महाराष्ट्रातील जिल्हे – ठाणे

२९. ठाणे

क्षेत्रफळ : ९५५८ चौ.कि.मी.

मुख्यालय : ठाणे.

साक्षरता : ८०.६७%

लोकसंख्या : १,१०,५४,१३१.

हवामान : समुद्राजवळ आद्र, उर्वरित भागात कोरडे.

तापमान : हिवाळयात १० अंश ते १७ अंश पर्यत उन्हाळयात ४२ अंश से पर्यत.

पर्जन्यमान : २५० से.मी.

थंड हवेचे ठिकाण : सूर्यमाळ.

पर्वत : सहयाद्री.

प्र. विभाग : कोकण ( मुंबई विभाग )

नद्या : वैतरमा, उल्हास देहेरजा, पिंजळ, मुर्या, बार्वी, भातसा, काळू.

तालुके : अंबरनाथ, भिवंडी, जव्हार, ठाणे, डहाणू, मोरवाडा, पालघर, शहापूर, वर्स, वाडा, मुरबाड, उल्हासनगर, विक्रमगड, तलासरी, कल्याण (१५)

किल्ले : अर्नाळा, वसई, कामनदुर्ग, आगाशी, सिध्दगड, वजीरगड, मंगळगड, भोपटगड, काळदुर्ग, थेदवण, माहुली, बळवंतगड, बेलापूर, भवानगड, मनोर, गंभीर गड, कामनादुर्ग, बहिरूणड, दंडा किल्ला, कितल, वीरठाण, विसावागड, गोरखगड, माहीम, अशेरी, पाणबुरुज, गुमतारा.

बंदर : डहाणू, अर्नाळा.

शेजारी जिल्ह्ये : नाशिक, रायगड, नवी मुंबई, पुणे, नगर.

धार्मिक ठिकाण : टिटवाळयाचा गणपती, कोपिनेश्वर मंदीर, अंबेरश्वर मंदीर, वज्रेश्वरी डोंबिवलीचे ओमकारेश्वर मंदीर.

ऐतिहासिक ठिकाणे : शहाड, कल्याण, वसई.

औद्योगिक क्षेत्र : कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे तारापुर, शहाड, अंबरनाथ, आसनगाव.

टोपण नावे : मुंबईची तहान, महानगरांचा जिल्ह्या.

पिके : भात, नाचणी, भाजीपाला, भेंडी.

पंचायत समित्या : १३.

नगरपालिका : अंबरनाथ, बदलापूर, नवघर, पालघर, डहाणू, नालासोपारा, जव्हार.

ग्रामपंचायती : ९६०.

गावे : १७४८.

महानगरपालिका : ठाणे शहर, कल्याण-डोंबिवली, नवीमुंबई, भिवंडी, वसई-विरार, उल्हासनगर, मीरा भाईदर.

लोकसभा मतदार संघ : ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडी.

विधान सभा मतदार संघ : ठाणे, ऐरोली, मीराभाईदर, भिवंडी ग्रा., कल्याण पूर्व, ओवळा माजीवाडा, पालघर, बेलापुर, शहापुर, डोंबिवली, मुरबाड, भोईसर, अंबरनाथ, कल्याण ग्रा., कोपरी, वर्स, भिवंडी ( पूर्व ), विक्रमगड, उल्हासनगर, मुंब्रा-कळवा, डहाणू, नालासोपारा, कल्याण पश्चिम, भिवंडी पश्चिम.

वनविषयक : ठाणे जिल्ह्यात ४० % वनक्षेत्र असुन वनामध्ये साग, हिरडा, कळस, बांबू, कडुलिंब, आंब्याची झाडे, करवंद, आढळतात. जंगलामध्ये वाघ, बिबटे, ससे, रानकुत्रे, रानदुक्करे, माकडे, अस्वले तसेच मोर, चिमण्या, पारवे, कबुतरे, रवंडया, पोपट, कोकीळ, घुबड, सुतारपक्षी, साळुंखी, तितरे, रानकोंबड्या, दलदलीच्या भागात बगळे, पानाकोम्बड्या, बदके इ. पशु-पक्षी आहेत.

येऊर : सहलीसाठी प्रसिध्द्द आहे.

शेतीविषयक : शेती ही बहुधा पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असुन भात हे जिल्ह्यातील मुख्य पीक आहे. पाणी व पाटबंधारे असलेल्या भागात चिकूच्या बागा आहेत तसेच काही भागात भाजीपाला घेतला जातो. येथील भाजीपाला हा मुंबईसाठी वरदान समजला जातो.

जिल्ह्यातील मुख्य शहरे व ठिकाणे :

ठाणे : हे जिल्ह्याचे मुख्यालय असुन सर्वात लवकर शहरीकरण झालेले शहर आहे. तसेच भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या सुद्धा जिल्ह्यामध्ये आहे. औद्योगिक दृष्ट्या ठाणे शहर खूपच विकसित झालेले आहेच. पुर्वी हे एक बंदर होते. वाढती लोकसंख्या व खाडीच्या भरावामुळे हे एक मोठ शहर उदयास आले. ठाणे येथील कोपिनेश्वर मंदीर, शनी मंदीर, राम मंदीर, बालाजी मंदीर, खुप प्रसिध्द्द आहेत. तसेच येथील टाळ्याची खाडी ही विशेष आहे.

बोर्डी : डहाणुपासून जवळच असलेले बोर्डी हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. बऱ्याच सालापासून येथे अग्रीज्योत तेवत ठेवलेली आहे. येथील किल्ला हा खुपच प्रसिध्द्द असुन बोर्डी हे पर्यटक क्षेत्र म्हणुन प्रसिध्द्द आहे.

भिवंडी : हे तालुक्याचे ठिकाण असुन महानगपालिका आहे. भिवंडी गृह उद्योग, छोटे-मोठे उद्योगासाठी मुंबई उपनगरात प्रसिध्द्द आहे. औद्योगिकदृष्ट्या भिवंडी शहर दिवसेंदिवस प्रगत होत आहे. येथून जवळच वज्रेश्वरी हे गाव असुन येथे वज्रेश्वरी देवीचे मोठे मंदीर आहे. तसेच गावात गरम पाण्याचे झरे आहेत.

पालघर : हे तालुक्याचे ठिकाण असुन एस.टी. परिवहन महामंडळाचे विभागीय मुख्यालय आहे. भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तालुक्यातील तारापुर येथे आहे.

डहाणू : डहाणू हे तालुक्याचे मुख्यालय असुन येथील कोळी समाज खूपच परिचित आहे. येथील लोकांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय असुन मत्स्य व्यवसायासाठी येथे होड्या बनविल्या जातात.

शहापुर : जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणुन शहापुर तालुक्याला ओळखले जाते. शहापुर तालुक्यामध्ये तानसा, मोडकसागर, भातसा हे मोठे मोठे धरण आहेत या धरणामुळे संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा केला जातो.

कल्याण : हे रेल्वेचे जंक्शन असुन जिल्ह्यातील महत्वाचे शहर व तालुका आहे. कल्याण शहर खुप जुने असुन सुध्द्दा औद्योगिकदृष्ट्या व व्यापारीदृष्ट्या खूपच प्रगत झालेले आहे. कल्याणला मुंबईचे प्रवेशद्वार सुध्दा म्हटले जाते. अनेक केमिकल फारटीलायझर, सूतगिरण्या, कल्याण औद्योगिक वसाहत मध्ये आहे. तसेच छोटी मोठी खेळणी कल्याण मधील गृह उद्योग आहेत. कल्याण शहराला डोंबिवली, उल्हासनगर, सारखे शहरे भिडल्याने हे एक महानगर झाले. शहरात सर्व धर्माच्या देवदेवाची प्रार्थनास्थळे आहे. कल्याणपासून जवळच शहाड हे ठिकाण असुन येथील बिर्ला मंदीर पाहण्यासारखे आहे.

मुरबाड : मुरबाड तालुक्याचे ठिकाण असुन जिल्ह्यातील खुप मोठा तालुका आहे. जिल्ह्यात आदिवासी वस्ती जास्त प्रमाणात आहे.

जव्हार : जव्हार हे जिल्ह्यातील निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाण असुन तालुक्याचे ठिकाण सुध्दा आहे. तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांची संख्या जास्त प्रमाणात आढळून येते.

सातपाटी : हे गाव कोळी समाजाचे गाव म्हणुन ओळखले जाते. येथील प्रत्येक कोळी हा समुद्रात मासेमारीसाठी जात असतो. प्रत्येक कोळ्याकडे महागड्या बोटी असुन येथील कोळी जिल्ह्यात श्रीमंत समजले जातात.

अंबरनाथ : हे ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक शहर असुन येथे दारू गोळा, आगपेठ्या, घड्याळे, रसायने यांच्या कंपन्या आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठा असिड कारखाना अंबरनाथ येथेच आहे. अंबरनाथ येथून मुंबई सी.एस.टी. येथे लोकल रेल्वे असुन असंख्य प्रवासी लोकल रेल्वेचा प्रवासासाठी वापर करतात. अंबरेश्वर, शिवमंदिर हे येथील धार्मिक ठिकाणे असुन असंख्य भाविक या मंदिराला भेटी देतात.

मोखाडा : ठाणे जिल्ह्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण मोरवाडा तालुक्यात असुन सूर्यमाळ हे या ठिकाणे नाव आहे.

विरार : वसई तालुक्यातील विरार हे एक महानगर आहे. मुंबईपासून ते थेट विरार या स्टेशन पर्यत लोकल सेवा असल्यामुळे या मार्गावरील सर्व प्रवासी लोकल रेल्वेनेच प्रवास करतात. विरार हे शहर एकवीरा देवीसाठी प्रसिध्द्द असुन एकवीरा देवीचे मंदीर येथे आहे.

टिटवाळा : शहापुर तालुक्यातील टिटवाळा या गावाचा महागणपती खुप प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा आहे. असंख्य गणेश भक्त या देवस्थानाला भेट देतात. तसेच टिटवाळा हे लोकल रेव्लेच एक महत्वाचे स्थानक आहे. येथून टिटवाळा ते मुंबई सेंट्रल, कसारा टे मुंबई सेंट्रल लोकल सारख्या असतात. येथून जवळच आसनगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहत आहे.

उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील हे एक महानगर असुन तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक प्रकारचे छोटे-मोठे उद्योग असल्यामुळे उल्हासनगर शहराची लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे. शहरामध्ये शिव मंदीर, झुलेलाल मंदीर, चालीयासाहेब मंदीर, ही धार्मिक ठिकाणे आहेत.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *