महाराष्ट्रातील जिल्हे – नागपुर

७. नागपुर

क्षेत्रफळ : ९,८०२ चौ. कि.मी.

मुख्यालय : नागपुर.

साक्षरता : ८९.५२%.

लोकसंख्या : ४६,५३,१७१.

हवामान : विषम व कोरडे.

तापमान : हिवाळयात ३ अंश से १० अंश पर्यत उन्हाळ्यात ४६ अंश से पेक्षा जास्त.

पर्जन्यमान : १,२४७ मि.मी. पर्यत.

प्रशासकीय विभाग : विदर्भ-नागपूर विभाग.

नद्या : कन्हान, कोलार, नाग, पेच, सांड, वैनगंगा.

तालुके : मौदा, कुही, हिंगणा, काटोल, कामटी, रामटेक, सावनेर, नागपूर, नरखेड, भिवापूर, पारशिवनी, कळमेश्वर.

शेजारी जिल्ह्ये : वर्धा, भंडारा, चंद्रपुर, अमरावती.

पिके : कापुस, सोयाबीन, ज्वारी, मुग, तुर.

फळे : संत्री, मोसंबी.

धार्मिक स्थळे :नृसिंहमंदिर, चैत्यश्वर मंदीर, हरीहारास्वामी मंदीर, चैत्यभूमी.

ऐतिहासिक ठिकाणे : काटोर, रामटेक, सावनेर.

लेणी : माठळलेणी.

टोपण नाव : संत्र्याचा जिल्ह्या.

महानगरपालिका : नागपुर शहर.

नगरपालिका : काटोल, रामटेक, हिंगणा, कळमेश्वर, भिवापुर, मौदा, कामठी.

पंचायत समित्या : प्रत्येक तालुक्याला १ एकूण १३.

लोकसभा मतदार संघ : नागपुर, रामटेक.

विधानसभा मतदार संघ : नागपुर, रामटेक, सावनेर, हिगडा, कुही, भिवापुर, कळमेश्वर, काटोल, कामठी, नरखेड.

विमानतळ : नागपुर.

रेल्वेस्थानक : नागपुर.

विद्यापीठ : पशु व मस्य विद्यापीठ, संत तुकडोजी महाराज विद्यापीठ.

औद्योगिक क्षेत्र : नागपुर, खापरखेडा.

वनक्षेत्र : नागपुर जिल्ह्यातील एकूण ३०% वनक्षेत्र आहे. वनामध्ये साग, बेहडा, बोरे, चिंच, बाभुळ, खैरा, ऐन, हिरडा तेंडु आजव, काटेरी झुडपे व करवंदीची झुडपे ही वनस्पती आढळतात. याशिवाय कुसळ व रोशा नावाचे गवत जंगलात भरपुर प्रमाणात आहे. वनामध्ये वाघ, चित्ते, माकडे, ससे, अस्वले, रानकुत्रे, वनगायी, हरणे, काळविट, कोल्हे, मोरे, चिमण्या, बगळे, तितरे, लाहुऱ्या, पारवे, पहाडी पोपट, घुबडे, खंड्या, साळुंखी इ. पशु-पक्षी आढळतात.

शेतीविषयक : नागपुर जिल्ह्या हा संत्र्यासाठी प्रसिद्ध असुन संत्रीचे विक्रमी उत्पादन जिल्ह्यात घेतले जाते. याशिवाय मोसंबी, पेरू, आंबे यांच्या बागा आहेत. तसेच ज्वारी, बाजरी, कापुस, सोयाबीन, तुर, तीळ, करडई, गहु, हरभरा ही पिके नागपुर जिल्ह्यात घेतली जात असुन भाजीपाला व मिरची पाण्याच्या भागात घेतली जातात.

नागपुर जिल्ह्यातील प्रमुख शहरे व ठिकाणे :

नागपुर : हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असुन महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे शहर आहे. प्रत्येक वर्षी महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुर येथे भरते. तसेच नागपुर शहर विदर्भातील सर्वात मोठे शहर असल्याने भविष्यात जर विदर्भ वेगळे राज्य झाल्यास नागपुरच या राज्याची राजधानी असेल. महाराष्ट्र शासनाने भव्य वस्तू संग्रहालय या शहरात आहे. तसेच शहरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ मुख्य कार्यालय, रमण विज्ञान केंद्र, राष्ट्रीय लिंबू वर्गीय फळे संशोधन केंद्र, महाराष्ट्र शासन खाण मंडळ, केंद्रीय कापुस संशोधन केंद्र, विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय, संत्री संशोधन केंद्र, संत्री मोसंबी बाजारपेठ, महानगपालिका, विमानतळ, रेल्वे जंक्शन, औद्यागिक वसाहत, मंदीरे आहेत.

                         डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ या दिवशी नागपुर याच ठिकाणी आपल्या असंख्य अनुयायीसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला व बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. हे इतिहासातील सर्वात मोठे धर्मांतर आहे. म्हणुन नागपुर हे दिक्षाभूमी म्हणून सुद्धा ओळखले जाते. तसेच बौद्ध धर्माची काशी म्हणुन नागपूरची ओळख आहे. दरवर्षी १४ ऑक्टोबर या दिवशी नागपुर येथे भारतातून लाखो बौद्ध भाविक येतात. नागपुर येथून जवळच अंबाझरी येथे भारताच्या संरक्षण विभागाच्या साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. नागपूर हे विदर्भातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर व जिल्ह्या आहे. येथे सालबर्डी नावाचा किल्ला आहे.

कामठी : हे तालुक्याचे ठिकाण असुन याठिकाणी सैनिक विद्यालय आहे. प्रसिद्ध ड्रग्रन पेलेस ही वास्तु येथे असुन बौध्द धर्माचे हे मंदिर आहे. कामठी या ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी असुन दगडी कोळशाच्या खाणीसाठी कामठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

सावनेर : राम गणेश गडकरी यांचे हे गाव असुन तालुक्याचे ठिकाण आहे.  या ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी आहेत.

भिवापुर : गुराचा बाजार व मिरची उत्पादनासाठी हे गाव प्रसिद्ध आहे.

मांढळ : उमरेड तालुक्यातील मांढळ हे गाव सातवाहनकालीन लेणीसाठी प्रसिद्ध आहे. येथील उत्खननात मंदीराचे अवशेष, ताम्रपट व अनेक मुर्त्या सापडल्या आहेत त्यामुळे हे गाव खुप प्रसिद्ध आहे.

कमळेश्वर : संत्री व मिरची यांची बाजारपेठ कमलेश्वर या ठिकाणी आहे.

अंभोरा : कन्हान, अंबा व वैनगंगा या नद्यांचा संगम अंभोरा या ठिकाणी झाला अह्हे, श्री हरिहर स्वामी व चैतन्यश्वाराचे सुंदर मंदिर गावात आहे.

खापरखेड : या ठिकाणी औष्णिक वीजनिर्मिती केंद्र आहे.

काटोल : हे तालुक्याचे ठिकाण असुन कुंतलनगर असेही या शहराला नाव आहे. येथे लिंबू संशोधन केंद्र व औद्यागिक वसाहत आहे.

रामटेक : हे एक तालुक्याचे ठिकाण असुन रामाच्या पावनस्पर्शाने पावन झालेले ठिकाण असल्याने व काही काळ रामचे वास्तव्य या ठिकाणी असल्याने या शहराला रामटेक म्हणुन ओळखले जाते. तसेच रामटेक या ठिकाणी कवी कालिदासांचे राष्ट्रीय स्मारक व कवी कुलुगुरू विद्यापीठ आहे. रामटेक या ठिकाणी भरपुर जागृत व प्राचीन मंदीरे असल्याने विदर्भाची पंढरी म्हणुन या शहरला ओळखला जाते.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *