महाराष्ट्रातील जिल्हे – नंदुरबार

६. नंदुरबार

क्षेत्रफळ : ५०३४ चौ.कि.मी.

मुख्यालय : नंदुरबार.

साक्षरता : ६३.०४%

लोकसंख्या : १६,४६,१७७.

हवामान : उष्ण व कोरडे.

तापमान : हिवाळयात २ अंश ते ८ अंश से. पर्यत उन्हाळयात ४० अंश से. 45 अंश से. पर्यत.

पर्जन्यमान : ७५.से.मी.

पर्वत : सातपुडा

नद्या : तापी, उकाई,रत्नावली, गोमती, नर्मदा, पाताळगंगा.

तालुके : सातपुडा, नंदुरबार, अक्कलकुवा, नावापुर, धडगाव, तळोदा, शहादा.

शेजारी जिल्ह्ये : नाशिक, धुळे, गुजरात, मध्यप्रदेशातील काही जिल्ह्ये.

प्रशासकीय विभाग : उत्तर महाराष्ट्र नाशिक विभाग.

पिके : कापुस, ज्वारी, बाजरी, उडीद, मुग.

धार्मिक ठिकाणे : प्रकाश, केदारेश्वर, संगमेश्वर, वाघेश्वरी मंदीर.

ऐतिहासिक ठिकाणे : नंदुरबार, नवापूर ( शिराशकुमार बालक्रांतीकारी ).

थंड हवेचे ठिकाण : तोरणमाळ.

नगरपालिका : नंदुरबार, नवापूर, कलोदा, शहादा, अक्कलकुवा.

पंचायत समित्या : एकूण ६.

लोकसभा मतदार संघ : नंदुरबार.

विधानसभा मतदार संघ : नंदुरबार, अक्कलकुवा, तळोदा, शहादा, नवापूर.

टोपण नावे : आदिवासीचा जिल्हा.

रेल्वे स्थानके : नंदुरबार.

औद्योगिक क्षेत्र : नंदुरबार, अकाल्कुवा, शहादा.

वनविषयक : नंदुरबार जिल्ह्यामध्ये १९८४ चौ कि.मी. वनक्षेत्र राखीव असुन जंगलात वाघ, कोल्हे, लांडगे, ससे, तरस, माकडे आढळतात. येथील आदिवासी ससे पकडण्यासाठी खुप काटक समजले जातात. त्यामुळे जंगलामध्ये सशांची शिकार मोठ्या प्रमाणत होते. मोर, पारवे, चिमण्या, सुतारपक्षी, कोकीळ, पोपट, सुद्धा जंगलामध्ये भरपुर प्रमाणात आढळतात. चंदन, मोह, साग, धावडा, पळस, खैर, या वनस्पती जंगलात आढळतात. औषधी वनस्पती साठी हे जंगल प्रसिद्ध तर आहेच शिवाय येथील आदिवासी जंगलातून मोह आणतात आणि त्या पासून दारू बनवतात, येथील रोपवासिकासाठी हे जंगल प्रसिद्ध आहे.

शेतीविषयक : नंदुरबार जिल्ह्यात पावरा ही आदिवासी जमात असुन शेती करण्यामध्ये ही जात खुप तरबेज आहे. तसेच श्रीमंत शेतकऱ्याचा शेतात काम करणारे शेतकरी सुद्धा नंदुरबार जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यामध्ये कापसाचे विक्रमी पिक घेतले जाते. याशिवाय ज्वारी, मका, बाजरी, तुर, तीळ, भुईमुग ही पिके नंदुरबार जिल्ह्यात घेतली जातील तसेच जळगाव नंतर केळीचे भरघोस उत्पादन नंदुरबार मध्ये होते.

प्रमुख शहरे व ठिकाणे :

नंदुरबार : १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्या वेगळा करण्यात आला. नंदुरबार हे ऐतिहासिक शहर असुन मोगलाची बाजारपेठ नंदुरबार शहरातच होती. बालक्रांतीवीर शिरीष कुमार नंदुरबार शहरातच जन्मला असुन या क्रांतीकारकारचे राष्ट्रीय स्मारक येथे आहे.शहरामध्ये अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. वाघेश्वरी मंदिर हे नंदुरबारचे प्रसिद्ध मंदिर आहे.

शहादा :हे तालुक्याचे ठिकाण असुन तालुक्यात प्रकाशा नावाचे एक गाव आहे. या गावात तापी व गोमती नद्यांचा संगम झाला आहे. प्रकाश गावातील केदारेश्वर व संगमेश्वर मंदिर आहे.

तोरणमाळ : हे सातपुडा पर्वत रांगामध्ये वसलेले एक गाव असुन प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. ब्रिटिशानीच या ठिकाणाला थंड हवेचे ठिकाण म्हणुन जास्त प्रसिद्धीस आणले. हे मोह घराण्याचा प्राचीन राज्याची राजधानी होती येथे फार मोठा नैसर्गिक तलाव आहे. निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणुन तोरणमाळ खानदेशातील प्रसिद्ध ठिकाण आहे.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *