महाराष्ट्रातील जिल्हे – चंद्रपुर

२२. चंद्रपुर

क्षेत्रफळ : ११,४४३ चौ.कि.मी.

मुख्यालय : चंद्रपुर शहर.

साक्षरता : ८१.३५%

लोकसंख्या : २१,९४,१६२.

हवामान : कोरडे, आर्द्र, थंड.

पाऊस : १७८६ मि.लि.

तापमान : ३ अंश ते ५ अंश से. पर्यत जे जास्तीत जास्त ४८ अंश से. पर्यत.

पर्वत : अजिंठ्याचे व गाविलगडचे.

प्रशासकीय विभाग : विदभ-नागपुर विभाग.

नद्या : वैनगंगा, वर्धा, इराई, अंधारी, पैनगंगा.

शेजारी जिल्हे : गडचिरोली, भंडारा, नागपुर, यवतमाळ, वर्धा, आंध्र प्रदेशातील जिल्हे.

तालुके : बल्लापुर, गोंडपिंपरी, नागभिड, भद्रावती, चंद्रपुर, कोरवाना, सिंदपाही, ब्रम्हपुरी, मुल, जिवती,, सावली, पोभूर्णा, चिमुर, राजुरा, वरोरा.

रवानी ( खनिजे ) : कोळसा.

टोपण नावे : गोंड राजाचा जिल्ह्या, खाणींचा जिल्ह्या.

पिके : भात, कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी.

धार्मिक ठिकाणे : महाकाली मंदिर, जैनमंदिर.

ऐतिहासिक ठिकाणे : चंद्रपुर, बल्लापुर, गोंडपिंपरी, भद्रावती, ब्रम्हपुरी.

महानगरपालिका : चंद्रपुरशहर

पंचायत समित्या : १४.

विधानसभा मतदार संघ : चंद्रपुर, चिमुर.

लोकसभा मतदार संघ : चंद्रपुर.

टोपण नाव : गौंड राजाचा जिल्ह्या / खाणीचा जिल्ह्या.

औद्योगिक ठिकाणे : चंद्रपुर, बल्लापुर, मुल, चिमुर, सिदेवाही, नवरगाव, ब्रह्मपुरी, राजुरा, गोंडपिंपरी, भद्रावती, वरोडा.

वने : चंद्रपुर जिल्ह्यात एकूण ५४४३ चौ.कि.मी वनक्षेत्र आहे, येथील जंगलामध्ये साग, बांबू, टेंभुर्णी, तेंदूची पाने, मोह, आंबे, खैर, कडुलिंब, काटेरी झुडपे व औषधीयुक्त गवत हे वनात आढळते. येथील वनातुन भरपुर उत्पन्न मिळत असल्यामुळे हे वनक्षेत्र महाराष्ट्रातील महत्वाचे वनक्षेत्र म्हणुन ओळखले जाते. येथील वनामध्ये वाघ, चित्ते, सांबर, ससे, काळवीट, विविध प्रकारची माकडे, अस्वले, वनगायी आढळतात.याशिवाय मोर विविध पक्षी येथे आढळतात. चंद्रपुर जिल्ह्यातील जंगल हे महाराष्ट्रात महत्वाचे मानले जाते. म्हणुनच चंद्रपुर जिल्ह्यात वनविषयक अभ्यासासाठी महाविद्यालय आहे. तसेच ताडोबा राष्ट्रीय उद्यान येथे असल्यामुळे येथील वनाचा खुप विकास झालेला आहे.

शेतीविषयक : चंद्रपुर जिल्ह्यात भरपुर पाऊस असल्यामुळे येथे भात, कापुस, ज्वारी, बाजरी, संत्रीच्या बागाची शेती केली जाते. याशिवाय भाजीपाला सुद्धा येथे बर्यापैकी घेतला जातो.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *