महाराष्ट्रातील जिल्हे – नांदेड

५. नांदेड

क्षेत्रफळ : १०,५२८ चौ.कि.मी.

मुख्यालय : नांदेड.

साक्षरता : ७६.९४%

लोकसंख्या : ३३,५६,५५६.

हवामान : विषम वक कोरडे.

तापमान : १० अंश टे १३ अंश हिवाळयात ४० अंश ते 45 अंश से उन्हाळयात.

पर्वत : अजिंठ्याचे व सातमाळ्याचे पर्वत.

प्रशासकीय विभाग : औरंगाबाद ( मराठवाडा )

नद्या : गोदावरी, पेनगंगा, मन्याड, मांजरा, लेंडी, कयाधु.

तालुके : हिमालायनगर, किनवट, हदगाव, देंगलुर, मुदखेड, धर्माबाद, नायगाव, अर्धापुर, नांदेड, मुखेड, भोकर, कंधार, बिलोली, उमरी, माहुर, लोहा.

शेजारी जिल्ह्ये : लातुर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, आंध्रप्रदेश.

पिके : कापुस, सोयाबीन, तीळ, तुर, ज्वारी, सुर्यफुल, करडई, उस.

धार्मिक ठिकाणे : गुरु गोविंद सिंहमी समाधी ( शीख तीर्थक्षेत्र ) रेणुका देवी मंदीर, दत्त मंदीर, महादेव मंदीर.

ऐतिहासिक ठिकाणे : नांदेड, मालेगाव, कंधार, माहुर ( पांडवलेणी ).

महानगरपालिका : नांदेड-वाघळा.

प्रमुख नगरपालिका : मुखेड, हदगाव, किनवट, भोकट, हिमालायनगर, कंधार, बिलोली, लोहा.

टोपण नावे : संस्कृत कवीचा जिल्हा, शिख धर्मीयांची काशी.

पंचायत समित्या : तालुके तितक्या पंचायत समित्या एकूण १६.

विधान सभा मदार संघ : नांदेड, हिमालायनगर, किनवट, भोकर, लोहा, कंधार, उमरी, अर्धापुर, माहुर, देंगलुर, मुदखेड.

लोकसभा मतदार संघ : नांदेड.

वनविषयक : जिल्ह्यामध्ये ११.८४ चौ. कि.मी. इतके वनक्षेत्र असल्यामुळे जिल्ह्यातील वनात भरपुर वनस्पती आढळून येतात. उदा. साग, बाबु, बोरे, बाभुळ, बेहडा, पळस, तेंदू, धावडा, तसेच येथील जंगलात कुसळ व रीशा नावाचे गवत भरपुर प्रमाणात आढळते. जिल्ह्यातील वनामध्ये वाघ, चित्ते, अस्वले, माकडे, हरणे, कळवीट, ससे, घोरपडी, रानकुत्रे, तरस, कोल्हे, लांडगे तसेच मोर, पोपट, साळुंखी, घारी, गिधाड, निरनिराळ्या चिमण्या, पारवे, लाहोरी, तितरे इ. पशुपक्षी आढळतात.

शेतीविषयक : नांदेड जिल्ह्यामध्ये कापसाची व सोयाबीनची शेती जास्त प्रमाणात दिसून येते, याशिवाय येथे उडीद, मुग, तुर, तीळ, घेवडा, भुईमुग, मका, ज्वारी,हिवाळयात करडई, सुर्यफुल, गहू, हरभरा, यांची पिके घेतली जातात. सिंचन व पाण्याच्या क्षेत्रामध्ये उस, भाजीपाला, संत्री, मोसंबीच्या बागा आहेत. येथील धान्य व कडधान्य यांच्या खरेदी विक्रीसाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याला धान्य मार्केट आहे. कापसाच्या विक्री साठी ठिकठिकाणी जिनिंग प्रेसिंग मील आहे.

नांदेड जिल्ह्यातील प्रमुख शहरे व ठिकाणे :

नांदेड : हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असुन मराठवाड्यातील औरंगाबाद नंतरचे दुसरे महानगर आहे. हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले असुन जिल्ह्या गोदावरी नदीमुळे भरपुर हरितक्रांती दिसून येते. शहरात स्वामी रामनंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठयाचे मुख्य कार्यालय, शीखाचे १० वे गुरु गोविंदसिंहजी यांची समाधी, औद्योगिक वसाहत कृषी उत्पन्न बाजार समिती, कापुस जिनिंग प्रेसिंग मील व सुत गिरणी, तेल गिरण्या आहेत. नांदेड हा माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व अशोक चव्हाण यांचा जिल्ह्या असुन जिल्ह्याने दोन पिता-पुत्र असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले आहेत. नांदेड येथून जवळच नेरळी या ठिकाणी कुष्ठरोग्यासाठी नंदनवन हे कृष्ण धाम आहे. नांदेड या जिल्ह्याला आंध्रप्रदेश राज्याची सीमा असल्याने अनेक आंध्रातील लोक या ठिकाणी राहतात. किनपट हे तालुक्याचे ठिकाण असुन पूर्णा-अदिलाहाबाद महामार्ग वरील एक शहर आहे. येथे किनपट हे अभयारण्य असुन जिल्ह्यातील हे पर्यटन केंद्र आहे. किनपट या शहरात बाजारपेठ तसेच अनेक पुरातन मंदिरे आहेत.

माहुर : हे तालुक्याचे ठिकाण असुन देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक देवीच्या मंदिरासाठी खुप प्रसिद्ध आहे. माहूर येथील गडावर रेणुका आईचे सुंदर मंदिर आहे. तसेच माहुर याच ठिकाणी दत्तचा जन्म झाला असावा असे मानले जाते. त्यामुळे येथील दत्त मंदिर हे सुद्धा माहूरचे खास देवस्थान मानले जाते. असंख्य भाविक भक्त या माहूरला भेट देतात. येथून जवळच डोंगरात पांडवलेण्या आहेत. लेणी मध्ये महादेवाची पिंड असुन या लेण्या राष्ट्र्कृट काळातील असाव्यात.

कंधार : हे तालुका ठिकाण असुन राष्ट्रकृट काळातील राजधानीचे शहर होते. कंधार जवळच सोमेश्वर या राष्ट्रकुट राजाच्या काळातील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. येथून जवळच मन्याड व वरवेटे नदीवर धारण आहे. तालुक्यात पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यान असुन हे प्रेक्षणीय ठिकाण म्हणुन ओळखले जाते.

लोहा : हे तालुक्याचे ठिकाण असुन येथील धान्य बाजार समिती आहे. लोहा येथून जवळच मालेगाव हे यात्रेसाठी मराठवाडयात प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा या ठिकणी भरते.

भोकर : हे तालुक्याचे ठिकाण असुन येथे कलावतीचा प्रसिद्ध महाल आहे. तसेच यादवकालीन महादेव मंदीर या ठिकाणी आहे. आषाढी व एकादशीला या ठिकाणी अनेक भाविक सर्व भेटी देतात. भोकर या तालुक्यात लमाणी ही जात भरपुर प्रमाणात आढळून येते. तसेच भोकर कापूस पिकासाठी खुपच प्रसिद्ध आहे. तालुक्यात ठिकठिकाणी जिनिंग प्रेसिंग मील आहेत.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *