महाराष्ट्रातील जिल्हे – परभणी

१६. परभणी

क्षेत्रफळ : ६,५१७.

मुख्यालय : परभणी.

लोकसंख्या : १८,३५,९८२.

साक्षरता : ७५.२२%

हवामान : उष्ण व कोरडे.

तापमान : हिवाळयात ८ अंश ते १० अंश पर्यत उन्हाळ्यात ४० अंश ते ४५ अंश पर्यत.

पर्यज्यमान : ७४९.मि.मी.

पर्वत : बालाघाट, जिंतुरचे डोंगर, अजिंठ्याच्या डोंगरगंगा.

प्रशासकिय विभाग : औरंगाबाद ( मराठवाडा ).

नद्या : गोदावरी, पुर्णा, वैनगंगा, इंद्रायणी, कयाधु, मासळी, वाण, दुधना.

शेजारी जिल्हे : हिंगोली, बीड, नांदेड, जालना.

तालुके : परभणी, जिंतूर मानवत, पाथरी, शेलू, गंगाखेड, पालम, पुर्णा, सोनपेठ.

पिके : कापुस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, भुईमुग, करडई, गहू.

लेण्या : जिंतूर येथील डोंगरातील जैन लेणी.

धार्मिक ठिकाणे : मुदगलेश्वर मंदीर, नृसिंह मंदीर, संत जनाबाई समाधी, बालाजी मंदीर, तुराबुल हक दर्गा, सय्यद शहादर्गा.

ऐतिहासिक ठिकाणे : परभणी, जितुर.

महानगपालिका : परभणी शहर महानगर पालिका.

नगरपालिका : जितुर, गंगाखेड, पुर्णा, मानवत, पाथरी, सेलू, सोनपेठ.

पंचायत समित्या : प्रत्येक तालुक्याला एक एकूण ९.

लोकसभा मतदार संघ : परभणी.

विधानसभा मतदार संघ : पाथरी, परभणी, गंगाखेड, जितुर.

साखर कारखाने : ०३.

गावे : ८५१.

रेल्वे स्थानके : परभणी, सेलू, पुर्णा.

औदोगिक ठिकाणे : परभणी.

टोपण नावे : २६ वे महानगर, ज्वारीचे कोठार.

विदयापीठ : मराठवाडा कृषी विदयापीठ परभणी.

वनविषयक : जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र फारच कमी असुन ३७,७०० हेक्टर्स एवढे आहे. येथील वनामध्ये पळस, साग, केन, धावडा, बाभुळ, खैर, बोरे ही झाडे आढळुन येतात. तसेच जंगलामध्ये मोर विविध पक्षी, रानडुक्कर, माकडे, ससे, हरणे, रानकुत्रे, रानकोंबड आढळुन येतात.

शेतीविषयक : परभणी जिल्ह्यातील जमीन सुपीक असुन पाऊस मात्र कमी आहे. जिल्ह्या खरीप व रब्बी दोन्ही पिके घेतली जातात. पावसाच्या पाण्यावर कापुस, ज्वारी, सोयाबीन, मका, तुर, तीळ ही पिके घेतली जातात तर हिवाळ्यात गहू, हरभरा, करडई, सुर्यफुल ही पिके घेतली जातात. गोदावरी नदी काठी असलेल्या सुपीक खोऱ्यामध्ये ऊस, संत्री, मोसंबी, भाजीपाल्याची शेती आढळते.

जिल्ह्यातील प्रमुख शहरे व ठिकाणे :

परभणी : जिल्हयाचे मुख्यालय असुन राज्यातील २६ वी महानगरपालिका आहे. परभणी शहरात मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कार्यालय, सुत गिरण्या, शिवाजी उद्यान, रेल्वे जंक्शन, दुरदर्शन केंद्र, आकाशवाणी केंद्र, तुराबुल हक दर्गा आहे.

जिंतूर : जिल्ह्यातील एक महत्वाचा तालुका म्हणुन जिंतुरला ओळखले जाते. प्राचीन काळी जैनपूर हे जिंतुरचे नाव होते असे म्हटले जाते. जिंतुरला लागून डोंगरात सहा लेण्या आहेत.

गंगाखेड : हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असुन परभणीची दक्षिण काशी म्हणुन ओळखले जाते.गंगाखेड येथे मदगलेश्वर मंदीर, बालाजी मंदीर व संत जनाबाईची समाधी आहे.

पाथरी : हे तालुक्याचे ठिकाण असुन महाराष्ट्राचे प्रसिद्ध दैवत शिर्डीचे साईबाबा यांचे हे जन्मगाव आहे. भुसारी हे त्याचे आडनाव होते.

चारठाणा : शायना नदीवर बसलेल्या या गावात दगडी झुलता मनोरा व प्राचीन महादेव मंदीर आहे. जिल्ह्यातील हे पर्यटन क्षेत्र आहे.

पोखर्णी : परभणी येथुन जवळच पोखर्णी गाव असुन नृसिंहाच्या मंदिरासाठी हे गाव ओळखले जाते.

जांभूळबेट : पालम तालुक्यातील जांभूळबेट हे ठिकाण मोरासाठी प्रसिद्ध आहे हे एक प्रेक्षणीय व निसर्गरम्य ठिकाण आहे.

पुर्णा : हे तालुक्याचे ठिकाण असुन जिल्ह्यातील मुख्य रेल्वे जंक्शन आहे. तसेच या ठिकाणी गोदावरी व पुर्णा नदीचा संगम झालेला आहे.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *