महाराष्ट्रातील जिल्हे – गोंदीया

२३. गोंदीया

क्षेत्रफळ : ५४२४ चौ.कि.मी.

मुख्यालय : गोदीयाशहर.

साक्षरता : ८५.४१%

लोकसंख्या : १३,१२,३३१.

हवामान : विषम.       

पर्जन्यमान : १४०० मि.मी.

तापमान : हिवाळ्यात ८ अंश ते १० अंश पर्यत उन्हाळ्यात ४० अंश ते ४६ अंश से पर्यत.

नद्या : वैनगंगा, गाढवी, वाघ, चुलबंद.

पर्वत : गाविलगड.

शेजारी जिल्हे : भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, मध्यप्रदेश, छत्तीसगड.

तालुके : मोरगाव, अर्जुनी, गोंदिया, तिरोडा, देवरी, सडकअर्जुनी, गोरेगाव, आमगाव, सालकसा.

धार्मिक ठिकाणे : शिवमंदिर, शिखांचे गुरुद्वार, प्रतापगड.

ऐतिहासिक ठिकाणे : गोंदीया, तिरोडा, सडकअर्जुनी, सालेकसा.

औद्योगिक ठिकाणे : गोंदीया, सडकअर्जुनी, तिरोडा.

किल्ले : प्रतापगड.

नगरपालिका : गोंदीया, मोरगाव, देवरी, आमगाव.

पंचायतसमित्या : ७. 

विधानसभा मतदार संघ : गोंदीया, गोरेगाव, आमगाव, देवरी, अर्जुनी.

लोकसभा मतदार संघ : गोंदीया.

रेल्वे स्थानके : गोंदीया.

टोपण नावे : विदर्भाचा अकरावा जिल्हा.

वनविषयक : जिल्हयातील भरपुर प्रमाणात वनक्षेत्र असुन या ठिकाणी नागझिरा व नवेगाव बाध अभयारण्य आहे. जिल्ह्यातील वनात तेंदू, साग, धावडा, बेहडा, पळस, कडुलिंब याशिवाय इतर औषधी वनस्पती आढळुन येतात. जंगलामध्ये वाघ, चित्ते, बिवटे, ससे, माकडे, अस्वले, रानकुत्रे, कोल्हे, लांडगे, तरस, हरिणे, काळवीट, निलगायी, मोर, साळुंखी, कबुतरे, घुबड, गिधड, खंडया, कोकीळ या प्रकारचे पशु-पक्षी आहेत.

शेतीविषयक : गोंदीया जिल्ह्यातील बरीचशी शेती ही मान्सुनच्या पाण्यावर अवलंबून असते. जिल्ह्यामध्ये भाताचे व कापसाचे विक्रमी पीक घेतले जाते. याशिवाय ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन तुर ही पिके सुध्दा घेतली जातात.तसेच संत्री, मोसंबीच्या बागा जिल्ह्यात आहेत.

गोंदीया : हे जिल्हयाचे ठिकाण असुन हा महाराष्ट्रातील ३५ वा जिल्ह्या आहे. गोंदीया हे मुंबई कोलकत्ता रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे जंक्शन असुन भारतातील कोणत्याही ठिकाणी प्रवासी येथुन जावू शकतात. येथील गुरुद्वारा शीख भक्ताचे धार्मिक ठिकाण असुन असंख्य शीख बांधव या ठिकाणाला भेट देतात.

                   गोंदीया या ठिकाणी भात गिरण्या, लाकुड उद्योग, विडी उद्योग, अगरबत्ती उद्योग भरपुर प्रमाणात चालतात. गोंदीया या ठिकाणी आमगाव हे तालुक्याचे ठिकाण असुन श्रेष्ठी साहित्यीक व प्रसिद्ध संस्कृत नाटककावर भवभूती याच्या स्मारकासाठी हे गाव महाराष्ट्रात ओळखले जाते.

सडक अर्जुनी : हे गोंदीया जिल्ह्यातील एक तालुका असुन बाबूंच्या कलात्मक वस्तूसाठी प्रसिद्ध आहे.

अर्जुनी मोरगाव : हे तालुक्याचे ठिकाण असुन जिल्ह्यातील हा तालुका अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे.

अर्जुनी येथुन जवळच नवेगाव बांध या ठिकाणी डॉ. सलीम आली पक्षी अभयारण्य जाते. येथील अभयारण्यात नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान आहे. हे पक्षी अभयारण्य असल्यामुळे येथे देशी-विदेशी असंख्य पक्षाच्या जाती आढळुन येतात. तसेच या अभयारण्यात वेगवेगळे प्राणी सुद्धा आहेत व अभयारण्यात जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव असुन सात टेकड्यात मध्यभागी हा तलाव आहे. तलावाच्या मध्यभागात मालडोंगरी नावाचे सुंदर बेट आहे. अर्जुनी येथुन प्रतापगड नावाचा शिवकालीन प्राचीन किल्ला आहे. तसेच येथे महादेवाचे शिवकालीन शिवमंदिर असुन हे मंदीर खुप जुने व जागृत आहे.

गोरेगाव : हे गोंदीया जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण असुन तालुक्यात नागझिरा या ठिकाणी वन्यप्राण्याचे अभयारण्य आहे.

तिरोडा : हे तालुक्याचे ठिकाण असुन धान्य मार्केट व धान्यगिरण्यासाठी प्रसिद्ध आहे. या शिवाय तिरोडा या ठिकाणी लाकूडकटाई, बनविण्याचे उद्योग मोठया प्रमाणात चालतात.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *