महाराष्ट्रातील जिल्हे – अकोला

२५. अकोला

क्षेत्रफळ :५४२९ चौ.कि.मी.

मुख्यालय :अकोला

साक्षरता : ८६.५५%                     

लोकसंख्या : १८,१८,६१७.

हवामान: उष्ण कोरडे

तापमान : हिवाळ्यात ७ अंश ते १० अंश से पर्यत. उन्हाळ्यात ४५ अंश ते ५० अंश से पर्यत.

शेजारी जिल्हे : बुलढाणा, वाशिम, अमरावती.

नद्या : पुर्णा, काटेपुर्णा, पेठी, लोणार, उमा, पैनगंगा, निर्गुणा, मार्णा.

पर्वत : गाविलगड.

लेण्या : शैवलेणी

किल्ले :नर्नाळा,बाळापुराचा किल्ला.

प्रशासकीय विभाग : अमरावती ( विदर्भ ).

रेल्वे स्थान : जिल्ह्यामध्ये अकोला.

तालुके : अकोला, अकोट, तेल्हार, पातुर, बाळापुर, मुर्तीजापुर, बार्शी टाकळी.

प्रेक्षणीय स्थळे : नर्नाळा किल्ला.

धार्मिक स्थळे : राजराजेश्वर मंदीर, सतीमाता मंदीर, बालादेवी, नागास्वामी मंदीरपद्मप्रभुस्वामीचे श्वेतांबर जैन मंदीर,

ऐतिहासिक ठिकाणे : बाळापुर, अकोला, नर्नाळा.

टोपण नाव : अकोलसिंग राज्याचा जिल्हा.

विधान सभा मतदार संघ: ५.

नगरपालिका : अकोट, बाळापुर, मुर्तीजापुर, बार्शी टाकळी.

महानगरपालिका : अकोला शहर.

विद्यापीठ : पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला.

वनक्षेत्र :अकोला जिल्हामध्ये पाणी पाऊस कमी असल्यामुळे येथे जंगलाचा फारसा विकास झालेला नाही. तरी सुद्धा येथील जंगलामध्ये साग, बेहडा, धावडा, बांबू, आंबे, बाभुळ, काटेरी झुडपे तसेच रोशा नावाचे गवत सापडते. जंगलामध्ये हिस्र पशु-पक्षी फारच कमी प्रमाणात आहे.

शेतीविषयक : येथील शेतकरी फारच कष्ट करतात. पाऊस वेळेवर पडत नसल्यामुळे शेती फारशी पिकत नसते. मान्सुनच्या पाण्यावर येथी शेती अवलंबुन आहे. ज्वारी कापुस हे येथील शेतकऱ्याचे मुख्य पीक आहे. याशिवाय सोयाबीन, मका, तीळ, तुर, मुग, उडीद, भुईमुग, येथील शेतकरी पिकवत असतो. थोड्या फार प्रमाणात संत्री-मोसंबीच्या बागा जिल्ह्यामध्ये आढळतात. धरणे-कालव्याच्याजवळ भाजीपाल्याची शेती केली जाते. जिल्ह्यामध्ये कापसाचे पीक विक्रमी असल्यामुळे मुर्तीजापुर, बाळापुर, अकोट, टोल्हाटा, हिवरखेड येथे मोठ्या प्रमाणात कापुस खरेदी केंद्र आहे.

प्रमुख स्थळे व शहरे :

बाळापुर : बाळापुर देवीच्या मंदिरामुळे शहराला बाळापुर असे नाव आहे. औरंगाजेबाची पुर्वी बाळापुर येथे मोटी वचक होती. बाळापुर येथे औरंगजेबाच्या मुलाने किल्ला बांधला होता. औरंगाजेबाची येथे सैन्याची एक मोठी तुकडी होती. येथील कारभार मिर्झाराजे जयसिंग पाहत असे मिर्झाराजे जयासिंगाची छत्री व येथील किल्ला प्रेक्षणीय आणि पाहण्यासारखे आहे. बाळापुर तालुक्यातील पारस या ठिकाणी औष्णिक विजनिर्मिती केंद्र आहे.

अकोला : विदर्भातील महत्वाचे महानगर असुन जिल्ह्यातील मुख्यालय अकोला शहरातच आहे. सुती कापडाच्या व्यापार येथे मोठया प्रमाणात चालतो. येथे कॅन्सरवर उपचारासाठी संत तुकाराम महाराज कर्करोग उपचार हॉस्पिटल आहे. तसेच आकाशवाणी व दूरदर्शनचे उपकेंद्र अकोला येथे आहे. मुंबई-कोलकत्ता रेल्वे मार्गावरील रेल्वे जंक्शन अकोला येथे आहे. पंजाब राव देशमुख कृषी विद्यापीठाचे मुख्यालय अकोला येथे आहे. येथील जैन मंदीर, राजराजेश्वर मंदीर, सतीमाता मंदीर, खूप प्रेक्षणीय व प्राचीन आहेत.

नर्नाळा : गाविलगड या डोंगरामध्ये असणारा हा किल्ला वनदुर्ग प्रकारातील असुन किल्ल्याला २७ दरवाजे आहेत. किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ २२ चौ.कि. एवढे विक्रमी आहे. विदर्भातील प्रेक्षणीय किल्ला असुन सध्या हे नर्नाळा अभयारण्य म्हणुन ओळखले जाते. हा किल्ला राजा बह्ममानी याने बांधला आहे.

पातुर : अकोला जिल्ह्यातील पातुर हा एक तालुका असुन पातुर गावाजवळच वाकाटकालीन शैवलेणी आहे. पातुर येथील सिधाजीबुवा यांची जत्रा खूप प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील भरपुर यात्री येथे येतात. चंदन व सागाच्या लाकडासाठी पातुर शहर प्रसिद्ध आहे.

मुर्तीजापुर : तालुक्याचे ठिकाण असुन मुंबई-कोलकत्ता रेल्वे मार्गावरील महत्वाचे जंक्शन असुन येथे संत गाडगेबाबा आश्रम आहे. तसेच ह.भ.प. पुंडलिक महाराज यांची समाधी मुर्तीजापूर या ठिकाणी आहे. तसेच येथे कापुस संशोधन केंद्र व कापुस जिनिंग प्रेसिंग मील आहे.

अकोट : हे तालुक्याचे ठिकाण असुन या ठिकाणी सतरंज्या व गोण्या प्रसिद्ध आहे. अकोट या ठिकाणी कापुस खरेदी-विक्री केंद्र व कापुस जिनिंग प्रेसिंग मिल आहे व वनस्पती तेलाचे कारखाने अकोट या ठिकाणी आहे.

Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *