२१. धुळे
क्षेत्रफळ : ८०६३ चौ.कि.मी.
मुख्यालय : धुळे शहर
साक्षरता : ७४.६१%
लोकसंख्या : २०,४८,७८१.
हवामान : उष्ण व कोरडे.
तापमान : हिवाळ्यात १३ अंश ते १५ अंश से तर उन्हाळ्यात ४० अंश ते 45 अंश से. पर्यत असते.
पर्वत : सातपुडा, सह्याद्रीच्या उपरांगा.
प्रशासकीय विभाग : उत्तर महाराष्ट्र, नाशिक.
किल्ले : लंकीमगीरीदुर्ग, सोनगीर, राजकोट, लंकी, कान.
नद्या : तापी, बुराई, अमरावती, अनेर, पांझरा, अरुणावती.
धार्मिक ठिकाणे : बालाजी मंदीर, शिरपुर, नागाईदेवी, साक्री, एकवीरादेवी, गोपालकृष्ण मंदीर, दोडाईचा
ऐतिहासिक ठिकाणे : साक्री, शिरपुर, धुळे, पिंपळनेर, दोंडाईचा.
औद्योगिक ठिकाणे : धुळे, साक्री, दोडाईचा, शिरपुर.
टोपण नावे : आदिवासीचा जिल्हा, अहिराणी भाषेचा जिल्हा.
पंचायत समित्या : प्रत्येक तालुक्याच्या १ एकूण ४.
विधानसभा मतदार संघ : धुळे, शिरपुर, साक्री, सिद्धखेड, दोंडाईचा.
लोकसभा मतदार संघ : धुळे.
महानगरपालिका : धुळे.
नगरपालिका : साक्री, शिरपुर, सिंधखेड, दोंडाईचा.
तालुके : धुळे, साक्री, शिरपुर, सिंधखेड, दोंडाईचा.
रेल्वे स्थानक : धुळे.
साखर कारखाना : शिंदखेड, भांडणे, ता. साक्री.
वनविषयक : धुळे जिल्ह्यात शिरपुर तालुक्यात वनाचे क्षेत्र आहेत. कडुलिंब, बाभूळ, खैरा, साग, बेहुडा, अंजन, शिसव, मोऊ, टेंभुर्णी, ह्या वनस्पती जंगलात आढळतात. जंगलात बहेडा,खैरा, बाभुळ यांच्यापासुन मिळालेला डिंक हा आदिवासी लोक जमा करून उदरनिर्वाह चालवतात. ससे, माकडे, रानकुत्रे, लांडगे, तरस, मोर, हरणे, हे प्राणी जंगलात आढळतात.
शेतीविषयक : धुळे जिल्ह्यातील शेती ९०% पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असल्यामुळे ज्वारी, बाजरी, कापुस, मका, ही येथील प्रमुख पिके आहेत. तसेच काही प्रमाणात मुग, करडई, भुईमुग, सुर्यफुल,सोयाबीन, तुर, तीळ ही सुद्धा पिके येथे घेतली जातात. सिंचनाच्या भागात केळी, द्राक्ष, भाजीपाल्याची पिके घेतली जातात.
प्रमुख शहरे व प्रेक्षणीय स्थळे :
शिरपुर : धुळे जिल्ह्यातील मुख्य तालुका असुन शिरपुर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. भाजीपाला व धान्याची मोठी बाजारपेठ शहरात आहे. पुरातन काळातील खंडेरावाचे जुने मंदीर येथे आहे तसेच बालाजीचे भव्य मंदीर आहे.
साक्री : साक्री तालुक्याचे ठिकाण असुन येथे नागाइदेवी मंदीर आहे. प्राचीन संस्कृतीचे अवशेष साक्री येथे आढळून आलेले आहेत.
दोंडाईचा : हे ठिकाण मिरचीसाठी खांदेशात प्रसिद्ध आहे. भरपुर प्रमाणात मिरचीचे उत्पादन येथे घेतले जाते व मिरचीची मोठी बाजारपेठ येथे आहे. येथील गोपाळकृष्ण मंदीर प्रसिद्ध आहे.
धुळे : हे जिल्ह्याचे मुख्यालय असुन महानगरपालिकेचे शहर आहे. पांझरनदी किनार्यावरील हे ऐहितासिक शहर आहे. येथील उत्खान्नात अश्मयुगीन अवशेष सापडलेले आहेत. यादव काळात येथे एकवीरा देवीची स्थापना करण्यात आली व देवीचे भव्य मंदीर येथे बांधण्यात आलेले आहे. तसेच तत्वज्ञान मंदीर व वाग्देवता मंदीर येथे आहे. अहिराणी ही धुळे शहरातील व जिल्ह्यातील भाषा खुपच मनोरंजक वाटते.मराठी विश्वकोश संस्थापक लक्ष्मणशास्त्री यांचा जन्म येथुन जवळच असलेल्या पिपंळनेर गावात आहे. तसेच प्रसिद्ध व्यंग चित्रकार रघुनाथ केळकर हे धुळे जिल्ह्यातीलच आहेत.
शिंदखेड : हे तालुका ठिकाण असुन सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. येथुन जवळच मुदावर या गावी पांझरा व तापी या नद्यांचा संगम आहे.जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाना येथे आहे. तसेच हा एक ऐतिहासिक प्रेक्षणीय तालुका आहे.