महाराष्ट्रातील जिल्हे-कोल्हापूर

१. कोल्हापुर

क्षेत्रफळ : ७६८५ चौ. कि.मी.

मुख्यालय : कोल्हापुर.

साक्षरता : ८२.९०%                                        

लोकसंख्या : ३८,७४,०१५.

हवामान : थंड.

तापमान : हिवाळयात १० अंश ते १४ अंश से पर्यत उन्हाळयात ३२ अंश ते ३६ अंश से पर्यत.

पर्वत : सह्याद्री, ज्योतिबा.

नद्या : कृष्णा, पंचगंगा, दुधगंगा, भोगावती, वारणा, वैदगंगा.

तालुके : गगनबावडा, हातकंगले, राधानगरी, गडहिग्लज, शाहुवाडी, करवीर, भूदगड, चंदगड, पन्हाळा, कागल.

शेजारी जिल्ह्ये : सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कर्नाटक राज्य.

प्रशासकीय विभाग : पश्चिम महाराष्ट्र, पुणे विभाग.

पिके : उस, तंबाखू, भुईमुग, मिरची, ज्वारी, आद्रक, गहू, भाजीपाला, भात.

फळे : आंबा, फणस.

धार्मिक ठिकाणे : महालक्ष्मी मंदीर, अंबादेवी मंदीर,जलमंदिर, संभाजी मंदीर, ज्योतिबा, बाहुबली, नृसिंह मंदीर, केदारेश्वर मंदीर, रामलिंग.

ऐतिहासिक ठिकाणे : पन्हाळा, कागल, इचलकरंजी, संभाजी नगर, करवीर, गडहिग्लज.

थंड हवेचे ठिकाण : पन्हाळा.

महानगरपालिका : कोल्हापुर महानगपालिका.

नगरपालिका : कात्रज, इचलकरंजी, हातकंगले, गगनबावडा, आजरा, गडहिग्लज.

पंचायत समिती : प्रत्येक तालुक्याला एक एकूण १२.

लोकसभा मतदार संघ : कोल्हापुर, इचलकरंजी.

विधानसभा मतदार संघ : कोल्हापुर, कागल, गगनबावडा, हाताकंगले, राधानगरी, गडहिग्लज, करवीर, चंदगड, पन्हाळा, शाहुवाडी(मलकापुर).

रेल्वे स्थानक : कोल्हापुर, इचरकरंजी.

विद्यापीठ : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुर.

औद्यागिक क्षेत्र : कोल्हापुर, इचलकरंजी, कागल.

टोपण नावे : कुस्तीगिरांचे मैदान, गुळाचा जिल्हा.

साखर कारखाने : कागल, पन्हाळा, चंदगड, मलकापुर, राधानगरी, कोल्हापुर, इचलकरंजी.

किल्ले : भुदरगड, गगनगड, गधर्वगड, पन्हाळा, कलनिधीगड, पारगड, पावनगड, रांगमा, सामानगड, महिपालगड, पारगड.

वनक्षेत्र : जिल्ह्यामध्ये पन्हाळा, शाहुवाडी, चंदगड या भागाला तसेच गगनबावडा व हातकंगले या तालुक्याचे बऱ्यापैकी जंगल आहे व राधानगरी या ठिकाणी अभयारण्य आहे. येथील वनात साग, बाबु, चंदन, खैर, किजळ, दालचिनी, जांभूळ, करवंदे या वनस्पती जास्त प्रमाणात आढळून येतात. जंगलामध्ये वाघ, चित्ते, ससे, माकडे, रानडुक्कर, भेकरे, अस्वले, मोये,  चिमण्या, कावळे, साळुंखे, पोपट, पारवे, मैना, खंड्या हे पशु-पक्षी बऱ्यापैकी आढळून येतात.

शेतीविषयक : महाराष्ट्र राज्यातील कोल्हापुर जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत समाधानी समजला जातो. येथील शेतकरी कष्टकरी असुन निसर्ग सुद्धा येथेच अवतरला आहे. पावसाच्या पाण्यावर कोल्हापूर जिल्ह्यात भातशेती सर्वाधिक केली जाते. तसेच ज्वारी, नाचणी, बाजरी, मका, भुईमुग, उस, भाजीपाला, तंबाखूचे पिक घेतले जाते.

जिल्ह्यातील प्रमुख शहरे व ठिकाणे :

कोल्हापुर : हे जिल्ह्याचे मुख्यालय असुन ऐतिहासिक काळात हे राजधानीचे शहर म्हणुन ओळखले जायचे. कोल्हापुर शहराचे जुने नाव करवीर नगर हे होते. तसेच कोल्हापुर जिल्ह्याला कुस्तीगीराचा जिल्हया म्हणुन सुद्धा ओळखले कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेले “खासबाग” हे मैदान शहरातच आहे.कोल्हापुर हे महाराष्ट्रातील महानगरापैकी एक महानगर आहे. तसेच शहरात पुणे-बँगलोर रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानक आहे. कोल्हापुर रेल्वे स्थानकापासून जवळच श्री महालक्ष्मी मंदीर आहे. हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. कोल्हापुर हे महाराष्ट्रातील चित्रपट व्यावासायाचे प्रमुख केंद्र असुन येथे चित्रनगरी आहे. कोल्हापूरच्या संस्थानिकांनी बांधलेले वाडे, राजवाडे, इमारती शाहू महाराज यांनी निर्माण केलेल्या वास्तू, तसेच बंगले हे कोल्हापूरचे वैभव समजले जाते. कोल्हापुर पासून जवळच पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण असुन पन्हाळगड हा डोंगरी किल्ला येथे आहे. किल्यावर संभाजी मंदीर, अंबाबाई मंदीर जलमंदिर आहे.

इचलकरंजी : हे तालुक्याचे एक ठिकाण असुन एक औद्योगिक शहर आहे. या ठिकाणी कापसाची बाजारपेठ सूतगिरण्या आहे. तसेच इचलकरंजी येते एक औद्योगिक वसाहत आहे. जिल्ह्यातील कोल्हापुर नंतरचे हे दुसरे मोठे शहर आहे.

ज्योतिबा : कोल्हापुर जिल्ह्यातील ६०%लोकांचे ज्योतिबा हे कुलदैवत आहे. येथे केदारनाथ, रामलिंग, व ज्योतिबा ही तीन मंदिरे असल्यामुळे जिल्ह्यातील हे दक्षिणकाशी म्हणुन ओळखले जाणारे धार्मिक क्षेत्र आहे.ज्योतिबा येते दरवर्षी मोठी यात्रा भरत असून असंख्य भाविक येथे दर्शनासाठीय येतात.

कागल : हे तालुक्याचे ठिकाण असुन महारष्ट्र व कर्नाटक सीमेवरील हा तालुका आहे. या ठिकाणी औद्योगिक वसाहत आहे तसेच कागल हा तालुका दुग्धव्यवसायत खुप प्रगत आहे येथील कागल दुध हे संपूर्ण  महारष्ट्रात प्रसिद्ध आहे.

पन्हाळा : हे तालुकाचे ठिकाण असुन जिल्ह्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. हे कवी मोरोपंताचे गाव म्हणुन ओळखले जाते. या ठिकाणी संभाजी मंदिर, अंबाबाई मंदिर, रामचंद्रपंत आमात्यसमाधी, भवानीमातेचे मंदिर, दत्त मंदिर,गणपती मंदीर आहे. पन्हाळा येथून जवळच पन्हाळगड हा प्रसिद्ध किल्ला आहे. हा किल्ला शिलाहार राजा भोज याचे राजधानीचे ठिकाण होता नंतर १६५९ साली छ. शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सर करून घेतला. पन्हाळा किल्यात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या असुन संभाजी राजांनी जास्त काळ याच किल्यावर वास्तव केले होते, आजही पन्हाळा गड हे कोल्हपुर चे एक वैभव म्हणुन ओळखले जाते.

शिरोळ : हे तालुक्यातील ठिकाण असुन येथून जवळच नृसिंहवाडी हे ठिकाण आहे. हे एक तीर्थक्षेत्र असुन महाराष्ट्रातील तीन दत्त स्थानांपैकी एक आहे. याच ठिकाणी पंचगंगा व कृष्णा या नद्यांचा संगम झालेला आहे.

बाहुबली : जैन धर्मियांचे हे तीर्थक्षेत्र असुन असंख्य जैन बांधव या ठिकाणी येतात.

चंदगड : हे तालुक्याचे ठिकाण असुन येथे तिल्लारी जलविद्युत प्रकल्प आहे.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *