महाराष्ट्रातील जिल्हे – नाशिक

८. नाशिक

क्षेत्रफळ: १५५३०. चौ. कि.मी.

मुख्यालय : नाशिक.

साक्षरता : ८०.९६%

लोकसंख्या : ६१.०९.०५२.

हवामान : उष्ण, कोरडे व थंड काही भागात दमट.

तापमान : हिवाळयात ३ अंश से १० अंश से. उन्हळ्यात ३५ अंश से ४२ अंश से पर्यत.

पर्जन्यमान : १०४. मि.मि.

थंड हवेचे ठिकाण : त्र्यंबकेश्वर.

पर्वत : सहयाद्री, वनी.

प्रशासकीय विभाग : उत्तर महाराष्ट्र, नाशिक.

नद्या : गोदावरी, गिरणी, कादवा, मोसम, दारणा, बाणगंगा, पांझण, आराम, माण, नार, चीदी, वैतरणा, दमणगंगा, बाल, पाकी, इंदुघोल.

तालुके : मालेगाव, बागलाण, कळवण, चांदवड, नांदगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, येवला, सिन्नर, देवळा, नाशिक, पेठ, दिंडरी, निफाड.

शेजारी जिल्हे : जळगाव, धुळे, औरंगाबाद, ठाणे, नगर, गुजरात राज्य.

धार्मिक ठिकाणे : सप्तशृंगीदेवी मंदीर, त्र्यंबकेश्वर, कपालेश्वर मंदीर, पंचवटी, सिताकुंड, तपोवन, नारोशंकर मंदीर, रामशेजकील्ला.

टोपन नावे : मुंबईची परीसबाग, द्राक्षाचा जिल्ह्या, क्रांतीकाराकाचा जिल्ह्या.

ऐतिहासिक ठिकाणे : येवला, सिन्नर, मालेगाव, इगतपुरी, भगुर.

विदयापीठ : महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ-नाशिक, यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठ-नाशिक.

औद्यागिक क्षेत्र : नाशिक, सिन्नर, सातपुर, रावळगाव, मालेगाव, एकलहरे, अंबड.

पिके : द्राक्ष, बाजरी, कांदा, उस, कापुस. भात, पेरू, भाजीपाला.

विमानतळ : नाशिक.

पंचायत समित्या : एकूण १५.

महानगरपालिका : नाशिक, मालेगाव.

नगरपालिका : सिन्नर, मनमाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, येवला, पेठ, निफाड.

ग्रामपंचायती : १,३७३.

किल्ले : सोनगड, भरतगड, रतनगड, बितनगड, प्रतापगड, हातगड, बासगड, पिसोलगड, त्र्यंबकगंड, खंगड, भोरगड, धरगड, हरगड, भास्कारगड, बळवंतगड, रामसेज, सल्हेर, मोरा, ललिग, इंद्राई, कणेरा, कांचनगड, चांदवड,माणिकपुंज, त्रिंगलवाडी, माकांडा, कंक्रळा, अरिवंत, अंजनेरी, चौलेर, अचला, आड, अंकोई, औंढा, कोलधर, गाळणा, टंकाई, घोडप, बहुला, मुल्हेर, सालोटा, राजधोर, वागेरा, खळ्या, मालेगाव, देरमाल, जावल्या.

वनक्षेत्र : नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबक या तालुक्यामध्ये वनक्षेत्र बऱ्याच प्रमाणात आढळून येतात. येथील वनामध्ये बाबु, साग, शिवस, फळस, कडुलिंब, बोरे, जांभुळ, करवंदे यांची झाडे आढळतात. नाशिक जिल्ह्यातील वनात वाघ, चित्ते, अस्वल, माकडे, कपीमाकडे, ससे, रानडूक्करे, रानकुत्रे, कोल्हे, तरस, मोर, पोपट,कोकीळ, मैना, पारवे, कबुतरे, खंड्या, चिमण्या, साळुंखी हे पशु-पक्षी आढळतात.

शेती : नाशिक जिल्ह्या हा कृषिप्रधान जिल्ह्या म्हणुन ओळखले जाते. जिल्ह्यात द्राक्षाची, कांद्याची सर्वाधिक शेती केली जाते. याशिवाय बाजरी, कापुस, ज्वारी, व सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या ह्या जिल्ह्यातील शेतीमध्ये घेतल्या जातात. नाशिक जिल्ह्यात मुंबईची परीसबाग म्हणुन ओळखले जाते. रोज २०० पेक्षा जास्त ट्रक मुंबई, वाशीच्या भाजीपाला मार्केट मध्ये भाजीपाला घेऊन येतात.

प्रेक्षणीय स्थळे व प्रमुख शहरे :

गंगापुर : जगातील सर्वात मोठे मातीचे धरण जिल्ह्यातील गंगापुर या गावी आहे. धरणाची उंची ४४.२७ मी. एवढी असून ३८१० मी. लांबी आहे. धरणाला ९ दरवाजे आहेत. पाणी साठ्याचे क्षेत्रफळ २२.८६. वर्ग कि.मी एवढे आहे.

चांदवड : चांदवड हे रेणुका देवी मंदिरासाठी परिचित आहे. येथील रंग-महाल व इंद्रायणी किल्ला पाहण्यासारखा आहे. चांदवड येथे शनी मंदिर, चंदेश्वर मंदिर हि धार्मिक स्थाने आहे.

भगुर : भगुर हे स्वातंत्र्यवीर वी.दा. सावरकर यांचे जन्मगाव आहे.

रावळगाव : हे औद्योगिक क्षेत्रात प्रगत असलेले गाव असून येथे खाजगी क्षेत्रातील साखर कारखाना तसेच चॉकलेट उद्योग आहेत.

इगतपुरी : मुंबई-मनमाड रेल्वे मार्गावरील इगतपुरी हे महत्वाचे रेल्वे स्थानक असून येथे निलगिरीच्या खोडापासून कागद बनविण्याचा कारखाना आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस इगतपुरी येथे पडतो. पावसाळ्यात येथील डोंगरातून वाहणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. तालुक्यामध्ये वैतरणा, भावली हे धरणे असून कावनई किल्ला, त्रीगंल किल्ला आहे. इगतपुरी हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी मुंबई-कोलकत्ता मार्गावरील रेल्वे स्थानक आहे. लोहमार्गावर घाट असल्यामुळे सर्व रेल्वे गाड्यांना या स्थानकावर पूरक रेल्वे इंजिन जोडले जाते.

सिन्नर : हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी जिल्ह्यातील मोठी औद्योगिक वसाहत आहे. सिन्नर हे नाशिक जिल्ह्यातील एक प्रमुख शारापैकी एक शहर आहे. सिन्नर या ठिकाणी पार्वती मंदिर, सूर्य मंदिर, गणपती मंदिर, विष्णू मंदिर व गोदेश्वर मंदिर हि एकाच जागी आहेत. या मंदिरांना शैव पंचायतन पद्धतीने मंदिरे म्हणून ओळखले जाते.

त्र्यंबकेश्वर : भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर ब्रह्मगीरी या  डोंगराच्या पायथ्याशी असून मंदिराच्या जवळच कुशावर्त नानाय कुंड आहे. या कुंडात स्थान करून मंदिरात गेल्याने मनातील इच्छा पूर्ण होऊन पापे नष्ट होतात असे मानले जाते. त्र्यंबकेश्वर हे एक निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाण सुद्धा आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यात खूप गर्दी असते.

त्र्यंबक : हे तालुक्याचे ठिकाण असून नाशिक शहरापासून हे ठिकाण अगदी जवळच आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वरांचे वडील बंधू निवृतीनाथ यांची समाधी आहे. नानासाहेब पेशवे यांनी बांधलेले महादेवाचे मंदिर सुध्दा या ठिकाणी आहे या मंदिरावर पाच सुवर्ण कलश असून मंदिराची ध्वजा पंचधातूची आहे. दर १२ वर्षांनी या ठिकाणी महाराष्ट्रातील एकमेव सिंहस्थ कुंभमेळा भरतो.

वनी : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्ती पिठापैकी सप्तशृंगी देवी हे धार्मिक ठिकाण वनी या ठिकाणी आहे. येथील सप्तश्रुंग गडावर देवीचे मंदिर असून देवीचे लाखो भक्त या गडावर येऊन देवीचे दर्शन घेतात. दरवषी याठिकाणी देवीची यात्रा भरते.

येवला : हे तालुक्याचे ठिकाण असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी याचं ठिकाणी धर्मातराचा निर्णय घेतला होता. भारतीय संस्कृतीच्या पोषाखाचे हे माहेर घरच आहे. या ठिकाणी रेशमी साड्या, पितांबरी, गर्द रेशमी लुगडे, नववारी संहावारी, रुबाबदार पूरष्री बरत्रे हे या ठिकाणाचे प्रसिध्द उद्योग आहेत.

मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे एक तालुका असून महानगर सुद्धा आहे. नाशिक जिल्ह्यामधील हे दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. याठिकाणी यंत्र माग, कापडगिरण्या, बाजारपेठा, औद्योगिक वसाहत मोठे मोठ्या मशिदी आहे. मालेगाव या शहरात जवळपास ८० % जनता हि मुस्लीम बांधवांची आहे. हे शहराचे विशेष आहे. २०% जनता हि हिंदू, जैन, बौध्द, सीख यात विभागली आहे. मालेगाव या ठिकाणी एक भुईकोट किल्ला सुद्धा आहे. तसेच येथून जवळच रावळगाव हे उद्योगाचे एक ठिकाण आहे. याठिकाणी लालचंद उधोग समूहाचा खाजगी कारखाना व चॉकलेट कारखाना आहे.

नाशिक : हे जिल्ह्याचे ठिकाण असून महाराष्ट्रातील एक महानगर आहे. तसेच नाशिक हे उत्तर महाराष्ट्र प्रशासकीय विभागाचे मुख्य ठिकाण आहे. संपूर्ण शहर सह्याद्रीचा पठारावर बसलेले असल्यामुळे या ठिकाणीची हवा हि आरोग्यासाठी उत्तम असते. पूर्वी या शहराचे नाशिका हे नाव होते.

                   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला होता. त्यानंतर दलितांनी या मंदिरात बाबासाहेब आंबेडकरांना बरोबर प्रवेश केला. ते काळाराम मंदिर नाशिकचे एक धार्मिक ठिकाण आहे. याशिवाय नाशिक येते पंचवटी सिताकुंड, तपोवन नारी शंकर कपालेस्वर मंदिर, जैन मंदिर, गणपती मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, दत्तमंदिर हे सुद्धा नाशिक शहरात आहे, तसेच मुंबई कोलकत्ता, मुंबई नागपूर, मुंबई पुणे या लोहमार्गावरील नाशिक हे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे व विमानतळ आहे. येथून जवळच देवलाली या ठिकाणी लष्करी छावणी असून रेल्वे स्थानक आहे. नाशिक येते सातपूर व अंबड या ठिकाणी औद्योगिक वसाहत आहे. तसेच भारत सरकार चलनी नोटांची मोठी प्रेस व नाण्यांची टाकसाळ येथे आहे. याशिवाय सरकारी पासपोर्ट, पोस्टपत्रे, किसान विकास पत्रे, पोस्ट तिकिटे सुद्धा याच ठिकाणी छापली जातात तसेच येथे मिग विमानांचा कारखाना आहे.

    नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण २८ छोटे मोठे शिवकालीन किल्ले आहेत. नाशिक जिल्ह्याने स्वा.वि.दा. सावरकर, नाटककार अनंत कन्हेरे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, वी.वा. शिरवाडकर या महान विभूतीना जन्म दिला असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ हे नाशिक जिल्हायचे व्यक्तिमत्व आहे.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *