महाराष्ट्रातील जिल्हे – जालना

१८. जालना

क्षेत्रफळ : ७,७१८ चौ.कि.मी

मुख्यालय : जालना.

साक्षरता : ७१.६१%.

लोकसंख्या : १९,५८,४८३.

हवामान : विषम कोरडे.

तापमान : १० अंश ते १२ अंश पर्यत उन्हाळ्यात ४२ अंश ते ४५ अंश से पर्यत.

पर्वत : अंजिठा.

प्रशासकिय विभाग : मराठवाडा, औरंगाबाद.

नद्या : गोदावरी, कल्याणी, जीवरेखा, पुर्णा, दुधना, कुंडलिका, गिरणा, जुई, खेळणा.

शेजारी जिल्हे : औरंगाबाद, जळगाव, बीड, परभणी, बुलढाणा.

पिके : कापुस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका.

तालुके : भोकरदन, बदनापुर, घनसावंगी, जालना, अंबड, मंठा, परतुर.

धार्मिक ठिकाणे : अबडचे खंडोबा मंदिर, गणपती मंदीर, चाकवत मंदीर,काकडाई मंदीर, मत्स्योदरी मंदीर.

ऐतिहासिक ठिकाणे : जाब, जालना, अंबड, असई, परतूर.

औद्योगिक ठिकाणे : जालना, भोकरदन, आष्टी.

नगरपालिका : जालना, अंबड, भोकरदन, परतुर, जाफारबाद.

पंचायत समित्या : प्रत्येक तालुक्याला एक एकूण ८ .

लोकसभा सदस्य : जालना.

विधानसभा मतदार संघ : जालना, भोकरदन, अंबड, बदनापुर, धनासावंगी, परतुर.

गावे : ९१५.

रेल्वे स्थानक : बदनापुर, जालना, परतुर, ( मुंबई-हैद्राबाद रेल्वे मार्ग ).

टोपण नावे : मराठवाड्याची बाजारपेठ.

वनविषयक : जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र खूपच कमी प्रमाणात आहे. तरी सुद्धा जिल्ह्यामध्ये साग, कडुलिंब, वड, पिंपळ, बेहडा, धावडा, सलई, टेभूर्णी, विभा, बाभुळ, तसेच करवंदाची झुडपे ह्या वनस्पती आढळतात. याशिवाय रोशा व कुसळ नावाचे गवत जंगलात भरपुर प्रमाणात आहे. तसेच जालना जिल्ह्यामध्ये वनामध्ये विविध प्रकारचे प्राणी व पक्षी आहेत.

शेतीविषयक : जालना हा कष्टकरी शेतकरी लोकांचा जिल्ह्या असल्यामुळे जिल्ह्यात बरीच पिके घेतली जातात. पावसाच्या पाण्यावर जिल्ह्यातील शेतकरी कापुस, ज्वारी, बाजरी, मका, तुर, सोयाबीन, तीळ, भुईमुग, मुग, उडीद, चवळा ही पिके घेतो. हिवाळा व उन्हाळ्यात येथील शेतकरी सुर्यफुल, करडई, गहु, हरभरा यांची शेती करतो. कालवा व विहीर असलेल्या ठिकाणी शेतामध्ये संत्री, मोसंबी, सिताफळे, चिकुच्या बागा व भाजी पाल्याची शेती केली जाते.

जालना जिल्ह्यातील प्रमुख शहरे व ठिकाणे :

जालना : हे जिल्ह्याचे ठिकाण असुन मराठवाड्यातील महत्वाचे शहर मानले जाते. मनमाड-कांचीकुडा रेल्वे मार्गावरील महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. जालना या शहरात छ. शिवाजी महाराजाचे चरण शहराच्या भुमीवर पडल्याचा उल्लेख इतिहासात आहे. जालना ही मराठवाड्याची प्रमुख बाजारपेठ मानली जाते. याठिकाणी गुळ, शेंगदाने, तुप, तेल, व मिटाचे मोठे मोठे व्यापारी असल्यामुळे संपुर्ण मराठवाड्याचे लहान व्यापारी ह्या बाजार पेठेत येत असतात. शहरामधूनच कुंडलिका नावाची नदी वाहते. शहरामध्ये नगरपरिषद कार्यालय, जि.प. कार्यालय आर.टी.ओ. कार्यालय, जिल्ह्या रुग्णालय, बस स्थानक व आगार, महत्वाची कार्यालये व मोती तलाव, मोतीबाग, आनंदस्वामी मठ, गणपती मंदीर, मारुती मंदीर, विठ्ठल मंदीर, व मुस्लीम मशिदी हे धार्मिक ठिकाणे आहेत. जालना जिल्ह्या हा महाराष्ट्रातील २८ वा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. १ मे १९८१ रोजी हा जिल्ह्या औरंगाबाद व परभणी मधुन जातो.

अंबड : अंबड हे तालुक्याचे ठिकाण असुन खंडोबा मंदीर येथे आहे. तालुक्यातील गोंदी येथे स्वामी रामानंद तिर्थ यांचा जन्म झाला. हैद्राबाद संस्थाना विरुद्ध लढा देणारे ते नेते होते. अंबड येथे मत्सोदरी देवीचे सुंदर मंदीर आहे. शहरात बाजारपेठ नगरपालिका असुन अंबड हे एक प्राचीन शहर आहे अंबड शहराचे प्राचीन नाव अंबर आहे. अंबर नावाच्या राजाने हे शहर वसवले असावे.

आसाई : हे इंग्रजकालीन गाव असुन येथे २३ सप्टेंबर १८०३ रोजी मराठे व इंग्रज यांच्यात जबरदस्त युद्ध झाले होते.

मठा : हेतालुक्याचे ठिकाण असुन येथील गुराचा बाजार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

जाब : समर्थ रामादास स्वामींचे जन्मस्थान म्हणुन जाब हे गाव परिचित आहे.

भोकरदन : हे तालुक्याचे ठिकाण असुन कापसाच्या गाठी बनविण्याच्या कंपन्या येथे आहेत. तसेच बी-बियाण्याच्या संशोधन केंद्र येथे आहे. भोकरदन येथुन जवळच एका डोंगरात बौद्ध लेणी आहे.

परतुर : हे तालुक्याचे ठिकाण असुन या ठिकाणी १९३७ साली महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन भरले होते.

राजुर : हे गणपती चे एक ठिकाण असुन संकष्टीला या ठिकाणी मोठी गर्दी असते.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *