· ऋग्वेदात ‘गावसभा’ या प्राचीन संस्थेचा उल्लेख आढळतो
· ‘मनुस्मृती’ व ‘नारद्स्मृती’ या ग्रंथाद्वारे स्थानिक प्रशासन म्हणून कार्यरत ‘न्यायपंचायत’ चा उल्लेख आढळतो.
· दक्षिण भारतातील ‘चोल’ या राजघराण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाना प्रोत्साहन दिले.
· ब्रिटीश भारतातील पहिला मुनिसिपल कायदा १८४२ (बंगाल प्रांत)
· १७९३ च्या चार्टर अॅक्टनुसार भारतातील या भागात पालिका संस्थांची स्थापना – मुंबई, मद्रास, बंगाल
· बंगाल प्रांतासाठी मंजूर झालेला म्युनिसिपल कायदा संपूर्ण भारतासाठी लागू – १८५०
· १८७० साली आर्थिक सत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हाती सोपविण्यासाठी कायदा केला – लॉर्ड मेयो
· लॉर्ड रिपन यांनी २८ मे १८८८ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला. त्यामुळे त्यांना म्हणतात – स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक
· ‘पंचायतराज’ हे स्वप्न बाळगणारे – महात्मा गांधी
· पंचायतराज स्वीकारणारे पहिले राज्य – राजस्थान (२ ऑक्टोबर १९५९)
· पंचायतराज द्वारे भारतातील पहिली ग्रामपंचायत – नागोर जिल्ह्यात (राजस्थान)
· पंचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र –९ वे राज्य