महाराष्ट्रातील जिल्हे – जळगाव

१७. जळगाव

क्षेत्रफळ : ११,७६५ चौ.कि.मी.

मुख्यालय : जळगाव शहर.

लोकसंख्या : ४२,२४,४४२.

साक्षरता : ७९.७३%

हवामान : उष्ण हिवाळ्यात थंड.

तापमान : हिवाळ्यात १० अंश ते १५ अंश पर्यत उन्हाळ्यात ४२ अंश ते ४६ अंश से पर्यत.

पर्यज्यमान : ७४० मि.मी.

पर्वत : अंजिठा, सातपुडा.

प्रशासकिय विभाग : नाशिक उत्तर महाराष्ट्र ( खांदेश ).

नद्या : तापी, पुर्णा, पांझरा, भोकर, सुकी, मोर, गिरणा, गुळी, हडकी, वाघुर, अनेर.

शेजारी जिल्हे : नाशिक, धुळे,बुलढाणा, औरंगाबाद, जालना, मध्यप्रदेश.

तालुके : जळगाव, जामनेर, भुसावळ, चाळीसगाव, पारोळा, पाचोरा, भडगाव, बोदवड, मुक्ताईनगर, चोपडा, यावल, रावेर, ऐरडोल, धरणगाव, अमळनेर.

पिके : कापुस, ज्वारी, मका, उस, भुईमुग, बाजारी, तुर, तीळ, गहु, हरभरा.

फळे : केळी, सीताफळ, पेरू, मोसंबी, लिंबू.

धार्मिक ठिकाणे : उनपदेव, चांगदेव, पद्मालय, मुक्ताईनगर, सूनपदेव, भैरोबा मंदीर, दादावाडी, जैन मंदीर, ओंकारश्वर मंदीर, हरेश्वर मंदीर, गोविंद महाराज समाधी ( पिंपळगाव ).

ऐतिहासिक ठिकाणे : फैजपुर, अमळनेर, पारोळा, एरंडोल.

टोपण नावे : अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार, केळ्याचे कोठार, कापसाचे शेत.

थंड हवेचे ठिकाण : पाल ता. रावेर.

महानगरपालिका : जळगाव महानगरपालिका.

नगरपालिका : जामनेर, भुसावळ, सावदा, पैजपुर, जामनेर, चोपडा, यावळ, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, अमळनेर, पारोळा, रावेल.

पंचायत समित्या : प्रत्येक तालुक्यात एक एकूण पंधरा पंचायत समित्या.

लोकसभा मतदार संघ :जळगाव, रावेर.

विमानतळ : कुसुबा, जळगाव.

विधानसभा मतदार संघ : जळगाव शहर, जळगाव ग्रामिण, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा.

गावे : १४७५.

रेल्वे स्थानक : मुंबई-भुसावळ लोहमार्ग, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, बोदवड, रावेर, भुसावळ जंक्शन जामनेर ( मिटर गेज ).

विद्यापीठ : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव जि. जळगाव.

औद्योगिक क्षेत्र : जळगाव, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, वरणगाव.

साखर कारखाना : मधुकर सह. साखर कारखाना रावेर व चोपडा येथील साखर कारखाना.

भौगोलिक माहिती : जळगाव जिल्हा १९०६ मध्ये पूर्व खांदेश म्हणुन ओळखला जात असे. जळगावातील मेहरूणच्या तलावामुळे जळगाव हे जलग्राम झाले. आणि १९६० साली जळगाव हे नवीन नामकरण झाले. पुर्वी काही लोकांच्या म्हणण्यानुसार ऋषिक असे नाव होते. जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य आहे. दक्षिणेस औरंगाबाद हा मराठवाड्यातील जिल्ह्या आहे. पशिमेला नाशिक, धुळे, व नंदूरबार हे जिल्हे आहेत. तसेच आग्येय सीमेला जालना व बुलढाणा हे जिल्हे लागुन आहेत. सातामाल्याचे पर्वत व अजिंठ्याच्या डोंगररांगाची झालारच जिल्ह्याला आहे.

जंगलक्षेत्र ( वने ) : जळगाव जिल्ह्यात जामनेर, यावल, रावेर, चोपडा, पद्यालय या भागात प्रामुख्याने जंगले आहेत. १९८२ पासुन या भागात सामाजिक वनीकरणाची सुरुवात झालेली आहे. सध्या सामाजिक वनीकरणाखाली ६०० हे. वनक्षेत्र आहे. या जंगलामध्ये साग, खैर, बेहूडा,बीटे, बिबळा, बोंदरा, कळस, साल, बाभुळ, रोहीन, धावडा, काटेरी झुडपे, कुंसळ, नावाचे गवत व काही औषधी वनस्पती आढळून येतात. चित्ते, बिबटे, कोल्हे, तटस, रानडुकरे, लांडगे, हरणे, ससे, माकडे, इत्यादी वन्यप्राणी व मोर, चिमणी, घारी, कबुतरे, पारवे, घुबड, कोकीळ, साळखी, सुतारपक्षी, पोपट दलदलीच्या भागात पानकोंबड्या, बगळे जंगलामध्ये आढळुन येतात.

शेतीविषयक : जिल्ह्यामध्ये पाऊस पाणी जरी कमी असला तरी सुद्धा महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रकारची पिके येथे घेतली जातात. केळी हे येथील मुख्य पिक आहे. केळी या पिकामुळे जळगाव जिल्ह्याला केळीचे कोठार म्हटले जाते. याशिवाय कापुस, ज्वारी, बाजरी, तुर, तीळ, मका, उडीद, भुईमुग, मुग, चवळी, नाचणी, भात ही पिके जिल्ह्यात पावसाच्या पाण्यावर घेतली जातात. तर गहु, करडई, हरभरा ही पिके हिवाळा उन्हाळ्यात घेतली जातात. कापुस हे येथील शेतकर्यांचे पांढरे सोने म्हणुन प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात भरपुर प्रमाणात कापसाची शेती केली जाते. उस, पपई, आंबा, आवळा, तसेच अनेक प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या विक्रमी उत्पादन जिल्ह्यात घेतले जाते. मिरचीसाठी जिल्ह्यात अमळनेर, पछुर, पाळधी, पारोळा, भडगाव, रावेर ही गावे प्रसिद्ध आहे. येथे मिरचीचे भरपुर पिके घेतली जाते.

प्रमुख शहरे व प्रेक्षणीय स्थळे :

जळगाव : जळगाव हे खांदेशातील प्रमुख महानगर आहे. केळीचे कोठार म्हणुन जळगाव जिल्ह्या प्रसिद्ध तर आहेच याशिवाय जिल्ह्यात ठिकठीकाणी कापसाच्या जिनिंग प्रेसिंग मील व बाजारपेठा आहेत. देशी-विदेशी पर्यटकांना अंजिठा वेरूळ जगप्रसिद्ध लेण्या पहावयास झाल्यास जळगाववरून राजमार्ग काढला आहे. त्यामुळे जळगावला अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणुन सुद्धा ओळखले जाते. शहरात दूरदर्शन सह्यप्रक्षेपण केंद्र, आकाशवाणी, रेडीओ केंद्र, विमानतळ, भव्य बाजारपेठा मॉल यामुळे शहर अगदी नटुन-थटून दिसते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हे शहरापासून ८ कि.मी. बाभोरी येथे आहे. शहरात रेल्वेचे जंक्शन असुन सुरत, पुणे, मुंबई, हे लोहमार्ग आहेत. मुंबई, अहमदाबाद, सुरत, पुणे, नागपुर, खंडावा, कोलकत्ता, दिल्ली जाण्यासाठी हे स्थानक महत्वाचे मानले जाते. येथे मोठी औद्योगिक वसाहत असुन जैन पाईप, सुप्रीम व इतर ही छोटे मोठे उद्योग शहरातील MIDC मध्ये आहेत. येथुन जवळच अशिक्षित कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे आसोदा गाव आहे. अशाप्रकारे तापी, व गिरणा या दोन नद्यांच्या काठी असलेले हे शहर आहे. तसेच महाराष्ट्रातील काही निवडक महानगरापैकी एक महानगर आहे.

जामनेर : जळगाव जिल्ह्यातील एक मोठा तालुका म्हणुन जामनेरला ओळखले जाते. काग नदीवरील हे शहर शैक्षणिक दृष्ट्या खुपच प्रगत आहे. इंग्रजकालीन जामनेर पाचोराच्या रेल्वेचे जामनेर हे स्थानक आहे. जामनेर येथे वनस्पती तुपाचा कारखाना आहे. तसेच सेंद्रिय खतांचा कारखाना आहे. जामनेर तालुका धार्मिक तालुका म्हणुन ओळखला जातो. येथुन जवळच शेदुर्णी गावात प्राचीन मंदीरे आहेत. त्यात नेमिनाथ जैन मंदीर, भगवान महावीर मंदीर, शिवमंदिर व इतर अनेक प्राचीन मंदीरे आहेत. इतिहासातील शेदुर्णी, पहुर, पाळघी या गावांना खुप महत्व होते.

पाल : जळगाव जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणुन पाल हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. हे रावेर तालुक्यातील असुन सातपुडा पर्वतारांगा मध्ये बसलेले गाव आहे. इ.स.४ थ्या शतकातील अंभीरच्या काळात हे मह्वाचे ठिकाण मानले जाई तसेच मध्ययुगात हे एक व्यापारी केंद्र होते.

पद्यालय : एरंडोल तालुक्यातील पद्यालय हे प्रसिद्ध गणपतीचे ठिकाण आहे. महाभारतातील भिमस्पर्शाने पावन झालेले हे तिर्थ क्षेत्र आहे. येथे स्वयंभु गणपतीचे भव्य सुंदर मंदीर व तलाव आहे तसेच महाभारतातील महाकुंड आजही जशेच्या तसे आहे.

चोपडा : हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असुन या तालुक्यात आदिवासी पारधी लोकांची संख्या भरपुर आहे. तसेच चोपडा हे जळगाव जिल्ह्यातील प्रमुख शहरापैकी एक शहर असुन चोपडा तालुक्यात गरम पाण्याचे झरे आहेत तसेच नाझरदेव सुनपदेव उनपदेव यांची देवस्थाने सुद्धा चोपडा तालुक्यातच आहेत.

पाचोरा : हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असुन मुंबई-भुसावळ रेल्वे मार्गावरील छोटे जंक्शन आहे. तसेच पाचोरा येथे वनस्पती तुप व खताचा कारखाना आहे. पाचोंरा येथुन पिंपळगाव हरेश्वर याठिकाणी मंदीर व समर्थ गोविंद महाराज समाधी आहे. आषाढी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते.

चाळीसगाव : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हे तालुक्याचे ठिकाण असुन मुंबई-भुसावळ रेल्वे मार्गावरील महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. प्रसिद्ध गणितीज्ञ भास्कराचार्य यांनी लिलावती हा ग्रंथ याच टिकाणी लिहिला. चाळीसगाव येथुन जवळच पाटणादेवीचे सुंदर मंदीर आहे.

पारोळा  : हे एक तालुक्याचे ठिकाण असुन धुळे-जळगाव महामार्गावरील प्रमुख शहर आहे. शहरात एक प्राचीन किल्ला आहे. हा किल्ला झाशीच्या राणीच्या वडिलांचा होता. त्यामुळे राणी लक्ष्मीबाई चे जन्मगाव असावे.

चांगदेव : इ.स. १३२५ मध्ये चांगदेवांनी येथे समाधी घेतली आहे. पुर्णा व तापी या महाकाय नद्याच्या संगमावरील चांगदेव हे गाव असुन योगीराज चांगदेव यांचे तीर्थक्षेत्र म्हणुन परिचित आहे.

भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हा प्रमुख तालुक्यांपैकी एल तालुका असुन मोठे शहर आहे. भारतीय मध्य रेल्वेचे मोठे जंक्शन म्हणुन भुसावळ ला संपूर्ण भारतात ओळखले जाते येथे औष्णिक विद्युत केंद्र व औद्योगिक वसाहत आहे.

अमळनेर : जळगाव जिल्ह्यातील धार्मिक क्षेत्र म्हणुन अमळनेर प्रसिद्ध आहे. येथे राममंदीर, जैन मंदीर, विठ्ठल मंदिर, सखाराम बुवा समाधी तसेच पेशवेकालीन महादेव मंदीर व तीर्थकुंड आहे. खान्देशाचे भुषण म्हणुन संबोधले जार असलेले तत्वज्ञान मंदीर येथेच आहे. कापड गिरण्या, वनस्पती तुप, सेंद्रिय खताचे कारखाने येथे असुन भुसावळ सुरत रेल्वे मार्गावरील रेल्वे जंक्शन आहे.

वरणगाव : हे भुसावळ तालुक्यातील महत्वाचे गाव असुन येथे भारत सरकारच्या संरक्षण विभागाचा कारखाना आहे. वरणगाव फक्टरी नावाने हा कारखाना प्रसिद्ध आहे.

फैजपूर : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर या गावाला ऐतिहासिकदृष्ट्या खुप महत्व आहे. या गावी १९३६ साली ग्रामीण भागातील कॉग्रेसचे पहिले अधिवेशन भरले या अधिवेशनाचे अध्यक्ष भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू होते.

मुक्ताईनगर : संत ज्ञानेश्वराची बहिण मुक्ताबाई यांची समाधी व मंदीरासाठी मुक्ताईनगर ला तिर्थक्षेत्र म्हणुन ओळखले जाते. जळगाव जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणुन हे ठिकाण ओळखले जाते.

बोदवड : भारताच्या पहिल्या महीला राष्ट्रपती ह्या बोदवड तालुक्यातील नडगाव गावी जन्मल्या असुन त्यांचे सर्व लहानपणीचे शिक्षण येथेच झाले. लग्नानंतर त्या अमरावती येथे गेल्या.

यावल : जळगाव जिल्ह्यातील एक तालुका असुन यावल पासुन जवळच आडगाव या ठिकाणी मनुदेवीचे मंदीर आहे. खांदेशातील 50% लोकांचे हे कुलदैवत असल्यामुळे या देवस्थानावर खान्देशी लोकांची भरपुर श्रद्धा असुन  दरवर्षी येथे मोठा यात्रोत्सव असतो. मनुदेवी येथील परिसर शांत व निसर्गरम्य आहे. जवळच एक धबधबा असुन जळगाव जिल्ह्यातील पर्यटक या ठिकाणी आनंद  घेण्यासाठी येतात.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *