण्याच्या क्रियेला……म्हणतात.त्यामुळे दुधावर साय येत नाही.
होमोझीनायाझेशन
- दुधातले सर्व प्रकारच्या बक्टेरीयाचा नाश करण्याच्या प्रक्रियेला….म्हणतात.
निर्जतुकीकरण
- अल्ट्रा-व्हायोलेट किरणांमुळे दुधातील डी जीवनसत्व वाढविण्यात आलेल्या दुधाला…..असे म्हणतात.
इरॉडियेट दुध
- भारतीय धवल क्रांतींचे जनक…..हे होत
डॉ. वर्गीस कुरियन
- स्टोप्तोकॉक्स लक्टीस या उपकारक जीवाणू मुळे दुधाचे रुपांतर……होते.
दह्यात
- ……..प्रक्रियेमध्ये दुध ६३ अंश सें तापमान ३० मिनिटे तापवतात किंवा ७२ अंश सें तापमानाला १५ सेकंद तापवतात. त्यामुळे हानिकारक जीवाणूंचा नाश होतो.-
पाश्चरायझेशन
- भारतात सर्वाधिक दुध…..राज्यात होते.
पंजाब
- बुळकांड्या रोग जनावरांना होऊ नये म्हणून…..लस टोचावी.
रिंडर पेस्ट
- जगातील एकूण म्हैशीनपैकी भारतात सुमारे…..% म्हैशी आहेत.
५७%
- भारतातील एकूण पशुधन संख्येनुसार महाराष्ट्राचा क्रमांक…..आहे
तिसरा
- आहार शास्त्रानुसार माणसाच्या दररोजच्या आहारात दुधाचे प्रमाण…..ग्रॅम असावे.
२२० ग्रॅम
- दुधापासून चीज बनवण्याच्या……किंवा…..या शाकाहारी एन्झाइम चा वापर केला जातो.
Papain/Baulius substillis.
- भारतातील दुग्धोत्पादनाचे इतर देशांची तुलना करता कमी असण्याचे कारण म्हणजे-१.
कमी दुध उत्पादन देणाऱ्या जनावरांच्या जाती. २. जुने तंत्रज्ञान ३. दुग्ध व्यवसायास जोडधंद्याचा दर्जा ४. शासकीय योजनाचे अपयश
- पशुसंवर्धन खात्याला १०० वर्ष पूर्ण कधी झाली.
२० मे १९९२
- नवीन जन्मलेल्या वासराला चिक किती द्यावा?
त्याच्या वजनाच्या १०%
- गायीच्या दुधात प्रथिनांचे प्रमाण किती असते?
३.४%
- बेबी फूड मध्ये कशाचा वापर केला जातो?
दुध पावडरचा
- कोणत्या प्राण्याच्या खातात नायट्रोजन व फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते?
शेळी
- केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे?
अविकानगर (राजस्थान)
- केंद्रीय बोकड संशोधन संस्था कोठे आहे?
मखदूम ( उत्तरप्रदेश)
- केंद्रीय मेंढी प्रजनन फार्म कोठे आहे?
हिस्सार ( हरियाणा)
- मुरघास तयार करण्यासाठी सर्वात जास्त योग्य पिक कोणते?
लघुनघास
- भारतामध्ये पहिले शीतविर्य केंद्र कधी सुरु झाले?
१९६५
- गायीचा माजावर राहण्याचा कालावधी किती?
१२ ते २४ तास
- भारतातील एकूण पशुधनापैकी म्हैशीची संख्या…..आहे.
३९%
- पंढरपुरी हि कोणत्या प्रांण्याची जात आहे.
म्हैस
- अखिल भारतीय सन्मवित शेळी दुध उत्पादन संशोधन प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
हरियाणा
- टोन्ड मिल्क प्रथम कोणी तयार केले?
डी.एन खुरोडे
- दुधाच्या किमती ठरविण्याच्या पद्धती किती? व कोणत्या?
टू ऑक्सिस बेसीस, इफेक्टीव्ह फट युनिट बेसीस
- टोन्ड मिल्क प्रथम कशापासून तयार केले?
सोयाबीन
- दुधाचा महापूर १ योजना कधी सुरु करण्यात आल्र?
जुलै १९७०
- अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण किती % असते.
१३ %
- गाईचे दुध कशामुळे पिवळे होते?
करोटीन
- दुधाचा महापूर हि योजना कोणत्या संस्थेने हाती घेतली?
राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ
- भारतात सहकारी तत्वावर आधारित दुग्धोत्पादनास केंव्हा सुरुवात झाली?
१९४६
- दुग्धोत्पादनात पशु आहारावर होणारा खर्च किती?
५० ते ७५%
- दुधाच्या किंमती कशावरून ठरविल्या जातात?
दुधातील स्निग्धांश व घन पदार्थ
- दुग्धजन्य ताप जनावरांना का होतो ?
रक्तातील क्ल्शीयम प्रमाण कमी झाल्यामुळे
- गाय, म्हैस, मेंढी इ. जनावरांमध्ये आढळणारा बुळकांडी रोग कशामुळे होतो?
विषाणू
- पशुजैव पदार्थ निर्मिती संस्था कोठे आहे?
पुणे
- भारतातील दुधासाठी पाळण्यात येणाऱ्या गायीच्या जाती कोणत्या?
साहिवाल, गीर, देवणी,सिंधी
- दुधासाठी पाळण्यात येणारी महाराष्ट्रातील गायीची जात कोणती?
देवणी
- डांगी जातीचे बैल महाराष्ट्रात कोठे आढळून येतात?
कोकण, अहमदनगर व नाशिक
- शेतीकामासाठी वापरण्यात येणाऱ्या बैलाच्या महाराष्ट्रातील जाती कोणत्या?
डांगी, खिल्लार
- दुधासाठी प्रसिध्द परदेशी गायीच्या जाती कोणत्या?
जर्सी, ब्राऊन स्वीस, होलस्टीन फ्रिजीयन
- ब्राऊन स्वीस गाय एका वेतात किती दुध देते?
४००० ते ५५०० लिटर
- होलस्टीन फ्रिजीयन गाय एका वेतात सरासरी किती दुध देते?
५००० ते ७००० लिटर
- जर्सी गाय एका वेतात सरासरी किती दुध देते?
४०००-५००० लिटर
- शेळीच्या परदेशी जाती कोणत्या?
सानेन, अल्पाईन, अगोरा
- भारतातील म्हैशीच्या महत्वाच्या जाती कोणत्या?
मुऱ्हा, जाफराबादी, मेहसाणा, सुरती, पंढरपुरी
- म्हैशीची महाराष्ट्रातील महत्वाची जात कोणती?
पंढरपुरी
- मोहेर नावाचे किंमती लोकर देणारी शेळीची जात कोणती?
अगोरा
- जनावरांनमध्ये विषाणू मुळे होणारे प्रमुख रोग कोणते?
लाळखुरकत, बुळकांडी, देवी, ब्ल्युटग
- अतिशय प्रसिध्द लोकर देणारी मेंढीची जात कोणती?
मेरीनो
- ब्लक मिनोर्का, ऱ्होड आयलंड रेड, प्लायमाऊथ रॉक या जाती कशाच्या आहेत?
कोंबड्याच्या
- व्हाईट यार्कशायर व लडरेस या जाती कशाच्या आहेत?
डुक्कर
- व्हाईट लेगहॉर्न हि कोबडीची जात एका वर्षात किती अंडी देते?
२२५-२५०
- जनावरांमध्ये जीवाणू मुळे होणारे प्रमुख रोग कोणते ?
घटसर्प, फऱ्या, क्षय.
- आर्थिकदृष्ट्या अतिशय नुकसान दायक जनावरील रोग कोणता ?
दगडी कास
- कुक्कुटपालन व्यवसायात सर्वाधिक खर्च कशावर होतो ?
खाद्यावर
- प्रतिकूल परिस्थितीत व कमी खर्चाचे व्यवस्थापन असणारी म्हैस म्हणून….म्हैस ओळखली जाते.
पंढरपुरी
- किती वयात बी=बोकड पैदासक्षम होतो ?
१ वर्ष वयाचा असताना
- शेळी प्रथम माजावर कोणत्या वयात येते ?
८ ते १२ महिने वयाची असताना
- किती शेळ्या साठी एक बोकड प्रजनासाठी वापरतात?
१२
- प्रथिनांची कमतरता असताना जनावरांच्या आहारात कोणता पदार्थ वापरतात?
युरिया
- एगमार्क म्हणजे काय ?
अग्रीकल्चरल मार्केटिंग
- देवी व होलस्टीन फ्रिजीयन यांच्या संकराने तयार झालेल्या गाई स कोणत्या नावाने ओळखतात?
होलडेन
- लोण्यामध्ये स्निग्धांश किती असतो?
८१%
- दुधाचे घनत्व कशाने मोजतात?
हायड्रोमिटर
- राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची स्थापना कधी झाली?
सप्टेंबर १९६५
- चिकामध्ये वासारच्या आरोग्याच्या दुष्टीने आवश्यक पदार्थ कोणता?
प्रति जैविके
- गाय व्याल्यानंतर ७२ तासपर्यत तिच्या दुधाला काय म्हणतात?
चिक
- पान्हा सोडण्यासाठी आवश्यक संप्रेरक कोणते?
ऑक्सिटोसिन
- दुध स्त्रवण्यासाठी आवश्यक संप्रेरक कोणते?
प्रोलक्टीन
- गायीची दुध ग्रंथी हि कोणत्या प्रकारची ग्रंथी आहे?
चर्म ग्रंथी
- पशूंची विमा योजना कधीपासून अंमलात आली?
१९७४
- अंगोरा जातीच्या शेळी मुळस्थान कोणते ?
(तुर्कस्थान)
- महाराष्ट्रात लांब पायाची, काटक, दुष्काळात तग धरणारी मेंढी ची जात कोणती ?
दख्खनी
- संकरीत गाय पहिल्यांदा वितात येण्याचे वय किती असते?
२ ते २|| वर्ष
- गायीचा गाभण काळ किती दिवस आहे?
२८० दिवस
- दुधापासून तयार केलेले कोणते पेय रशियात जास्त प्रसिद्ध आहे?
क्युमीस
- दुधात पाणी घालून केलेली भेसळ कोणत्या उपकरणाच्या सहाय्याने ओळखता येते?
लकटोमीटर
- महाराष्ट्रात पशु खाद्यासाठी कोणत्या देशी गवताचे सर्वात जास्त जागा व्यापली आहे?
मारवेल ४०
- जनावरां च्या संकरणासाठी परदेशी वळू का वापरतात?
त्यामुळे गाईची उत्पादकता वाढते.
- पशुधन खाद्य पैकी……. हे प्रथिनांचे जास्त प्रमाण असलेले उदाहरण होय.
भुईमुगाची पेंड
- जनावरांना उपयोगी पडणारे बारमाही गवत कोणते?
नेपियर
- कोणती सुकी वैरण जनावरांसाठी जास्त पोष्टिक व उपयुक्त असते?
द्विदल
- कोणत्या वृक्षा पासून चारा मिळतो?
काशीद
- मुरघास तयार करण्यसाठी कोणते पिक सर्वात जास्त योग्य आहे?
बरसीम
- दही हा पदार्थ दुधाचा कोणता दुग्धजन्य पदार्थ आहे?
आंबविण्याची प्रकिया केलेली
- दुध हे पूर्ण अन्न आहे कारण……..
त्यात शर्करा, खनिज, मूलद्रव्ये व जास्त स्निग्ध पदार्थ असतात.
- दुधातील हानिकारक बक्टेरीया चा नाश करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
पाश्चरायाझेशन
- राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने दुधाच्या दराविषयी सुचवलेली टू-अक्सीस पद्धत यावर आधारित आहे?
फट आणि एस.एन.एफ
- दुधाच्या पाश्चरिकारणाचा प्रक्रीयेत कोणत्या जीवनसत्वांचा नाश होतो?
ब
- दुग्ध व्यवसाय आणि कृषी व्यवसाय एकत्रित घेत कल्यास कोणत्या वर्गात मोडतो?
पूरक व्यवसाय
- गाईची कोणती जात हॉलंड मध्ये आहे?
होल्स्टन
- गाईची कोणती जात इंग्लड भागातील आहे?
जर्सी
- कोणती गाईची जात स्वित्झर्लंड येथील आहे?
ब्राऊनस्विस
- निली रावी जातीच्या गाई कोणत्या प्रदेशात आढळतात?
पाकिस्तान
- कृत्रिम रेतन पद्धतीद्वारे…..निवड पद्धती वाढवण्यासाठी मदत होते.
नर
- सेट्रीफ्युगल मशीन कशासाठी वापरतात?
फट(स्निग्धांश)
- इन्शुलेटेड टकर्समध्ये दुधाचे तापमान वाहतुकीचे काळात किती ठेवले जाते?
५ ते ६ अंश सें.ग्रे.
- दुध स्टरलायाजेशन करायचे झाल्यास ते १०० ते १०२ अंश सें.ग्रे तापमानात किती तास तापवावे लागेत?
अर्धा
- दुध हे आम्ल कि विम्ल प्रकारचे असते?
आम्ल
- गाईच्या दुधास कशामुळे पिवळा रंग येतो?
करोटीन
- गाईच्या जातींची त्यांच्या वितातील सरासरी दुध उत्पादना नुसार चढत्या क्रमाने लिहा?
देवणी-लालसिंधी-जर्सी-होल्स्टन-फ्रिजीयन
- १९१९ मध्ये खालील पैकी कोणत्या शास्त्राज्ञाने परदेशातून जनावरांच्या जाती आणल्या?
ग्यून
- कोणत्या साली कृत्रिम रित्या रेतन भरवण्याची सुरवात झाली?
१९३९
- ऑक्सीटोसीन हॉर्मोनमुळे काय होते?
युटेरियन अंकुचन पावते.
- कोणते एन्झायम शुक्रजंतू मध्ये असते कि ज्यामुळे शुक्रजंतू मादीचे बीजात प्रवेश करतो आमी त्यानंतर गाई गाभण राहते?
हाळूरोनिडस
- कालवड कशास म्हणतात?
गाईचे मादिवासरू
- शेळीचा आणि मेंढीचा विण्याचा कालावधी किती दिवसाचा असतो?
१५० दिवस
- वळू किंवा खोंड खच्ची केल्याननंतर त्यास काय म्हणतात?
बैल
- तिहेरी संकरीत गाय म्हणजे काय?
५०%होल्स्टन+२५%जर्सी+२५%गीर
- एन.डी.डी.बी. ची स्थापना केंव्हा करण्यात आली?
१९६५.
- शेतीकामासाठी उपयुक्त अशी माळवी जात कोणत्या भागात आढळते?
मध्य भारत
- सर्वसाधारणपणे संकरीत गाय किती महिन्यात गाभण राहेत?
१६ ते १८
- गोविकास प्रकल्पाचा अनुभव लक्षात घेता किती % विदेशी जनावरे फायदेशीर ठरतात?
६२.५०%
- भारतातील हवामानात कोणत्या जातीच्या वळू पासूनची भरवलेली गाय दुध अधिक देते आणि भारतीय हवामानात चांगला टिकाव धरते?
होलस्टन
- कोणत्या जातीच्या म्हैशीच्या दुध काढावयाचे वेळी लवकर पान्हा फुटतो?
पंढरपुरी
- पाश्चरायझेशन पद्धत सन १८९५ मध्ये कोणत्या शास्त्राज्ञाने शोधून काढली?
लुईस पाश्चर
- पाश्चरायझेशन मुळे काय घडते?
दुध आरोग्यास हानिकारक स्थितीत राहत नाही
- कोणत्या क्षेत्रात दुध व्यवसाय विकसित झाला?
सहकार
- भारताचा दुध उत्पादनात आता कितवा क्रंमाक?
पहिला
- ऑपरेशन फ्लड-१ मध्ये १९७० साली कशाची स्थापना गावोगावी करण्यात आली?
दुधाच्या सहकारी सोसायट्यांची स्थापना
- आनंद येथील सहकारी दुग्ध व्यवसायाचा पाया कोणी घातला?
डॉ. कुरियन
- अगमार्क अक्ट केव्हा संमत करण्यात आला?
१९३७
- रंगीत दुधास काय म्हणतात?
टोन्ड मिल्क
- दुधाचे भावावर कोणता घटक परिणाम करतो?
स्निग्धांश
- दुधाची डिग्री तपासण्यासाठी काय वापरतात?
लक्टोमीटर
- पाश्चरायाझेशन न केल्यास किती तासात दुधात असिडीटी डेव्हलप होते?
६
- चिलिंग सेंटर मध्ये तापमान किती असते?
१० अंश सें.
- दुधाची पावडर करावयाची झाल्यास किती डिग्री तापमानात नोझल द्वारे व्हक्युमरूम मध्ये ड्रईग साठी ठेवावे लागते?
११० अंश सें
- शेळी साठी बमनिन किंवा फिनोव्हीस या जंत =नाशकांच्या वापर…..कृमी नष्ट करण्यासाठी करतात.
गोलकृमी
- शेळीच्या दुधात स्निग्धांशाचे प्रमाण ३ ते ४ % असते त्यामुळे ते पचावयास…..असते.
हलके
- महाराष्ट्रात….जिल्ह्यात शेळ्या जास्त आहेत.
अहमदनगर
- शेळ्या मेंढ्याना होणारे टेपवर्म नावाचे जंत…..औषध वापरणे कमी करता येतात
निकोटीन कॉपर सल्फेट
- भारतीय वातावरणात……हि विदेशी गाय वापरणे जास्त फायदेशीर ठरते.
जर्सी
- शेळ्यांसाठी ग्रामीण कृषी संस्था……येथे असून या ठिकाणी सानेन जातीच्या शेळ्यांची पैदास केली जाते.
नारायणगाव
- महाराष्ट्रात आढळणारी……या जातीची शेळी मांसासाठी व तदवतच दुधासाठी हि उपयुक्त गणली जाते
उस्मानाबादी
- पशुधन खाद्यापैकी…….हे प्रथिनांचे प्रमाण अधिक असलेले खाद्य होय.
भुईमुग पेंड
- निवड पद्धती नुसार सुधारित अशा उस्मानाबादी शेळीच्या प्रजातीस……हे नाव देण्यात आले आहे.
फुले उन्नती
- शेळ्यांना…. हवामान चांगले मानवते.
उष्ण व कोरडे
- …..हि परदेशी शेळी मिल्क क्कीन म्हणून ओळखली जाते.
सानेन
- मेंढ्यांच्या संख्येत जगात भारताचा……क्रंमाक लागतो.
६ वा
- मेंढ्याची……..हि जात मुळची स्पेनची सध्या ती ओस्ट्रेलियाट आढळते व तिची लोकर मऊ असते.
मेरीनो
- महाराष्ट्रात एका मेंढी पासून सरासरी किती लोकर मिळते?
अर्धा ते १ किलो
- …….झाडाचा पाला अधिक प्रमाणात चारल्यास मेंढीवर त्याचे दुष्परिणाम होऊन त्यांचे केस गळतात
सुबाभळ
- पशूंचा वंश सुधारण्यासाठी…….पैदाशीच्या पद्धती वापरतात.
निवड पद्धत, बाह्यपद्धत, संकरपद्धत, गर्भ रोपन
- पशुसंवर्धन खाते सर्व प्रथम कोणत्या प्रांताकरता सुरु करण्यात आले होते?
मुंबई
- पशुधनाच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रंमाक लागतो?
पहिला
- जगाच्या एकूण जनावरांच्या किती जनावरे भारतात आहेत?
१/५ (१९.२)
- शेतीच्या एकूण उत्पन्नातील मिळणाऱ्या उत्पन्नात जनावरांचा हिस्सा किती % आहे?
२६%
- भारतातील किती % जमीन पावसच्या पाण्यावर अवलंबून आहे?
७०%
- देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक पशुधन एकवटलेले आहे?
मध्यप्रदेश
- ऑपरेशन फ्लड हा शब्द प्रयोग कोणत्या बाबींशी संबंधित आहे?
दुध उत्पादन
- पशुधनाची घनता म्हणजे काय?
दर १०० हेक्टर पिकांखालील क्षेत्रामध्ये जनावरांची संख्या
- प्रत्येक पिकाच्या एक्य्न उत्पन्नात जनावरांच्या श्रमाचा वाटा किती आहे?
८ ते ४२ %
- जनावरांचा उपयोग कशासाठी केला जातो?
शेतीच्या विविध कामासाठी, मांसासाठी, शेणखतासाठी,वाहतुकीसाठी, दुधासाठी, लोकर उत्पादन इ.
- देशी गाई पासून सुधारित जनावरांची पैदास करण्याची वळू योजना केव्हा सुरु करण्यात आले?
१९३१-३२
- मार्गदर्शी ग्राम योजना केंव्हा सुरु करण्यात आली?
१९७१-७२
- पशुसंवर्धन एकात्मिक कार्यक्रम केंव्हा सुरु करण्यात आला?
१९७१-७२
- जगातील सर्वात मोठा दुग्धोत्पादन विकासाचा एकात्मिक कार्यक्रम कोणता?
धवल क्रांती
- दुध महापूर योजना केव्हा सुरु करण्यात आली?
१९७१
- १९७१ मध्ये राज्यात पहिला दुध भुकटी कारखाना…….येथे कार्यान्वित करण्यात आला.
मिरज
- माणसाच्या आहारामध्ये दररोज सुमारे किती ग्रॅम दुधाचा समावेश असावा?
२१० ग्रॅम
- महाराष्ट्रात दुग्धोत्पादन प्रामुख्याने कोणत्या जनावरांपासून मिळतो?
गाय व म्हैस
- गायीच्या सर्वात चांगल्या जाती……………..प्रदेशात आढळतात.
कमी पावसाच्या
- गायीच्या निकृष्ट जाती ……………प्रदेशात आढळतात.
जास्त पावसाच्या
- दुधासाठी गायींच्या कोणत्या जाती प्रसिद्ध आहेत?
लालसिंधी, सहिवाल, गीर
- ओढकामासाठी गायीच्या कोणत्या जाती प्रसिद्ध आहेत?
खिल्लार, डांगी, गवळाऊ
- ओढ कामासाठी व दुधासाठी वापरल्या जाणाऱ्या गायींच्या जाती कोणत्या?
क्रॉंक्रेज, देवणी, हरियाणी
- गायीच्या कोणत्या विदेशी जाती प्रसिद्ध आहेत?
जर्सी, होल्स्टीन, फ्रिजीयन, ब्राऊन स्वीस, रेड, डानिश
- सर्वात जास्त अंडी देणारी कोंबड्यांची जात कोणती?
व्हाईट लेग हॉर्न
- झुंजीसाठी कोंबड्यांची कोणती जात प्रसिद्ध आहे?
ब्रम्हा
- १ दिवस ते ८ आठवडे दरम्यान कोंबड्याना कोणते खाद्य दिले जाते?
चिक मश
- ८ आठवडे ते २० आठवडे दरम्यानच्या कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्यास काय म्हणतात?
ग्रोअर मश
- २० ते ७२ आठवडे दरम्यानच्या कोंबड्याना कोणते खाद्य दिले जाते?
लेअर मश
- दुध महापूर योजनेचा पहिला टप्पा केव्हा पूर्ण करण्यात आला?
१९७८
- दुध महापूर योजनेचा दुसरा टप्पा केंव्हा पूर्ण करण्यात आला?
१९८५
- दुध महापूर योजनेचा तिसरा टप्पा केव्हा पूर्ण करण्यात आला?
१९९६
- दुध काढण्याचा कालवधी जर जास्त असेल तर दुध स्निग्धांश प्रमाण……..असते.
कमी
- दुधाचे पदार्थ प्रमाण बद्ध असण्याकरिता कोणते प्रमाणपत्र देण्यात येते?
अगमार्क
- वराह पालनात कोणत्या देशाचा जगात प्रथम क्रंमाक लागतो?
चीन
- गुरामध्ये कशाचे ज्ञान फार तीव्र असते?
वासाचे
- कोणत्या जातीचे बैल मंद असतात?
सहिवाल
- गरिबांची गाय म्हणून कोणत्या प्राण्यास ओळखले जाते?
शेळी
- दुभत्या जनावरांच्या हिरव्या चार्यास पर्याय म्हणून कोणता चारा दिला जातो?
मुरघास.