महाराष्ट्रातील जिल्हे – गडचिरोली

२० . गडचिरोली

क्षेत्रफळ : १४,४१२ चौ.कि.मी 

मुख्यालय : गडचिरोली.

साक्षरता : ७०.५५%.

लोकसंख्या : १०,७१,७१५.

हवामान : उष्ण व कोरडे काही भागात आर्द्र.

तापमान : हिवाळ्यात ८ अंश ते १५ अंश उन्हाळ्यात 45 अंश ते ४६ अंश से. पर्यत.

पर्वत : गाविलगडच्या डोंगररांगा.

तालुके : अहेरी, सिरोंचा, किटची, चामोर्टी, धानोटा, कुटखेडा, आटमोरी, एटापल्ली, भामरागड, मुलचैत, देसाईगंडा, गडचिरोली, गोदावरी, द्रीवती, वैनगंगा.

अभयारण्य : चपराळा अभयारण्य.

ऐतिहासिक ठिकाणे : वैरागड, बामरागड.

धार्मिक ठिकाणे : काळेश्वर मंदीर, चपराळयाचे हनुमान मंदीर, शैवमंदीर.

औद्योगिक ठिकाणे : गडचिरोली.

नगरपालिका : गडचिरोली, धानोरा.

पंचायात समित्या : १२.

विधान सभा मतदार संघ : गडचिरोली, अहेरी, दानोरा, आटमोरी, शिरोंचा.

लोकसभा मतदार संघ : गडचिरोली.

शेजारी जिल्ह्ये : चंद्रपुर, गोदिया, छत्तीसगड, आंध्र प्रदेश राज्ये.

टोपण नावे : जंगलाचा जिल्ह्या.

वने : जंगलामध्ये वाघ, चित्ते, सांबरे, हरणे, वनगायी, हत्ती, माकडे, ससे, तसेच मोर विविध पक्षी,फुलपाखरे आढळतात. महाराष्ट्रातील सर्वात जास्त जंगल असलेला जिल्ह्या म्हणुन गडचिरोली ओळखले जाते. जिल्ह्यामध्ये कटापल्ली, अहेरी, धानोल शिरोचा येथे सर्वाधिक जंगल आढळते. येथील जंगलात साग, धावडा, पळस, निंबू, बांबू, आंबे, तेंदू, टेंभुर्ली, बोरे, करवंदे यांची झाडे विविध काटेरी झुडपे आढळतात.

शेती : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी कापुस, ज्वारी, बाजरी, भात, सोयाबीन व सिंचनक्षेत्रात गहु, हरभरा हि पिके घेतली जातात.

अहेरी : अहेरी येथे शिव,हनुमान, विठोबा यांची देवस्थाने आहेत. येथील दसरा महोत्सव हा पाहण्यासारखा असतो. दसऱ्याला येथे शिवमुर्तीची मिरवणुक काढुन विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

आरमोरी : येथे गोंड राज्याची पुर्वी सत्ता केंद्र होती. येथे गोंड राजाने बांधलेले त्रिदल पद्धतीचे शिव मंदिर आहे. रेशिम उद्योगात आरमोटी हे शहर खुपच प्रगत आहे. हे धातुच्या व लोखंडाच्या वस्तुसाठी प्रसिद्ध आहे.

भामरागड : हे तालुक्याचे ठिकाण असुन येथील त्रिवेणी संगम खुप प्रेक्षणीय आहे. इंद्रावती पर्लकोटा व पामुलगौतम या तीन नद्यांचा संगम येथे झालेला आहे.

चपराळा : हनुमानाच्या मंदिरासाठी चपराळा हे ठिकाण प्रसिद्ध आहे. चपराळा येथे अभयारण्य व प्रशांत धाम हे प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.

गडचिरोली : हे जिल्ह्याचे ठिकाण असुन हा जंगलाचा जिल्ह्या म्हणुन ओळखला जातो. जिल्ह्यामध्ये घनदाट जंगल असल्यामुळे या जंगलामध्ये नक्षलवादी आढळुन येतात. शहरात सर्व धर्माचे मंदीरे असुन धान्य बाजार व जिनिंग प्रेसिंग मिल आहे. जिल्ह्यामध्ये चपटाळा या ठिकाणी अभयारण्य आहेत. जिल्ह्यामध्ये भामरागड, वैरागड, देसाईगंज या ठिकठिकाणी प्राचीन किल्ले आहेत.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *